मडका

रडका - करणी रात्री

Submitted by नीधप on 12 July, 2015 - 02:05

गंमत जंमत म्हणत म्हणत
करणी रात्री केली जाते
कविच्या बोटांना
कवितेची धार लागते

भळभळणार्‍या कविता
कश्या आवरू समजत नाही
डकौघाने नुसता
ट्यार्पी वाढत जाई

रडका - रात्री केलेल्या कवितांच्या करणीने रडणारा

(गुर्वाज्जींच्या शिकवणीचे पालन करायचे तर विसू देणे भाग आहे)
विसू - घ्या. हवेतर तिसू घ्या.

फडका

Submitted by टवाळ - एकमेव on 3 July, 2015 - 05:28

पुर्वी सुगंधीत गुलमोहोराला
हल्ली वास येतोय सडका
जागोजागी नव-कवीने
सांडून ठेवलाय तडका

करावा शब्दखेळ
हा तर कवींच्या हातचा मळ
अपूरे पडता प्रतिभाबळ
नव-कवीस भरला चळ

विशाल असेलही डोह
पण प्रतिभेवाचून कोरडा ठक्क
बहुतांनी समजावले तयाला
नव-कवी मात्र मख्खं

जुन्याच शाल-जोडीतला
हा एक तुकडा धडका
वाचविण्या गुलमोहोर
फिरला टवाळाचा फडका

- कविराज "नम्र टवाळ"

Subscribe to RSS - मडका