सायकलिंग - रोड

Submitted by हिम्सकूल on 29 July, 2012 - 07:43

३ दिवस, २१२ खेळाडू, ४ सुवर्ण पदके

- रस्त्यावरच्या लांब पल्ल्याच्या शर्यती

- दोन प्रकार - रस्ता शर्यत आणि टाईम ट्रायल

- पुरुषांची रस्ता शर्यत २५० किलोमीटर
- महिलांची रस्ता शर्यत १४० किलोमीटर
- सर्व स्पर्धक एकाच वेळेस स्पर्धेस सुरुवात करतात. सर्वात आधी पोहोचलेला स्पर्धक शर्यत जिंकतो.

- टाईम ट्रायल मध्ये स्पर्धक एकापाठोपाठ एक सुरुवात करतात. दोन स्पर्धकांमधील वेळ ९० सेकंदांची असते.
- पुरुषांची शर्यत ४४ किलोमीटर तर महिलांची शर्यत २९ किलोमीटर
- सर्वात कमी वेळात शर्यत पूर्ण करणारा विजेता होतो.

- पुरुषांची शर्यत पहिल्यांदा १८९६ साली तर महिलांची शर्यत पहिल्यांदा १९८४ साली झाली.

- १८९६ साली झालेली शर्यत अथेन्स पासून मॅरेथॉन पर्यंत जाऊन परत अथेन्सला यायची होती आणि त्यात फक्त ६ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users