किल्ली

सुखाची किल्ली

Submitted by आनन्दिनी on 12 January, 2017 - 02:40

इतक्या दिवसांनी आज पुन्हा आले घरी
संसाराने हैराण झाले
माहेरीच मी बरी

सोन्यासारखा नवरा तुझा, मुलं मोत्यासारखी
ऐकते तेव्हा कधी कधी मीच होते परकी

आपल्याच पसंतीचा नवरा
आणि मुलंसुद्धा आपली
भरला संसार असताना
ही तळमळ तरी कसली

संसार काही थांबत नाही
आणि तळमळ काही संपत नाही

शेवटी म्हटलं देवा आता तूच सोक्षमोक्ष कर
लेक तुझी व्याकुळ इथे
तू बरा बसलायस वर

ह्याची बायको त्याची आई
याच्याशिवाय मला माझं
वेगळं अस्तित्व आहे की नाही !!

मुलगा मुलगी समान असतात,
शाळेत सांगितलं जायचं
पण हेच करायचंय तर मुलींना डोकं कशाला द्यायचं !!

देव हसला आणि म्हणाला

शब्दखुणा: 

किल्लीने उडविलेली खिल्ली

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 November, 2014 - 03:20

सोमवारची पहाट उजाडली आणि दिवाळीची ४ दिवसांची लागून आलेली सुट्टी संपुष्टात आली. तशी बर्‍याच दिवसांनी लागून सुट्टी असल्याने रूटीनची कामे करण्यासाठी मेंदू आणि शरीरावर थोडा आळसच चढला होता. पण ऑफिसला पोहोचायचे आहे ही गोष्ट भानावर येताच सगळा आळस खराट्याने झाडतात तसा झाडून टाकला. माझ्यातल्या विदाऊट लाइट, चार्जिंगच्या मानवी यंत्राने भराभर कामाचा रहाटगाडा आटोपायला सुरुवात केली.

ऑफिससाठी घराबाहेर पडताना निसर्गालाही अजून दिवाळीच्या सुट्टीचा आम चढल्याचे ढगाळ वातावरणामुळे जाणवत होते. ४ दिवस मुलींसोबत सतत जवळीक साधल्याने टाटा करताना मुलींचा रडवेला चेहरा अ‍ॅक्टीवाची चावी सुरू करताना अडथळाच आणत होताच.

शब्दखुणा: 

किल्ली!

Submitted by अमेलिया on 21 September, 2012 - 10:08

आज उशीर झालेला असतो. मी घाई घाईने आवरून निघते. असंख्य वाहनांच्या गर्दीने वाहणारे दहा सिग्नल्स वागविणारा माझा ऑफिसचा रस्ता डोळ्यासमोर दिसू लागतो. आणि ते घडते. माझ्या दुचाकीची किल्ली जागेवर नसते. तिच्या जोडीला सुखाने नांदत असणाऱ्या घराच्या तीन किल्ल्याही गायब असतात मी सगळे घर शोधते. आवरलेल्या-पसरलेल्या गोष्टींची उलथा-पालथ करते. कुठेच ती चिरपरिचित खणखण ऐकू येत नाही.. मग मी माझ्या शत्रूची मदत घ्यायचे ठरवते. काल शेवटची तिला कुठे पहिली होती हे आठवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना अचानक माझ्या वरच्या मजल्यावरचा दिवा पेटतो. काल कारने हिंडत होतो नाही का.. कुलूप लावताना घेतली होती पण तिला बरोबर.

Subscribe to RSS - किल्ली