Breaking point.

Submitted by अजिंक्यराव पाटील on 10 April, 2020 - 06:42

काल परवा "आयत्या घरात घरोबा" चित्रपट बघत होतो, शेवटी जेव्हा अशोक सराफ छत्री गोल फिरवत निघतो, तेव्हा नकळत डोळे ओलावले. मग सहज आठवून पाहिलं की एरव्ही माझ्यासारखे बऱ्यापैकी दगडी मनाचे लोक कोणते चित्रपट वगैरे बघताना हळवे होत असतील.. सुरुवात माझ्यापासून करतो, मला सगळ्यात जास्त भावनिक करणारे चित्रपटातील प्रसंग..
१. साला ये दुख काहे खतम नहीं होता बे? (मसान- शालू गुप्ताचा मृत्यू)
२. ऑक्टोबर चित्रपट (वरुण धवनला सहन करता येईल असे दोनच चित्रपट आहेत, ऑक्टोबर आणि बदलापूर).
३. हायवे -हिंदी. महावीरला गोळी घातल्यावर आलियाचं रडणं बघून..
४. सदमा... (अगतिक, असहाय्य कमल हसन)
५. रंग दे बसंतीचा शेवट.

तुमचेही असे ब्रेकिंग पॉईंट कोणते ते नक्की लिहा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

एक इंग्लिश चित्रपट आहे कोको नावाचा.
तो बघताना आजोबांच्या आठवणीत कितीदा रडलो असेल नाही कळल.
छान धागा!

हायवे मुवीतले आलिया भटचे 2-3 सीन आहेत जे रडवतात..
हे बेबी, मध्ये ती छोटी मुलगी मरणाच्या दारात असते तो सीन.
The boy in striped pajamas मध्यंतरी बघितला होता.. मुवीचा शेवट अक्षरशः काळजाला हात घालतो.
अजुनही काही मुवीज आहेत.. जे सीन्स लगेच आठवले ते लिहीलेत..

रणवीर सिंगचा लुटेरा बघून हळवा झालेलो..
"अनुमती" हा चित्रपट पाहील्यानंतर खुप रडलो होतो..

सदमा, रेनकोट, द जपानीज वाईफ, पुष्पक पाहून खुप वाईट वाटलेलं..

सदमा चा शेवट मला हि खूप हळवा करून जातो. तसेच जो जिता वही सिकंदर मध्ये ज्या वेळेला आमिर खान चा भाऊ रतन ला ऍक्सीडेन्ट मध्ये दुखापत होऊन तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असतो (हा सिनेमाचा टर्निंग पॉईंट सुद्धा आहे, कारण इथूनच आमिर ला जाणीव होते आणी तो स्पर्धे बद्दल गंभीरतेने विचार करायला लागतो) तर या ठिकाणी एक गाणं आहे, रुठके हमसे कभी जब चाले जाओगे तुम. या गाण्यात लहान पणी च्या आठवणी दाखवल्या आहेत. ते गाणं मला खूप आवडत आणि हळवं करून जातं. आपली प्रिय व्यक्ती आपल्याला अचानक सोडून जाणार कि काय हि भीती एका नॉन सिरिअस व्यक्तीला किती बदलवू शकते हे खूप छान दाखवलय. मी हा सिनेमा पहिल्यांदा पहिला तेव्हा माझंही भाऊ सुद्धा माझ्या सोबत होता, त्यामुळे ते कायम आठवणीत राहिले.

खूप छान धागा..
खूप छान धागा..

Sadma tr purnch Chan ahe .. tri mla man ya picture mdhe jevha aamir khan Manisha Koiralala paijan ghalayla jato aani ti tyala tiche paay accident mdhe gelyamule advte.. tevha khup rdu yet

Kakan movie bghtana pn khup rdle hote .. last la tr khupch jast.. side che lok pahayla lagle hote .. theatre mdhe ...

छान धागा आहे.

मी नेहमी लपवायचा प्रयत्न करतो पण कर्क राशीचे गुण असलेला हळवा पुरुष आहे. मनाला भिडले की डोळ्यात पाणी येते सहज. मजा येते ते आले की...

मला शाहरूख सर्वाधिक आवडायचे कारण हेच आहे की त्याने मला हसता हसता बरेच रडवले आहे.

कभी खुशी कभी गम हा चित्रपट तर आमच्या घरचा सुर्यवंशम आहे तो याच कारणामुळे. कधीही लागो. मी आणि माझी आई तो बघतो. आणि डोळे साफ करून घेतो.

लिहितो अजून...
शाहरूख व्यतिरीक्त ईतरही कैक आवडीचे रडवणारे कलाकार आणि चित्रपट आहेत त्यांच्यावर आठवेल तसे.....

पुन्हा एकदा, छान धागा
फक्त शीर्षकावरून आतला अंदाज आला नाही.

तीन ईडियट चित्रपट सुद्धा खूप रडवतो. डोळ्यातना पाणी आल्यावर पुन्हा हसू येते तेव्हा तो माधवन नेहमी फोटो काढतो हे क्लासच !
शेवटचा डिलीव्हरीचा सीन तर अशक्य रडवतो. दरवेळी डोळ्यातून पाणी काढतो.

आमीरचा तारे जमी पर सुद्धा असाच रडवतो.
पीकेच्या शेवटच्या शॉटलाही माझ्या डोळ्यातून पाणी येते.

आमीरचा आणि मनिषा कोईरालाचा मन चित्रपट कोणाला आठवतो. क्लायमॅक्सला जेव्हा त्याला कळते ती लंगडी झालीय.. खूप रडवतो तो सीन. तेवढ्यासाठी मन आवडतो.

काही पिक्चरचे रडगाणे मात्र बोअर करते
उदाहरणार्थ दिल
त्याचा पहिला भाग मस्त मनोरंजक वाटतो. मग सगळी ट्रॅजेडी बोअर होते.
हेच सेम त्याच्या ईश्क चित्रपटाबाबतही होते.

रुठके हमसे कभी जब चाले जाओगे तुम. या गाण्यात लहान पणी च्या आठवणी दाखवल्या आहेत. ते गाणं मला खूप आवडत आणि हळवं करून जातं.
>>>>>

मी माझ्या आयुष्यातील ऑल टाईम फेव्हरेट तीन गाणी काढली तर त्यात हे असेल Happy

संजीव कुमारचे सगळे भावनिक सिन्स, जबरदस्त fan आहे. Happy . त्यांचे डोळ्यातले भाव असे झरझर बदलायचे की बस्स. { Parichay, Koshish(1973), Aandhi (1975) and Mausam (1975) }
राज कपूर चे आवारातले काही सिन्स. अजूनही असतीलच पण लगेचच हे आठवले.

तशी तर मी कोणत्याही emotional सीनला रडणारी आहे. पण पहिल्यांदा पाहतानाच. नंतर त्याची intensity कमी होते. पण एकच गाणं आहे जे मला नेहमी रडवतं ते म्हणजे 'चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौनसा देश, जहा तुम चले गये'. अगदी लिहिताना पण डोळ्यात पाणी आलं.

तारे जमींपर मधले बरेच सीन , पण स्पेशली मेरी माॅ गाणं आणि ईशानला हाॅस्टेलवर सोडून परतत असताना गाडीचा दरवाजा बंद केल्याचा आवाज आणि ईशानचे दचकणे.
सदमा फिल्मचा शेवट.
थ्री ईडियटसचं जाने नही देंगे तुझे गाणं.
सरोफरोशमध्ये आमिर मिशनवर निघालेला असताना त्याची आई रडत बडबडत त्याला जाऊ नको सांगत असते पण वडील आरतीचं ताट आणून त्याच औक्षण करतात तो सीन.
बाकीचे आठवतील तसे नंतर.

१९७१
मनोज वाजपेयीला परत एलओसी ओलांडून नेतात तो क्षण.
अजुन असे बरेच आहेत.
सवडीने लिहतो

Pan's Labyrinth चा शेवट
Crash मधला बाबांवर गोळी झाडत असताना त्याची छोटी मुलगी त्याला वाचवायला जाते तो सीन
The sixth sense मधला आई आणि मुलामधला गाडीतला संवाद, तसेच या चित्रपटाचा शेवट

हे कितीही वेळा बघितले तरी त्यातली intensity अजिबात कमी होत नाही. प्रत्येक वेळी नव्याने बघितल्याचा अनुभव मिळतो.

आनंद

शोले अमिताभ मरतो तेव्हा

मनोजकुमारच्या भगतसिंग मधला फाशीचा सीन

दो आँखे बारा हाथ ( वी शांताराम ) मध्ये एका गुन्हेगार त्याच्या मुलांना भेटून रडत असतो आणि त्याची आई त्याला बघून तो सीन

सदमा

मासूम आणि तारेंं जमीन पर.. लहान मुलांच्या काही गोष्टी, एवढ्याशा जीवाचं भावविश्व, चलबिचल, काही प्रसंगी होणारी तगमग, आणि काही प्रसंगात आलेला समंजसपणा.. सगळच काळजाला हात घालणारं आहे..

मार्ले अँड मी.. खूप खूप सही मूव्ही आहे.. पेट डॉग च आणि पेट पेरेंट चं नितांत सुंदर नातं... माझ्या कडे सुद्धा ८ वर्षाचा जर्मन शेफर्ड आहे, म्हणून अगदी मना जवळचा पिक्चर हा.

हायवे -हिंदी. महावीरला गोळी घातल्यावर आलियाचं रडणं बघून.. ~~ +१२३४५६
अतिशय सुंदर अभिनय.. असही दोघं अत्यंत फेवरीट कलाकार माझे.. तेव्हा जरा जास्त च रडू आलं..
सदमा... (अगतिक, असहाय्य कमल हसन) ~ +१२३४५६७८९

सद्माच्या क्लायमॅक्सला कमल हसनचे माकडचाळे केल्यासारखे जे चित्रकरण केलेले ते नेहमीच हास्यास्पद वाटत आले हे मागेही ओवरहाईप कलाकाराच्या धाग्यावर लिहिलेले बहुधा.
याबाबत ऑर्कुटवरून ओळखीचे एक पुण्याचे काका सांगतात की त्या लास्ट सीनला लोकांनी रडणे अपेक्षित होते पण थिएटरमध्ये लोकं खिदळत होते.
पर्सनली मला त्यात काही विनोदीही नव्हते वाटले.

मी पण कर्क असल्याने बऱ्यापैकी इमोशनल आहे, बऱ्याच मुविजना रडते. पण ही चर्चा चालू असताना अचानक विस्मृतीत गेलेला एक मुव्ही आठवला, चिमणी पाखरं, शाळेत होते तेव्हा, बेक्कार रडले होते, विशेषतः त्या छोट्या मुलाला अपंग असल्याने कुणी दत्तक घेत नसतं आणि मग लक्ष्या त्याला दत्तक घेतो....
हम दिल दे चुके सनम ला पण शेवटी रडू येतं
परवा forest gump पहिला खूप दिवसांनी, तेव्हा पण रडू आलं, टॉम हँक्स... काय म्हणावं या अवलियाला..
रंग दे बसंती
अजूनही बरेच आहेत...
रच्याकने, a boy in stripped pajamas कुठे आहे? मला खूप दिवसांपासून पाहायचा आहे.

डर मध्ये शाहरुख मरतो तो सीन पाहताना अश्रू थांबले नव्हते .

नवीन Submitted by कटप्पा on 13 April, 2020 - 21:31
>>>>
प्रतीसादाचा आयडी चुकला आहे, ही योग्य माणसाने नोंद घ्यावी.

प्रसंग कसाही असू दे एकवेळ भीती वाटेल पण डोळ्यात पाणी येत नाही पण याला अपवाद कन्नड चित्रपट " हरिवू" . U tube वर सहज बघायला घेतला आणि डोळ्यात पाणी आले .मग डायरेक्टर च तपास घेतला आणि मन्सूर यांना या चित्रपट साठी National award मिळाले आहे. नंतर त्यांचा नातीचारामी हा चित्रपट बघितला बोल्ड विषय आहे पण फारच छान आहे .दोन्ही चित्रपटातील गाणी श्रवणीय आहेत

हम दिल दे चुके सनम ला पण शेवटी रडू येतं
>>>>

+७८६
आणि हे रडू सलमानसाठी येते.
मागेही मी हे एकदा लिहिलेले. मला तो शेवटच पटला नव्हता.
म्हणजे मुलीचे एकदा लग्न लाऊन दिले की ती मागचे प्रेमबिम विसरून जाते असा कित्येक प्रेमी युगुलांचे प्रेम धोक्यात आणणारा फालतू संदेश त्या चित्रपटातून दिला होता.
अर्थात तसेच दाखवायचे होते तर प्रेम थोडेफार तरी ऊथळ वा आकर्षणातून आलेले दाखवायचे होते. पण नाही.. ऊसने मुझे यहा छुआ है मां म्हणत छातीला हात लावणारया ऐश्वर्याचा गहिरे प्रेम दाखवणारा सीन दाखवलेला...
आणि ते तडप तडप के ईस दिल से आह निकलती रही... ईतक्या अफाट हृदयाला चिरून टाकणारया गाण्यानंतर हा असा शेवट.. खरया प्रेमाची लाज घालवली !!

Pages