सायकलिंग
नशिक पेलोटोन २०१४ अर्थात सांघिक सायकलिंग शर्यत
मित्रांनो,
नाशिक येथिल सायकल प्रेमी मंडळींनी ९ फेब्रुवारी २०१४ ला नाशिक येथे १४० किलोमीटर ग्रुप रेस आयोजित केलेली आहे.
रेसची ठळक वैशिश्ठ्ये:
>> १४० किलोमीटर ग्रुप रेस (३ जणांचा एक संघ)
>> ५ धरणांच्या सन्निध्यातील नयनरम्य परिसर
>> आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सायकलपटुंचा सहभाग
>> भारताच्या विविध भागातील व्यावसायिक खेळाडुंचा आयोजनात सहभाग
>> प्रत्येक ३५ किमी नंतर पाणी तसेच अत्यावश्यक गोष्टींची ऊपलब्धता
>> परगावातील स्पर्धकांसाठी आदल्या दिवशी राह्ण्याची सोय
>> प्रथम येणार्या ४ संघांना जवळ्पास ५ लाख रुपयांची
तर वेळेत स्पर्धा पूर्ण करणार्या प्रत्येकास आकर्षक बक्षिसे
सायकलिंग - रोड
३ दिवस, २१२ खेळाडू, ४ सुवर्ण पदके
- रस्त्यावरच्या लांब पल्ल्याच्या शर्यती
- दोन प्रकार - रस्ता शर्यत आणि टाईम ट्रायल
- पुरुषांची रस्ता शर्यत २५० किलोमीटर
- महिलांची रस्ता शर्यत १४० किलोमीटर
- सर्व स्पर्धक एकाच वेळेस स्पर्धेस सुरुवात करतात. सर्वात आधी पोहोचलेला स्पर्धक शर्यत जिंकतो.
- टाईम ट्रायल मध्ये स्पर्धक एकापाठोपाठ एक सुरुवात करतात. दोन स्पर्धकांमधील वेळ ९० सेकंदांची असते.
- पुरुषांची शर्यत ४४ किलोमीटर तर महिलांची शर्यत २९ किलोमीटर
- सर्वात कमी वेळात शर्यत पूर्ण करणारा विजेता होतो.