नियतकालीक

तडका - माणसांनो

Submitted by vishal maske on 23 November, 2015 - 01:36

माणसांनो

मोडताहेत माणसांचे मणके
माणसांनीच माणसं मुरगाळले
मांगल्य,ममता,मित्रत्वासह
मोडलेत मांडव मर्माळले

माणसांनी "मी" मोडावं
माणूसकीशी मन मिळवावं
मग मिळेल मतितार्थ
माणसांत मायेनं मिरवावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निसर्ग कृपाळला

Submitted by vishal maske on 22 November, 2015 - 08:48

निसर्ग कृपाळला

त्यांनी जे जे केले काल
आज सारे स्मरून आले
पाहणी करण्या आले होते
मात्र पळणी करून गेले

त्यांचे दौरे आले,गेले
मदतीचा मुद्दा ढेपाळला
पथकाने केला काना डोळा
पण निसर्ग मात्र कृपाळला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - डाळ भाव

Submitted by vishal maske on 22 November, 2015 - 04:53

डाळ भाव

भाव-वाढ झाली म्हणून
डाळ साठेही जप्त केले
पण कुणकुण किणकिणली
जप्त साठे लुप्त केले,...?

आपली बाजु पटवण्यासाठी
जे-ते इथे पटाईत आहेत
पण सारं काही घडून देखील
डाळ-भाव मात्र टाईट आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - दुष्काळी पळणी

Submitted by vishal maske on 21 November, 2015 - 20:35

दुष्काळी पळणी

दूष्काळ पाहणी करण्यासाठी
केंद्रातुनही पथक येतात
पाहणी सोडून पळणी करतात
तेव्हा आशा निरर्थक जातात

पळत पळत दौरा सारा
दूष्काळ पहायला वेळ नाही
सांगा त्यांना दूष्काळ म्हणजे
तुमच्या मनातला खेळ नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बाजारात

Submitted by vishal maske on 21 November, 2015 - 01:24

बाजारात

मनसोक्त बाजार करण्याचं
धाडस कमी होऊ लागलं
तांदूळ,डाळ,वाटाण्यासह
टमाटंही भाव खाऊ लागलं

बाजार करणारांपेक्षा हल्ली
बाजार फिरणारे जास्त आहेत
घेणारांची वाट पाहून-पाहून
पालेभाज्या मात्र त्रस्त आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - धंदा काळ्या बिझनेसचा

Submitted by vishal maske on 20 November, 2015 - 20:32

धंदा काळ्या बिझनेसचा

कुणी अमाप श्रीमंत झाले
कमवा-कमवीच्या या रस्त्यात
त्यांचे इनकम वाढते भरमसाठ
पण बिझनेस मात्र गुलदस्त्यात

त्यांच्या पाप कमाईसाठीही
सामान्य जनतेचाच खांदा आहे
हा सरळ-सरळ न उलगडणारा
काळ्या बिझनेसचा धंदा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हि एक मागणी

Submitted by vishal maske on 20 November, 2015 - 08:28

हि एक मागणी

रोज वाढत्या समस्यांनी
लोक इथले त्रासत आहेत
तुमचे नव-नवे धोरणंही
जीवघेणे भासत आहेत

जगणं कठीन होऊ लागलं
धडधड वाढली उरामधी
"अच्छे दिन" वाले बाबा
भारत दौराही करा कधी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - डॉक्टर

Submitted by vishal maske on 19 November, 2015 - 20:06

डॉक्टर

जरी कर्तव्य पार पाडताना
नसते कसलीही दिरंगाई
तरीही केली जात असते
पेशंट कडून भलती घाई

वरिष्ठांचे आदेश,अती एमर्जन्सी
कधी कर्तव्यात अडले जातात
म्हणूनही सामाजिक संतापात
आजकाल डॉक्टर पडले जातात

झाल्या विलंबाने पेशंटच्या काया
कदापीही ना कोमेजल्या जाव्या
डॉक्टर हे जीवन दाते आहेत
त्यांच्या समस्याही समजल्या जाव्या

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जागतिक शौचालय दिन

Submitted by vishal maske on 19 November, 2015 - 08:56

जागतिक शौचालय दिन

कित्तेक शासकीय योजनांत
भ्रष्टाचाराचेच खड्डे आहेत
गावच्या पांद्या-रस्ते देखील
शौचेसाठीचे अड्डे आहेत

पडताळून पहा ही दृष्ये
गावो-गावी सकस ताजी
कागदोपत्री पुरस्कार योग्य
वास्तवात मात्र बोगसबाजी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

फुसके बार – १७ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:37

फुसके बार – १७ नोव्हेंबर २०१५
.
१) चेन्नई व परिसरात मुसळधार पावसामुळे ७०एक बळी गेलेले आहेत. पण देशाचे तिकडे म्हणावे तितके लक्ष गेलेले दिसत नाही. मागे ओडिशामध्ये येणा-या वादळासाठी जय्यत पूर्वतयारी केल्यामुळे जवळजवळ शून्य प्राणहानी झाली होती. यावेळी तेवढी काळजी का घेण्यात आली नाही की वादळ व त्यामुळे होणा-या पावसाचा अंदाज चुकला?

२) साळीच्या लाह्या खाताना किंवा पोहे खाताना दाताखाली तांदळाचे टरफल येते तेव्हा जे अंगावर काटा आणणारे सेंसेशन येते, त्याला कोणत्या भाषेत काही नाव आहे काय?

Pages

Subscribe to RSS - नियतकालीक