मायबोली गणेशोत्सव २०१५

'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.२ : ब्रह्मघोटाळ्याचे पराठे बदलून मटर पराठे

Submitted by sonalisl on 25 September, 2015 - 21:41

मूळ घटक '१०-१५ कोवळी तोंडली' बदलून 'वाटीभर फ्रोझन मटर' घेतले आहे.

लागणारा वेळ:
४० मिनिटे

लागणारे घटक -

१) वाटीभर मटर
२) एक कांदा
३) ७-८ लसूण पाकळ्या
४) २ हिरव्या मिरच्या (ऐच्छिक)......तिखटपूड असल्यामुळे ईच्छा नव्हती
५) १०-१२ काड्या कोथिंबीर
६) डावभर तेल
७) अर्धी वाटी डाळं
८) अर्धी वाटी शेंगदाणे
९) पाव वाटी तीळ
११)१ मोठा चमचा धणेपूड
१२) १ लहान चमचा हळद
१३) १ लहान / मोठा चमचा तिखटपूड
१४) १ मोठा चमचा आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळ........मी आमचूर पावडर वापरली.

विषय: 

अरंगेत्रम् नृत्याविष्कार - गणेशवंदना

Submitted by संयोजक on 22 September, 2015 - 23:52

नमस्कार!

मायबोलीवर गणेशोत्सवात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असतात. यंदा अनेक कल्पक उपक्रमांसोबत आणखी एक नावीन्यपूर्ण कार्यक्रम, म्हणजेच नृत्याविष्कार सादर करताना संयोजक मंडळाला अतिशय आनंद होत आहे. हा कार्यक्रम आहे आपले मायबोलीकर दांपत्य सायली (सायलीकुल) व हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) यांच्या 'सुमनांजली' या भरतनाट्यम् नृत्यसंस्थेच्या अरंगेत्रम्‌चा! अरंगेत्रम् म्हणजे 'प्रथम रंगमंचीय सादरीकरण'. या कार्यक्रमानंतर भरतनाट्यम् शिकणार्‍या विद्यार्थ्यांना आपली कला रंगमंचावर सादर करण्याची परवानगी मिळते.

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव  २०१५