यश

प्रवास यशाकडचा!

Submitted by पराग र. लोणकर on 13 April, 2020 - 04:50

अवास्तव स्वप्नांच्या विश्वात
मी कधी वावरलोच नाही
वास्तवाचे भान माझ्या
मी कधी विसरलोच नाही

मर्यांदांची जाण माझ्या
सदा ठेवुनी मनी
प्रयत्नांची कास माझ्या
मी कधी सोडलीच नाही

असंख्य आली अपयशे
झाल्या अनेक उपेक्षा
यशाची त्या आस माझ्या
मी कधी गमावलीच नाही

दीर्घ अशा या प्रवासात
झाल्या अनेक जखमा
चिकाटीच्या औषधाने
त्या भरल्यात आता

ठेवलेल्या संयमाची
दिसू लागलीत फळे
जागोजागी दिसू लागलेत
आता यशाचे मळे...

***

शब्दखुणा: 

आउटलायर:पुस्तक परिचय

Submitted by अश्विनी कंठी on 3 April, 2016 - 21:27

आपण आपल्या आजूबाजूला लोकांना आयुष्यात यशस्वी झालेले पाहतो आणि त्यातल्या कित्येकांचे वर्णन ‘स्वकर्तृत्वावर पुढे आलेला’ असे ऐकतो. परंतु यशस्वी होण्याकरता हुशारी आणि कर्तुत्व सोडून इतरही अनेक घटक कारणीभूत असतात असे माल्कम ग्लाड्वेल या लेखकाला वाटते. या इतर ‘अदृश्य’ घटकांचा शोध त्याने त्याच्या ‘आउटलायर’ या पुस्तकामधून घेतला आहे. लेखकाच्या मते यशस्वी होण्याकरता ‘हुशारी’ हा जरी मुलभूत घटक आवश्यक असला तरी एका ठराविक टप्प्यानंतर, बुद्धी आणि यश यांचा संबंध नसतो. नाहीतर प्रत्येक हुशार माणूस यशस्वी झाला असता.

Subscribe to RSS - यश