मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.
हिंदू धर्मात धर्मांतराचा
हिंदू धर्मात धर्मांतराचा विचार होत नाही. जी काही उदाहरण आहेत ती तूरळक आहेत. एखाद्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकणे किंवा पैशाचं अमिश दाखवून धर्मांतर करून घेणे हें असले प्रकार शक्यतो होणार नाहीत. त्यामुळे मुख्तार अब्बास नक्वी, शहानवाज खान किंवा किरण रिजिजू यांना स्वतः वाटलं तरच धर्म बदलतील नाही तर नाही.
काल अजिबात मूड नव्हता आणि
काल अजिबात मूड नव्हता आणि तसही विषय भरकटला कि मग समोरच्याने काय सांगितलं त्याला क्रॉस करत नाही. यांच्या कडून स्वतःहून माहिती दिली जाणे अपेक्षित नाही. किमान एआय च्या नावाने विधवा आलाप करणाऱ्यांनी तरी पूर्ण सत्य सांगावे ना.
स्वामी श्रद्धानंदांनी धर्मांतराची चळवळ चालवली हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे कि त्यांनी घरवापसीची चळवळ चालवली. जे उच्चवर्णीय राजपूत सत्तेच्या लोभाने पूर्वी मुसलमान झाले होते पण हिंदू परंपरा पाळत होते आणि त्यांची राजपूत ही ओळख कायम होती पण इतर राजपूतांचा त्यांना पुन्हा राजपूत म्हणून स्विकार करण्यास नकार होता, त्यांना आर्य समाजी बनवले. ज्यांना राजपूत होता आले त्यांना पुन्हा हिंदू बनवले.
याचे संदर्भ सगळीकडे एकसारखे नसले तरी कुठल्याही मूळ मुसलमान व्यक्तीला त्यांनी आर्य समाजी बनवले नाही. असल्यास नक्षत्र शेंडे यांनी निर्विवाद पुरावा द्यावा.
अन्यथा खोटी आणि चुकीची माहिती हेतूपुरस्सर देऊन ती खरीच आहे असे दाखवून त्या चुकीच्या माहितीवर प्रश्न विचारणे त्यांनी बंद खरावे.
लोक मूर्ख आहेत असा त्यांचा समज असल्याचा अर्थ यातून निघतो आणि इतरांचा मौल्यवान वेळ वाया जातो.
पुन्हा असे केल्यास फाट्यावर मारले जाईल याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Swami_Shraddhanand
विकिपीडिया नाकारू शकाल पण हिंदू संस्थेच्या वेबसाईट वरून संदर्भ दिले तर?
https://hinduexistence.org/2023/07/29/hundred-years-of-great-shuddhi-mov...
हिंदू मुली ऑफिसातल्या मुस्लिम
> हिंदू मुली ऑफिसातल्या मुस्लिम मुलांना जाळ्यात ओढून त्यांचं धर्मांतर करण्याचा कट रचतायत का? काय ते सांगा एकदाच. टू मच मिस्टरी!!!
तसे काहीही झालेले नाही. It is essentially a consensual extramarital affair gone wrong, as I was suspecting all along.
असो आता धुरळा खाली बसला आहे व ताबूत थंड होत आहेत तर हेडर मध्ये ही थोडेसे करेक्शन करावे व निदा खान फरारी असल्याचा उल्लेख काढून टाकला तर बरे होईल. या विषयावर इतक्या पोटनिडिकीने लिहित होतो कारण 'सत्य पायात चप्पल घालेपर्यंत असत्य जगाची एक फेरी मारून आलेले असते' या उक्तीप्रमाणे एखादी गोष्ट zeitgeist मध्ये जाऊन बसली की मग ती काढणे अशक्य असते. रिया चक्रवर्ती खमकी होती म्हणून वाचली, इतर कुणी जिवाचे बरे वाईट करून घेतले असते.
लेन्सकार्ट बद्दल फा यांचे म्हणणे पटले.
कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व !
एकूण ८ मुलींनी आणि एका मुलाने
एकूण ८ मुलींनी आणि एका मुलाने तक्रारी दाखल केल्या आहेत.सगळ्यांचे affair असेल वाटत नाही. असलं तरी एकाच वेळी तक्रार का करतील. निदा खान पोलिसांना अजून सापडलेली नाही.
>>>
>>>
याचे संदर्भ सगळीकडे एकसारखे नसले तरी कुठल्याही मूळ मुसलमान व्यक्तीला त्यांनी आर्य समाजी बनवले नाही. असल्यास नक्षत्र शेंडे यांनी निर्विवाद पुरावा द्यावा.
अन्यथा खोटी आणि चुकीची माहिती हेतूपुरस्सर देऊन ती खरीच आहे असे दाखवून त्या चुकीच्या माहितीवर प्रश्न विचारणे त्यांनी बंद खरावे.
<<
स्वामी श्रद्धानंदांच्या शुद्धीकरण मोहिमेबद्दल अधिकृत माहिती शोधत आहे. तोपर्यंत तो विषय स्थगित.
पण मूळ मुद्दा हा आहे की कुणाला हिंदू बनवत असताना कुठली जात हा एक अडसर असल्यामुळे तसे परिवर्तन शक्य नाही. हे खरे आहे का? आजिबात नाही. बिनबुडाचा दावा.
काही उदाहरणे.
ज्युलिया रॉबर्ट्स ह्या प्रसिद्ध अमेरिकन नटीने काही वर्षांपूर्वी हिंदू धर्म स्वीकारला. तिला ही अडचण आली नाही.
सध्याच्या ट्रंप मंत्रीमंडळात असणार्या तुलसी गॅबार्ड ह्या स्त्रीबद्दल. ती एक वैष्णव हिंदू आहे. ती कशी हिंदू झाली? तिची आई अनेक वर्षांपूर्वी हिंदू झाली. तिची आई एक श्वेतवर्णीय ख्रिश्चन बाई. पूर्वज हिंदू असल्याचा कुठलाही पुरावा नाही. तरी तिने हिंदू धर्म स्वीकारला आणि तिने वैष्णव पंथ स्वीकारला. तुलसीची आई काही कुणी प्रसिद्ध, वलयांकित स्त्री नव्हती. तरी तिला कुठली जात असा प्रश्न पडला नाही.
स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने मार्गारेट नोबल ही आयरिश महिला हिंदू बनली. ती भगिनी निवेदिता या नावाने उर्वरित जीवनात वावरली. तिने शिक्षण, सामजिक सुधारणा ह्या क्षेत्रात काम केले. तिला हिंदू बनताना कुठली जात असा प्रश्न पडला नाही. तिचे कुठलेही पूर्वज हिंदू होते असा पुरावा नाही.
आता बोला.
आधी तुम्हाला माहिती नसताना
आधी तुम्हाला माहिती नसताना इथे ठासून का सांगितलेत आधी? आता शोधताय का संदर्भ?
तुम्ही असेच बिनबुडाचे काहीही सांगत राहणार आणि बाकिच्यांनी काम धाम नसल्यासारखे शोधत बसायचे का?
जे लिहाल ते आताच संदर्भासहीत सांगा.
शेंडेजी
शेंडेजी
तुम्ही ही उदाहरणे तुमची खरोखरीची समजूत आहे म्हणून दिली आहेत असे मी समजतो. म्हणजे तुम्हाला सैद्धांतिक दृष्ट्या धर्म स्विकारता येतो एव्हढेच सांगायचे आहे असा मी अर्थ घेतो.
आता काही प्रॅक्टीकल गोष्टी पाहूयात.
धर्म स्विकारलेल्या व्यक्तींची सांस्कृतिक ओळख, त्यांची सांस्कृतिक भूमी (प्रदेश) आणि त्यांचे स्टेटस.
वर दिलेली उदाहरणे सेलिब्रिटी आणि विशेषाधिकृत व्यक्तींची उदाहरणे आहेत. सामान्य मानुषाच्या अनुभवांशी त्यांचा संबंध नाही.
हिंदू धर्मातून जाती अडसर आहे हे भारतीय सामाजिक यथार्थता आहे. धर्मशास्त्र दृष्ट्या जाती आवश्यक नसली तरी, व्यावहारिकदृष्ट्या ती अजूनही जिवंत आहे. याला नकार देणे खोटेपणाचे चिन्ह आहे.
मी तुम्हाला या आधीही जातव्यवस्था कुठे ट्रान्स्फर होते हे नीट सांगितलेले आहे. तुम्ही ते वाचले नसावे. या तीन व्यक्ती अशा मुलखातून, सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत जिथे जात नाही. त्यामुळे एखाद्या कुटुंबात एक व्यक्ती हिंदू, एक मुस्लीम आणि एक ख्रिस्ती असली तरी त्यांना व्यावहारिक अडचण काहीच येणार नाही. त्यांना फक्त मानसिक दृष्ट्या वे ऑफ लाईफ मधे बदल हवा होता तो त्यांनी मिळवला. पुन्हा हा धर्म मुलांना कंपल्सरी नाही. कारण तिथे हिंदू धर्माचे ठेकेदार नाहीत. बौद्ध धर्माचे नाहीत, ना मुस्लीम. मुल त्याला हवा तो धर्म निवडेल किंवा बिना धर्माचाही राहू शकेल. असे लोक भारतातही आहेत. (पण वैतागून त्यांनी आता धर्म स्विकारला ज्याची बातमी जास्त झाली नाही. )
नक्षत्रजी समजून घ्यायचे असेल तर नीट समजून घ्या. विपर्यास करून निव्वळ वाद घालण्यात इंटरेस्ट नाही.
आता या सर्व व्यक्ती सेलेब्रिटी होत्या. तसेही गोरी चमडी ही भारतात सेलेब्रिटीच असते. एखादा गोरा माणूस आपल्यासाठी वंदनीय असलेल्या ठिकाणी गेला कि त्याची बातमी होत असते. आपली मानसिकता ते श्रीमंत आहेत, प्रगत आहेत आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ही असते.
सेलेब्रिटींना तर सामाजिक कायदे सैलच असतात. त्यांचे आंतरधर्मिय विवाह झाले तरी त्यांना अडचण येत नाही. सेलेब्रिटींची आपली एक दुनिया असते ज्यात त्यांना धर्माच्या दुनियेचे कायदे अडसर म्हणून वाटत नाहीत. ते समाजापासून फटकूनच असतात. म्हणजे ते श्रेष्ठ असतात.
त्यामुळे भारतात राहिले तरी त्यांना अडचण येत नाही. ते हिदू धर्म स्विकारून चिनी व्यक्तीशी लग्न करू शकतात. पण कल्चर आपलेच जोपासतील किंवा कदाचित वेगळेही पाळतील. त्यांना कुणी मुलगी देण्याचा प्रश्नच येत नाही.
सामान्य माणसाला हा धोका असतो. रोटीबेटी व्यवहार बंद झाला तर त्याला बहीष्कृत जिणे जगावे लागते. तो समाजापासून वेगळा जगू शकत नाही. ही अडचण यातल्या एकालाही येणार नाही.
सांस्कृतिक भूमी असे वर म्हटले आहे ते म्हणजे ते जिथून आले तिथे उदारमतवाद असेल , मोठ्या प्रमाणावर असेल तर कुणी हिंदू धर्म स्विकारला यामुळे कुणाचेच काही बिघडणार नाही. भारतातही एखाद्या उचवर्णियाने ज्युलिया रॉबर्टसच्या मुलाला आपली मुलगी देणार नाही असे ठरवले किंवा काही जातींनी तसे ठरवले तरी तिचे काहीही अडणार नाही. तिला चायनीज, जपानी, ख्रिस्ती, मुस्लीम असे हजार पर्याय आहेत. तिची सामाजिक अडवणूक करण्याचा प्रयत्न केला तरी ती याच्या वर आहे.
भगिनी निवेदिता या प्रपंचापासून अलिप्त असल्याने त्यांनाही सामाजिक अडवणुकीने काहीही फरक पडत नाही.
आता आपण वेगळे उदाहरण बघू.
गरीब आफ्रिकन देशातल्या गरीबाने जर हिंदू धर्म स्विकारला आणि तो भारतात राहिला तर?
जर तो आफ्रिकेत गेला आणि तिथे धर्म ही कन्सेप्ट घट्ट नसेल तर त्याच्या मुलखात त्याच्या धर्मांतराचा इश्यू होणार नाही. तिथे जातव्यवस्था ही ओळख नसल्याने त्याचे काही अडणार नाही.
पण भारतात?
त्याचे अडणार नाही असे म्हणू शकतो का आपण?
फक्त गरीब आफ्रिकनचेच नाही तर तिथल्या श्रीमंत आणि सेलेब्रिटी माणसाचे पण भारतात काय होईल?
भारतीय माणूस आफ्रिकन माणसांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानत नाही. त्यांना सेलेब्रिटी मानत नाही. आफ्रिकेतले सेलेब्रिटी भारतात सामान्यांप्रमाने फिरतात जसे पूर्वी बॉलीवूडचे सेलेब्रिटी युरोपात फिरत.
अशांना हिंदू धर्म स्विकारला म्हणून त्यांच्याशी कॉण रोटीबेटी संबंध प्रस्थापित करेल?
धर्म स्वीकारणे आणि सांस्कृतिक जीवन बदलणे ये दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर कोणीतरी अमेरिकेसारख्या उदार देशात राहतो, तिथे जन्मजात धर्म नाही, तिथे संस्कृती सैल आहे, सहज बदलांना अनुकूल आहे तिथे त्या व्यक्तीने हिंदू धर्म स्वीकारला तरीही त्याचे दैनंदिन जीवन अमेरिकन परंपरांनुसार चालणार. त्याचा धर्म बदलून गेला, पण संस्कृती बदलली नाही.
तीन महिलांच्या बाबतीतही असे आहे. ज्युलिया रॉबर्ट्स अमेरिकेतच राहते. तुलसी गॅबार्ड अमेरिकेचा राजकीय व्यक्तित्व आहे. भगिनी निवेदिता भारतात आली, पण ती एक महान शिक्षक आणि समाजसुधारक होती - विशेष स्टेटसची व्यक्ती. सामान्य मानवासारखी परिस्थिती त्यांच्यात नाही.
यापेक्षा जास्त मी सांगू शकणार नाही. नेमके समजून घ्यायची इच्छा असेल तर समजेल. वितंडवाद घालायचा असेल तर माफ करा.
महत्वाचं राहीलं.
महत्वाचं राहीलं.
अपवादाने नियम सिद्ध होत असतो, अपवाद म्हणजे नियम नसतो.
ह्या धाग्यावर अनुचित पोस्ट
ह्या धाग्यावर अनुचित पोस्ट असेल ही ..
anchayat actor Vinod Suryavanshi (who appeared in the series) has spoken out about facing severe, real-life caste discrimination in his native Karnataka village, saying the experience of casteism remains deeply rooted despite his acting success.
Key Details from Vinod Suryavanshi's Account:
Temple Entry Restrictions: The actor revealed he is still not allowed to enter a temple in his ancestral village.
Separated Living Areas: He stated that his village in Karnataka has separate, segregated areas for "upper" and "lower" castes.
Humiliation and Social Exclusion: He recalled a childhood incident where, at age 12, he was forced to wash his own plates at a hotel after eating, simply due to his caste, even though he paid for the food.
Continuing Struggle: He noted that his family faces social exclusion and is still treated as "inferior" in the village, proving that professional success does not immediately eliminate social inequalities.
शेंडेनक्षत्र यांनी दिलेली
शेंडेनक्षत्र यांनी दिलेली उदाहरणे समजाच्या अत्यंत वरच्या स्तरातील आहेत. ०.१%.
भारतात गरीबी नाही, कारण मुकेश अंबानी सारखे लोक पत्नीला विमान गिफ्ट देतात असे म्हणण्यासारखे.
निरंजन टकले यांनीही एक व्हिडिओ केला आहे, बराच मोठा. नाशिक पोलिसांना 'बावळट' विशेषण दिले आहे त्यांनी. IMO he is being charitable.
पाहिला तो व्हिडीओ पूर्ण.
पाहिला तो व्हिडीओ पूर्ण. निष्कर्ष काय काढायचा आहे ते आधीच ठरवून केलेला तपास वाटतो.
- निदा खान यांना अटक झाली आहे असा क्लेम त्यांनी केला आहे (२०:५० मि. ला). तसे कोठे वाचलेले नाही. त्या पोलिसांना सापडल्या आहेत किंवा पोलिस ठाण्यात त्यांनी स्वतःहून रिपोर्ट केले आहे असेही वाचलेले नाही. त्याच्या नवर्याने दिलेल्या पत्त्यावरही त्या नव्हत्या असेच वाचले आहे. त्यांची बेल याचिका कोर्टाने नाकारली अशी बातमी आली होती. (त्यांच्यावरच्या आरोपाचा त्या एच आर मधे आहेत की नाही याच्याशी काहीच संबंध नाही, पण ते वेगळे)
- निदा खान एच आर मधे नाहीत हे समजल्यावर अश्विनी चेनानी यांना अटक झाली असा काहीतरी क्लेम त्यांनी केला आहे. वास्तविक इतरांबरोबरच त्यांनाही अटक झाली होती असे आठवते.
- कंपनीकडे कोणतीही लेखी (इमेल) तक्रार आलेली नाही यावर पाच दहा मिनिटे मोठा गौप्यस्फोट केल्याच्या थाटात ते बरेच काय काय बोलले आहेत. मुळात अशी तक्रार आलेली नाही याचा पुरावा आत्तापर्यंत फक्त "कंपनीचा दावा" इतकाच आहे. दुसरे म्हणजे पॉश करता तोंडी तक्रारही चालते हे इथे पॉश मधे काम करणार्यांनीच लिहीले आहे. शिवाय अशा बाबतीत इतर सर्वत्र लेखी तक्रारीतील रिटॅलिएशनच्या धोक्याचा विचार करून तोंडी तक्रारीही मान्य करतात हे अगदी कॉमन आहे. पण तरीही असे चालतच नाही हे अगदी रेटून सांगण्याचा उद्देश निर्वाळा आधीच द्यायचा आहे हा दिसतो.
- तिसरे म्हणजे बहुतांश आरोप आहेत त्यातले काहीही सिद्ध होऊ शकत नाही - म्हणून ते घडलेच नाही हे ही अगदी हुकमी माहीत असल्यासारखे सांगत आहेत.
मी यांचे व्हिडीओ आवर्जून बघतो. जनरल ग्रूपथिंकच्या पेक्षा वेगळे काहीतरी त्यात असते. मला त्यांच्याबद्दल काही द्वेष वगैरे नाहीत. पण हा "शोध" ऑब्जेक्टिव्ह नाही. मात्र त्यांनी इतर एक दोन क्लेम्स केले आहेत त्याची चौकशी व्हायलाच हवी
- मुख्य तक्रारदार व त्यातील आरोपीची पत्नी यांच्यात ३-४ वर्षे व्हॉट्सअॅप चॅट होत होती असा दावा. हे असेल तर फसवणुकीचा आरोप फोल ठरेल. हा क्लेम फक्त यांच्याच क्लिप मधे दिसला आहे आत्तापर्यंत.
- आरोपपत्रांमधे काही हिंदू नावेही आहेत पण त्यांना अटक झालेली नाही.
- तीन चार वर्षे जेथे रॅकेट असल्याचा क्लेम मिडियाने केला आहे तेथे प्रत्यक्षात एकही व्यक्ती मुस्लिम झालेली नाही. त्यामुळे रॅकेट बिकेट काही नाही. हे बरोबर वाटते. पण रॅकेट असल्याची काही ठोस माहिती मिळालेली नाही हे पोलिसांनीही काही दिवसांपूर्वीच क्लिअर केलेले आहे.
बाय द वे, एका आरोपीच्या वकिलांनी "ऑफिसमधले कॅज्युअल बोलणे सिरीयसली घेउन आरोप केले आहेत" अशा अर्थाचे वक्तव्य केले आहे. तेव्हा काहीच्च झालेले नाही हा निर्वाळा जरा प्रिमॅच्युअर आहे. मी कोणालाही दोषी गृहीत धरलेले नाही. पहिल्यापासून माझा पॉईण्ट हे सगळे इतक्यात डिसमिस करू नका इतकाच आहे.
टकलेंच्या व्हिडीओची लिंक दिली
टकलेंच्या व्हिडीओची लिंक दिली होती. नंतर नक्षत्राच्या देण्यामधे राहून गेलं ते. त्या व्हिडीओबद्दल काय काय वाटले ते लिहीणार होतो. पण विसरलो.
सर्वप्रथम टकलेंचं इन्क्लिनेशन
सर्वप्रथम टकलेंचं इन्क्लिनेशन एका बाजूला झुकलेलं आहे हे लपून राहिलेलं नाही. त्यामुळे त्यातून एक बाजू समजून घेण्यासाठी मदत होते. पण ते सांगतात ते अंतिम सत्य असा समज करून घ्यायचा नाही. संपूर्णपणे न्युट्रल पत्रकार किंवा बॅलन्स रिपोर्टिंग ही भारतात अफवाच आहे. जज्ज लोया प्रकरणात टकलेंनी शोधपत्रिकारिता केली होती, पण नंतर मविआ सरकार मधे त्यांनी त्या प्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही हा प्रश्न पडतोच.
तरी पण टकलेंनी नेमके काय म्हटलेय? ते ऑन रेकॉर्ड बोलत आहेत. ते माझ्याकडे पुरावे आहेत असे म्हणत आहेत. त्यांचे म्हणणे बर्याच प्रकरणात सत्य निघाले आहे हे पण नजरेआड करता येत नाही. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांनी अशीच एक भूमिका घेतली होती, पण नंतर न्यायालयाने त्यांना दणका दिला आहे. त्यांनी त्याचा पोलीस कोठडीत खूनच केला आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणात आरोपींना जामीनच मिळू नये अशी कलमे लावली. पहिल्यापासून ते प्रकरण तुषार दामगुडे सारख्या आणि एका बल्लाळ नावाच्या टीनएजरच्या तक्रारीवर दाखल झाले होते. कुणीही जबाबदार व्यक्तीने तक्रार दिलेली नाही. तक्रार देणारे हे लेबल नसलेले सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यातही न्यायालयाने नंतर शेरे मारले.
अगदी मविआच्या काळातल्या अंबानींच्या घराबाहेरच्या थ्रेटच्या प्रकरणात पोलीस दोषी असल्याचे आढळून आले होते.
भीमा कोरेगावचा तपास ज्याने केला तो पोलीस कमिशनर परमेश्वर राव दोषी असल्याचे मविआच्या काळात केंद्र सरकारला आढळले.
त्यामुळे या प्रकरणाकडे भाजपचा इंटरेस्ट विरूद्ध मविआचा इंटरेस्ट असे बघू नये. निव्वळ एका बाजूचे दृष्टीकोण मांडल्याने काहीच हाती लागणार नाही. हा धागा दहा हजार पानापर्यंत गेला तरी तेच चालू राहील. नंतर पुन्हा लिहीन.
टकलेंच्या व्हिडीओतले मुद्दे
टकलेंच्या व्हिडीओतले मुद्दे
क्र) टाईमलाईन आणि विवरण या पद्धतीने (इथे टेबल बनवणे शक्य नाही)
१) ०.४१ दिल्लीतल्या बाँबस्फोटाशी कनेक्शन असल्याच्या बातम्या.
माझे दोन आणे- या बातम्या मी ऐकल्या आहेत. अनेकांनी ऐकल्या असतील. म्हणूनच पुराव्याची गरज नाही. अशाच बातम्या नव्वदच्या दशकात चालायच्या. काहीही घटना घडली कि मिनिटभरात आरोपींची नावे, त्यांची संघटना यांची नावे वाहीन्यांवर यायची. पोलिसांआधीच वाहीन्यांचा तपास पूर्ण व्हायचा. त्या वेळी इंडियन एक्सप्रेस मधे इलेक्ट्रॉनिक मीडीयाच्या या पद्धतीच्या रिपोर्टिंगवर एका माजी पोलीस अधिकार्याने म्हटले होते कि ञा दहशतवादी संघटनांची कॉर्पोरेट ऑफीसेस भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडीयाच्या स्टुडीओतच असतात. पुण्यात सायकल स्फोत प्रकरणात एका गरीब टेलरला अटक झाली होती. तो ज्या दुकानात काम करत होता त्या दुकानाच्या हिंदू मालकाला पोलिसांना हवी तशी साक्ष न दिल्याने मारहाण झाली होती. पुढे तो मजूर निर्दोष सुटला. करकरेंनी मालेगाव स्फोट प्रकरणात आधी दोषी ठरवलेल्या आरोपींचा हात नाही हे सांगितले होते. जर्मन बेकरी प्रकरणात अटक केलेला हिमायत बेग हा त्या दिवशी औरंगाबादेत होता हे त्याचे म्हणणे कुणीच ऐकले नाही.
आशीष खेतान यांच्या स्टिंग ऑपरेशन मधे ते समोर आले. या प्रकरणाचा पॅटर्न हा असाच चिरपरिचित असल्याने संशयाला जागा आहे.
२) १.० :- फॅब्रिकेटेड न्यूज - हे पुढे आलेच आहे. कारण या न्यूजबरहुकूम एफ आय आर नाहीत. पोलीस तक्रार काय आहे हे बाहेर यायच्या आतच स्टोर्या तयार झाल्या. या स्टोर्यांचा बेस काय? हा प्रश्न पडायला नको का?
३) १.३६ मुंबईत पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची तक्रार तिच्या पित्याने केली. ४ तारखेला मुंबई नाका पोलीस स्टेशन मधे एफ आय आर क्र १७२ दाखल झाली. हिची पडताळणी सहज शक्य आहे. हा गुन्हा ३ तारखेला घडला.पुढच्याच दिवशी तक्रार दाखल झाली. याच काळात नाशिक प्रकरणात मीडीया ट्रायल चालू होती. मुंबई केस मधे आरोपी हिंदू आहे हे टकले का सांगतात असा प्रश्न आधी पडला होता. पण आता त्याचा संदर्भ समजला.
टकले खोटं बोलत असतील तर कुणीही ते उघडकीस आणू शकतात. ही बातमी देण्यामागे पोलिसांची अशा प्रकरणातली संवेदनशीलता काय असते ते ते मांडतात. पोलीसच नाही तर गृहमंत्री किती गांभीर्याने अशा केसेस घेतात. मग हेच पोलीस आणि गृहमंत्री नाशिक प्रकरणात एव्हढे हाय अॅलर्ट मोड मधे कसे? चांगली गोष्ट आहे. पण एखाद्या प्रकरणात कर्तव्यदक्ष असलेले पोलीस दुसर्ञा पॉस्को अधिक लैंगिक function at() { [native code] }याचार प्रकरणात उदासीन का? हा प्रश्न न्यायालयात पण उभा राहील.
४) ४.४४ - आधी पोलिसांनी सांगितलं कि निदा खान एच आर हेड आहे. पुढे त्यांनी जे म्हटले आहे ते मी इथे अनेकदा आधी लिहीले आहे. कि जर पोलिसांनी अंडरकवर ऑपरेशन किंवा स्टिंग ऑपरेशन केले होते तर त्यांना निदा खान एचआर आहे हे कसे समजले? कंपनीने लेखी खुलासा केला कि निदा खान एच आर नाही. हा त्यांचा दावा नाही. हे त्यांचे स्पष्टीकरण आहे. हे खोटे असेल तर ते टिकणार नाही. ती जर एच आर म्हणून असेल तर ते उघडकीस येणारच. म्हणजेच पोलिसांचे अंडरकवर ऑपरेशन ही काय भानगड होती. मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिकमधेच आहे. मुंबईत नाही. तर मग नाशिकच्या या शेरन्या या प्रकरणात काय बोलल्या? कि त्यांना फक्त टीसीएस प्रकरणातच इंटरेस्ट होता? असेल तर एकाच प्रकरणात का?
हा प्रश्न व्हॅलिड नाही असे का वाटते?
एव्हढेच प्रश्न पुरेसे आहेत. बाकीचे अन्य मुद्द्यांवर बोलतीलच.
थोडक्यात
थोडक्यात
चॅट, ईमेल्स, सीसीटीव्ही फूटेज हे पुरावे पाहूनच न्यायालय मत देईल. या केस मधे जर ईलेक्ट्रीनिक मीडीयाला पण पार्टी केले तर त्यांनी बातम्या देताना काय तपास केला होता हे न्यायालयात उघड होईल. लव जिहाद चा आरोप करताना काय पुरावे होते हे समजेल.
कंपनी दोषी असेल तर याच पुराव्यांनी ते शाबीत होईल. तसेच पोलीस दोषी असतील तर कंपनीने ट्राईलिगल आणि अन्य एका क्पनीला तपास करायला सांगितले आहे. या कंपनीने पूर्वी पॉश प्रकरणात तपास केला आहे. हा काही न्यायालयावर प्रभाव पाडेल असा अहवाल नसेल. पण जर पोलीस काही सिद्ध करू शकले नाहीत तर हा रिपोर्ट न्यायालयाला दुसरी बाजू समजून घेण्यासाठी मदत करेल.
मूळ निदा खान एच आर नसताना प्रभाव कशी टाकू शकली?
ती मॅटर्निटी लीव वर असताना तिला फरार का घोषित केले?
सात जण १५० जणांना बीफ खायची, धर्मांतराची सक्ती करू शकतील का?
निदा खान जी टेलिमार्केटिंग मधे टेलिकॉलर आहे तिच्याकडे महिलांना बोलावून तू याच्या हाताखाली काम कर असे सांगण्याचा अधिकार असू शकतो का?
या धाग्यावर तशा पोस्टस आहेत.
इथे वारंवार पॉश कायदा आणि
इथे वारंवार पॉश कायदा आणि तोंडी तक्रार पुरेशी आहे असे दावे केले गेले आहेत.
कायदा कुठलाही असो कितीही कडक असो, तक्रार तोंडी असेल आणि कारवाई झाली नाही तर न्यायालयात ते टिकणार नाही हे माहीत असल्याने कायदेविषयक सल्ले देणार्या वेबसाईटस पाहिल्या ( ज्या सर्च मधे येतातच). एकूण गोळाबेरीज अशी आहे.
POSH कायद्यात तक्रारीची पद्धत काय आहे?
POSH कायद्याच्या कलम ९(१) नुसार, पीडित महिला लिखित स्वरूपात तक्रार दाखल करू शकते. ती तीन महिन्यांच्या आत असावी ( घटनांची मालिका असेल तर शेवटच्या घटनेपासून).
जर तक्रार लिखित स्वरूपात करता येत नसेल (शारीरिक किंवा मानसिक अडचण असल्यास), तर Internal Committee (ICC) च्या presiding officer किंवा कोणत्याही सदस्याने त्या महिलेला सर्व शक्य सहाय्य देऊन तक्रार लिखित स्वरूपात तयार करण्यास मदत करावी. म्हणजे, तोंडी सांगितले तरी ती लिखित स्वरूपात नोंदवली जावी आणि त्या महिलेला वाचून दाखवून तिची संमती घेतली जावी.
तोंडी तक्रार स्वतंत्रपणे पुरेशी नाही. अनेक न्यायालयीन निर्णयांनुसार (विशेषतः केरळ उच्च न्यायालयाच्या २०२५ च्या निकालात), तोंडी तक्रार लिखित तक्रारीची जागा घेऊ शकत नाही. ती फक्त प्राथमिक चर्चा किंवा माहिती म्हणून घेतली जाऊ शकते, पण POSH अंतर्गत औपचारिक चौकशी सुरू करण्यासाठी लिखित तक्रार आवश्यक आहे.
कंपनीने काहीच केले नाही, हा दावा कोर्टात टिकण्याची शक्यता कमी आहे,
जर केवळ तोंडी तक्रार केली असेल आणि लिखित स्वरूपात कधीही दिली नसेल, तर कंपनी किंवा ICC वर काहीच केले नाही असा आरोप सिद्ध करणे कठीण जाते. कायद्यानुसार तक्रार लिखित नसल्यास ICC ला औपचारिक प्रक्रिया सुरू करण्याची सक्ती नाही.
न्यायालय बघते की लिखित तक्रार ही प्रक्रियेची मूलभूत गरज आहे. ती नसल्यास कंपनीला जबाबदार धरणे अवघड होते.
मात्र, जर लिखित तक्रार दिली असेल (ईमेल, पत्र किंवा हाताने दिलेली) आणि तरीही ICC ने ९० दिवसांत चौकशी पूर्ण केली नाही, तक्रार नोंदवली नाही किंवा प्रक्रिया दाबली गेली, तर हा दावा टिकू शकतो. अशा वेळी कंपनी आणि ICC वर कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल जबाबदारी येऊ शकते.
अनेक कंपन्या POSH पॉलिसीत तोंडी तक्रारींनाही गांभीर्याने घेतात आणि त्या लिखित स्वरूपात रूपांतरित करतात. पण कायद्याने लिखित स्वरूपावर भर दिला आहे.
जर कंपनीकडे लिखित रेकॉर्ड (ईमेल, तक्रार फॉर्म, नोंद) नसेल, तर कोर्टात आम्ही तक्रार ऐकली पण लिखित नव्हती असा बचाव कंपनीकडून येऊ शकतो.
दुसरीकडे, जर पीडितेने लिखित तक्रार दिल्याचे पुरावा (ईमेल रिसीप्ट, पोस्ट, साक्षीदार) सादर केला आणि कंपनीने काहीच केले नाही, तर कोर्ट कंपनीला जबाबदार ठरवू शकते. यात दंड, नुकसानभरपाई किंवा इतर कारवाई होऊ शकते.
कुणीही ही माहिती पडताळून पाहू शकतो. कायद्याचा अर्थ चुकीचा लागला असेल तर सांगू शकता.
हा प्रश्न व्हॅलिड नाही असे का
हा प्रश्न व्हॅलिड नाही असे का वाटते? >>> नाही ते व्हॅलिड नाहीत असे मी म्हणत नाही. तो बोलले त्यातले मला जे चुकीचे वाटले जसे लिहीले तसेच मला जे रास्त वाटले तेही मी लिहीले. तुम्ही उल्लेख केलेले बरेच प्रश्नही व्हॅलिड आहेत.
फक्त निदा खान यांच्या मुद्द्याबद्दलः या एच आर नाहीत हे पोलिसांना कसे समजले नाही हे ते २-३ वेळा विचारतात. हे "अंडरकव्हर" म्हणजे साध्या वेषातील पोलिस तेथे जाउन कर्मचार्यांशी बोलले होते. निदा खान या बरेच महिने आधी बदली होउन मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्याबद्दल तेथे डिटेल काही बोलणे झाले नसेल. बाय द वे, निदा खान या आरोपी आहेत, पोलिसांना अजून कोठे भेटलेल्या नाहीत, त्यांची अॅण्टिसिपेटरी बेल अमान्य झालेली आहे. अशा स्थितीत त्यांचे खटल्याच्या बाबतीत त्यांची अधिकृत नोंद फरार अशीच असेल ना?
टकल्यांचे मत एका बाजूला झुकलेले असण्याबद्दल काहीच प्रश्न नाही. प्रत्येकाचे थोडे ना थोडे असणारच. आणि जेव्हा हजारो लोक काहीही शहानिशा न करता आलेल्या बातम्या पुढे ढकलत आहेत, तर कोणीतरी क्रिटिकल प्रश्न विचारले तर बरोबरच आहे.
पोलिसांना जर निदा खान भेटलीच
पोलिसांना जर निदा खान भेटलीच नाही तर ती फरार कशी घोषित केली?
आणि जर भेटलीच नव्हती तर ती एच आर असल्याचा शोध कुणी आणि कसा लावला? ती मास्टरमाईंड आहे असे पोलिस म्हणतात असे न्यूज चॅनल्स सांगत होते. मग पोलिसांनी खुलासा का केला नाही?
पोलिसांना जर निदा खान भेटलीच
पोलिसांना जर निदा खान भेटलीच नाही तर ती फरार कशी घोषित केली? >>> आरोपी व्यक्ती पोलिसांना सापडली नाही (तिच्या नवर्याने दिलेल्या पत्त्यावरही ती नव्हती), स्वतःहून पोलिस ठाण्यात येउन रिपोर्ट केले नाही. बेल मागितली होती म्हणजे त्या व्यक्तीला आरोपांची ऑलरेडी कल्पना नाहे. अशा वेळी फरारच नोंद करत असावेत असे मला वाटते. मला यातला कायद्याचा भाग १००% माहीत नाही. आणखी काही कारणाने फरार घोषित करणे चुकीचे असेल तर कल्पना नाही.
टकले असे म्हणतात कि त्यांनी
टकले असे म्हणतात कि त्यांनी माहिती घेतली आहे. पोलीस त्या पत्त्यावर पोहोचलेच नव्हते. ती मॅटर्निटी लीव्ह वर होती. ती जर प्रेग्नंट असेल तर तिला जामीन मिळायलाच हवा.
हा विरोधाभास महत्वाचा आहे. ( प्रेग्नंट असताना फरार म्हणणे आणि जामीन मिळाला नाही असे म्हणणे).
एक टेलिकॉलर मास्टरमाईंड आहे असे दावे केले गेलेत. त्या पार्श्वभूमीवर हा सगळा भोंगळ कारभार आहे. पोलिसांना ती भेटलीच नसताना आणि ती एच आर नसताना तिला मास्टरमाईंड कसे ठरवले?
हे प्रकरण इतके चघळले गेले
हे प्रकरण इतके चघळले गेले ह्यामागेच अजेंडा आहे. तो बिलकुल लपलेला नाहीये. इथल्या अनेक सदस्यांनी सुद्धा आपल्या पोस्टींद्वारे हे स्पष्ट केले आहे.
बाकी माहितीअभावे केस स्पेसिफिक काही कमेंट नाही.
अटकपूर्व जामीन नाकारला गेला
अटकपूर्व जामीन नाकारला गेला व पोलिसांना तरीही व्यक्ती सापडली नाही तरच फरारी असे म्हणता येईल.
पोलिसांचे मालेगाव केस मधले व याही केस मधले वर्तन पहाता त्यांच्याकडून अटक करवून घेण्यापेक्षा जामीन मिळवणे हेच योग्य आहे असा कुणीही सूज्ञ विचार करेल.
पोलिसांच्या गुप्त वेषातील TCS मधल्या तपासाबद्दाल वावड्या उठल्या तेव्हाच पोलिसांनी खरे तर clarify करायला हवे होते, पण फुकटात काहीही न करता देशभर मेडियातून आपला उदो उदो होतोय तर असू द्या असा विचार केला असेल.
POSH मध्ये तोंडी तक्रारीचीही दखल घेणे अपेक्षित असते तरीही ती केली होती हे कसे सिद्ध करणार ? आम्ही केली होती असे फिर्यादी म्हणत असतील व केलीच नव्हती असे आरोपी म्हणत असतील तर ? आठ नाऊ पैकी एकीनेही लेखी तक्रार केली नव्हती हे पटणे अवघड आहे.
या केस ची माझ्या मते टाईमलाईन अशी आहे.
परस्पर संमतीने सुरू असलेल्या अफेयर मध्ये काही कारणाने वितुष्ट आले, मुलीला घरच्यांनी नोकरी सोडून घरीच बसवले, एका 'हिंदुत्ववादी' कार्यकर्त्याला हे समजले. त्याने घरी जाऊन तिचे दोन तीन दिवस ' काउंसेलिंग' केले. मग त्यांनी एफ आय आर केला. पूर्वी ४९८-अ चा एफ आय करताना जसे नवरा, सासू सासरे, दीर, नणंद जावा सर्वांचीच नावे घालत( मग ते एन आर आय का असेनात) तसे मिळतील त्या मुस्लिमांची नावे एफ आय आर मध्ये घातली, निदा खान तर आयतीच सापडली. मग त्या कार्यकर्त्याने इतर काही जणांचे 'काउंसेलिंग' करून आणखी एफ आय आर केले.
उरलेल्या ७ मुली आणि एक मुलगा
उरलेल्या ७ मुली आणि एक मुलगा यांच्या केस ची तुमच्या मते टाईमलाईन कशी असेल.
अटकपूर्व जामीन नाकारला गेला व
अटकपूर्व जामीन नाकारला गेला व पोलिसांना तरीही व्यक्ती सापडली नाही तरच फरारी असे म्हणता येईल. >>> मग तसेच आहे ना सध्या?
चित्रांगदा सेन चा एक चित्रपट
चित्रांगदा सेन चा एक चित्रपट आठवला इन्कार म्हणून असंच काहीतरी विषय होता. खूप छान चित्रपट आहे. हा पण धर्माचा अंकल नाहीये त्याला. पिक्चर जुनाच आहे. ती त्याच्या पूर्णपणे प्रेमात असते आणि तोही असतो . सगळं काही सुरळीत चालू असता आणि अचानक तिला असं वाटायला लागतं की त्याचं माझ्यावर प्रेम नाही, त्याला दुसरच कोणीतरी आवडते , किंवा जस्ट टाइमपास आहे. त्यामुळे ती त्याच्यावरती sexual assault ची केस टाकते.
मान्य आहे, निदा खान फरारी आहे
मान्य आहे, निदा खान फरारी आहे असे टेक्निकली म्हणू शकतो.
सुरुवातीला निदा खान एच आर मॅनेजर आहे व मास्टरमाईंड आहे असा प्रचार पाच सहा दिवस सर्व वाहिन्यांवर चालू होता तेव्हा पोलिस एका वाक्यात क्लियर करून हे थांबवू शकत होते, पण ती एच आर नाही हे शोधले कुणी, तर दिल्लीच्या एका पेपर ने. तिचे नाव एकाच एफ आय आर मध्ये आहे व आरोपही He said / she said प्रकारचे आहेत. आतातर तिच्यावर अॅट्रॉसिटीचीही कलमे लावायची तयारी आहे, हे म्हणजे एका अर्थाने आमच्या मूळ आरोपात फार दम नाही पण आम्हाला हे प्रकरण जास्तीत जास्त ताणायचे आहे अशी पोलिसांची भूमिका !
Deja vu ! this is Sushant suicide all over again. तेव्हाही 'सुशांत च्या खात्यातून सात कोटी रियाच्या खात्यात गेले' अशा ब्रेकिंग न्यूज येत होत्या व सर्वांना खर्याच वाटत होत्या.
https://www.livelaw.in/news
https://www.livelaw.in/news-updates/tcs-nashik-case-court-denies-interim...
इथे कोर्टात काय झाले ते दिले आहे. अजून अशा अनेक साईटस आहेत. मीडीयातल्या न्यूज खोट्या किंवा खोडसाळ आहेत.
निदा खानचा फायनल अर्ज फेटाळलेला नाही. २० एप्रिल रोजी के जी जोशी यांच्या कोर्टात बेल देण्यावर सुनावणी झाली. त्यात अंतरिम दिलासा मागितला होता. म्हणजे फायनल निकाल येत नाही तोपर्यंत पोलीस अटक करू शकत नाहीत. कोर्टाने त्यास नकार दिला आणि २७ एप्रिल म्हणजे आजची तारीख दिलेली आहे. म्हणजे अर्ज फेटाळलेला नाही, ना बेल दिली आहे ही स्थिती आहे. या स्थितीत पोलीस अटक करू शकतात. पण आरोपी कोर्टापुढे आल्याने फरार म्हणता येईल का?
https://www.hindustantimes.com/cities/pune-news/court-denies-interim-ant...
भारतात रिया चक्रवर्ती केसमधून
भारतात रिया चक्रवर्ती केसमधून दिसले आहे की पत्रकार, टिव्ही अँकर एक व्यक्तीवर वाट्टेल ते निराधार आरोप करून त्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त करू शकतात. त्यांना कोणीही अकाऊंटेबल धरत नाही.
तेच एक कॉमेडियन वाईट जोक मारतो तर तीन मुलको की पोलिस मागे लागते.
निराशाजनक स्थिती.
आधीची सरकारे सुद्धा असे करत
आधीची सरकारे सुद्धा असे करत होती. त्यांना ही सपोर्ट करणारा मीडीया होता.
पण घाऊक प्रमाणावर असे होत नव्हते. कुठेतरी सरकारच्या विरोधात आवाज उठू शकतो असे लोकांना वाटावे असे चित्र होते. किंवा त्या काळात सरकार जास्त स्मार्ट असावे. लोकांच्या मानसिकतेचा जास्त अभ्यास असावा.
जर सगळीकडून सरकारला हवा तसाच आवाज उठू लागला आणि दुसरी बाजू दिसेनाशीच झाली तर अशा स्थितीत संशय उत्पन्न होतो. सरकार जे सांगते त्यावर विश्वास बसणे हळू हळू कमी होऊ लागते. त्यातच अशी प्रकरणे शेवटाला जाताना दिसत नाहीत. यथावकाश प्रकरण रंगवलेले होते असे उघडकीस येऊ शकते. यामुळे जर एखादे प्रकरण खरे असले तरीही नंतर लोकांचा विश्वास बसणार नाही.
लांडगा आला या स्थितीला जायचे का याचा विचार करायचा नसेल तर तो त्यांचा निर्णय आहे, त्याचा आदर केलाच पाहीजे.
या प्रकरणातही जस जशी दुसरी बाजू क्षीणपणे का होईना पुढे येत चालली आहे तस तसे आधी उच्चरवात बोलणारे बिळात जाऊ लागले आहेत. अजून पूर्ण सत्य काय ते समोर आलेले नाही.
Pages