उगाचच

Breaking point.

Submitted by अजिंक्यराव पाटील on 10 April, 2020 - 06:42

काल परवा "आयत्या घरात घरोबा" चित्रपट बघत होतो, शेवटी जेव्हा अशोक सराफ छत्री गोल फिरवत निघतो, तेव्हा नकळत डोळे ओलावले. मग सहज आठवून पाहिलं की एरव्ही माझ्यासारखे बऱ्यापैकी दगडी मनाचे लोक कोणते चित्रपट वगैरे बघताना हळवे होत असतील.. सुरुवात माझ्यापासून करतो, मला सगळ्यात जास्त भावनिक करणारे चित्रपटातील प्रसंग..
१. साला ये दुख काहे खतम नहीं होता बे? (मसान- शालू गुप्ताचा मृत्यू)
२. ऑक्टोबर चित्रपट (वरुण धवनला सहन करता येईल असे दोनच चित्रपट आहेत, ऑक्टोबर आणि बदलापूर).
३. हायवे -हिंदी. महावीरला गोळी घातल्यावर आलियाचं रडणं बघून..
४. सदमा... (अगतिक, असहाय्य कमल हसन)

शब्दखुणा: 

सखे ...

Submitted by प्रगो on 18 January, 2013 - 08:19

वळणांवळणांवरती सखे
तव आठवणींची भरती सखे
कसे विस्मरू सांग तुला मी
हे श्वास श्वास तुज स्मरती सखे |

पाऊस हा घनगर्द सखे
अन् तुझ्या मिठीचा गंध सखे
कसा सुटावा असा रेशमी
तव बाहुंचा बंध सखे

रक्तवर्णित तव लज्जित चर्या
श्वासा श्वासांवरि भीति सखे
अनामिकशा त्या ओढीने
रोमांचित तव कांती सखे

चिंब चिंब ही तुझी कुंतले
चेहर्‍यावरी मम रुळती सखे
थेंब थेंब हा तुला स्पर्षता
न कळत होई मोती सखे

थरथरत्या तव अधरांची
मग पडे घट्ट ती मिठी सखे
असे गुंतलो एकामेकीं
जणु जन्मांतरीची भेटी सखे

श्रावणातल्या सायंकाळी
मला गवसले मीच सखे
विरुन गेले तुझ्यात अलगद
सायुज्यता का हीच सखे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उगाचच