श्वास प्रश्वासाच्या
आरोह अवरोहाला
पाहता पहाता मी
सावध होत गेलो
मनाची बेलगाम
धाव सजग होवून
न्याहाळू लागलो
पाहतांना त्यात कधी
वाहून जावू लागलो
वाहने लक्षात येताच
पुन्हा मनापासून
वेगळे होवू लागलो
साक्षीच्या अथांग
निळ्या आकाशात
विहार करू लागलो
दृष्ट्त्वाच्या शिखरावर
सावध बसू लागलो
होता होता असे काही
शून्याच्या स्पर्शाचे
संकेत आकळू लागलो .
“अरे हेच तर मिळवायचे होते
मग आजवर टाळले का ?
मीच मला विचारले .
अन मीच उत्तर मला दिले
कारण त्यात
चुकायचे भय होते
स्वत:च स्वत:ला नित्य
सांभाळायचे होते
अन मला तर
सुरक्षित नीट पोहचायचे होते
ध्यानातून काहीही मिळवायची
“आकांक्षा ”
सर्व प्रथम मनातून काढून टाका .
अगदी सहज पणे ध्यान करा .
जे घडायचे ते घडू द्या .
एक दिवस अगदी सहज
सारे काही घडू लागेल.
प्रयत्नांनी ध्यान कधीच होत नाही .
खरतर ,
प्रयत्न हाच अडथळा असतो
प्रयत्नात आणि अभ्यासात
एक प्रकारचा तणाव असतो
एक प्रकारची अपेक्षा असते
अगदी शांतीची अपेक्षा सुद्धा
अशांती निर्माण करते
हा तणाव जायला हवा.
ज्या क्षणी हे पटते
दैवी शक्तीचे अवतरण होते.
“मी हे करतो”
हे वाटणेच थांबवा.
त्या ऐवजी अनुभूत करा.
मी मला, स्वत:ला
त्याच्या हवाली करत आहे.
हेच समर्पण आहे.
स्वत:चे संपूर्ण समर्पण करा.
जेव्हा हे कराल तेव्हाच
जप, जाप्य.. तप, तपश्चर्या वगैरे शब्द नविन नाहीतच.
तप आणि तपश्चर्या कदाचित आता तितक्याश्या अपिलींग राहिल्या नसल्या तरी अगदी पुराण कालापासून आजही जपाचे महत्व टीकून आहे. जपालाच बिलगून असते ते ध्यान. "सुंदर ते ध्यान ऊभे विटेवरी" मधले ध्यान नव्हे- त्या ओळीत, दगडात कोरलेल्या एखाद्या मूर्त रूपातही नाथांना सौख्य, शांती, लोभस असा जिवंत अनुभव मिळाला त्याचे ते वर्णन आहे. ईथे रूढ अर्थाने "ध्यान" करणे, मेडीटेशन या अर्थी म्हणतोय.
तर जप आणि ध्यान याचे आजच्याही युगात महत्व/अपिल कमी झालेले नाही.
09-Feb-12
ध्यानामध्ये ध्यान अस लागतच नाही . काल थोडीशी तंद्री लागली ,
मनात नक्की शिवशंकर आले पण स्वामींचा भास ,.... आजूबाजूला भुतावळ !
म्हनाले, म्हणजे मनातूनच फीलीन्ग्स आली - हि भुतावळ माझ्हीच लेकरं,
हिडीस फिडीस दचकवनारे चेहेरे बघून थोडी भीती वाटली.
अरे ह्या बिचार्यांना काय घाबरायचं? त्यांना मुक्तीची वाट दाखवायची कि आपणच घाबरायचं?
आयुष, आर्या मुखवटा घालून भौ: करतायत असं वाटलं . खूप वाईट वाटलं . आपल्या मुलांचा चेहरा असा असता तर ?
स्वामींना करुणासागर का म्हणतात हे कळलं. अफाट करुणा, कणव . ह्या फिलिंगनेच, डोळ्यातून अश्रू आले.....