पनवेल मधील मुस्लीम बांधवांचे अभिनंदन

Submitted by स्पॉक on 7 September, 2015 - 23:22

शासनाने आणि माननीय कोर्टाने सर्व धर्मीयांना त्यांच्या सगळ्या प्रार्थना / उत्सवादरम्यान आवाज निंयत्रित करण्याची आणि इतरांना त्रास होणार नाही अशा शांततेत उत्सव साजरा करण्याची विनंती / आवाहन केले होते.

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आमच्या गावातील सर्व मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सदरच्या आवाहनाला प्रतिसाद देत पनेवलमधील सर्व मशिदींवरील बाहेरचे भोंगे (मराठीत स्पीकर्स) उतरवण्याचे मान्य केले आहे.

या अतिशय स्तुत्य निर्णयाबद्दल, पनवेलमधील सर्व मुस्लीम बांधवांचे मनापासुन अभिनंदन आणि धन्यवाद.

मशिदीच्या आतमधील भोंगे तसेच राहतील. त्यामुळे धार्मीक पद्धतीने अजान म्हणन्यास कुठल्याही प्रकारचे बंधन नाही.
या स्तुत्य निर्णयामुळे, ध्वनी प्रदुषन कमी होण्यास मदत होईल.
मुळ बातमी: http://www.lokmat.com/storypage.php?catid=10&newsid=7783618

आता ईतर सर्व धर्मीयांनी मुस्लीम बांधवांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपापले सर्व प्रार्थना व उत्सव शांततेत, कशाचीही नासाडी न करता आणि सामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत साजरे करावे, अशी नम्र विनंती करत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता ईतर सर्व धर्मीयांनी मुस्लीम बांधवांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपापले सर्व प्रार्थना व उत्सव शांततेत, कशाचीही नसाडी न करता आणि सामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत साजरे करावे, अशी नम्र विनंती करत आहे.>>>>>>+१

त्या साठिच तर धाग्यच्या शेवटई "नम्र विनंती" केली आहे ना?
त्या बातमीत दिल्या नुसार,
असे आवाहन सगळ्याच धर्मीयांना केले गेले आहे. त्यत गणपती सण ई . सुद्धा आले. त्याचाच एक भाग म्हणून मशिदींवरील भोंगे काढले आहेत.

सर्व मशिदींवरील सर्व प्रकारचे (आतले / बाहेरचे ) भोंगे (मराठीत स्पीकर्स) उतरवा .

अरब व इस्लामी देशातदेखिल मशिदीवर भोंगे बसवून रात्री-बेरात्री शान्तता भन्ग करणे व लोकांची झोपमोड करणे हा कायद्याने गुन्हा आहे

आता हिंदूनीही आतले बाहेरले भोंगे उतरवावेत
>>
एकाच धर्माला टार्ग्तेट करुन फुट पाडण्याच्या उद्देशाचा जाहीर निषेध.

पनवेलच्या मुस्लिम बांधवांचे व स्पॉक ह्यांचेही अभिनंदन! स्पॉक ह्यांनी मूळ धाग्यात सर्वांबाबत लिहून न्याय्य भूमिका घेतली.

एकाच धर्माला टार्ग्तेट करुन फुट पाडण्याच्या उद्देशाचा जाहीर निषेध

>>

.ही भोंगे ( बोम्बले) लावण्याची खुजली हिंदू आणि मुसलमान वगळता अन्य कोणत्या धर्मियात असते बरे ?

रॉबिनहुड,
निषेध लबाड कोल्याच्या जाणुनबुजुन दुस-या धर्माकडे बोट दाखवुन खिजवण्याच्या वृत्तीचा केला आहे.
बाकी कोणी काय भोंगे लावतो न लावतो याचा केलेला नाही.

मला एक कळत नाही, आवाजाचा विषय निघाल्यावर नेहमी गणेश उत्सवाचा दाखला दिला जातो.
३६५ दिवस, दिवसातुन पाच वेळा बोबंलनार्‍या भोंग्याने ध्वनी प्रदुषन जास्त होते, की दहा दिवस चालणार्‍या गणपती उत्सवांने?

अरे वा! सगळीकडेच बंद होणार का कर्णे? विविध उत्सव शांततेत पण खर्‍या अर्थाने साजरे व्हावेत. माझ्या घराच्या मागच्या भागात दूरवर कुठेतरी मशिद आहे. गेल्या महिन्यापर्यंत पहाटेच्या निरवतेचा भंग खणखणीत बांगेनेच व्हायचा. दिवसभरातही बांग ऐकू येत असे. आता अचानक बंद झालं आहे. त्यांनीही पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असावा. बेहरामपाड्यात मात्र नमाजाच्या वेळेला दर शुक्रवारी अजून खूप जोरात दणाणणारी गाणी, प्रवचनं (त्या धर्माची) लावलेली असतात.

ह्यावर्षीपासून आमच्या संस्थेतर्फे असणारी गणपती आगमन आणि पुनर्मिलाप (विसर्जन) मिरवणूक असणार नाही. पोलिसांवर त्या १० दिवसात येणारा ताण लक्षात घेवून हा निर्णय घेतला गेला आहे. विविध शहरांतील पोलिसांना आमचे Disaster Management Volunteers मात्र गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांनी केलेल्या मागणीला मान देवून गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशीच्या दिवशी मदत करतील.

पनवेलच्या मुस्लिम बांधवांचे व स्पॉक ह्यांचेही अभिनंदन! स्पॉक ह्यांनी मूळ धाग्यात सर्वांबाबत लिहून न्याय्य भूमिका घेतली.

चांगला निर्णय. सगळ्यांनीच तारतम्य दाखवले तर काहीच प्रश्न उद्भवणार नाही.

>>
+१ Happy

बरं वाटलं वाचून Happy

आमच्या घराजवळील अजानचे भोंगे चालु झाले की आजुबाजूच्या गल्लीतील कुत्री देखील तसाच सुर लाउन ओरडतात
आणि जेवढा मोठा आवाज असेल तितके जास्त श्वान त्यात सामिल होतात

स्पॉक,

बातमीबद्दल धन्यवाद. बातमीचा एखादा दुवा मिळेल काय? जरा कुठे हिंदू-मुस्लिम सहकार्य होऊ घातलं की सेक्युलर मुखंड ऊरबडव्या आवाजात अल्पसंख्यांकांचे हक्क नाकारल्याचं ओरडंत सुटतात. त्यामुळे अशा बातम्या मुख्य माध्यमांत सहसा येत नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

स्पॉकला धन्यवाद आणी पनवेलमधल्या सर्व मुस्लिम बान्धवान्चे अभिनन्दन. बाकी सर्व धर्मियानी याचे अनुकरण करावे.

दुवा Lol

ध्वनी प्रदूषण किंवा गोंगाट म्हणजे मोठा आवाज नसून नकोसा वाटणारा आवाज असे होय.

त्यामुळे एका धर्माच्या लोकांना दुसर्‍या धर्मीयांच्या सणांचा वा प्रार्थनेचा आवाज गोंगाट वाटणे साहजिकच आहे.

आमच्या दारातून बोल बजरंग बली की जय म्हणत गोविंदा सरकतो किंवा गणपती बाप्पा मोरया म्हणत ढोलताशे बडवत मिरवणूक जाते तेव्हा तो माहौल बघून अंगात उत्साह संचारतो.

याऊलट हाश्शम हुश्शम (नक्की काय बोलतात ते माहीत नाही) करत मुसलमानांचा काळे कपडे परिधान केलेला जमाव सरकतो तेव्हा तो अक्षरशा काळा दिवस आणि काळ्यापाण्याची सजाच वाटते.

त्यामुळे इथे गरज सर्वांना समान कायद्याची आहे. ते न्यायालयाने बनवावेत. सर्वांनी त्याचा आदर करावा. मग ईतर काही करण्याची गरज नाही. आपापली सेक्युलर वृत्ती असो वा आपल्या धर्माबद्दलचे प्रेम, ते आपल्या घरात राहिलेलेच उत्तम.

अवांतर - सध्या उत्सवांचे बदललेले ओंगळवाणे स्वरुप पाहता मला आपले सणही एक प्रकारचे गोंगाटच वाटू लागले आहेत हे खेदाने नमूद करू इच्छितो. यासाठी कोणताही कायदा होणार नाही, आपणच आपल्या सणांचे मांगल्य आणि पावित्र्य राखायचे आहे.

या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माचे आहेत त्याचे सण साजरे करायला कशाला हवेत कायद्याचे निर्बंध. ?बहुसंख्याकांचेच वर्चस्व पाहिजे की नको कोणत्याही देशात.? ज्याना गोंगाटाचा त्रास होतो त्यानी निर्गोंगाट देशात जावे.

पण नेमके हेच ढोल-ताशे, डिज्जे दणादण बडवले जातात त्याचा लहान बाळे, परीक्षेचा अभ्यास करणारी मुले-मुली, आजारी माणसे, म्हातारी माणसे या सर्वाना किती त्रास होत असेल? ऐन परीक्षेच्या वेळी मोठ्याने लावलेली गाणी, ढोल यान्चा भर वस्तीत काय परीणाम होतो याचा विचारच् उत्साही मन्डळी करत नाहीत्.

त्यामुळे इथे गरज सर्वांना समान कायद्याची आहे. ते न्यायालयाने बनवावेत.
<<

कायदा करण्याचा अधिकार फक्त भारताच्या संसदेला आहे, न्यायालये कायदा बनवत नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

>>>> कायदा करण्याचा अधिकार फक्त भारताच्या संसदेला आहे, न्यायालये कायदा बनवत नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. <<<<< बरोबर आहे प्रसाद.
पण यावरही मला कूशंका का येत्ये की इकडे सरकारीहापिसातला चपराशीदेखिल जे बोलेल/ठरवेल त्यालाही "काय-द्या-ची" डूब अस्ते?????

धन्यवाद स्पॉक! काही लोकांना दुवा आणि दुआ यांतला फरक ठाऊक नाही. पण तुम्हाला माझ्या मनात काय आहे ते ताबडतोब ओळखता आलं! Happy
आ.न.,
-गा.पै.

रॉबीनहूड | 8 September, 2015 - 14:04 नवीन
स्पॉक , मामांना लिंक द्या. दुवा मागताहेत ते !

>>>

भारी! Biggrin

Pages