विचार-सरणी
गुन्हेगाराच्या गुन्हेगारीवर
सगळेच तोशेरे ओढतात
तर त्याच्या सांत्वनालाही
कधी-कधी बसेरे वाढतात
केल्या कर्माच्या मोबदल्याला
जैसी करणी-वैसी भरणी असते
मात्र प्रत्येक गोष्टीच्या पाहण्याला
वेग-वेगळी विचारसरणी असते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
कायद्याच्या कचाट्यात
माणसांसाठीच माणसांनी
बनवलेला कायदा असतो
माणसांच्या या कायद्याचा
माणसांनाच फायदा असतो
त्यांना शिक्षा तर होणारच
जे अपराधांत ओले आहेत
कारण कायद्याच्या कचाट्यात
भले-भले ना भले आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
ना हिट,ना रन
बोला कीतीही खोटे कुणीही
सत्यापुढे ते ना भावते आहे
सांगा असत्य टिकेलच कसे
इथे "सत्यमेव जयते" आहे
कुणी ना थोरले,ना कुणी बारके
सर्वांसाठीच कायदा सम आहे
असुद्या कितीही "हिट" कुणीही
कायद्यापुढे ना त्याची "रन" आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
नैसर्गिक बदल
कुणी शाब्दीक दोष दिले
कुणी भावनीक रोष केले
कुणी-कुणी तर म्हणाले
या निसर्गाचेच होश गेले
आपण काहीही म्हटलो तरीही
निसर्ग अनियमितता टिकवुन आहे
निसर्गाचा घडणारा प्रत्येक बदल
आता नैसर्गिकतेलाही ठकवुन आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
म्हाळसा देवीचे स्टेटस
टिव्ही मधील सिरियलचा
मना-मनात गुंता आहे
खंडेरायाच्या लग्नाची
घरा-घरात चिंता आहे
कुणी भलते बेफाम झालेत
कुणी सावरू लागले आहेत
म्हाळसादेवीचे स्टेटस् मात्र
मिडीयात वावरू लागले आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
महापुरूषांचे विचार,...
इतिहासाचे पाठबळ घेऊन
वर्तमानात चालावं वाटतं
आपलं कार्यही कुणाला
इतिहासाशी तोलावं वाटतं
महापुरुषांच्या जाती घेऊन
हल्ली तर सारेच नाचतात
मात्र महापुरूषांचे विचार हे
आत्मसात करावे लागतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
पुरस्कार,..
पुरस्कारांच्या वाटा-घाटीला
भुतकाळाचाही वास असतो
कित्तेक-कित्तेक पुरस्कारांना
पारदर्शकतेचा भास असतो
मात्र पुरस्काराचा वाद घडणे हा
पुस्काराचाही अवमान असतो
प्रत्येक व्यक्तीच्या योग्यतेचा
समाज हाच परिमान असतो
त्यामुळेच पुरस्कार देताना
योग्य व्यक्तीलाच दिले पाहिजेत
त्यांच्या सन्मानाचे स्वागत
जनतेकडूनही झाले पाहिजेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
परिवर्तनाची बोंबा-बोंब
ठराविक-ठराविक वेळेला
ठराविक-ठराविक धडे असतात
सांगणारे सगळेच असले तरीही
आत्मसात करणारे थोडे असतात
सामाजिक परिवर्तनाच्या नावाखाली
कुठे बाजारीकरणाचाच जश्न आहे
परिवर्तन तर सर्वांनाच हवं आहे
मात्र करायचं कुणी हा प्रश्न आहे,...!
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
हे महामानवा,...
मानव जातीच्या कल्याणाला
शांततेचा तुच मार्ग दिला
अहिंसेचा स्वीकार करूनही
नष्ट विषमतेचा वर्ग केला
आज मानवतेच्या मना-मनात
तुझ्या शांततेची भ्रांती आहे
हे महामानवा तथागता
हि तुझीच विश्वक्रांती आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
गंमत हास्य दिनाची,...
तीला म्हटलं हसून घे
आज हास्य दिन आहे
एक दिवस हसण्याचाही
सांग तुला का शीन आहे
तीनं माझ्याकडं पाहीलं
चेहरा थोडा गंभीर केला
तीच्या या गंभीर वर्तनाला
मी माझाच मला धीर दिला
मी प्रयत्न केला तरीही
ती मात्र हसली नाही
तीच्या स्वभावाशी ती
जराशीही फसली नाही
तीचा चेहरा पाहून मात्र
मी गप-गुमान बसलो होतो
तीला हसवण्याच्या नादात
मीच आज फसलो होतो
मात्र तीला पाहून मीही
आता पुरता गंभीर झालो
आता मीही हसणार नाही
या मतावर खंबीर झालो
माझी झालेली फसगत
आता मला दिसु लागली
मात्र माझा चेहरा पाहून
ती जोरजोरात हसु लागली
नक्की कळेनासं झालं मला