कित्येकदा

कित्येकदा

Submitted by आर्त on 8 March, 2021 - 08:47

कित्येकदा वाटलं, सत्वर निघून माझं प्रेम व्यक्त करावं
कित्येकदा वाटसरू होऊनही दारावरून मी परतावं.

कित्येकदा वाटलं, तु नाही येणार, फार उशीर झाला आता,
कित्येकदा वाट एकाकी बघता मम अंतरंग अमृत व्हावं.

कित्येकदा वाटलं हिशोब करावा, उरले मोजकेच तुकडे,
कित्येकदा वाटलेल्या मर्माचं तु मूल्य चुकतं करावं.

कित्येकदा वाटलं, पुन्हा नको तो चौक आपल्या नात्यात,
जिथून वाटांनी भिन्न दिशा धरण्यास अगतिक व्हावं.

कित्येकदा वाटलं अनैसर्गिक आहे, नित्याचे भांडणे,
कित्येकदा वाटघाट म्हणून तु शिळ्या प्रपंचानामी खपवावं

विषय: 

कित्येकदा

Submitted by SADANAND BENDRE on 13 October, 2013 - 04:37

आखलेली हद्द मी ओलांडली कित्येकदा
वाट सापडली क्वचित पण लागली कित्येकदा

पावसाला घर दिले मी अन उन्हाला सावली
ही जुनी देणी अशीही भागली कित्येकदा

फार मुद्देसूद होती आखणी माझी तरी
मी तुझी बाजूच नकळत मांडली कित्येकदा

मी किडामुंगीच आता व्हायला हरकत कुठे
थोर मोठी माणसेही रांगली कित्येकदा

आपले नाते मला परराष्ट्रधोरण वाटते
भिंत आपण बांधली अन पाडली कित्येकदा

फार नाही पीत मी , विश्वास थोडा ठेव ना
मी तुझ्या नावे जराशी सांडली कित्येकदा

ठेवतो लपवून हल्ली मीच कवितांची वही
यारदोस्तांचीच मैफल पांगली कित्येकदा

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कित्येकदा