मानस कथा

संकेत - भाग १

Submitted by मुग्धमानसी on 14 December, 2015 - 05:58

माझी ही कथा मायबोलीवर मी आजपासून काही भागांत प्रसिद्ध करते आहे.

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' - दिवाळी २०१४

ही कथा मायबोली.कॉमवर प्रसिद्ध करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती सुजाता देशमुख यांचे मनःपूर्वक आभार.
___________________________________

नाट्यगृहाचे कॅन्टीन हे काय कुणाच्या लीगल इश्युज विषयी चर्चा करण्याची जागा आहे?

शब्दखुणा: 

आगंतुक! - शतशब्दकथा

Submitted by मुग्धमानसी on 11 March, 2015 - 03:10

आज गेले नाही.

एरवी रोजच जाते. भर दुपारी, उन्हात... त्याला भेटायला.
कुणीच नसतं तेंव्हा तिथं. एकांताची छान मैफल जमते...

विचारते खुशाली. कंटाळलेल्या त्याला जराशी तरतरी येते.
बदल्यात तो ऐकून घेतो... माझं सारं!
सल्ले, उत्तरं देत नाही. थट्टा करत नाही. गुपितं फोडत नाही. कळवळतही नाही.
फक्त ऐकून घेतो.
म्हणून तिथं जाते मी रोजच.

काल तिथं गर्दी दिसली. सोहळा असावा... आगंतुका सारखं कसं जावं?
डोकावले तर तोही दिसला... नटून गाभार्‍यात! मी परतले.

वळून पुन्हा बघते तर हा चक्क दाराबाहेर उभा!
"इथे काय करतोयस...?"
तो हसला...
"तुला भेटायला... रोज येत असतो ना... भर दुपारी, उन्हात..."

अभिनंदन (शतशब्दकथा)

Submitted by मुग्धमानसी on 6 September, 2013 - 07:15

"अभिनंदन... मुलगी झाली!"
अन् ती आली माझ्या हातांत.

हवेत हात हलवत ती बोलावत होती जणू मला... नव्हे... माझ्यातल्या कुणालातरी.

चेहरा हळूवार नेला तिच्या जवळ आणि तिचा पहिला स्पर्श झाला! सर्वांग भारून गेलं! कुरळ्या ओलेत्या जावळात... चुळबुळणार्‍या गुलाबी तळव्यांत... मी शोधू लागलो मलाच.

अचानक पाहिलं तिनं थेट माझ्या डोळ्यांत. आणि खुदकन हसली. त्याक्षणी आमची पहिली ओळख पटली. माझ्यातला बाप अखेर तिनं शोधलाच!

"माझ्याकडे बघू बाळ...." कुणीतरी माझ्या हातून तिला घेऊ लागलं. मी चिडलो. ही माझी... माझ्यापासून दूर नेऊ देणार नाही हिला....

सुर्योदय

Submitted by मुग्धमानसी on 23 July, 2013 - 03:33

"ए चला आता. पुरे झालं. अंधार पडूनही फार वेळ झालाय. परतूया आता. हला." - आकाश आता अगदी निर्वाणीच्या सूरात म्हणाला.

शुभ्र कोर्‍या कॅनव्हासवर एखाद्या सुंदर चित्राची कल्पना करत असतानाच कुणीतरी त्यावर भस्सकन् वेडीवाकडी शाई ओतून द्यावी तसं झालं राजसला. मनातल्या मनात वैतागून त्यानं क्षितीजाकडे लागलेली त्याची नजर पुन्हा पायाखालच्या रेतीत घुसळली.

शब्दखुणा: 

बकुळाबाईंचं चरित्र

Submitted by मुग्धमानसी on 2 July, 2013 - 05:11

"मी माझं चरित्र लिहीणार आहे!"
-बकुळाबाईंनी दवंडी पिटल्याच्या आवेशात घोषित केलं आणि ’आश्चर्याचा धक्का, अविश्वास, अभिमान, गहिवर, कौतुक, आनंद... वगैरे वगैरे’ या सगळ्या भावनांचं अनोखं स्नेहसंमेलन आता आपल्याला ईंदूच्या - त्यांच्या सुनेच्या - चेहर्‍यावर पहायला मिळणार आहे अशा खात्रीने त्यांनी समोर बसून मेथी निवडणार्या ईंदूकडे पाहिलं. ईंदू समोरच्या टिव्हीत पार आकंठ बुडालेली होती. एका हाताने मेथीची पानं त्यांच्या मूळस्थानापासून कचाकच तोडत स्थानभ्रष्ट करता करता ती सवयीनं उद्गारली... "हं..."

शब्दखुणा: 

रिक्षावाला - ४ (अंतिम)

Submitted by मुग्धमानसी on 25 April, 2013 - 05:06

आधीचे भाग...
भाग १ - http://www.maayboli.com/node/42624
भाग २ - http://www.maayboli.com/node/42643
भाग ३ - http://www.maayboli.com/node/42647

तुषारने नीताकडे मोर्चा वळवला.
"तुम्ही... आय मीन... तू काहितरी बोल ना... ताई..."
नीताने एक थंड कटाक्ष तुषारकडे टाकला. इतका थंड की तुषारच्या अंगावर शहारा आला. पण लगेचच तिच्या डोळ्यात त्याला सामान्य भाव दिसले.
"मी? काय बोलू?"
"तुमच्या मिस्टरांचे युद्धातले काही अनुभव सांगा की."
नीताचं तोंड जरासं पडलं. "ते नसतात इथे. त्यांचे अनुभव सांगण्यापुरतेही."
"त्यांची खूप आठवण येते तुला?"
"...."

शब्दखुणा: 

रिक्षावाला - ३

Submitted by मुग्धमानसी on 24 April, 2013 - 06:42

एक गंभीर श्वास सोडून बर्वे उद्गारले - "कळलं मला!"
"काय कळलं साहेब?"
"जे कळायचं होतं ते कळलं. उतरा राजे..." ते तुषारकडे पाहून म्हणाले.
"का? मी का उतरू?" - तुषार साशंक आवाजात म्हणाला.
"मी सांगतोय म्हणून. उ त र!!!"
तुषारने चमकून एकदा बर्व्यांकडे पाहिलं. पण त्यांच्या आवाजाची धार जाणवून तो निमुटपणे रिक्षातून उतरला. त्याच्यामागून बर्वे उतरले.
"बसा आता आत. या ताईंकडे थांबा जरा. आणि हे सांभाळा..."
"हे काय आहे?"

शब्दखुणा: 

रिक्षावाला - २

Submitted by मुग्धमानसी on 24 April, 2013 - 00:49

रिक्षाच्या एका कडेला बसून नीता विचारात गढलेली होती. तोंडाने सतत रामनाम पुटपुटत होती. तरी मनातलं वाईट विचारांचं वादळ काही थांबेना. अवघ्या तास-दिड तासापुर्वी कुठे होतो आपण! शाळेत रानडे बाईंना मनातल्या मनात शिव्या घालत घालत भरभर काम उरकत होतो. मनगटातल्या घड्याळ्याकडे पाहत मनात म्हणत होतो कि याहून वाईट काही होऊच शकत नाही. आणि आता... एवढ्या लगेच दैवानं दाखवून दिलं कि आहे त्याहूनही वाईट असू शकतं. परमेश्वराच्या कल्पनाशक्तीला अंत नाही हेच खरं. मघाशी वेळेत... किमान लवकरात लवकर घरी पोचायचं म्हणून आटपिटा चालला होता जीवाचा. आणि आता... परमेश्वरा...

शब्दखुणा: 

रिक्षावाला

Submitted by मुग्धमानसी on 23 April, 2013 - 03:14

नीता शाळेतून बाहेर पडली तेंव्हा बरंच अंधारून आलं होतं. त्यातून पाऊस दाटलेला. वारा सुटलेला. तिची पावलं झपाझप पडत होती. डोळ्यांसमोर दिसत होतं फक्त तिचं घर आणि चिमण्या आतूर डोळ्यांनी तिची वाट बघणारं तिचं पिल्लू!!.... पिलाची आठवण येताच घशाशी आलेला आवंढा गिळत तिनं पावलांचा वेग आणखी वाढवला. जवळ जवळ धावतच तिनं बसस्टॉप गाठला. आभाळ आता चांगलंच भरून आलं होतं. मनातही प्रचंड हुरहूर माजल्यासारखी... ही वेळच प्रचंड घातकी!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मानस कथा