वजन वाढवण्याबाबत

Submitted by बन्या on 19 April, 2014 - 15:43

जिकडे पहावे तिकडे वजन कमी करण्याचे किस्से , त्यावरचे डाएट, व्यायाम इ. च्या माहितिचा स्फोट झालेला दिसतो, पण अशीही लोकं असतात जी अती बारीक, अशक्त, क्रुश असतात, ज्यांचे वजन खुपच कमी असते, आणि काही केल्या वाढत नाही.

अनुवांशिक असेल तर काहीच समस्या नाही, अशा व्यक्ती बारिक असल्या तरी चपळ असतात.

पण काही व्यक्तींची पचनशमता कायमची मंदावलेली असते, यामागे काविळ किंवा त्तसम पोटाचे किंवा लिवर चे विकार असतात.

अन्न पचन न झाल्याने व त्यामुळे पोषण तत्व शरिरात षोषली न गेल्याने वजन वाढत नाही.

यामागे मानसिक ताणतणावही असु शकतो.

तरी अशा लोकांनी कसा आहार घ्यावा, काय व्यायाम करावा, पचन कसे वाढवावे, याबद्दल च्या चर्चेचा धागा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक करून काहीही आजार नसलेल्या लोकांचे ...बैठे काम, व्यायामाचा अभाव, जेव्हा जसे वाटेल तसे खाणे, पार्ट्या-सणवार यावेळी जेवणावर ताव मारणे, भूक लागल्यावर खाणे परंतू भूक नसतानाही खाणे यामुळे वजन वाढते...म्हणूनच वजन कमी करण्याचे किस्से , त्यावरचे डाएट, व्यायाम इ. च्या माहितिचा स्फोट झालेला दिसतो.

पण काही व्यक्तींची पचनशमता कायमची मंदावलेली असते, यामागे काविळ किंवा त्तसम पोटाचे किंवा लिवर चे विकार असतात.
अन्न पचन न झाल्याने व त्यामुळे पोषण तत्व शरिरात षोषली न गेल्याने वजन वाढत नाही.>>>>असे असेल तर अशा व्यक्तींना खाण्या-पिण्याची बरीच पथ्ये असतात. त्यामुळे काय खावे, काय खाऊ नये हे डॉक्टर, आहारतज्ञ यांना विचारूनच ठरवले तर बरे होईल.

इथे अवांतर आहे. तरीही
कुणी नेचरामोअर कंपनीची सप्लिमेंट पावडर घेतली आहे का? एक मुलांसाठी आहे. आणि एक खास स्त्रीयांसाठी आहे.
कुणी वापरली असेल तर सांगा.

विषय:
आयुर्वेद
होमिओपथी

<<
जेवण नीट करून वजन वाढवायला आयुर्वेद अन होमिओपथी लागणार असेल तर विषय संपला.