अबोला

अबोला..

Submitted by मन्या ऽ on 22 August, 2019 - 07:11

अबोला..

अबोला होताच मुळी
दोघांचा जीवघेणा छंद
तरी प्रेमज्योत
तेवत होती मंद

तुझ्या आठवणींनी
गर्दीतही एकटी होते
तुझ्या आठवणींनी
एकटी असुनही
एकटी नव्हते

वादातुन साधले
नवे चांगले
प्रेमाच्या रोपाला
फुटले नवे धुमारे

शब्दाशब्दांत झाले
आज प्रेम साजरे
माझ्या-तुझ्या
वादातले प्रेम गहरे

(Dipti Bhagat)

कातील जीवघेणा....

Submitted by भक्तिप्रणव on 17 November, 2014 - 02:08

कातील जीवघेणा ठरतो हा अबोला
जाणिव बोलण्याची जपतो हा अबोला

झडती मंडपात सनई चौघडे जिथे
अधीर पापण्यात लाजतो हा अबोला

चांदव्या रात्रीच्या रंगल्या मैफिलीत या
वीणेच्या झंकारात स्वरतो हा अबोला

सजली तलम फुलांनी काया ती मखमली
सुखासिन देहात रसरसतो हा अबोला

घेता निरोप प्रियेचा जावया दूर देशी
पाणावल्या पापणीत झरतो हा अबोला

काळीज कापणारी धार शब्दांना जरी
शब्द निशब्द होतो नि बोलतो हा अबोला

- संदीप मोघे

शब्दखुणा: 

धरी ती अबोला...

Submitted by स्वाकु on 28 October, 2013 - 04:25

धरी ती अबोला मला राहवेना,
जसे गूढ आभाळ ते पाहवेना ||

मिटूनी तिचे ओठ ती का रुसावी?
गुन्हा काय झाला मला ही कळेना ||

पहाटे विझूनी दिवा रात गेली,
कसे हासवावे मला ही जमेना ||

जरी लोचनी राग होता तरी ही,
तिचा तो दुरावा मला मानवेना ||

धरी कान माझे जरी चूक नाही,
तशी ती खुलावी मला सांगवेना ||

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अबोला