प्रकाशचित्रं

भुताटकीचा सण आला - हॅप्पी हॅलोविन!!

Submitted by धनश्री on 31 October, 2013 - 13:11

आला, आला, भुताटकीचा आनंदी सण आला. सगळ्यांना हॅप्पी हॅलोविन!! Happy

मागच्या वर्षी हॅलोविनच्या या धाग्याला माबोकरांनी खूप छान प्रतिसाद दिला. तुमच्या प्रोत्साहनाने हुरूप आला. यावर्षी देखील त्याच उत्साहाने आणि त्याच धावपळीत या वर्षीची सजावट केली. भोपळे आणले , चित्रं काढली, आणि कोरीव काम केले. यंदा ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चित्रीत करण्याचा हा प्रयत्न.

सर्वप्रथम शेतातून भोपळे आणले. त्या वरची माती, पालापाचोळा, धुवून टाकला. स्वच्छ झालेले हे टवटवीत भोपळे.
प्रचि १

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - इंद्रधनुष्यी सौंदर्य" १० सप्टेंबर

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 12:14

रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!

हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.

Subscribe to RSS - प्रकाशचित्रं