राजकारणातील घडामोडींकडे लक्ष ठेवणार्यांसाठी एक हलकाफुलका विरंगुळा !
----------------------------------------------------------
त्याला जरा रागवा ना बाई
तो काही माझे ऐकत नाही…
घर बदलले दार बदलले
मी सारे आधार बदलले
तो काही माझे पाहत नाही
बहीणाबाईंच्या स्मृतीला अभिवादन करुन ....
देव अजब गारोडी
त्याचं न्यारचं तंतर
गर्भातले जीवात
तो फुकतो मंतर
जे दिलं त्यानं दान
म्हणु नये त्याला शाप
नख लावु नये बाळा
लई मोठं गं हे पाप
काळ्जाच्या तुकड्याचे
कसं सोसतील हाल
शस्त्रांच्या जोरावर जर
क्रांती झाली असती तर
आज विश्वाला महात्म्यांची गरज का होती ?
रक्ताच्या नदीतून जर
शांतीचे नंदनवन फुलले असते तर
आज विश्वाला शांतिदूताची गरज का होती ?
क्षेपणास्त्रांच्या प्रकाशाने जर
आकाश उजळले असते तर
ह्रुदयातुनि या माझ्या
आहे तुझीच साद
तुझे रुप पाहाणे हा
जडला असे मझ नाद
ह्रुदयातुनि या माझ्या
आहे तुझेच ध्यान
भाग्यवान मी अशी रे
मज मिळे तव प्रेम्रुपि ज्ञान
ह्रुदयातुनि या माझ्या
आहे तुझेच प्रतिबिम्ब
मम मानसी असे रे
अवचित बरसला श्रावण, खुदकन तु हसावी तसा
चिंब भिजवुन दडला श्रावण, लटिके तु रुसावी तसा
सर अल्ल्ड धावत येई, रिते होती अमृतकुंभ
सर तुझी कशासच नाही, नाही कुणात हे प्रतिबिंब
असा धरेस बिलगे श्रावण, हितगुज तु सांगावे तसा
अक्षरांच्या जोडीला
आज मन गं तुझे
मोत्याच्या ओळीला
जणू सोनं गं तुझे
तुझ्या कानातली
फुलं नक्षत्रांची
केसांत माळली
वेलांटी चंद्राची
अनुस्वारांचे हिरे
तुझ्या गं बिंदीत
दंडात घट्ट तुझ्या
रुतले सोनेरी उकार
कपाळीचा गोंद
एकन एक कवितेचा छाप
उमटायलाच हवा वहीच्या पानांवर
असा अट्टहास कशाला?
काही कवितांची उतरू द्यावी नक्षी
फक्त मनाच्याच कॅनव्हासवर...
काही संवेदनांच्या शुभ्रफुलांनी
उजळु द्यावा गाभारा खोलवर...
प्रत्येक वेळी त्यांना टोकं करुन
कळत न कळत
वेणि विणताना तिने
सुगंधी फुलांसवे
माझे मन हि गुंफले
अबोल श्वास माझे
अस्फुट स्मित तिचे
वाचेगुजहि माझे मनिचे
शब्दही मुक होति
फुकेच काय निति
नजरेनेच कळली प्रिति
तिच्या निलनयनी
चिंब सदेह मन दोन्ही

असाच वारा माळावरती वेध घेत शर वहात होता
शहराच्या कुंठित पटलावर मळभ धुळीचे पहात होता
कुशीत हिरवळ धूर मनातिल कौल छेदुनी मिरवत होता
रम्य अंबरावरती चातक सावलीस कुरवाळत होता
स्वप्नं तुझे पाहाता
स्वप्नांत जागलो मी,
धुंद त्या प्रितीत
बेधुंद वागलो मी.
स्वप्नांत सत्य होते
सत्यात स्वप्नं होते,
माझे मला कळेना
अर्धसत्यात गुंतलो मी.
हे माझे जीवन गाणे
गाण्यातच जीवन जगणे,
शोधु नकाच कोठे
शब्दात हरवलो मी.