घरचे/सोसायटीमधील गणपती गेल्यावर मायबोली उपक्रमासाठी एखादे कार्टून काढशील अशी लेकीशी सेटिंग लाऊन ठेवली होती. कारण स्पष्ट आहे. तेवढेच माझ्या धाग्यांच्या संख्येत एकाची भर
तरी ती लहरी असल्याने फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या.. पण आज ऑफिस मधून आल्यावर असे सरप्राईज मिळाले. एक सोडून चार चार.. आवडेल ते घ्या 
गाडी हा विषय वाचून घरात असलेल्या कलरिंग पुस्तकांच्या संचाची आठवण झाली.
मग ज्याच्यात गाडी आहे असे पुस्तक रमाला (वय वर्षे साडेचार) दिले आणि ह्यातली आवडती गाडी हव्या त्या रंगात रंगव असे सांगितले.
तिने मोजून १० मिनिटात हे चित्र रंगवून मला दाखवले.
(ओमने सुद्धा एक चित्र रंगवायला घेतले आहे, २ कप्पे रंगवलेत.
पूर्ण झालं तर त्याचाही येईल धागा.)
काय छोट्या दोस्तांनो?
कसे आहात सगळे?
मनावर दगड ठेऊन, थोडासा का होईना अभ्यास करताय ना? आई- वडीलांचं अधून मधून का होईना ऐकताय ना? ते तुम्हाला फार त्रास देत असतील तर यावर्षी माझ्या कानात हळूच सांगा हां. पुढच्या वर्षी मी तुम्हाला त्यांचा आईबाबा करतो.
तर आता आई-बाबा माझी बडदास्त ठेवण्यात व्यग्र आहेत तो पर्यंत तुम्ही मजा करुन घ्या. मस्तपैकी खेळा, हुंदडा, गोड-धोड खा...
हे सगळं करता करता अजून एक तुमच्या आवडीची छान गोष्ट करा, ती म्हणजे मस्तपैकी सुंदर चित्रे काढा, रंगवा आणि मला त्याचे छान फोटो पाठवा.
मुलांनो,
काय ऐकतोय मी हे? आजकाल तुमचा स्क्रीन टाईम फार वाढलाय म्हणे ? तुम्ही उठसुठ मोबाईल टिव्हीवर कार्टून्स बघण्यात दंग असता.
असं नाही चालायचं. चला बाजूला व्हा पाहू त्या स्क्रीन पासून आणि जा पाहू जरा बाहेर मैदानात खेळायला.
काय म्हणता? आज खेळायला कोणीच नाही? रोज रोज तेच तेच खेळून कंटाळा आलाय?
जाऊ द्या, आजच्या दिवस घरातच खेळा. नाहीतर मग एक काम करता का? गाडीचे चित्र काढून रंगवून झाले असेल किंवा मग गाडीचे चित्र काढायचे नसेल तर तुम्हाला दुसरा विषय देऊ का?
मला नवीन नवीन रंग माध्यम ट्राय करून बघायला आवडतात.. नुकतेच gouache रंग विकत घेतले ते वापरून काढलेली चित्रं...

.

हे जलरंगाची प्रॅक्टीस करताना..
सॅन डिएगोतल्या कुठल्यातरी म्युझियममध्ये किंवा सायन्स सेंटरमध्ये क्यूबन गोगलगायींचे हे सुरेख शंख दिसले होते. झळाळता पिवळा रंग आणि त्यावर डार्क चॉकलेटी वळणे - बस्स इतक्या दोनच गोष्टी होत्या खरंतर पण फारच आकर्षक. फोटो काढल्याशिवाय पुढे जाऊच शकले नाही.
नॅशनल जिओच्या वेबसाईट वर या जगातल्या सर्वात सुंदर गोगलगायी असल्याचे वाचले (आणि त्यामुळेच त्या critically endangeredही आहेत). यांच्यात आणखी खूप रंग असतात. बघू पुन्हा कुठे प्रत्यक्षात बघता आल्यातर.
फॅबरकॅसल पॉलिक्रोमोज
प्रिज्माकलर व्हेरीथिन्स
100gsm पेपरवर
पालघर, महाराष्ट्र , जलरंग ,कागदावर
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
लेकीने तिच्या कॉलज प्रवेशासाठी लागणार्या चित्रांमध्ये काढलेल एक चित्र. इथे सांगायला आनंद वाटतो की ४-५ वर्षांची असल्यापासून तिने काढलेली चित्रे मी इथे टाकली आहेत आणि माबोकरांनी तिचे भरभरुन कौतुक केले आहे. आता तिने डिझाईन अॅनिमेशन मध्येच पुढे शिक्षण करायच ठरवलं आहे.
इतके वर्ष वेळोवेळी कौतुकाची थाप दिलेल्या माबोकरांचे मनापासून आभार 