मी निसर्ग आहे, ती शाश्वत आणि सतत विकसित होणारी शक्ती जी जीवनाच्या या विशाल पटलाला एकत्र गुंफून ठेवते. माझी कथा पर्वतांच्या घड्यांमध्ये, वाऱ्याच्या कुजबुजीत आणि महासागरांच्या गर्जनेत लिहिलेली आहे. मी प्राचीन आणि नवीन दोन्ही आहे, जन्म, वाढ, ऱ्हास आणि पुनर्जन्म या चक्रातून मी अविरतपणे फिरत राहते.
आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच!, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत काढायचा. त्याला पाठीवर घेऊन साधूच्या होमकुंडाच्या दिशेने निघायचा. रस्त्यात त्या प्रेतात बसलेल्या पिशाच्चाने त्याला गोष्ट सांगायची, विक्रमादित्याने उत्तर दिलं नाही, तर डोक्याची शंभर शकलं होतील अशी भीती घालायची. आणि उत्तर दिलं की मात्र मौन भंगल म्हणून प्रेतासह परत झाडावर जाऊन लटकायचं. असा 'चीत भी मेरी, और पट भी' चा पिशाच्ची खेळ सुरु होता.
प्रस्तावना
आज पर्यावरणात अनेक ठिकाणी उद्रेक होताना दिसतात. देशामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पसरला आहे, पहाडामध्ये वणवे पेटत आहेत आणि संपूर्ण जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे लँडस्लाईड. आपल्या देशाच्या संदर्भात दुष्काळाची समस्या अगदी गंभीर स्थितीत आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, ह्या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो? ह्या विषयावर आपल्याशी बोलू इच्छितो. आजवर ह्या विषयाबद्दल जे समजून घेतलं ते आपल्याला सांगू इच्छितो.