रिमझिम

उशीर

Submitted by रिमझिम on 11 September, 2013 - 19:48

"एकशे पंधरा रुपये" रिक्शा वाल्याने पुन्हा एकदा सांगीतले तशी तनया भानावर आली.

पर्स मधुन तिने पैसे काढुन त्याच्या हातावर ठेवले. आज नेहमीचेच ठि़काण तिला अनोळखी भासत होते. याच शहरात तर तिने तिच्या कॉलेजचे सोनेरी दिवस व्यतीत केले होते. याच ठीकाणी कित्येक मित्र मैत्रिणींचे वाढदिवस आणि नंतर एकेकांचे जॉब सुरु झाल्यावर सेलिब्रेशन केले होते.आणि याच ठिकाणी.... तिची आणि तेजस ची पहिली ओळख झाली होती.

शब्दखुणा: 

रिमझिम्म....!

Submitted by बागेश्री on 23 August, 2011 - 13:23

खट्याळपणे आपल्याच धुंदीत,
माझ्या छत्रीवर बरसणारा तू....
आणि 'पिया बसंती रे....' गुणगुणत
घराच्या दिशेने निघालेली मी......

मन निवांत असलं ना, की तुझी बरीच रुपं दिसतात, साठवता येतात.... लोभसवाणी, निव्वळ..!
बर्‍याच दिवसांनतर झालेली लाडकी जाणीव.....!!

काळाशार डांबरी रस्ता, मस्त ओला झालेला
त्यावरचे तुझे तुषार....
भरधाव गाड्याच्या पिवळ्या झोतांमुळे मोहक दिसणारे तुझे थेंब...!

हिरवीगार पाने, त्यावरची ओल आणि रस्त्यांच्या कडेच्या लाईट्समुळे त्यावर
उतरलेली चमक.....

गढूळ पाण्याचे इवले-मोठे डबके,
त्यात तू धरलेला नाद!

सगळं कसं ल-य-ब-द्ध!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रिमझिम...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 8 June, 2011 - 13:47

रिमझिम रिमझिम पाउस यावा,मन आनंदावे ।
अलगद नवथर सूर फुलावा,मी गाणे गावे ।

अविरत पडत्या जलधारांचा गगनी ओलावा,
शब्द तयांचा सर्वस्वाच्या कानी झेलावा ।

झऱ्यास यावा तारुण्याचा फिरुनि नवा जोष ।
धरेस गात्रा-गात्रांमधुनी व्हावा संतोष ।

श्याम घनांची भरून जत्रा, गडगड कल्लोळ,
निसर्गदेवा आर्तिक्याचा तडित्प्रभालोळ ।

कुणी नसावे रिते, पोरके, एकाकी कोणी
सनाथ व्हावे धरा, वने, खग, अन् सारे प्राणी ।

उत्साहाचा होवो उत्सव, आंदण सौख्य मिळो,
नसोत चिंता-क्लेश कुणाला, सकलहि दुःख जळो ।

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रिमझिम