summer schools/precollage experience in US

Submitted by अमा on 23 February, 2015 - 22:45

जगभरातील विद्यार्थ्यांसाठी अकरावीनंतर समर स्कूल/ प्री कॉलेज एक्स्पिरीअन्सची दुनिया उपलब्ध आहे. अकरावी परीक्षा दिल्यानंतर बारावीची धामधूम सुरू होण्या आधीच्या वेळात हे शिक्षण घेता येते. साधारण एक महिन्याचे कोर्सेस आहेत व अनेक विषयांचे शिक्षण उपलब्ध आहे. मला मुख्य माहिती यूएस/ यूके मधील हवी असली तरीही सिंगापूर/ पॅरीस/ अ‍ॅम्स्टरडॅम/ फिनलँड / उर्वरीत युरोप येथील माहिती असल्यास कृपया द्या.

ऑक्सब्रिज म्हणून आहे त्याचे अ‍ॅप्लिकेशन प्रोसेस आता संपण्यात आहे. पण मी एन वाय यू, टिश स्कूल ऑफ फिल्म मेकिन्ग च्या साय्टी तपासत आहे. कोर्सचे ड्युरेशन, व युनिवर्सिटी लोकेशन, काही खास लोकल माहिती जी तुम्ही तिथे राहात असल्याने देउ शकाल अशी / वेब साइटची लिकं दिली तरी बास आहे. मी चित्रपट बनवण्याशी संबंधित कोर्सेस, स्क्रिप्ट रायटिंग फोटो/ व्हिडिओ एडिटिन्ग. डिजिटल मिडिआ जाहिरात कला, डिबेट आणि जनरल मिडिआ रिलेटेड/ तांत्रिक कोर्स शोधत आहे. कॉस्च्यूम डिझायनिंग मध्ये आजिबात रस नाही आहे. ती माहिती नको आहे.

शिवाय माबोकरांचे सुपुत्र सुकन्या कोणी अश्या कोर्सेसला कुठे गेले असतील तर तो अनुभव कसा होता, वर्थ आहे का? काय अपेक्षित आहे हे ही सांगा. पालकांनी काय करणे अपेक्षित आहे? माहिती साठी आधीच धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा,
माझ्या मुलाला अशा कोर्सेसला अप्लाय करण्यासाठी तो आठवीत असल्यापासून युनिवर्सिटीजच्या ऑफर येत होत्या. $४००० -$८००० समर साठी खर्च करणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यापेक्षा कुणाच्या तरी हाताखाली अप्रेंटिस म्हणून वॉलेंटियर बेसिसवर कामाचा अनुभव जास्त महत्वाचा वाटला. अर्थात हा पर्सनल चॉइस. कारण माझ्या मुलाला तशा संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध होत्या. तसेच शाळेतूनच समरमधे हायस्कूल क्रेडिट्स घेण्याची सोय होती.

तुम्हाला युस मधील प्रोग्रॅम्स साठी इंटरनॅशन्ल स्टुडंट म्हणून विसाच्या दृष्टीने लवकरात लवकर अप्लाय करणे गरजेचे आहे.
http://www.hercampus.com/high-school/preparing-college/12-best-pre-colle...
ही लिंक बघा.

NYU Tisch ला कोर्स असतो पण त्याची फी तशी भरमसाठ असते.
सर्व साधारणपणे महिन्याभराचा कोर्स असतो. न्यूयॉर्क शहराच्या ५०/६० मैलाच्या परिसरात रहात असाल तर रोज जाऊन - येऊन करता येतो, अन्यथा तिथे रहावे लागते.

त्यापेक्षा थोडा कमी खर्चिक ड्रेक्सेल फिलाडेल्फियाला पण २ आठवड्यांचा कोर्स असतो.
निघताना २ / ३ मिनिटांची फिल्म तयार करून घेतली जाते. माझ्या कन्येने हा केला होता..

खरे सांगायचे तर यातल्या कुठल्याही क्लास मुळे फार फायदा होतो असे वाटत नाही.
प्राथमिक तंत्र कळते, पण त्यासाठी एवढे पैसे खर्च करणे नको वाटते.

NYU मधे तर चार वर्षांची डिग्री घेताना देखील एकादी फिल्म पूर्ण करण्याची अट नाहीय.

हे क्षेत्र 'कष्ट करून शिकण्याचे' क्षेत्र आहे.
एकदा विद्यार्थी या क्षेत्रात घुसला की इतर विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या फिल्म वर काम करूनच जास्तीत जास्त शिकता येते.
माझी कन्या आता कॉलेज पूर्ण करत आहे (SVA).. पण ११ महिन्यात एक फिल्म पूर्ण करून ती जे काही शिकली ते चार वर्षात कॉलेजमधे शिकली नसावी..

अमा, माझ्या ओळखीत एक जण आहे जी या फील्डमध्ये काम करते. तिच्याकडून काही माहिती मिळाली तर देते १-२ दिवसांत.

धन्यवाद. प्रोसेस सुरू तर झाली आहे. मला काहीच माहिती नसल्याने इथे मिळेल त्या बेसिस वर नेट वर सर्च करून जमल्यास कोर्स करायचा आहे.

गो गा तुमच्या पुढील फिल्म मध्ये काही टेक्निकल जागा आहेत का? किंवा भारतात काही को ऑर्डिनेट करायचे असेल तर माझ्या मुलीला तो प्रॉजेक्ट करता येइल. ती डिजिटल मीडिआ चांगले हँडल करते व प्रॉडक्ट फोटोग्राफी मध्ये पावले टाकत आहे.

अनुभव प्राइसलेसच.

माझा अनुभव कॉर्पोरेट फिल्म्स शोर्ट फिल्म्स डॉकुमेंटरीज एव्ढा आहे. मुलीला टिश मधून पीजी तरी करायचेच आहे त्या आधी हा एक अनुभव अशी कल्पना आहे. खर्चा बद्दल स्वाती, गोगा तुमचे मत बरोबर आहे माझे ही तसेच आहे. पण मुलांना जमेल त्या संधी त्या वयात मिळाल्या तर कदाचित आयुष्य बदलून जाउ शकते ह्या एका वेड्या विचाराने पुढे जायचे आहे. आउट राइट परवडणे शक्य नाही असे सांगितले तर आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते ह्या वयात.. तसे नसेलही. चांगल्या शि क्ष णासाठी तिची मेहनत करायची तयारी आहे. (वेट्रेस- पेनी !!! ) स्कॉलरशिप, वगैरे पर्याय तपासत आहेच.

सिंडरेला धन्यवाद. वाट बघते.

झरबेरा तुझे तर प्रथम धन्यवाद. तुझा काही प्लॅन आहे का? तुम्ही दोघी रूम शेअर करू शकाल म्हणून विचारते.
तुझ्या पर्सनल स्पेस चा मान राखूनच विचा रत आहे.

भारतातले पर्यायही शोधत आहे.

गो गा तुमच्या पुढील फिल्म मध्ये काही टेक्निकल जागा आहेत का? << अजून फिल्म प्लॅन केलेली नाही.
मुलीला टिश मधून पीजी तरी करायचेच आहे <<< फिल्म क्षेत्रात शिक्षणाच्या सर्टिफिकेटपेक्षा ओळख आणि अनुभव जास्त लागतो हे माझे अनुभवावर आधारित व्यक्तिगत मत आहे..

उदा: आत्ताच एका अमेरिकन मराठी माणसाने भारतात जाऊन एक चित्रपट पूर्ण केला. लवकरच हा चित्रपट गृहांमधे प्रदर्शित होणार आहे. त्याचे काही Promos संकलन करता का? असे आमंत्रण आले.
लेकीने विचारले, 'यात मला काही पैसे मिळू शकतील का?'
त्यानंतर त्या लोकांकडून साधे उत्तरही आले नाही...

NYU, SVA सारख्या ठिकाणी बर्‍याच विद्यार्थ्याना फिल्म करण्यासाठी स्वयंसेवक लागतात. त्यासाठी Bulletin Board वर जाहिराती लागतात. लक्ष ठेऊन तेव्हा तेव्हा त्या लोकाना संपर्क केल्यास काम मिळू शकते.
NYU ची वार्षिक फी व खर्च $६५०००+ पर्यंत जातो...

>>
आउट राइट परवडणे शक्य नाही असे सांगितले तर आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते ह्या वयात.. >>अमा, असा विचार करू नका. पालक म्हणून आपल्याला काय सहज शक्य आहे, काय प्रयत्न करुन जमवता येइल, काय डोईजड होईल याबद्दल मुलांना पूर्ण कल्पना द्यावी. आर्थिक जुळवाजुळव करताना त्यांना सहभागी करुन घ्यावे. हेही एक प्रकारचे शिक्षणच! मुलं पर्याय सुचवतात, स्कॉलरशिप्स शोधतात. ओनरशिप घ्यायची सवय लागते.
तिला जर का पुढे परदेशात पिजी करायचे असेल तर आत्ता काही आठवड्यांचा परदेशातला खर्च करण्यापेक्षा भारतातच अप्रेंटिस म्हणून संधी मिळते का ते बघा. मुंबईत संधी मिळाली तर पुढे कॉलेज संभाळूनही ती काम सुरु ठेवू शकेल.

पाल्य भारतात आहे की अमेरिकेत?
भारतात असल्यास ११ वी नंतरच्या सुट्टीत १२ वी साठीचे कोचिंग लगेच सुरू होते, काही काही कॉलेजेसही सुट्टी कॅन्सल करून पोर्शन आटपण्यासाठी लवकर कॉलेज सुरू करतात.
तर कुणाला ११ वी ते १२ वी अशा सुट्टीत तिकडे जाऊन एखादा कोर्स करायला वेळ मिळणार आहे का?

वेळेपेक्षा ज्या प्रमाणात प्रचंड खर्च होईल, त्या मानाने हे समर कोर्स तितके वर्थ नसतात. मी माझ्या मुलाला म्हणेन , त्यापेक्षा समर जॉब्ज कर कुठेतरी, रियल लाइफ एक्स्पिरियन्स घे. Happy

साती. मीप्ण तोच विचार करत होते. बहुतेकदा तर अकरावीच्या परीक्षाच फेबच्या आधी संपवतात आणि मार्चपासून बारावी कोचिंग चालू. डिसेंबरपर्यंत बारावीचा पोर्शन संपवून पुढे एक्झाम प्रीपरेशन चालू होतात.

बहुतेकदा तर अकरावीच्या परीक्षाच फेबच्या आधी संपवतात आणि मार्चपासून बारावी कोचिंग चालू. डिसेंबरपर्यंत बारावीचा पोर्शन संपवून पुढे एक्झाम प्रीपरेशन चालू होतात.>> हे फक्त सायंसवाल्यांचं होतं ना? आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये पण असं होत का?

अमा,
या अभ्यासक्रमांचा फारसा फायदा होत नाही. खर्च भरपूर आणि पदरी त्यामानाने फारसं काही पडत नाही. दोन मित्र वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अशा समरस्कुलांमध्ये शिकवत होते. एक विद्यार्थिनी गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेनंतर हार्वर्डला जाऊन आली. या तिघांच्या अनुभवांवरून अशा अभ्यासक्रमांच्या वाटेस न जाण्याचा सल्ला मी देईन.

गेली काही वर्षं शाळा / कॉलेज आणि अशा अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी पाठवणार्‍या संस्था एकत्र काम करत आहेत. त्यामुळे शाळांकडूनच पालकांना आग्रह होतो.

तुम्ही माझेच मत अधोरेखित केले आहे. मला पण खर्च व त्यामानाने रिटर्न्स हे अवाजवी प्रपोर्शन वाट्त आहे. म्हणून तर इथे विचारले. त्यापेक्षा तेच फंड्स नंतर अ‍ॅक्च्युअल पीजी शिक्ष्णाच्यावेळी जास्त चांगले युटिलाइज होतील असे माझे मत आहे. मुलांना एक संधी नाकारताना त्यामागे सॉलिड रीझनिन्ग लागते ते डेव्हलप करायला मला मदत होईल.

सध्या कोर्सेरा वरील कोर्सेस, फ्रीलान्स वर्क वगैरे एज अ‍ॅप्रोप्रिएट धडपड चालू आहे. मुलींमध्ये अशी काही टूम येते कि फ्रेंचच शिकायचे, असे समर कोर्सेसच करायचे, एस एटीच द्यायची,. हे सर्व बरोबरच आहे पण आपल्याला काय गरजेचे आहे व योग्य आहे ते समजून केले पाहिजे.

बारावी अभ्यास सुरू होण्या आधी एक साधी टूरिस्ट म्हणून चक्कर मारून यावी असा माझा बेत होता पण हे एकदमच समोर आले त्यामुळे भंजाळून न जाता नीट रीझनिन्ग करून नकार देता यावा किंवा काही स्कॉलरशिप मिळाल्यासच जा असे सांगावे असे माझे मत होते. तुमच्या प्रतिसादाने त्यास पुष्टी मिळाली आहे. त्या बद्दल धन्यवाद.

यू प्रोव्हाइड द मच नीडेड पर्स्पेक्टिव्ह. त्या बद्दलही.