सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा सारेगमपच्या नवीन पर्वाचा १८ स्पर्धकांबरोबरचा पहिला भाग मस्त झाला .सर्व गायक आणि गायिकांनी एक एक गाणे सादर केले . त्यानंतर त्यांना चिठ्ठ्या उचलायला सांगून दोन गटांत विभागण्यात आले . अवधूत आणि सलील कुलकर्णी ह्यांनी सूत्रसंचालन केले . पल्लवी उद्याच्या भागात आली तर येईल किंवा मग पुढच्या आठवड्यात येईल . बघू या .
काही उल्लेखनीय स्पर्धक :-
१. स्वरदा गोखले गोडबोले :- आवाज फार छान आहे . ह्या पर्वातली विभावरी वाटली मला . Proud
२. सुस्मरिता डवाळकर ( नांव लक्षात ठेवणे अवघड आहे .:) ) :- वयाने सर्वात लहान स्पर्धक , माझे मन तुझे झाले खूप सुंदर गायली .
३. केतकी भावे :- ठाण्याची स्पर्धक . Happy चांगली गायली , स्पर्धेत काही फेर्‍या निश्चितच क्लिअर करेल असे वाटते .
४. मोना कामत :- ठाण्याची अजून एक स्पर्धक . शिक्षणाने इंजिनियर , व्यवसायाने प्रोफेसर . आवाज ठीक आहे , पण सारेगमप ची ग्लॅमर गर्ल वाटेल अशी आहे .
५. केतन पटवर्धन :- डोंबिवलीचा चुलबुला लडका . आवाज छान आहेच , पण smile खूप निरागस आहे . Happy
६. अभिषेक पटवर्धन :- सांगलीचा स्पर्धक . ह्याचा भाऊ आधीच्या पर्वात येऊन गेलाय , असं अवधूत म्हणाला . ठीक आवाज आहे .
७. राहुल सक्सेना :- चिंब भिजलेले :- शंकर महादेवन ने म्हंटलेले गाणे गायला . गळ्याच्या शिरा ताणून गात होता , बघूनच त्रास होत होता . Happy आज तरी तो मला ओव्हर स्मार्ट वाटला .

आता उद्या आणखी १८ स्पर्धक बघून अपडेट करेन .

अभिषेक पटवर्धन :- सांगलीचा स्पर्धक . ह्याचा भाऊ आधीच्या पर्वात येऊन गेलाय , असं अवधूत म्हणाला . ठीक आवाज आहे .
<<< सांगलीच्या पटवर्धन राज घराण्यातल्या भाग्यश्रीचा कोण हा Proud

ह्या पर्वाची सुरवात एका चांगल्या गोष्टीने झाली. " एकदा जोरदार टाळ्या " वाली नव्हती. हीला टाळ्यावाल्यांचा का एवढा पुळका ? ही मराठी पध्द्त नाही " आता कस वाटतंय " ऐकलं की मला खूप इच्छा आहे, एकखाद्याने सांगावे " एक कानाखाली..... मग कळेल " छे ह्या फक्त इच्छाच !
गाण सरळ सुरु करुन मग खाली नाव फीत दाखवणे आवडले.
आजचा ऑडीओ दर्जा चांगाला होता. हींदी सारेगमला फार वाईट असतो. तीथे वादकांची साथ लग्नाच्या वरातीतला ब्रास बॅन्ड वाटतो. पण इथे, सत्तूचा कीबोर्ड, निलेशची ढोलकी / नाल, अमर ओकची बासरी कानाला फार सुखकारक असते.

एकदा जोरदार टाळ्या " वाली नव्हती >> या साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.. Proud
बरे आहे.. आता बघायला हवा कार्यक्रम.. हे हे.. त्या भागात परिक्षक म्हणुन कोण आले नाहीत काय ?

सॉरी लोक्स.
कालचा कार्यक्रम लै लै बोर वाटला मला.
प्रचंड कंटाळ आला- इतका की नंतर बंद केला. आता डायरेक्ट फायनल पाहायचा विचार आहे.

आता डायरेक्ट फायनल पाहायचा विचार आहे.
>> ओह्ह.. मी आजच पहाणार होतो कुठे ऑनलाइन मिळते का ते.. एवढा टुकार होता ?

रैना... पहिल्याच भागात कंटाळलीस.. का ग... Sad

अर्थात काल पहिलाच भाग असल्याने सगळे प्रचंड दडपणा खाली गायले हे ही तितकेच खरे त्यामुळे म्हणावा तसा रंगलाच नाही कालचा भाग..

माझ्या ओळखीचे चार जण आहेत यंदा स्पर्धेत.. स्वरदा, सिद्धेश, प्रियांका, अभिलाषा..

आजचा भाग मी येता जाता बघितला आणि ऐकला . म्हणून लक्षात राहिलेल्या स्पर्धकांची माहिती देते .
१. श्रुती विश्वकर्मा :- अजि सोनियाचा दिनु सारखे अवघड गाणे गाऊन आजच्या भागाची मस्त सुरुवात केली .
२. अभिलाषा चेल्लम :- माझिया मना जरा थांब ना अप्रतिम गायली . एकूणच लंबी रेस का घोडा .:)
३.पूर्वजा पाध्ये :- नववसन धारिणी हे नाट्यगीत गायली . आवाज तयारीचा वाटला .
४. श्रीरंग जोशी :- येशील येशील येशील राणी . ठीकठाक गायला . ऑडिशन राऊंडमध्ये बर्‍यापैकी तयारीने गायला होता .
५. सौरभ दफ्तरदार :- कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे गायला . ओ के .
६. उर्मिला धनगर :- लटपट लटपट तुझं चालणं सुलोचना चव्हाणांच्या आवाजात ऐकत असल्यासारखे वाटले . Happy पण जोक्स अलाहिदा . आवाजात दम आहे . कार्तिकीची गादी चालवून बरीच पुढे जाईल बहुतेक .
७. प्रियांका बर्वे :- मालती पांडे बर्वे ह्यांची नात असे अवधूत ने सांगितल्यावर कळले . लपविलास तू हिरवा चाफा गायली बहुतेक , पण ठीकठाक .

३६ पैकी ४ किंवा ५ नॉन मराठी स्पर्धक आहेत . ते सर्व पुढच्या राऊंड्स मध्ये पोचायला लागले की कार्यक्रमात रंगत येणार . Happy

ता.क. :- मी क्लासिकल संगीताची अभ्यासक नाही , फक्त कानसेन असून टीव्ही शोजची कट्टर फॅन आहे . म्हणून ही मते केवळ एका रसिकाची आहेत , हे समजून वाचावे . Happy

>>>> लै लै बोर वाटला
यात नवल ते काय?
रोज मरे त्याला कोण रडे या उक्तिप्रमाणे होतय
मी तर बाबा मन लावुन बघितला, आयुष्यात पाहिल्यान्दाच बघतो हे अस समजुन बघितला, मग खुप छान वाटला Happy

लागोपाठ ३ नाट्ट्य संगीत व ३ शेवटच्या लावण्या " ऐकीवेबल " होत्या.
" जोरदार टाळ्या " पेक्षा आजच्या टीचक्या फार त्रासदायक वाटल्या नाहीत.

नकूल - झीमराठी ची यूट्यूब लींक दील्याबद्दल फार फार आभार.

विनविन, आभार बिपोल्बो [अश्विन होनकन] या मित्राचे आणिक झी मराठीचे माना. आधी तो छोट्या क्लिप्स टाकायचा. पण त्यामुळे त्याला झीने कॉपीराईट क्लेमची नोटिस दिली. त्यानंतर त्याने झी वाल्यांशी बोलून त्यांना इकडे त्यांचे चॅनेल सुरू करण्यास उद्युक्त केले.

स्वरदा गोखलेला मी बर्‍याच वेळा ऐकलय पण मला कळलं नाही की ती मागच्या पर्वात का आली नाही कारण ती professional singer आहे आणि कितीतरी awards तिला already मिळालेली आहेत. तिचा आवाज खूपच गोड आहे, हिंदी गाणीही ती छान म्हणते.
"श्रावणाचं उनं मला झेपेना" वाली कोण होती तिला ते खरच झेपल नाही. कामत - lecturer in Eng college तिचाही आवाज फार चांगला वाटला नाही. इंदौरच्या मुलीची पण दमछाक झाली. स्वरदाला टक्कर देणारी कोण ठरेल हे बघण्यास मजा येइल.

कालचा भाग बघितलास का अभिश्रुती.. आहेत स्वरदाला टक्कर देणार्‍या बर्‍याच मुली आहेत... मागच्या पर्वात professional च्या पर्वात का.. तेव्हढी professional वाटली नसेल झी वाल्यांना...
वैशाली जिंकली त्या पर्वात होती स्वरदा पहिल्या ३२ मध्ये.. पण मग लग्नाची गडबड सुरू झाल्याने भाग घेतला नाही तिने....

मला जनरलीच 'सारेगमप'चा कंटाळा येऊ लागलाय.. स्पर्धकांच्या गुणवत्तेमुळे, किंवा अजून कशामुळे नाही, तर तीच ती गाणी ऐकून Sad ठराविक ५० गाणी असतात, तीच हरेक पर्वात ऐकायला मिळतात.. मराठी आणि हिंदीतही. तीच ती गाणी ऐकायची असतील तर मूळ गाणीच ऐकावी..

हे मात्र अगदी खरं - मराठीत काय आणि हिंदीत काय - कितीतरी सुंदर गाणी आहेत पण तीच तीच गाणी का गायली/निवडली जातात हे मला कळतच नाही (उदा. - पतंग उडवीत होते, बाई माझी करंगळी मोडली, जखमा उरातल्या, सखी मंद झाल्या तारका, येऊ कशी प्रिया...) आणि पहिल्या भागात सोमवारी कित्येक गायक्/गायिका बेसुर गात होते. म्हणुन जरा त्रास झाला पण हळूहळू ते सुधारतील अशी अपेक्षा आहे.

ठराविक ५० गाणी असतात, तीच हरेक पर्वात ऐकायला मिळतात
कितीतरी सुंदर गाणी आहेत पण तीच तीच गाणी का गायली/निवडली जातात
----------------------------------------------------
अगदी बरोबर.. त्यानी "आधी न ऐकलेली नवीन गाणी" असे काहीतरी विभाग यात सुरु करायला हवा. नाहीतर तीच तीच गाणीच म्हटली जाणार...
(मला कंटाळवाणी वाटु लागलेली गाणी...मन उधाण वार्‍याचे, मल्हार वारी, गोंधळ मांडला, ही गुलाबी हवा..इ इ..आणि आमच्या लताबाईंन्च्या काही गाण्यांचाही कंटाळा येउ लागलाय्..काही दिवस बघणे/ऐकणे बंद केले पाहिजे).

ठाण्याची मोना कामत हे एक "मोटीवेशन" आहे कार्यक्रम पहायला Happy पण दुर्दैवाने तिचे गाणे हा तिच्या दिसण्याएवढा भक्कम पॉइंट वाटला नाही त्यामुळे ती किती दिवस टिकेल हे पहायचे Sad

कितीतरी सुंदर गाणी आहेत पण तीच तीच गाणी का गायली/निवडली जातात हे मला कळतच नाही
कमी ऐकलेली गाणी गाऊन परत ती लोकांच्या पसंतीला उतरवणे हे सोपे काम नाहीय. अभिजीत सावंतने इ.ऑ. मध्ये जास्तीत जास्त गाणी ही कमी ऐकलेली गायली होती. आणि त्याच्या तोंडुन ऐकुन लोकांना ती आवडलेलीही होती. चन्नावे घर आजावे.. हे एक गाणे जे बहुतेक त्याने गायल्यावर जास्त फेमस झाले.

मला गाणी ऐकायला आवडतात पण मीही सगळीकडे तीच तीच गाणी ऐकुन कंटाळलेय. अगदी नव्या गाण्यांमध्येही मोजकीच गाणी परत परत गायली जातात.... हिंदी आणि मराठी सारेगामा - लहान थोर सगळ्यांचाच - पहायचा उत्साहच उरला नाहीय आता. मला तर कधी कधी परिक्षकांनाही त्याच त्याच गाण्यांवर बोलायचाही कंटाळा आलाय असे वाटते.. सगळीकडे सुरेश वाडकर दिसतोच.. तोही वैतागला असेल... Sad

अभिलाषा नाही का सिलेक्ट झाली फायनल मधे ?
अत्ता आहेत त्या वरून राहुल, स्वरदा, सिद्धेश असतील टॉप ५ मधे असं वाटतय, चांगले गायले हे तिघं पण अत्यंत मख्ख माठ चेहरा करून च गायचं ठरवून आलेले आहे बरेच स्पर्धक , त्या स्वरदाचं दुसरं गाणं अगदीच काही तरी झाल, चोरट्या आवाजात गायली !
पण एकंदरीत एपिसोड तसा रटाळ च झाला.

२५ ऑगस्ट च्या भागातील अभिलाषाचे माझिया मना ऐक , डीजे . अप्रतिम झाले .
स्वरदा आणि प्रियांका ह्या दोन hyped गायिका आहेत . स्वरदाचे " लाडिक " उच्चार ( ईति:- सलील कुलकर्णी ; १०० % सहमत ) दुसर्‍याच गाण्यापासून नकोसे वाटायला लागलेत मला . Sad
प्रियांका बर्वे झिम्मड बरे गायली , पण कमोदिनी ची वाट लावली तिने . Sad तिच्या गाण्यात अजून तरी सिरीयसनेस दिसत नाहीये . वर वर गातेय फार .

मला तर त्याच त्याच गाण्यांबरोबर सलीलच्या पुणेरी आणि अवधूतच्या अतिसामान्य जोक्स चा विशेष संताप येतो..
सलीलच्या बाबतीत एक गोष्ट चांगली कि त्याला निदान गाण्याची, कवितेची उत्तम समज आहे.. अवधूताकडे सगळीच बोंब...

राहुल सक्सेना मस्त गायला... प्रियांका बर्वे खूप घाबरली होती असे वाटले... आणि आवाजही बसका वाटला..
स्वरदा च्या गाण्यात दम नाही... सिद्धेश ने पहिला अभंग भारी म्हंटला. पण पहिल्या भागापेक्षा दूसरा भाग निश्चितच चांगला झाला.

स्वरदाला डिच्चू मिळाला तरी हरकत नाही, फारच लाडिक लाडिक गाते ती.

ऋतुजा लाडला विसरलात का? जबरी गाते ती.

Pages