कान

पनवेल मधील मुस्लीम बांधवांचे अभिनंदन

Submitted by स्पॉक on 7 September, 2015 - 23:22

शासनाने आणि माननीय कोर्टाने सर्व धर्मीयांना त्यांच्या सगळ्या प्रार्थना / उत्सवादरम्यान आवाज निंयत्रित करण्याची आणि इतरांना त्रास होणार नाही अशा शांततेत उत्सव साजरा करण्याची विनंती / आवाहन केले होते.

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आमच्या गावातील सर्व मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सदरच्या आवाहनाला प्रतिसाद देत पनेवलमधील सर्व मशिदींवरील बाहेरचे भोंगे (मराठीत स्पीकर्स) उतरवण्याचे मान्य केले आहे.

या अतिशय स्तुत्य निर्णयाबद्दल, पनवेलमधील सर्व मुस्लीम बांधवांचे मनापासुन अभिनंदन आणि धन्यवाद.

कानाचे उपचार: पुण्यामधले तज्ज्ञ डॉक्टर सुचवा

Submitted by शाहिर on 30 August, 2013 - 15:18

माझ्या वडिलांचा उजवा कान खुप दुखत आहे ..६ महिन्यापासून हे दुखणे आहे . कानाच्या आतमधे ठणका येतो..
यावर अम्ही प्रथम फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला..त्याने आराम मिळाला नाही.. त्यांनी पेन किलर दिल्या ..तेवढ्यापुरते बरे वाटायचे ..मग कान नाक घसा तज्ज्ञ ला भेटलो ..त्यांनी दुर्बिणी मधून कानाची तपासणी केली ..
कान स्वच्छ आहे ..कोणतेही स्त्राव नाहीत.. नंतर त्यांच्या गोळ्यांनी फरक पडेना ..आणि निदान होइना ..

आम्ही सोनोग्राफी केली . सीटी स्कॅन केले ..एका डॉक्टरचे मत आहे , तिथली एक नस ` ओव्हररीअ‍ॅक्ट` होत आहे म्हणून दुखत आहे ..तर दुसर्या डॉक्टरचे मत आहे , कानाच्या आतील हाडाला सूज आह ..

Subscribe to RSS - कान