अरंगेत्रम् नृत्याविष्कार - गणेशवंदना

Submitted by संयोजक on 22 September, 2015 - 23:52

नमस्कार!

मायबोलीवर गणेशोत्सवात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असतात. यंदा अनेक कल्पक उपक्रमांसोबत आणखी एक नावीन्यपूर्ण कार्यक्रम, म्हणजेच नृत्याविष्कार सादर करताना संयोजक मंडळाला अतिशय आनंद होत आहे. हा कार्यक्रम आहे आपले मायबोलीकर दांपत्य सायली (सायलीकुल) व हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) यांच्या 'सुमनांजली' या भरतनाट्यम् नृत्यसंस्थेच्या अरंगेत्रम्‌चा! अरंगेत्रम् म्हणजे 'प्रथम रंगमंचीय सादरीकरण'. या कार्यक्रमानंतर भरतनाट्यम् शिकणार्‍या विद्यार्थ्यांना आपली कला रंगमंचावर सादर करण्याची परवानगी मिळते.

अनुजा, ऋतुजा, दीपिका व नेहा या सायली यांच्या विद्यार्थिनी सातत्यानं नऊ वर्षं 'सुमनांजली'मध्ये भरतनाट्यम् शिकल्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे हा कार्यक्रम समापन्न झाला होता.

त्यातील गणेशवंदना या भागाचे रेकॉर्डिंग गणेशोत्सवाचे औचित्य साधून मायबोलीकरांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजक मंडळ सायली व हिमांशु यांचे मन:पूर्वक आभारी आहे!

https://youtu.be/COHqA1tdTsI

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन व्हिडिओ पाहिला नाही. पण अतिशय चांगला उप्क्रम. आमची मुलगी (आणि तिच्या मैत्रिणी)५ वर्षापासून भरतनाट्यम शिकती आहे. दाखवते संध्याकाळी त्यांना.