जरा वेगळं चिंतन..
Submitted by _आदित्य_ on 1 December, 2025 - 01:33
मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची गाढ झोपेची वेळ, पण तरीही सदानकदा बिछान्यात चुळबुळत पडलेला सदा. इतक्यात डोळ्यासमोर अचानक लक्ष लक्ष काजवे चमकल्यासारखे झाले अन तो दचकून बिछान्यातच उठून बसला. पाहतो तर समोर एक तेजस्वी सिद्धपुरुष ज्याच्या शरीरातून निघणार्या प्रकाशाने बेडरूमच्या डिमलाईटच्या प्रकाशाला पुरते झाकोळून टाकले होते. आपण स्वप्नात तर नाही ना हे बघण्यासाठी म्हणून सदा स्वताला चिमटा काढायला जाणार इतक्यात समोरूनच आवाज आला, "अरे राजा, स्वप्न पडण्यासाठी आधी झोप तरी यायला नको का?" .... हे मात्र सदाला पटले, गेले कित्येक दिवस त्याला मनासारखी झोप लागली नव्हती..