मैत्री मेळघाट १०० दिवसांची शाळा

मेळघाट 'मैत्री शाळा' - २०१६-१७

Submitted by हर्पेन on 2 August, 2016 - 07:24

नमस्कार मंडळी !

सालाबादाप्रमाणे मेळघाटात मैत्रीच्या शिक्षण संदर्भातले काम चालू झाले आहे/ होत आहे त्याची माहिती देत आहे.

जून महिन्यामध्ये अमरावती येथे आपण गावमित्रांचे प्रशिक्षण व नियोजन शिबीर घेतले. त्या शिबीरात पुढील वर्षभर काय काय करायचे याची आखणी आपण केली. त्याच्या अभ्यासाचा भाग शोभाताईंनी तयार करून गावमित्रांना सांगितला व त्याप्रमाणे त्यांची तयारी करून घेतली.

मेळघाट 'मैत्री शाळा' - २०१५-१६

Submitted by हर्पेन on 4 September, 2015 - 03:03

सस्नेह नमस्कार! सालाबादाप्रमाणे मेळघाटात मैत्रीच्या शिक्षण संदर्भातले काम चालू होत आहे त्याची माहिती देत आहे.

मागील कामाचा आढावा :

गेली चार वर्षे मेळघाटामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांसाठी अभ्यासपूरक अनेक उपक्रम घेत आहोत. आपली त्यांच्याबरोबर चालू असलेली ही ‘मैत्रीशाळा’ च आहे. गावामधील थोडेसे शिकलेले तरुण, (प्रत्येकी एक ) ज्यांना आपण ‘गावमित्र’ म्हणतो, संपुर्ण शैक्षणिक वर्षात (जुलै ते एप्रिल) शाळा भरण्याच्या आधी मुलांना जमा करुन त्यांचे शाळेचे शिकणे सोपे व्हावे यासाठी काम करतात. काय काय करतात ते?

Subscribe to RSS - मैत्री  मेळघाट १०० दिवसांची  शाळा