|| श्री ||
आशिषचा पांचवा वाढदिवस होता. पाच-साडेपाचलाच केक कापायचा होता. सकाळी सत्यनारायणाची पूजा घालून झाली होती. घरची घरची म्हणत बरीच माणसे जेवायला होती. आदल्या दिवशीपासून गावाहून नातेवाईक माणसे आलेली होती. शेजारच्या फ्लॅटचा हॉलही वापरायला घेतला होता. संध्याकाळी तर तुडूंब माणसे बोलावलेली होती. दरचवर्षी आशीषचा वाढदिवस थाटातच असायचा, मला प्रत्येक वर्षी सगळ्या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण असायचे.
'वाढदिवस', आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस. काहींना मोठं झाल्याचा आनंद मिळतो, तर काहीजण नाराज असतात एक वर्ष कमी झालं म्हणून. अर्थात, प्रत्येकाच्या मनावर हा अर्थ अवलंबून असतो. पण माणसाला सुखाची अपेक्षा असेल तर त्यानं नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. भारतीय संस्कृती ही "तमसो मा ज्योति र्गमय" या पायावर उभी असल्यानं नेहमीच सकारात्मक विचार सांगते. साहजिकच वाढदिवसाला ती दिवाळी इतकाच आनंदाचा दिवस मानते.
हे मी केलेले काही केक्स व केक डेकोरेशन्स 
*****************************************
हा लेकीच्या दुसर्या वाढदिवसाचा 'लॉली क्लाऊन'

****
हे छोटे क्लाऊन्स:


*****
हा दुसर्या वाढदिवसाचाच घरच्यासाठी केलेला 'लॉली मॉन्स्टर केक'