चित्रपट

चित्रपट परिचय - ४ | जूनो: सुंदर पटकथा, संयत अभिनय, उत्तम दिग्दर्शन

Submitted by मंदार-जोशी on 29 March, 2011 - 12:40

काही विशिष्ठ संवेदनशील विषय असलेल्या चित्रपटांवर चर्चा करणं मी सहसा टाळतो. पण अशाच एका विषयावर बनलेल्या एका उत्तम चित्रपटाने अखेर माझी ती सवय मोडली. अमेरिकेत सर्रास आढळणार्‍या आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणार्‍या आपल्या भरकटलेल्या भारतीय तरुण पिढीपर्यंत ते लोण पसरण्याचा धोका असलेला तो विषय म्हणजे पौगंडावस्थेतील गर्भधारणा अर्थात टीनएज प्रेग्नंसी.

विषय: 

चित्रपट परिचय - ५ | इनव्हिक्टस Invictus: खेळातून राष्ट्रीय एकात्मता - एक आगळावेगळा प्रयत्न

Submitted by मंदार-जोशी on 10 March, 2011 - 01:15

मंडळी, मध्यंतरी खंड पडलेली 'चित्रपट परिचय' ही लेखमालिका पुन्हा सुरु करतो आहे. ज्यांना ही मालिका नवीन आहे, त्यांच्यासाठी आधीच्या लेखांचे दुवे या लेखाच्या शेवटी दिले आहेत. पहिल्या लेखाच्या सुरवातीसच स्पष्ट केल्याप्रमाणे हे चित्रपट परिक्षण नाही. तर ही लेखमालिका म्हणजे फक्त आणि फक्त 'मला आवडले, तुम्हाला सांगितले'च्या धर्तीवर मला आवडलेल्या काही चित्रपटांची ओळख करुन देण्याच्या हेतूने लिहीत आहे.

चला तर मग आस्वाद घेऊया ह्यावेळच्या चित्रपटाचा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

विषय: 

बर बाबा, तनू वेड्स मनू मधे माधवन cute दिसतो.

Submitted by ऋयाम on 27 February, 2011 - 05:34

बदल इतिहासः -

सदर लेखाचे मूळ नाव : - "तनू वेड्स मनू!!!"
समाजकंटकांनी केलेल्या नुकसानापोटी : "तनू वेड्स मनू : घुमजाव!!!"
समाजकंटकांनी पुनःपुन्हा चालुच ठेवलेल्या नुकसानापोटी : " बर बाबा, तनू वेड्स मनू मधे माधवन cute दिसतो"

मूळ लेख पुढिलप्रमाणे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

आधीच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत सुंदर दिसते.

"HITCH" चित्रपटात 'विल स्मिथच्या' तोंडी एक वाक्य आहे, जे थोडंसं बदलून इथे वापरता येईल कदाचित.

विषय: 

सात खून माफ!!!

Submitted by चिनूक्स on 20 February, 2011 - 01:08

'सात खून माफ' अफाट आहे. लेखन, दिग्दर्शन, छायालेखन, रंगभूषा, अभिनय सगळंच अफाट. सुसाना आणि तिच्या आयुष्यातील सात पुरुषांची ही कथा. या सातही पुरुषांवर ती प्रेम करते. मात्र त्यांच्याकडून तिच्या वाट्याला अपमान, विश्वासघात आल्यावर त्यांचा ती काटाही काढते. हे काटा काढणं शेवटच्या पुरुषाच्या बाबतीत अतिशय अफलातून पद्धतीने दाखवलं आहे. सातवा नवरा आणि या सातव्या नवर्‍याचा खून..ही कल्पनाच लाजवाब आहे.

विषय: 

मला आवडलेले चित्रपट : सूरज का सातवाँ घोडा

Submitted by नेतिरी on 18 February, 2011 - 14:30

गोष्टी ऐकायला सगळ्यांनाच आवडत. लहानपणी ऐकलेल्या भूताखेतांच्या किंवा सिंदबाद, अरेबियन नाइटस् मधील सुरस चमत्कारिक कथा अगदी खर्‍या खर्‍या वाटायच्या.एवढच कशाला, अज्जी तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायची. तिच्या अजोळच्या वाड्यातल्या तळघरातून येणारे आवाज, लग्नात तिची बहीण सोन्याने कशी वाकली होती, एका पैशाला ढीगभर सगळकाही मिळायच, शेतातला एक गडी मोठा मणाचा हंडा कसा उचलायचा आणी तिचे कोणी तरी मामा निरस शेर-शेरभर दूध कसे गटागटा प्यायचे.

विषय: 

मला आवडलेले चित्रपट : To Kill a Mockingbird

Submitted by नेतिरी on 15 February, 2011 - 16:55

हार्पर ली च्या पुलित्झर विजेत्या कादंबरीवर आधारीत हा नितांत सुंदर चित्रपट.आता जवळपास नामषेश झालेल अमेरिकन खेडेगावातल संथ जीवन, टीव्ही इंटरनेट च्या पूर्वी असलेले रस्त्यावर चाक फिरवणे, झाडावर चढणे संध्याकाळी घरातून हाका ऐकू येइ पर्यंत चालणारे खेळ. दाहक वर्णभेद आणी त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत घडलेल्या काही प्रसंगा मूळे छोटी स्काउट एक महत्वाचा धडा आपल्या वडीलांच्या मदतीने कसा शिकते याच अप्रतिम चित्रण यात आहे.

विषय: 

नॉक्ड आउट !!

Submitted by maitreyee on 6 February, 2011 - 08:42

काल नॉक आउट नामक चित्रपट पाहिला. तुफान करमणूक झाली म्हणून वाटले की इथे शेअर करावीच.
तर सुरुवातीला बरा थ्रिलर असावा असे वाटले. सुरुवात अशी की एका बिल्डिंग मधे लपलेला एक शूटर शिनेमाचा हिरो(?) ला लांबून कॅमेराज, सि सिटिव्ही ,टेलिस्कोपिक लेन्स असलेली गन इ. च्या सहायाने एका टेलिफोन बूथ मधे होल्ड अप करतो. थोड्या ड्रामा अन थोडा गोळीबार इ.नंतर बाहेर तोबा गर्दी, पोलिस, मिडिया वगैरे ऑडियन्स जमल्यानंतर हे सगळे कोण, का अन मुख्य म्हण्जे कशासाठी करत आहे हे हळू हळू आपल्याला कळते अन तस तसा शिनुमा महान म्हणजे महानच विनोदी होत जातो !
*********** स्पॉयलर अलर्ट*************************************

मला आवडलेले चित्रपट : Bicycle Thieves

Submitted by नेतिरी on 3 February, 2011 - 20:35

रिची (Lamberto Maggiorani) बर्‍याच दिवसांपासून बेकार आहे.शेवटी त्याला भिंतिवर पोस्टर चिकटवण्याच काम मिळत पण अट आहे सायकलची.रिची आणी त्याची बायको मारिया (Lianella Carell) घरातिल बेडशीटस विकून दुकानात अडकलेली सायकल सोडवुन आणतात.

विषय: 

रीटा

Submitted by प्रज्ञा९ on 2 February, 2011 - 14:28

"रीटा" चित्रपट बघितला. खरंतर आधीच बघायचा होता, पण डीवीडी वगैरे आणून बघणं नाही जमलं. परवा आपलीमराठी वर बघितला. मला आवडला खूप. त्याचं परीक्षण वगैरे करण्यापेक्षा एकदातरी बघायला हवा असं वाटत होतं.

"रीटा" ही शांता गोखले यांची पुरस्कारप्राप्त कादंबरी. आईच्या या कादंबरीवर रेणुका शहाणे या गुणी अभिनेत्रीने काढलेला हा चित्रपट.

विषय: 
शब्दखुणा: 

गंध

Submitted by दिनेश. on 30 January, 2011 - 23:48

यावेळेस भारतातून येताना, गंध चित्रपटाची सिडी घेऊन आलो. गंध या कल्पनेशी निगडीत ३ वेगवेगळ्या कथा आहेत. एकंदर मला आवडला.

पहिला भाग आहेत तो, वयात आलेली मुलगी. यात ज्योति सुभाष, चंद्रकांत काळे, अमृता
सुभाष आणि गिरिश कुलकर्णी आहेत. कथेची गरज म्हणून थोडी ओव्हर अ‍ॅक्टिंग हवीच
होती आणि ती अमृताने भागवली. यातला काळ बहुतेक १९९३ नंतरचा असावा, कारण
दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे, मधले गाणे वापरलेय. पण त्या काळात, टाईपरायटर
वापरात होते का याबद्दल मला खात्री नाही. ज्योति सुभाष आणि चंद्रकांत काळे, सहज
वावरलेत.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट