प्रबळ मेंदु - डावा की उजवा ?

Submitted by बाजिंदा on 9 January, 2016 - 10:58

वर्तमानपत्रात आलेल्या एका क्विझवरुन खालील प्रश्न लिहिलेले आहेत.
तुमचा कोणता मेंदु प्रबळ आहे हे खाली प्रश्नोत्तरावरुन ओळखता येऊ शकेल
१. तुम्ही नातेवाईकांशी , मित्रांशी वाद घालताना तुम्ही कुठ्ला मार्ग अवलंबता ?
अ. अवास्तव आणि कल्पित मुद्दे मांडता.
ब. तथ्य आणि डाटा वापरता.

२. जर तुम्हाला १ आठवड्याची परदेशात जाण्याची फुकट संधी मिळाली तर तुम्ही कोणाला बरोबर न्याल ?
अ. आईवडिलांना
ब. गफ्रे/ बॉफे / मित्र

३. तुमच्या ऑफीसमध्ये जर मतदान घेतलं तर तुमचे मित्र तुमचा उल्लेख कसा करतील ?
अ. सर्वांबरोबर मिसळणारी व्यक्ती
ब. एकलकोंडी व्यक्ती

४. सकाळी कपडे घालताना तुम्ही
अ. मनाला येईल ते कपडे घालता .
ब. आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे कपडे घालता.

५. एकाच वेळी जर तुमच्या हातात २ कामे असतील तर तुम्ही
अ. पहिलं काम संपवुन मग दुसर्‍या कामाला लागता.
ब. दोन्ही काम एकाच वेळी चालु करता.

६. जर तुम्ही दु:खांत असणारा सिनेमा पाहिलात तर
अ. गहिवरुन जाता
ब. मनाला जास्त लावुन घेत नाही .

तुमची उत्तरं अ मध्ये येतात की ब मध्ये येतात ह्याची नोंद करा , क्विझचा निष्कर्श ३-४ दिवसांनी देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारी उत्तरे धाडसी आहेत.

१. तुम्ही नातेवाईकांशी , मित्रांशी वाद घालताना तुम्ही कुठ्ला मार्ग अवलंबता ?
अ. अवास्तव आणि कल्पित मुद्दे मांडता. - जर विषयाची माहीती असेल (जी फार क्वचितच असते) तर अर्थातच ’ब’ मार्ग अवलंबतो. अन्यथा वादात जिंकण्यासाठी काहीही म्हणत दे ठोक बिनधास्त.
ब. तथ्य आणि डाटा वापरता.

२. जर तुम्हाला १ आठवड्याची परदेशात जाण्याची फुकट संधी मिळाली तर तुम्ही कोणाला बरोबर न्याल ?
अ. आईवडिलांना
ब. गफ्रे/ बॉफे / मित्र - अर्थातच गर्लफ्रेंड. आमच्यात तिलाच इंग्लिश बोलता येते.

३. तुमच्या ऑफीसमध्ये जर मतदान घेतलं तर तुमचे मित्र तुमचा उल्लेख कसा करतील ?
अ. सर्वांबरोबर मिसळणारी व्यक्ती - एकलकोंडेपणा हा शापासारखा असतो. ऑफिसात एकट्याने जेवण्यासारखे तर दुर्दैव नाही.
ब. एकलकोंडी व्यक्ती

४. सकाळी कपडे घालताना तुम्ही
अ. मनाला येईल ते कपडे घालता. - काहीही घातले तरी स्मार्ट दिसत असल्याने कधी काय घालावे हा प्रश्न कधी भेडसावलाच नाही.
ब. आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे कपडे घालता.

५. एकाच वेळी जर तुमच्या हातात २ कामे असतील तर तुम्ही
अ. पहिलं काम संपवुन मग दुसर्‍या कामाला लागता.
ब. दोन्ही काम एकाच वेळी चालु करता - एकाच वेळी मी दोन नोटपॅडवर दोनतीन धागे सुचेल तसे लिहित असतो यातच सारे काही आले.

६. जर तुम्ही दु:खांत असणारा सिनेमा पाहिलात तर
अ. गहिवरुन जाता - फील घेत बघितला नाही तर पिक्चरचे पैसे वसूल होत नाहीत. मनसोक्त रडतो आणि ब्रांण्डेड रुमालाने डोळे पुसत त्याचेही पैसे वसूल करतो.
ब. मनाला जास्त लावुन घेत नाही .

निकालाच्या प्रतीक्षेत,
मला डावा-उजवा मेंदू आहे की नाही हे जाणून घेण्यास उत्सुक

अहाहा, धागा कुठलाही असो, वाचावे तर ऋन्मेषचे प्रतिसाद!
Happy

बरं , माझी उत्तरे-
१ते ३ - ब
४- अ
५- डिपेंडस पण ब म्हणू शकता.
६- अ

छान आहे प्रश्न....
माझी उत्तरे....
१. तुम्ही नातेवाईकांशी , मित्रांशी वाद घालताना तुम्ही कुठ्ला मार्ग अवलंबता ?
.........वाद घालायची ईच्छा असेल तर '' पर्याय. पण समोरच्या कडून 'अ'सारखे प्रतिसाद येत असेल तर त्याच्याशी त्याच्याच मुद्द्यावरुन वाद घालायच्या ऐवजी गप्पा मारायच्या, टिंगल करायची, तारिफ करायची.

२. जर तुम्हाला १ आठवड्याची परदेशात जाण्याची फुकट संधी मिळाली तर तुम्ही कोणाला बरोबर न्याल ?
..........''..आईवडिलांना

३. तुमच्या ऑफीसमध्ये जर मतदान घेतलं तर तुमचे मित्र तुमचा उल्लेख कसा करतील ?
............''.... सर्वांबरोबर मिसळणारी व्यक्ती

४. सकाळी कपडे घालताना तुम्ही
......... मनाला येईल ते कपडे घालते. पण ठरवून बाहेर जायचे असेल तर...... आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे

५. एकाच वेळी जर तुमच्या हातात २ कामे असतील तर तुम्ही
........ पहिलं काम खूप महत्वाचे असेल तर ते संपवुन मग दुसर्‍या कामाला लागते नाहीतर ब. दोन्ही काम एकाच वेळी चालु करते.

६. जर तुम्ही दु:खांत असणारा सिनेमा पाहिलात तर
........'' गहिवरुन जाता.......खूप रडते Happy

१. तुम्ही नातेवाईकांशी , मित्रांशी वाद घालताना तुम्ही कुठ्ला मार्ग अवलंबता ?
ब. तथ्य आणि डाटा वापरता.

२. जर तुम्हाला १ आठवड्याची परदेशात जाण्याची फुकट संधी मिळाली तर तुम्ही कोणाला बरोबर न्याल ?
अ. आईवडिलांना - आईवडील दोघेही येऊ शकत नाहीत. त्यामुळे
ब. नवर्‍याला.

३. तुमच्या ऑफीसमध्ये जर मतदान घेतलं तर तुमचे मित्र तुमचा उल्लेख कसा करतील ?
अ. सर्वांबरोबर मिसळणारी व्यक्ती

४. सकाळी कपडे घालताना तुम्ही
अ. मनाला येईल ते कपडे घालता .

५. एकाच वेळी जर तुमच्या हातात २ कामे असतील तर तुम्ही
ब. दोन्ही काम एकाच वेळी चालु करता.

६. जर तुम्ही दु:खांत असणारा सिनेमा पाहिलात तर
अ. गहिवरुन जाता... चित्रपटातील एखादा प्रसंग जरी दुःखद असला तरीही खुप जास्त रडू येते.

अ उत्तर आलेल्यांसाठी,
<तुमचा डावा मेंदु प्रबळ आहे. डावा मेंदु प्रबळ असलेल्यांच्या जीवनात जास्त व्यवस्थितपणा असतो. हे लोक दुसर्‍यांच म्हणणं समजुन घेऊ शकतात , नवीन प्रयोग करायला ह्यांची तयारी असते. प्रतिकुल परिस्थितीचा फार लवकर परिणाम ह्या लोकांवर होतो. समस्येच योग्य विश्लेषण करुन त्यावर तोडगा काढण्यात ह्यांचा हातखंडा असतो. ह्या लोकांच वागणं व्यावहारीक आणि तर्कसंगत असतं आणि हे भावनेच्या भरात वहात जात नाहीत>

ब उत्तर आलेल्यांसाठी,
<तुमचा उजवा मेंदु डाव्या पेक्षा प्रबळ असतो. निर्णय घेताना ह्या लोकांची गोची होते , निर्णय घेऊ की नको करण्यातच ह्यांचा पुष्कळसा: वेळ जातो. हे लोक इतरांशी चांगलं वागतात पण अचानक फटकुन पण वागु शकतात . हे लोक विचारांत आणि स्वप्न रंजनात जास्त रमलेले असतात . इतरांच्या मते असे लोक अव्यावहारीक असतात. अशा लोकांना रम्य कथा , चित्रकला आणि संगीतात जास्त रस असतो. हे लोक उत्स्फुर्त , मस्तमौला आणि संवेदनशील असतात .तोंडी सुचना ह्यांच्या लवकर पचनी पडत नाहीत. ह्या लोकांना गुढ उकलण्यात मजा येते>

ह्या निष्कर्षांना कुठलाही वैज्ञानिक बेस नाहीये. Wink

ब उत्तर आलेल्यांसाठी,
<तुमचा उजवा मेंदु डाव्या पेक्षा प्रबळ असतो. निर्णय घेताना ह्या लोकांची गोची होते , निर्णय घेऊ की नको करण्यातच ह्यांचा पुष्कळसा: वेळ जातो. हे लोक इतरांशी चांगलं वागतात पण अचानक फटकुन पण वागु शकतात . हे लोक विचारांत आणि स्वप्न रंजनात जास्त रमलेले असतात . इतरांच्या मते असे लोक अव्यावहारीक असतात. अशा लोकांना रम्य कथा , चित्रकला आणि संगीतात जास्त रस असतो. हे लोक उत्स्फुर्त , मस्तमौला आणि संवेदनशील असतात .तोंडी सुचना ह्यांच्या लवकर पचनी पडत नाहीत. ह्या लोकांना गुढ उकलण्यात मजा येते>

१. तुम्ही नातेवाईकांशी , मित्रांशी वाद घालताना तुम्ही कुठ्ला मार्ग अवलंबता ?
अ. अवास्तव आणि कल्पित मुद्दे मांडता.
ब. तथ्य आणि डाटा वापरता.

६. जर तुम्ही दु:खांत असणारा सिनेमा पाहिलात तर
अ. गहिवरुन जाता
ब. मनाला जास्त लावुन घेत नाही .

यात तर अ उत्तरांचं ब व्यक्तींशी साधर्म्य दिसून येतंय Happy

माझ्यासाठी
1,3,5-ब
4,6-अ
2-एकटाच जाईन
<कुठलाही वैज्ञानिक आधार नाही.>
पण माझ्यासाठी ब परफेक्ट मॅच

>>४. सकाळी कपडे घालताना तुम्ही
अ. मनाला येईल ते कपडे घालता. - काहीही घातले तरी स्मार्ट दिसत असल्याने कधी काय घालावे हा प्रश्न कधी भेडसावलाच नाही.
ब. आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे कपडे घालता.<<

>>ब उत्तर आलेल्यांसाठी,
तुमचा उजवा मेंदु डाव्या पेक्षा प्रबळ असतो. निर्णय घेताना ह्या लोकांची गोची होते , निर्णय घेऊ की नको करण्यातच ह्यांचा पुष्कळसा: वेळ जातो.<<

कुछ् लोचा है बॉस...

हेच प्रश्न आज मी माझ्या गर्लफ्रेंडला विचारले आणि तिने खालील उत्तरे दिली.

१. तुम्ही नातेवाईकांशी , मित्रांशी वाद घालताना तुम्ही कुठ्ला मार्ग अवलंबता ?
ब. तथ्य आणि डाटा वापरता. - ती नेहमी तथ्य आणि डाटा वापरते कारण तिच्याकडे फोर-जी आहे.

२. जर तुम्हाला १ आठवड्याची परदेशात जाण्याची फुकट संधी मिळाली तर तुम्ही कोणाला बरोबर न्याल ?
अ. आईवडिलांना - ती आपल्या आईवडीलांना नेईल कारण तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे मला अजून ईंग्लिश बोलता येत नाही.

३. तुमच्या ऑफीसमध्ये जर मतदान घेतलं तर तुमचे मित्र तुमचा उल्लेख कसा करतील ?
ब. एकलकोंडी व्यक्ती - ती एक एकलकोंडी व्यक्ती आहे आणि याचाच गैरफायदा उचलत मी तिला पटवले असा तिचा ठाम विश्वास आहे.

४. सकाळी कपडे घालताना तुम्ही
ब. आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे कपडे घालता. - तिच्यामते जगातल्या सर्वच मुली अश्या करतात आणि तिला माझ्यासारखे जगावेगळे वागायला आवडत / जमत नाही.

५. एकाच वेळी जर तुमच्या हातात २ कामे असतील तर तुम्ही
अ. पहिलं काम संपवुन मग दुसर्‍या कामाला लागता. - ती खाताना खाते, बोलताना बोलते. मी दोन्ही कामे एकाच वेळी चालू करत असल्याने माझा मचाक मचाक आवाज येतो.

.............................................................

वरील सर्व उत्तरांचे निरीक्षण केल्यास लक्षात येईल की जिथे माझा उजवा मेंदू काम करतो आहे तिथे तिचा डावा मेंदू काम करतो आणि जिथे तिचा उजवा मेंदू काम करतो तिथे माझा डावा.
बहुतेक म्हणूनच आम्ही मॅड फॉर इच अदर आहोत..

फक्त शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरात मात्र आम्ही समानता राखतो.

६. दु:खांत असणारा सिनेमा पाहिला तर आम्ही दोघेही गहिवरून जातो, गळ्यात गळे टाकून रडतो वगैरे.. कारण तिथे आम्ही दाये बाये दिमागसे नाही तर दिल से विचार करतो Happy

साती ताई...
हा हा हा हा !!
ऋन्मेऽऽषची प्रतिक्रिया वाचून माझ्या मनात पण हाच विचार आला पैला Wink

भर थेटरात नाही हो ... तो तिकडला लास्ट कॉर्नर.. ती तिकडची कोपर्‍यातील सीट.. जी अस्तित्वात आहे हे डोअरकीपर सुद्धा विसरला असतो Wink