अबु आझमींचं खरंच चुकलं का?

Submitted by kanchankarai on 9 November, 2009 - 06:32

मला वाटतं घटनेनुसार जवळजवळ २२ संमत भाषांमधून आमदार शपथ घेऊ शकतात. अबू आझमींनी ’त्या’ प्रसंगानंतर पत्रकारांसमोर असे सांगितले आहे की, काही आमदारांनी इंग्रजीतून शपथा घेतल्या. जर ’ते’ चालते तर ’हे’ का नको? हे जर खरं असेल तर आझमींचं काहीच चुकलं नाही. कारण आग्रह मराठीचा आहे, त्यामुळे विरोध इंग्रजी भाषेलाही व्हायला हवा होता. वक्तव्य केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार हे मनसेचं तत्व आहे त्यामुळे ’मनसे’ने थोडं धिराने घ्यायला हवं.

मात्र, आझमींच्या शपथविधीच्या वेळची चित्रफित पाहिली तर लक्षात येतं की खुद्द आझमींची देहबोली देखील हेच दर्शवत होती की, "घेणार मी शपथ हिंदीतून. बघू राज ठाकरे काय करतो ते?" त्यामुळे असं वाटतं की केवळ ’मनसे’ला विरोध करण्यासाठी म्हणूनच अबू आझमींनी हिंदीतून शपथ घेण्याचा आग्रह धरला असावा. कारण राज मसल पॉवर दाखवणार, हे त्यांना माहित असावं.

http://bit.ly/i551U

तिकडे लालूप्रसाद यादव यांना आपण कोणत्या पक्षाविषयी बोलतोय याचं भान आहे की नाही कुणास ठाऊक? आधी त्यांनी आबू आझमींच्या घटनेमुळे ’मनसे’चा धिक्कार केला. मग महाराष्ट्राबद्दल बोलताना त्यांनी शिवसेनेलाही मधे घेतलं. त्यांचं म्हणणं असं आहे की देश तुटला तर तो महाराष्ट्रामुळेच तुटणार!

नि हिंदीला सारखं सारखं राष्ट्रभाषा का म्हणतात? खरंच ती राष्ट्रभाषा आहे का??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नि हिंदीला सारखं सारखं राष्ट्रभाषा का म्हणतात? खरंच ती राष्ट्रभाषा आहे का??>> यावर भरपुर चर्चा झाली. हिंदी कायद्याने राष्ट्रभाषा नाही हे स्पष्ट आहे.

तिकडे लालूप्रसाद यादव यांना आपण कोणत्या पक्षाविषयी बोलतोय याचं भान आहे की नाही कुणास ठाऊक?>> याव्यतिरिक्त त्याच्याकडे काही कामही नाही. करु द्या त्याला बडबड.

मराठीचा आग्रह झालाच पाहिजे, पण संविधान काय म्हणते याचही भान असावं.

बघू राज ठाकरे काय करतो ते?" त्यामुळे असं वाटतं की केवळ ’मनसे’ला विरोध करण्यासाठी म्हणूनच अबू आझमींनी हिंदीतून शपथ घेण्याचा आग्रह धरला असावा.>>>>>>>>>>>अहो पण त्याने कायद्यात राहून केलयं हे आपल्याला सझायला हवे ना.
म न से च्या आमदारांनाच का निलंबित केले? हिंदी मध्ये शपथ घेणे जर कायदयाने गुन्हा असता तर आझमीला निलंबित केला असता.

आझम्याच्या म्हनण्यानुसार काही आमदारानी इंग्रजीतून शपथ घेतली.त्यांचे काय? आझम्याचा हा प्रश्न बिनतोड आहे. मनसेने हाच न्याय त्याना का लावला नाही? गिरीश बापटानी तर संस्कृतमध्ये घेतली. समजा आझम्याने कागदावर लिहून मराठीत घेतली असती तरी मनसेने आझ्मी आम्हाला घाबरला म्हणून मराठीत शपथ घेतली असेही भांडवल झाले असते. मी तुम्हाला घाबरत नाही हे दाखवण्यासाठी अझमीनेही मुद्दाम हिन्दीत घेतली. त्याने काय झाले. आझमीची व्होट बॅन्क आणखी पक्की झाली. आणि मनसेची ही झाली. यात सेनेची स्थिती गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले अशी झाली आहे.
आम्ही सेनेपेक्षाही आक्रमक आहोत हे चित्र मनसेला रंगवायचे होते ते झाले.

यात फायदा झाला कॉन्ग्रेसचा.

हुडा,
तुमचं हेच विश्लेषण आवडतं मला. येकदम टु द पॉईंट आणि पटेश. मनसे कॉर्पोरेशनच्या निवडणुकीपर्यंत संधी मिळेल तिथे असाच धिंगाणा घालणार. त्यांचे दिवस चांगले आहेत.
पण आझमीची व्होट बँक पक्की झाली असे नाही वाटत. अर्थात काळच ठरवेल काय ते.

आर आर सिंग नावाचे एक उत्तरभारतीय गृहस्थ पूर्वी महापौर होते. त्यानन्तर एकदा त्यांची भेट मुम्बै जिल्हाधिकार्‍यांच्या केबीन मध्ये झाली होती. ड्रेस टिपिकल यु पी. म्हणजे तलम धोतर, तलम कुर्ता, टोपी नाही. अर्थात हे आर आर सिन्ग आहेत हे माहीत नव्ह्ते. नाव ऐकून होतो. ते इतकी स्वच्छ आणि शुद्ध मराठी बोलत होते की बस. सुरुवातीस तर वाटले कोणी महाराश्ट्रीयनच आहेत. समोरचे जिल्हाधिकारी अमराठी होते. (तेही मराठी बोलत होते.) न राहवून आम्ही श्री सिन्ग याना तसे म्हटलेही त्यावर त्यानी असे उत्तर दिले की आमचे सगळे आयुष्य मुम्बईत गेले आता हेच आमचे घर आणि राज्य झाले आहे.
गम्मत वाटली.

झालं ते वाईटच झालं.
अबु आझमी चूकले.म.न.से. आमदारही (कायदा हातात घेऊन ) चूकले.
आता दंगली आणि तोडफोड करून सामान्यांचं जगणं अवघड करू नका.

चुकलं फक्त एकच.....

त्यानं आव्हान दिलं

नम्रपणे म्हणाला असता...मी अजुन शिकतोय्....वेळ लागेल्....तरी चाललं असतं....

मनसे च्या साइट वर लिहिलेलं हे वाक्य.....

जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते.

>>>>>>नम्रपणे म्हणाला असता...मी अजुन शिकतोय्....वेळ लागेल्....तरी चाललं असतं....
अगदी अगदी.
आजम्याची दादागिरी जास्तच वाढत चाललीये. त्याची बोलण्याची पद्धत बघीतली कीच डोकं सणकतं.
मला तर वाटतं चांगलाच फोडायला हवा होता त्याला..

मी म्हणेन चुकलं मनसेचं.......
मगं कायं , एका फालतु आझम्यासाठी चार जंणाची विधानसभेतील अत्यंत आवश्यक असणारी शक्ती वाया घालवली. त्या आझम्याला तर बाहेर पण तुडवता आलं असतं .

मला पटलं मनसे चं काम....

-- एक मेसेज उलटा जायला पाहिजे...तो गेला आता.....

-- नेभळटा साऱखं सभेत बसुन ५ वर्ष कशाला वाया घालवायची......एक घाव दोन तुकडे...

-- त्याला गोड बोलून सांगितलेलं समजत नाही ना...

आता रस्त्यावरचा राडा करू नये.....(आत्ताच सुरू झालाय्)..हेच एक दुर्दैव.....

रॉबिनहुड यांचे विश्लेषण अगदी अचुक..

आधी मला वाटायचे की राज ठाकरे बेताल बोलतो. त्याच्या अगदी उलट आहे. तो जे बोलतो किंवा वागतो ते भावनेच्या भरात नसुन अगदी मोजुन मापुन आणि कॅल्क्युलेटेड असते हे मनसे ने विधानसभेमधे जे केलेय त्यातुन अगदी स्पष्ट झाले आहे. तो हळुहळु शिवसेनेला पर्याय उभा करतोय हे आता अगदी स्पष्ट झालेय.
गॉडफादर मधला अल पॅचिनो म्हणतो तसे "इट्स नॉट पर्सनल, इट्स बिझनेस".

मनसेला मानले आपण Happy

आझमीची व्होट बॅन्क आणखी पक्की झाली. आणि मनसेची ही झाली. यात सेनेची स्थिती गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले अशी झाली आहे.
>>> बराबर बोला. उद्याच्या मिडडे किंवा मुंबईमिररला आयेशा ताकियाची मुलाखत नक्की येणार. त्यामधे मनसेचा उल्लेख हमखास गून्स गुंडे असा केलेला असणार.

पण आझमीला थोबडवला ते बघून बरं वाटलं. कुनीतरी हे करायलाच हवं होतं Proud

सय्यद शहाबुद्दीन नावाचे एक जुने खासदार होते(सध्या एक गुंड जेलमध्ये आहे तो नव्हे). हे पूर्वी आय एफ एस (Indian Foriegn Service ) मध्ये होते. म्हणजे उच्च शिक्शित वगैरे. त्यांचा वन्दे मातरम ल विरोध असे. त्यातूनच' इस देशमे रहना है तो वन्दे मातरम कहना पडेगा' ही घोषणा जन्माला आली. त्यांची मुलाखत एकदा टीव्ही वर ऐकली त्यात हा वन्दे मातरमबद्दल प्रश्न त्याना विचारण्यात आला होता. त्यांचे म्हणणे असे की की त्यातली काही कडवी, मूर्तिपूजक आहेत म्हणून न म्हणण्याची भूमिका आहे. शिवाय उद्या मला मला पटले तर मी म्हणेणही पण कोणी बाळ ठाकरे म्हणतात म्हणून मुळीच म्हणणार नाही. मी काय म्हणावे हा हुकूम करणारे हे कोण?
इकडचीही भूमिका त्याला कसा वाकवला अशीच असते. त्यामुळे दोन्ही बाजू रिजिड होत जातात. आझमी ने एक नवीन पिल्लू काढले आहे. राजच्या मुलाने जर्मन भाषा विषय घेतला त्यावेळी त्याने त्याला का रोखले नाही. राम कदम या मनसे आमदाराने हिन्दीतून दम दिला. आता या गोष्टीना काही अन्त आहे का?

त्यांचे जाऊ द्या , मायबोली हे पोर्टल मराठीतून चालावे अशी मूळ धारणा आहे. इथे काही लोक इन्ग्रजी पोस्ट करतात. त्यावर त्याना समज दिल्यास 'आम्ही कोणत्या भाषेत लिहावे सांगणारे तुम्ही कोण?" असा काही नियम आहे का? 'शब्द हे भावना पोचण्याचे माध्यम आहे. ते कोणत्या भाषेत करावे हा आमचा प्रश्न आहे आशय कळल्याशी कारण, आम्ही इंग्रजीतच चांगले 'एक्सप्रेस ' करू शकतो. आता परदेशात राहू मराठीत ल्याहायचे म्हणजे आता 'कशशंच' वाटतं असा वितन्डवाद करणारे बरेच 'आझमी' इथे होऊन 'गेले' आहेत.

.

हुडा,
त्यांना सांगितलं तर त्याचे दत्तू लोक तो माणूस जवळजवळ प्रेषित असल्यासारखे अंगावर येतात. तुम्हाला त्या बीबीवर जायला कोणी सांगितलं इत्यादीपासून सल्ले देतात.. ते पण आझमीच की. संदर्भासाठी ज्योतिष, भविष्य बीबी बघा.

राज्यघटनेच्या आर्टीकल १८८ तील तिसर्‍या परिशिष्टातील तरतुदींप्रमाणे विधिमंडळाच्या सदस्याला त्याचे आसन ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल अथवा त्यानी ऑथराईज केलेल्या अधिकार्‍यापुढे घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते.त्याचा इंग्रजी तर्जुमा असा.
"I, A.B., having been elected (or nominated) a member of the Legislative Assembly (or Legislative Council), do swear in the name of God/solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter."]
त्याचा आवश्यक त्या भाषेत भाषान्तर उपलब्ध असते.
अशा शपथा, निवडणुकीला उभे राहताना उमेदवाराना घ्याव्या लागतात. त्याचा मजकूर असाच पण थोडा वेगळा असावा लागतो.
मंत्र्याना मंत्रीपद धारण करताना पद आणि गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते, ती राज्यपाल अथवा राष्ट्रपती देतात. (शपथविधी).
Form of oath of office for a Minister for the Union:-
"I, A.B., do swear in the name of God/solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, _439[that I will uphold the sovereignty and integrity of India,] that I will faithfully and conscientiously discharge my duties as a Minister for the Union and that I will do right to all manner of people in accordance with the Consitution and the law, without fear or favour, affection or ill-will."

Form of oath of secrecy for a Minister for the Union:-
"I, A.B., do swear in the name of God/solemnly affirm that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a Minister for the Union except as may be required for the due discharge of my duties as such Minister."
उच्च व सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तीपदी पद धारण करताना त्यानाही शपथ घ्यावी लागते. ती अशी

Form of oath or affirmation to be made by the Judges of a High Court:-
"I, A.B., having been appointed Chief Justice (or a Judge) of the High Court at (or of) ........................... do swear in the name of God/solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, _439[that I will uphold the sovereignty and integrity of India,] that I will duly and faithfully and to the best of my ability, knowledge and judgment perform the duties of my office without fear or favour, affection or ill-will and that I will uphold the Constitution and the laws."

आता या शपथेचा काय उपयोग असा प्रश्न येणे क्रमप्राप्त आहे . यात घेतलेल्या शपथेविरोधी वर्तन केल्यास सदर शपथेचा भंग होऊन पद सोडावे लागण्याचा प्रसंग येऊ शकतो. (अर्थात ते सिद्ध झाल्यासच....)

राज ठाकरेंच्या विरुद्ध 'ब्रीच ऑफ प्रिविलेज'ची कारवाइ होऊ शकते. ती तशी व्हावी अशी त्यांचीही इच्छा असेल :). हक्कभंग सिद्ध झाल्यास ९० दिवसापर्यन्त तुरुन्गवासाची शिक्षा सभागृह देऊ शकते.

या निमित्त्याने ' हिंदी राष्ट्रभाषा आहे किंवा नाही ' हाही वाद काही मराठी प्रसारमाध्यमांमधे सुरू झालाय... Happy

मनसेने केले ते बरोबर की चूक हे ठरविणारे इतर पक्षाचे राजकारणी स्वत: किती बरोबर आहेत ?
दुसर्‍या कोणत्याही राज्यात (विशेषत: दक्षिणी) जाऊन तिथल्या विधानसभेत असे करून दाखवावे आझमी आणि तत्सम लोकांनी. आपलेच लोक अवसानघातकी आहेत.
मराठी माणसाची सहिष्णुता बरेच वेळा त्याला धोक्यात आणते.
उदा. बोलणी करायला आलेल्या नजिबाला दत्ताजी शिंदे यांनी नुसते पकडून ठेवले असते तरी पानिपत घडले नसते.
गांधी हत्या (की वध ?) झाल्यापासुन एकंदरीतच काँग्रेसी उत्तर संस्कृतीला महाराष्ट्राबद्दल आकस आहे.
वर दुर्दैव असे की सेनेचा काळ सोडल्यास इतर सर्व काळी असल्याच संस्कृतीचे राज्य महाराष्ट्रात आहे.
पेशव्यांच्या काळात मराठी सत्ता भारतात किती होती ते खालील नकाशात पहावयास मिळेल.
http://en.wikipedia.org/wiki/File:Marathas.GIF
उत्तरेकडच्या राज्यकर्त्यांना ते सलत असणार. हे असे सल, आकस आणि आपलेच पाय ओढणारी माणसे असल्यावर काय होणार महाराष्ट्राचे ?

विधीमंडळातील सदस्यत्वाची शपथ एवढीच असेल तर त्याचे मराठीत भाषांतर करून घेऊन ती समजून घेणे अबू असिम आझमी ला गेल्या १३ दिवसात शक्य होते.
ते केले नाही ते कशासाठी ? तसेच प्रत्येक मुलाखतीत मी शपथ हिंदीतूनच घेणार हे परत परत सांगणे खरोखर आवश्यक होते का ?

अबू असिम आझमी २००० सालापासून समाजवादी पक्षाचा मुंबई शहर अध्यक्ष आहे तरीही त्याने आतापर्यंत मराठी शिकण्याचा प्रयत्न केला नाही याचाही या घटनेसंदर्भात विचार केला पाहिजे.

जर अबू असिम आझमी ला मराठी पुरेसे समजत नसेल तर त्याच्या विभागातील नागरिकांच्या मराठीतील तक्रारी तो कशा काय समजून घेणार ?
काही दिवसांपूर्वी विधीमंडळ कामकाजाची कागदपत्रे हिंदीतून मिळावीत म्हणूनही अबू असिम आझमीने आग्रह धरला होता.

काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी ने इंग्रजीतून शपथ घेतली तेव्हाही निषेध नोंदवला गेला होता. ज्याप्रकारे अबू असिम आझमीबद्दल निषेध नोंदवला गेला ती पद्धत चुकीची असली तरी याची जबाबदारी काही प्रमाणात अबू असिम आझमीवरही आहे.

ज्या अबू असिम आझमीने २००० साली मस्तान तलावाजवळील भाषणात 'देशाचे तुकडे झाले तरी मला पर्वा नाही' या आशयाचे शब्द उच्चारले होते त्याने राज ठाकरेवर देशद्रोहाचा आरोप करणे म्हणजे विनोदच आहे.

<<हुडा,
तुमचं हेच विश्लेषण आवडतं मला. येकदम टु द पॉईंट आणि पटेश. मनसे कॉर्पोरेशनच्या निवडणुकीपर्यंत संधी मिळेल तिथे असाच धिंगाणा घालणार.>>
अनुमोदन. कायदा आहे, तो बदलायचा तर वैधानिक मार्गाने बदला. गुंडगिरी करून नव्हे.

<<त्यांचे जाऊ द्या , मायबोली हे पोर्टल मराठीतून चालावे अशी मूळ धारणा आहे. इथे काही लोक इन्ग्रजी पोस्ट करतात. त्यावर त्याना समज दिल्यास 'आम्ही कोणत्या भाषेत लिहावे सांगणारे तुम्ही कोण?" असा काही नियम आहे का? 'शब्द हे भावना पोचण्याचे माध्यम आहे. ते कोणत्या भाषेत करावे हा आमचा प्रश्न आहे आशय कळल्याशी कारण, आम्ही इंग्रजीतच चांगले 'एक्सप्रेस ' करू शकतो. आता परदेशात राहू मराठीत ल्याहायचे म्हणजे आता 'कशशंच' वाटतं असा वितन्डवाद करणारे बरेच 'आझमी' इथे होऊन 'गेले' आहेत>>
यावर खूप चर्चा पूर्वी झाली आहे. त्यामुळे जाऊ द्या ते!

सगळ्यात गंमत म्हणजे यू ट्यूबवर भारतीय संसदेत सुद्धा कशी मारामारी झाली, लोकांची डोकी फुटली याची दृक्श्राव्य फीत आहे. ती पाहून पण गंमत वाटली!!

एकंदरीत भारत देशात कायद्याला किंमत नाही!!

.....

हुड...
पण जर हे निलंबन खरेच कायम राहिले तर त्या चार मतदार संघांना आमदार अर्थात प्रतिनिधी नसेल का? अन मग त्या लोकांनी त्यांचे प्रश्न कुठे मांडायचे? निलंबित आमदार काय काम करु शकतो अन काय करु शकत नाही?

अर्थात, एक दोन महिन्यात हे निलंबन मागे घेतले जाईलच कारण त्याला दुसरा राजकीय पर्याय नाही!

सर्व पाहिल्यावर असे वाट्टे की आवश्यक गोष्ट ( अबु आजमी ला चोप देणे) अनावश्यक वेळी झाली.. 'राज' कारणाचा पहिला नियम - योग्य गोष्ट योग्य वेळीच योग्य पद्धतीनेच करायला हवी..

Pages