गोडी शिक्षणाची,...
आता शाळाबाह्य विद्यार्थ्यांचीही
शाळेत टोळी बसायला पाहिजे
मात्र शिक्षण घेण्यासाठी सुध्दा
मनी आवड असायला पाहिजे
आता शिक्षणाची महती इथे
घरा-घरात कळायला हवी
अन् शिक्षणाची गोडी सदैव
शिक्षणातुनच मिळायला हवी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
हे लक्षात असु द्या,...
कुणी सत्य म्हणत असतात
कुणी असत्य म्हणत असतात
आपली छाप टिकवण्यासाठी
दोन्ही वारे झुण-झुणत असतात
मात्र आरोप-प्रत्यारोप करताना
औकातीत औकात असाव्यात
अन् अवमानाच्या हद्दी सुध्दा
नैतिकतेच्याच आत असाव्यात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कधी-कधी,...!
विचारपुर्वक बोलायच्या गोष्टी
विचारपुर्वक ना बोलल्या जातात
मात्र बोलुन झालेल्या गोष्टींवर
सुटकेच्या उचक्या ढाळल्या जातात
आपल्या बोलण्याच्या परिणामांचा
आपल्यावरतीच तर भार असतो
मात्र कधी आपल्या वक्तव्यावरून
आपलाच पलटवार असतो,...!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पुणे शहरात बी ए सायकॉलोजी स्नातक पदवी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर टॉप दहा कॉलेजे कोणती ? अरे हो.... माध्यम इंग्रजी आहे!!!!
सेंट मिरा आणि मॉडर्न कशी आहेत?
विद्यार्थी हवेत,...!
पर्याय कोणता निवडावा याची
विद्यार्थ्यांच्या मनात गोची असते
तर शाळा आणि कॉलेजकडून
विद्यार्थ्यांची खेचा-खेची असते
वेग-वेगळे ऑप्शन सांगत-सांगत
विद्यार्थ्यांना राजी करावं लागतं
तर कधी विद्यार्थी शोधत-शोधत
शिक्षकांना दारो-दारी फिरावं लागतं,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सत्य-असत्य,...
सत्यावरती पडदा घालुन
असत्य बाहेर काढले जाते
न्यायासाठीचे सत्य मात्र
सर्रास इथे पीडले जाते
मना-मनात दडेल अशी
असत्याची खोड असते
मात्र सत्याच्या पावर पुढे
असत्याची भांडाफोड असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
शिक्षणाच्या बाबतीत,...
एका मागुन एक प्रकरणं
आता उघडकीस येऊ लागले
अन् शिक्षणमंत्र्यांनाही कुणी
पदवी प्रकरणांत गोवु लागले
करायचे म्हणून आरोप नसावेत
त्यात सत्यापनाची अस्सल असावी
"शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे"
त्यामध्ये बनावटी भेसळ नसावी,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मुंबई बंद,...!
मुंबई बंद ठेवण्यामागेही
वेग-वेगळे कारणं आहेत
अन् निसर्गाच्या वर्षावासह
कुकर्मिक मानवी वर्ण आहेत
करून दाखवलेल्या कामांचं
दर्जेदारपणही भेदलेलं आहे
अन् पावसा पेक्षाही जास्त
नाल्यांनी लक्ष वेधलेलं आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
शिक्षणाच्या बाजारात,...
कुणी चुकून शिकले आहेत
कुणी शिकून चुकले आहेत
बोगजबाजीच्या बाजारात
कुणी शिक्षणच विकले आहेत
शिक्षणाच्या बाबतीत तरी
अशी कुठेच ना खाच पाहिजे
विकणारांना तर नाहीच नाही
पण घेणारांना तरी लाज पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भानगड खर्चाची
ऐपत जर असेल तर
खर्च कुठेही करता येतो
विनाकारण खर्चाचाही
कधी भुर्दंड भरता येतो
मात्र ऐपत जर नसेल तर
गरजांनाही शमवावं लागतं
अन् काहीतरी गमवण्यासाठी
काहीतरी कमवावं लागतं,...!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३