मी अंगार होतो जेव्हा ?
धगधगत्या उर्जेतही
बिलगुन मजला राहिली....
मी वादळ होतो जेव्हा ?
थरथरत्या शिडावर
निशाण बनून राहिली....
मी पाऊस होतो जेव्हा ?
सळसळत्या अंगावरी
तू खिदळत राहिली....
.....
मी अंगारा झालो जेव्हा !
माझ्या राखेच्या
हा सांज गारवा....हा सांज गारवा
छेडे अंतरात, हळुवार मारवा
छत, भिंती सोबती, भरभरून बोलती
सावलीतल्या खुणा, मुक अबोल ऐकती
झेलू किती ? कसा ? बरसत्या आठवा... हा
कधी मी तुझ्या सवे, कधी मी तुझ्या सयी
गुणगुणतो गीत हे, जीवनी तुझ्या लयी
म्रुत प्रणयाची शैय्या सजवून
त्यावरी लोळतो देह माझा
शव नखाने ओरबाडूनी
त्यावरी आनंदे खेळ्तो जीव तुझा
अर्धशून्य प्रहरात मिसळूनी
तांबडे रक्त निसटले नभाच्या ललाटी
इथेच घडल्या अतृप्त मनाच्या
कैक क्षणाच्या अवचित भेटी
काम कसे न करु दुसय्राला विचारु
कामचुकारांचा कल्पतरु बनेची गा // १ //
थोडे काम केले फुग्यासम फुगविले
लटकेच मोठ्याने बोले कीती केले // २ //
वाचाळता अंगी मोठी वार्ता करावी खोटी
लबाडीची हातोटी बाळगावी अंगी // ३ //
हळव्या पावसाळ्यात तो कोसळला
आणि मला माझ्यातला मी कळला
चालता चालता येळकोट झाला
आभाळातल्या ओघळाला
आणि एक ओहळ मिळाला
..................अज्ञात
१२९८,नाशिक
काल धुवाधार पाऊस होता
हिरवळलेल्या डोंगरमाथ्यावर
मी आणि ओघळणार्या थेंबांशिवाय
कोणीच नव्हतं
वाटेवरची माती एक हुळहुळत होती
चिखल गार्यात
अंगावरचे ठसे मोजत
गार वार्यात
..................अज्ञात
१२९९,नाशिक
शोधु नको मला माझ्या मध्ये अता
त्या पुर्वीच्या माझियाचि केली मी सांगता
प्रतिबिंब दर्पणातील आहे अनोळखी
परतुन मी पहातो भलताच कोण दिसता
काही खुणा पुराण्या अजुनी राहीलेल्या
सुकल्या फुलामधुनी जाणवतो गंध नसता
फार कमी झालाय
आता नात्यांचा प्रवास
एका स्टेशन वर जुळला
तर दुसर्यावर तुटण्याचा त्रास
काहिच निरंतर नाहि
मग मन का जुळतात
कोणि प्रेम करत नसतांना
पाउल का त्यांच्या दारा कडे वळतात
ओझ म्हणुन कधि
वाहतात लोक नात
औपचारिकतेने अता
हिला गझल म्हणता येईल का ?? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा.
अंगणात पारिजात, खुष त्यात सत्यभामा
सवतीच्या घरी सडा, अजुनी पडे रे श्यामा
हे भाग्य द्रौपदीचे, फिरुनी पणास लागे
कौरव पांडवाचा, झाला करारनामा
एका धुंद मैफिलीत
त्याच्या तरूण गळ्यातून तयारीची सुंदर तान निघाली
आणि मला माझ्या वयाची जाणीव झाली
कार्यक्रमानंतर
मी त्याच्या पायावर डोकं ठेवलं,
तो चमकला आणि म्हणाला आहो हे काय करताय ?
मी म्हणालो,
योग्य तेच करतोय,