TCS नाशिक

Submitted by रेव्यु on 12 April, 2026 - 00:28

मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रेनवॉश केल्यावर बळजबरी का केली? किंवा
बळजबरी करून ब्रेनवॉश कसा होतो?

मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत "अज्ञानी".

त्याला जिन्नने पछाडले असेल. मौलवींनी मंत्र म्हटले असतील. त्या अंमलाखाली असे स्टेटमेण्ट देत असेल.
पोलिसांची "तांत्रिक" टीम याचा छडा लावेल.

खरात ब्रेनवॉश करायचा की जबरदस्ती ?

विकुंनी गाढवांपुढे वाचली गीता
तर गाढवे म्हणती रामाची कोण सीता?

ही केस माहित आहे, त्यावरच वर लिहिलेही आहे, ही केस बनावट आहे हेही खरे आहे,
एखाद्या सज्ञान व्यक्तीने पूर्ण विचारांती धर्म बदलायचा ठरवले तर तो त्याचा (तिचा) मूलभूत हक्क आहे हे अगदी सुप्रीम कोर्टानेही हे मान्य केले आहे.
इथे केवळ काही रिकामटेकड्या पुढार्‍यांच्या हट्टामुळे (नाशिकप्रमाणेच) एफ आय आर दाखल करून अटक केली गेली आहे. डॉ इसरार अहमद यांना मरूनही दहाएक वर्षे झाली असावीत. पण त्यांनीच हे घडवून आणलं असं इथले एसपीच म्हणत आहेत. कपाळबडवती !

बाकी राहूल शिवशंकर सारखे लोक आहेतच सनसनाटी न्यूज द्यायला व अंकल आंटी लोकांची करमणूक करायला !

सगळं खोटं आहे. इथल्या फक्त दोन तीन सर्वज्ञानी लोकांनाच खरं काय आहे हे माहित आहे आणि नेहमीच माहित असतं. Happy

शामली केस मधला पीडित(?)च स्वतःला सगळं माहित असल्यासारखे बोलायला लागला! कमालच आहे.

भारतात १८ वर्षे झाली की मतदानाचा अधिकार मिळतो. पण स्वतःच्या आयुष्यात कसं वागायचं याचा अधिकार कधी मिळतो का?
आंतरधर्मीयच काय, आंतर्जातीय विवाह खपवून घेतले जात नाहीत.
तेच हुंड्यासाठी छळ होत असेल, तर जिस घर में तुम्हारी डोली गयी है, वहाँ से अब सिर्फ अर्थी उठेगी असं आजच्या काळातही सांगितलं जातं.
त्यापेक्षा १०० वर्षांपूर्वी होत, तसे बालविवाह लावून द्या. बर्‍याच लोकांच्या बर्‍याच समस्या दूर होतील.

मानव, तुम्ही एका लेखाची लिंक दिली होती. त्याचीच री ओढतोय. पटला तो.

https://timesofindia.indiatimes.com/city/dehradun/dalit-student-18-dead-...
Nails hammered into his legs': Dalit student ‘tortured to death’ over friendship with upper caste girl in Uttarakhand
अठरा वर्षांच्या दलित पोराने शिक्षण करियर सोडून मुलीच्या , तेही वरच्या जातीच्या मुलीच्या मागे का लागावं?

भारतात १८ वर्षे झाली की मतदानाचा अधिकार मिळतो. पण स्वतःच्या आयुष्यात कसं वागायचं याचा अधिकार कधी मिळतो का?>>>>स्वतः च्या अधिकारांचा गैरवापर करुन एखाद्याचे न्याय्य हक्क डावलून त्याला कुणी धर्मांतरासाठी कोंडीत पकडत असेल, असहाय बनवून धर्मांतरासाठी भाग पाडत असेल. ब्लॅकमेल करुन धर्मांतर घडवू पहात असेल तर तो गुन्हा होऊ शकेल किंवा बळजबरीने धर्मांतराचा गुन्हा बनू शकेल....इतर सर्व सज्ञान लोकांसाठी ब्रेनवॉश केले असे म्हणून ठपका ठेवणे हा केवळ राजनैतीक स्टंट असतो. कॅशिअस क्ले वयाच्या २२ व्या वर्षी धर्म बदलून मुसलमान मुहम्मद अली झाला, तो आपल्या इथला हिंदू असता तर नितेश राणे ने आणि फडणवीसांनी नक्की त्याचा ब्रेनवॉश करुन त्याचे धर्मांतर घडवून आणले आहे अशी कोल्हेकुई सुरु केली असती.

अनेक गोर्‍या लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.
अनेकदा डझनभर लोक घरवापसीच्या नावाखाली समारंभपूर्वक हिंदू होतात, त्यात कुणालाच काही खटकत नाही (खटकू ही नये).
इथे त्या शामली मधल्या तथाकथित पीडीताचा व्हिडिओ पाहिला तर त्याने हा निर्णय विचारपूर्वकच घेतला आहे हे दिसून येते.
त्या आधी आलेल्या विप्रो पुणे महिलेचा व्हिडिओ पाहिला तर तिचे खरे ब्रेन वॉशिंग झाले आहे असे दिसून येते.
Hopefully Pune police are not retarded like Nashik police.
त्या एका व्हिडिओ वरून विप्रो मधल्या वरिष्ठ एम्प्लॉयीज ना आत टाकणार नाहीत ही आशा !

त्या गोऱ्यांना पैशाचं अमिश दाखवून नाहीतर एखाद्याच्या असह्हतेचा फायदा घेऊन जर धर्मांतर करत असतील तर ते पण चुकीचं आहे. कित्येक ख्रिश्चन संघटना जगभर धर्मातरांसाठी काम करत आहेत.

मला बरेच दिवसापासून हा प्रश्न आहे. बोलावं का नाही वाटतं. नुसते विचार आहेत, मत वगैरे नाही.
आज भारतात मुस्लिम हा सेकंड क्लास धर्म झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे. डार्विनच्या सर्वायवल, मॉस्लोचे पिरॅमिड इ. इ. वरुन आजही धर्म लोकांना इतका जवळचा वाटतो का? मुख्यत्त्वे शहरात तरी? आपल्या धर्मामुळे (म्हणजे धर्मामुळे न्हवे, पण इतरांच्या परसेप्शन. इंटरप्रिटेशन इ. इ. डोक्यातील जळमटांमुळे काय असेल ते.. ) हे असं होतंय हे समजून तरुण लोक तरी धर्मापासून दूर जाऊ लागले आहेत का? बाबासाहेब आंबेडकर एका अर्थाने गेले तसे आता धर्मच नको वगैरे लोकांना वाटू लागले आहे का?
हे बरोबर नाही, प्रत्येकाला घटनादत्त अधिकार आहे वगैरे वगैरे सध्या राहुद्या. ते अस्तित्त्वात नाही हे ७० वर्षांत समजलं असेल. तर त्यासाठी लढण्यापेक्षा हे सगळं बगाड भिरकावुनच द्यावं. किंवा सरळ हिंदूच बनावं असं कुणाला वाटतं का?
त्यात खोडे घातलेच जातील, हार्ड कोर हिंदू लोक ते होऊ देणार नाहीत, त्यांनी तसं केलं/ झालं तरी सेकंड क्लास कायमच राहील वगैरे ही आहेच आणि समजतं.
अनप्रोसेस्ड विचार आहेत फक्त. कुठेतरी बोलावे म्हणून लिहिलं.

त्या गोऱ्यांना पैशाचं अमिश दाखवून >> पैशाच्या आमिषाने केलेलै धर्मांतर चुकीचे होऊ शकत नाही....एखादा आर्थिक विवंचनेत असताना त्याला मदत न करता वर त्याने याच प्रयॉरीटीज फॉलो करायला हव्यात हे ठरवणारे आपण कोण? काहींना धर्मापेक्षा आर्थिक स्थितीत सुधारणा महत्वाची वाटू शकते, ज्याची त्याची प्राथमिकता... ज्या प्रमाणे आजकाल बऱ्याच नेत्यांना पक्षनिष्ठा आणि सामाजिक/राजकीय विचारधारेपेक्षा, सत्तेसोबत जण्याने सुटणारी आर्थिक व राजकीय गणिते महत्वाची वाटतात....जर त्याला आपला आक्षेप नसेल किंबहूना ते जर आपल्या आवडत्या पक्षाच्या सोईचे म्हणून आपण स्विकारत असू तर पैशासाठी केलेले धर्मांतरही स्विकारण्याची धमक हवी.

भारतीय कायद्यानुसार तरी पैशाच अमिश दाखवून केलेल धर्मांतर चुकीचे आहे.
पैसा आणि आर्थिक स्थिती हाच न्याय लावला तर पैसाच अमिश दाखवून काहीही करून करता येईल, करतच आहेत.

पैशाच्या आमिषाने केलेलै धर्मांतर चुकीचे होऊ शकत नाही >> +१ टोटली.
मला सुरुवातीपासून हेच वाटते. मिशनर्‍यांनी धर्मांतर केले आणि बदल्यात पैसे वाटले. मग? तुम्ही वाटा की! ज्याला रात्रीच्या भाकरीची आणि पाण्याची ... कारण तुमच्या शिवाशिवीच्या कल्पना... भ्रांत आहे ती व्यक्ती पैसे दिले, भूक भागवायला काही दिले तर का काही नाही करणार?
विन-विन झालं हे!

मी हिंदुत्त्ववादी गावाच्या घेट्टो भागात वाढलो. तिकडे तरी लोक हे गॉस्पल ट्रुथ असल्यासारखं हे असं म्हणत. तुम्हाला ते ही माहित नाही की काय!!! आता मला तुमच्यापेक्षा जास्त हिंदुत्ववादी झाल्यासारखं वाटतंय. Lol

स्वतःच लिहिलेल्या प्रतिसादासाठी पण तुम्ही हिंदूंनाच दोष दिला.
पैशाच्या अमिष देऊन किंवा भाकरीची लाच देऊन बरच काही करता येईल, चालेल का ते?

पैशाच अमिश दाखवून केलेल पक्षांतर. त्याबद्दल जर काही कायदा नाही ये तर धर्मान्तरावारच आक्षेप का?

सुरुवातीपासून हेच वाटते. मिशनर्‍यांनी धर्मांतर केले आणि बदल्यात पैसे वाटले. मग? तुम्ही वाटा की! ज्याला रात्रीच्या भाकरीची आणि पाण्याची ... कारण तुमच्या शिवाशिवीच्या कल्पना... भ्रांत आहे ती व्यक्ती पैसे दिले, भूक भागवायला काही दिले तर का काही नाही करणार?
विन-विन झालं हे!>>> अगदी सहमत

थोडी सामाजिक प्रतिष्ठा आणि आदर ही दिला तर कोण करेल धर्मपरिवर्तन

Pages