दागिने
हँडपेंटेड ज्वेलरी बॉक्स
गेल्या महिन्यात मला एका क्राफ्ट सामानाच्या दुकानात एक छोटसं दागिन्यांचं कपाट मिळालं होतं. स्वतःसाठी घरी आणून ते रंगवल्यानंतर एंड प्रॉडक्ट खूपच आवडला.
मग दिवाळीमध्ये जावांना भेट देण्यासाठी मुद्दाम परत त्या दुकानातून पाच कपाटं आणली. (खरंतर आम्ही सात जणी आहोत. मला सहा कपाटं हवी होती, पण पाचच मिळाल्यानी माझं कपाट पण मी भेटवस्तूंमध्ये दिलं. आता माझ्यासाठी नविन कपाट आणून रंगवायचं आहे.)
गावाला जायच्या आधी आठवडाभरात ती पाची कपाटं रंगवून (एक कोट प्रायमरचा, दोन कोट बेस कलरचे आणि मग त्यावर डीझाइन आणि सगळ्यात शेवटी एक हात वॉर्निशचा) तयार केली.
क्रोशाचे दागिने (ब्रेसलेट सह )
दागिने कुठे घ्यावेत? अमेरिकेत की भारतात
योग्य किमतीला चान्गले दगिने कुठे घ्यावेत ईथे कि तेथे? कहि जण म्हणतात तिकडे स्वस्त असतात वगेरे
योग्य उहापोह व्हावा हि विन्नती
लफ्फा
पूर्वी पण टाकला होता तो परत टाकतेय.
हे चित्र तयार करण्याचं मूळ कारण माझ्याकडे संदर्भ-बँक तयार करणं हे आहे. मला कल्पना आहे की डिजिटल पेंटींग म्हणून ह्या चित्राला काही महत्व नाही.
फोटोशॉपमधे आयबॉलच्या पेन टॅब्लेटच्या ( http://iball.co.in/Product.aspx?c=16 ) सहाय्याने हे चित्र तयार केलेय.
कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची
कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची
मी नेसली नेसली, साडी अंजीरी ग रंगाची
कशी दिसते दिसते, लाडाची लाडी तुमची ||धृ||
गजरा माळला माळला, शेवंती फुलांचा
डोई घेतला घेतला, पदर लाल बुट्टीचा
भांगी भरलं भरलं, कुंकू सवाष्णीचं
आहे मौलीक मौलीक, माझं कपाळीचं लेणं
नको नजर लागो या वैभवाला कुणाची
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||१||
गळा घातला घातला, चंद्रहार सोन्याचा
मंगळसुत्र मिरवीते मिरवीते, ऐवज धन्याचा