कित्येकदा

Submitted by SADANAND BENDRE on 13 October, 2013 - 04:37

आखलेली हद्द मी ओलांडली कित्येकदा
वाट सापडली क्वचित पण लागली कित्येकदा

पावसाला घर दिले मी अन उन्हाला सावली
ही जुनी देणी अशीही भागली कित्येकदा

फार मुद्देसूद होती आखणी माझी तरी
मी तुझी बाजूच नकळत मांडली कित्येकदा

मी किडामुंगीच आता व्हायला हरकत कुठे
थोर मोठी माणसेही रांगली कित्येकदा

आपले नाते मला परराष्ट्रधोरण वाटते
भिंत आपण बांधली अन पाडली कित्येकदा

फार नाही पीत मी , विश्वास थोडा ठेव ना
मी तुझ्या नावे जराशी सांडली कित्येकदा

ठेवतो लपवून हल्ली मीच कवितांची वही
यारदोस्तांचीच मैफल पांगली कित्येकदा

हे खरे मी आजवर नाही कुणाला मारले
पण खुशीने वाचली श्रद्धांजली कित्येकदा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast...

आखलेली हद्द मी ओलांडली कित्येकदा
वाट सापडली क्वचित पण लागली कित्येकदा>>>>>>>>>क्या बात !

पावसाला घर दिले मी अन उन्हाला सावली
ही जुनी देणी अशीही भागली कित्येकदा>>>>>>>>>वा !

फार मुद्देसूद होती आखणी माझी तरी
मी तुझी बाजूच नकळत मांडली कित्येकदा>>>>>>>मुद्देसूद !

आपले नाते मला परराष्ट्रधोरण वाटते
भिंत आपण बांधली अन पाडली कित्येकदा>>>>>>>>कुर्बान नंदूशेठ !! जियो !!!

फार नाही पीत मी , विश्वास थोडा ठेव ना
मी तुझ्या नावे जराशी सांडली कित्येकदा>>>>> ओ ! आच्छा ?

हे खरे मी आजवर नाही कुणाला मारले
पण खुशीने वाचली श्रद्धांजली कित्येकदा >>>>>>धन्य आहेस !

धन्यवाद रे !

-सुप्रिया.

अख्खी गझल अफलातून
मुशायर्‍यातून प्रत्यक्ष ऐकलीच आहे आज पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला
खूप खूप धन्यवाद

फार मुद्देसूद होती आखणी माझी तरी
मी तुझी बाजूच नकळत मांडली कित्येकदा

मी किडामुंगीच आता व्हायला हरकत कुठे
थोर मोठी माणसेही रांगली कित्येकदा

हे दोन शेर फार आवडले.

अख्खी गझल अफलातून
मुशायर्यातून प्रत्यक्ष ऐकलीच आहे आज
पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला>>>+1

सुपर्ब .....

किडामुंगी, परराष्ट्रधोरण आणि श्रद्धांजली - हे सारे अप्रतिमच ....