नियतकालीक

तडका - शाळा आठ तास

Submitted by vishal maske on 14 November, 2015 - 22:23

शाळा आठ तास

आता अभ्यासबाह्य शाळेचे
दोन तास वाढवले जातील
विविध उपक्रमात विद्यार्थी
शाळेतच घडवले जातील

शाळेचे पुर्ण आठ तास
गुरूजींना थांबवले जाईल
अभ्यासबाह्य दोन तास
विद्यार्थीही डांबवले जाईल

पण नाण्याला दोन बाजु आहेत
या गोष्टीही मानल्या जाव्या
अन् साधणार्‍या फायद्यांसह
कुचंबनाही जाणल्या जाव्या

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बाल दीन

Submitted by vishal maske on 14 November, 2015 - 08:40

बाल दीन

बालपण सुंदर असुनही
तिथे वन्समोर मिळत नाही
बालपणातुन गेल्याविना
बालपणही कळत नाही

कितीही मोठे झाले तरी
बालपणात मनं झूलवतात
बालदिन साजरे करताना
बालदीन मनं हेलावतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मजा आयुष्याची

Submitted by vishal maske on 14 November, 2015 - 02:12

मजा आयुष्याची

स्वच्छंदपणाने हूंदडताना
ना कसलीही चिंता आहे
ना निरागस त्या मनामध्ये
गडबडणारा गुंता आहे

ना कसलीही ओढ त्यास
पुढे येणार्‍या भविष्याची
बालपणातंच सामवली जणू
सारीच मजा आयुष्याची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भ्याड हल्ले

Submitted by vishal maske on 13 November, 2015 - 23:34

भ्याड हल्ले

जात पाहिली जात नाही
धर्म पाहिला जात नाही
मरणारांच्या कर्तृत्वाचा
वर्म पाहिला जात नाही

निष्पापांचेही घेतात बळी
डोकेच त्यांचे म्याड आहेत
म्हणूनच तर त्यांच्याकडून
हल्यावर हल्ले भ्याड आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रॉपर्टी

Submitted by vishal maske on 13 November, 2015 - 21:31

प्रॉपर्टी

लोभी माणसांचा उतावळेपणा
कुणाचाही झाकलेला नाही
प्रॉपर्टी कमावण्याचा हव्यास
कुणालाही चुकलेला नाही

आपण कमवलेली प्रॉपर्टी कधी
आपल्याच हातुन जाऊ शकते
आता कळून चुकलं आहे की
प्रॉपर्टी जप्तही होऊ शकते,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - ती आणि तो

Submitted by vishal maske on 13 November, 2015 - 09:41

ती आणि तो

तीच आणि त्याचं नातं
अगदीच घट्ट आहे
तीच्या प्रत्येक मागणीत
त्याचाच तर हट्ट आहे

ती आली की तोही येतो
नसताना देखील बांधील
ती आहे दिपावली आणि
तो आहे आकाश कंदील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भाऊबीज

Submitted by vishal maske on 12 November, 2015 - 20:06

भाऊबीज

ऊत्सव साजरे करताना
आनंद उतप्रोत असतो
प्रेम आणि आपुलकीचा
ऊत्सव हा एक स्रोत असतो

करायचे म्हणून करायचे
नको नुसतेच नावाला
भाऊबीज साजरे करण्या
बहिण जपावी भावाला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - ती आणि मी

Submitted by vishal maske on 12 November, 2015 - 09:06

ती आणि मी

केला निर्धार मनामध्ये
ठरवलं मी धीट व्हायचं
अंधाराचा फायदा घेऊन
आज तीला पेटवायचं

अंधारातही तेजस्वीनी
ती अस्सल जादूगरी आहे
आनंदाच्या उत्सवातील
ती सुरसुरती सुरसुरी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सुगरणींनो

Submitted by vishal maske on 12 November, 2015 - 05:37

सुगरणींनो

लाडूची होणारी चाचणी
सुगरणीचीही चाचणी असते
एकदा चाचणी चुकली तर
लाडू कला ना पचनी असते

सांभाळून घ्या चाचणी जराशी
चाचणीत फसगत होऊ नये
अन् फसल्या गेल्या चाचणीचा
उगीच साखरेला दोष देऊ नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - बळीराजा

Submitted by vishal maske on 12 November, 2015 - 01:03

बळीराजा

कधी येणार बळीचं राज्य
सुखही सारं गोठलं आहे
दुष्काळ आणि महागाईनं
वामन होऊन लुटलं आहे

फास घेतोय,विष पेतोय
बळ का गळतंय बळीचं
मरू नको रे बळीराजा
सांगणं हे तळमळीचं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - नियतकालीक