TCS नाशिक

Submitted by रेव्यु on 12 April, 2026 - 00:28

मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली हौस भागेल पण TCS मधल्या मुलींची लग्ने होणे अवघड होईल.>>>>
लग्न हेच आयुष्यातल अन्तिम ध्येय आहे हेच मुलिना सान्गत राहायच, फियर मॉन्गरिन्ग करत राहायच..ज्यायोगे बदनामी होवु नये म्हणून होत असलेला अन्याय सहन करा , किवा अशा घटना होतिल तेव्हा घरिच बसा बर म्हणजे लग्न जुळायला अडचण येणार नाही हेच अप्रत्यक्षरित्या सुचवताय तुम्ही??? धन्य आहात !!
याआधीही तुम्ही ब्राम्हण मुलीची लग्न का जुळत नाही त्यातल्या अडचणिसारखे अडाणचोट धागे काढले होते..यावरुन तुमच्या बुरसटलेल्या मानसिकतेचा अन्दाज येतोय.

आज पर्यंत जे झाले नाही ते पुढील २५ वर्षात होईल असे म्हणायचे आहे?>>>>

हो. आजपर्यंत झाले नाही असे तुम्हाला वाटतेय म्हणजे १००% झाल्यावरच तुम्ही झाले असे म्हणणार. गेली १००० जे सुरु आहे त्याला यश मिळतेय, पाकिस्तान उगीच झालेला नाही. तेही या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

किती भारतीय शहरांची डेमोग्राफी बदललीय, ती कशी बदललीय हे शोधा नेटवर. इथे लिहिले नाही तरी चालेल. मला व्यक्तिशः ना खेद ना खंत.

लिंक देताना पण कसंसच होतंय. >>>>

मग नका देऊ. उगीच का त्रास करुन घ्यायचा? तसेही इथे कोण स्वतःचे मत इतरांचे वाचुन बदलतेय..

प्राजक्ता, हाच स्वयंघोषित डाव्या पण खरे तर पाखंडी स्वप्रतिमेच्या प्रेमात पडलेल्या आणि स्वतःला अती उजव्या लोकांपासून वेगळे समजणार्‍या पण फार फरक नसलेल्या, स्वतःला लिबरल समजणार्‍या लोकांचा अजेंडा आहे. अर्थातच कट्टर उजव्या लोकांचा हाच अजेंडा आहे हे उघडच आहे.

कट्टर उजव्यांचा तो अजेंडा आहे हे तर उघड दिसतं. पण स्वयंघोषित डाव्या लोकांचा ही तोच बुरसटलेला अजेंडा आहे. हे लोक लिबरल अजिबात वगैरे नाहीत. विज्ञाननिष्ठ आणि लॉजिकल आणि सारासार विचार करणारे तर दूर दूर पर्यंत नाहीत.
मला ही हे उशिरा लक्षात आलं, पण आता ते वारंवार दिसतं.

प्राजक्ता, हाच स्वयंघोषित डाव्या पण खरे तर पाखंडी स्वप्रतिमेच्या प्रेमात पडलेल्या आणि स्वतःला अती उजव्या लोकांपासून वेगळे समजणार्‍या पण फार फरक नसलेल्या, स्वतःला लिबरल समजणार्‍या लोकांचा अजेंडा आहे.>>> यु सेड इट !

>>> तसेही इथे कोण स्वतःचे मत इतरांचे वाचुन बदलतेय..

दुर्दैवाने 'चालू घडामोडी' (दोन शब्द), 'राजकारण' (एक शब्द) ही सुटसुटीत शीर्षके टाळून ग्रुप्सची शीर्षके आठ-आठ शब्दीय ठेवणे योग्य ठरणार नाही.

>>इथे अनेक तरुणी आयुष्यातून उठल्या आहेत वगैरे अफवा पसरवणे टाळावे. आपली हौस भागेल पण TCS मधल्या मुलींची लग्ने होणे अवघड होईल.>> लग्न होणे अवघड? विकु, सिरीयसली?
कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवणे योग्य नाहीच परंतू तरुणी पिडीत झाली म्हणजे आता आयुष्यातून उठली हे समजणे देखील चुकीचे आणि असा काही पास्ट असल्याची शंका आल्याने लग्न होणे अवघड हे म्हणणे त्याहून चुकीचे. एक तर लग्न ही इतिकर्तव्यता नाही आणि त्यापुढे जावून अगदी स्वतःच्या चुकीने एखादी मुलगी पिडीत झाली तरी तिला आपले आयुष्य सावरायचा, पुन्हा नव्याने आयुष्याचा विचार करायचा पूर्ण अधिकार आहे. She deserves second chance. कुणाला कळले तर अब्रू जाईल, लग्न होणार नाही ही भिती घालून गुन्ह्याची वाच्यता होवू दिली जात नाही, ब्लॅकमेलच्या चक्रात मुली अडकतात. पिडीत व्यक्तीला गुन्हेगारासारखे वागवले जाते म्हणून तर अत्याचार करणार्‍यांचे फावते. जो काही भूतकाळ आहे त्याच्यासह स्विकार करायची तयारी नसलेला समाज पिडीत व्यक्तीला मौन बाळगायला भाग पाडून हा एक प्रकारे गुन्हेगारांना मदतच करत असतो आणि त्यातून काही काळाने धीर करुन तोंड उघडलेच तर पुन्हा विचारणा होते की इतके दिवस गप्प का बसलात? Angry

|Some of the most important problems facing humanity include climate change, extreme poverty, and the risks associated with advanced artificial intelligence. Addressing these challenges is crucial for ensuring a sustainable and equitable future for all."
बाकी चालुद्या.

कट्टर उजव्यांचा तो अजेंडा आहे हे तर उघड दिसतं. पण स्वयंघोषित डाव्या लोकांचा ही तोच बुरसटलेला अजेंडा आहे. >>> अरे तो तर स्वतंत्र लेखाचा आणि लाथाळ्यांचा विषय आहे Happy

करेक्ट!
रेप होतोय, गळचेपी होते आहे, जीव जातो आहे... पण वर्ल्ड पीस महत्त्वाची! वर्ल्ड पीस होत असेल तर सहन करा. कारण मानवजातीचा उद्धार करताय तुम्ही! रेप होताना क्लायमॅट चेंज तर झाला नाही ना! रडत राव कुठले!

अमितव
डराव डराव. डुबुक डुबुक.
रेप करणारा कोण होता? हिंदू ना? मग ठीक आहे.
इथे हजारो प्रश्न विचारले गेले. उत्तर एकाचेही नाही. बिल्किस बानो असो वा मणिपूर असो. आज मात्र उर बडवून रडारड. का हो. त्या स्त्रिया नव्हत्या का? निव्वळ फालतू गिरी.
भारतातले डेली रेपचे आकडे पहा.
आणि कुणी मर्मावर बोट ठेवले कि असे वाटेल ते लिहित बसायचे.

एकझॅक्टली तेच तर म्हणतोय. डेली रेप होतात, बिल्किस बानो झालं, मणिपूर झालं, उन्नाव झालं. तसं हे आणखी एक! हु केअर्स! उगा उर बडवू रडारड! निव्वळ फालतू स्त्रीयाच. त्या ही आणि या ही!

तुम्हाला पीडित तरुनिन्बद्दल काडीचेही देणे घेणे नाही .
आहा मुस्लीम का? good ! चला घेऊया आडे हात.
मी काय लिहिले आहे ते तुम्हाला चांगले समजते आहे. पण आज संधी मिळाली आहे. घ्या हात धुवून.
पण, सर, बिल्किस बानूचे .
कायरे डाव्या? तुला लैच प्यार मोहब्बत आलीय का ? धरा ह्याला.

मनातले डायलॉग का म्हणताय? मला बिल्किस बानू, हाथरस, उन्नाव सगळ्या बद्दल चीड, राग येतो. पण म्हणून बाकी कुठल्या केस मध्ये बातमी आल्याच्या पाच मिनिटांत ती १००% फेक केस आहे. पूर्वी या प्रकारच्या केसेस फेक होत्या म्हणजे ही आणि या पुढील सर्व फेकच असणार, नाशिक मध्ये हे होणे शक्य नाही या अशा लेव्हलची आर्ग्युमेंट करू का? का वर्ल्ड पीस बद्दल बोलू? ह्या केस मध्ये गप बसल्याने मणिपूर बद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी मिळणार आहेत? असेल फालतूगिरी तर असू द्या की. होईल दिशाभूल थोडी, जाईल पोलिसांचा वेळ. जाऊ दे. येतील परत लायनीवर. ग्रेटर पिक्चर मध्ये विष आणखी भिनणार असेल तर दुर्लक्ष केल्याने कमी विष जाणारे थोडीच! हे डिसमिस करणे बरे नाही.

बाकी मी एसी मध्ये बसुन टाईप करतो. मला या किंवा कुठल्याही केस मध्ये काय चीड राग वगैरे येतो तो टोटल वांझोटा आहे. मी बाकी काहीही अ‍ॅक्शन घेत नाही. तात्पुरतं काही वाटून मी रोज रात्री आनंदाने झोपतो. त्याबद्दल ना खेद ना खंत. त्यामुळे त्याबद्दल बोलायचं असेल तर गिल्टी आहे हे मान्यच आहे.
बाकी ती पोस्ट तुम्हाला उद्देशुन न्हवती.

मग नका देऊ. उगीच का त्रास करुन घ्यायचा? तसेही इथे कोण स्वतःचे मत इतरांचे वाचुन बदलतेय..>>> या केस मधे इथले इन्फ्य्युएन्शिल लोक पोलिसांना अंडरकवर ऑपरेशन करायला भाग पाडतील या आशेने दिली लिंक. कदाचित फार मोठं रॅकेट उघडकीस येईल.

मेंटल हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या आयटीपार्कच्या कोपर्‍यावर भला मोठा बॅनर लागला आहे. हिंदूंनो तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी त्रास होत असेल तर खालील क्रमांकावर संपर्क साधा या आशयाचा. असेच बोर्डस अन्य आयटी पार्क जवळ लागलेले आहेत. गोध्रा अहमदाबाद दंग्यांनतर गुजरात आणि राजस्तान मधे अनेक मुस्लिमांची दुकाने बंद झाली. त्यांच्यावर बहीष्कार झाला. खानांचे सिनेमे पाहणार नाही अशा शपथा घेतल्या गेल्या. आता आयटी मधून मुस्लिमांवर बहीष्कार घातला जाईल ही भीती आहे.

बाकि, कुणी बदलत नाही हे खरेच. आणि कुणाचं काय तत्वज्ञान आहे याची कुणालाही फिकीर नाही. तुमचं तत्वज्ञान तुमच्याजवळच ठेवा. आम्हाला नका सांगू. ते काही आयएसओ स्टँडर्ड नाही. मानसिकता उघड होते अशा प्रकरणात इतकेच. असे प्राणी स्वतःला काहीही समजत असतील तरी ते इतरांसाठी अस्तित्वातच नाहीत हे त्यांनी समजून घेतलं तर त्यांच्यासाठीच चांगलं.

ज्यांना या प्रकरणात नारी सन्मानाचं भरतं आलेलं आहे त्यांच्या नारी सन्मानाच्या व्याख्या लपून राहिलेल्या नाहीत. पण कालच्या मुंबईतल्या प्रोटेस्ट नंतर त्या पुन्हा समोर आल्या.
https://www.facebook.com/photo?fbid=3389009567921802

विकु यांनी मांडलेले अभ्यासू विचार मी नेहेमीच आतुरतेने वाचतो. Happy
काही वेळा कटू असतात. सुशांत सिंग राजपूत प्रकरणांत मोठी राळ उडविली गेली होती पण त्यांनी अगदी सुरवाती पासूनच वेगळी भुमिका घेतली होती. शेवटी CBI ने खून नसल्याचे सांगितले. समोर येत असलेल्या माहितीच्या आधारे विश्लेषण आणि अनुमान वेगळे असू शकतात.
अनेक ठिकाणी मतभेद असले तरी विचारांत दुटप्पी पणा दुरान्वयेही कुठे आढळला नाही. नवी माहिती पुढे आल्यास चूक मान्य करण्याचा मनाचा दिलदार पणा वेळोवेळी दिसला आहे.

आर्यन खान केस मधे पण अश्शीच राळ उडविली होती. केरळ फाईल्स... ३३००० सारखे फॅक्टच्या जवळही न जाणारे मोट्ठे मोट्ठे आकडे. का विश्वास राहिल लोकांचा ?

नाशिक TCS घटनेत मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेतला जात आहे. आधी आरोपी कडून आणि मग बजरंग दलाकडून. तिला न्याय मिळवून देण्याच्या निमीत्ताने या प्रकरणाचा आपला अजेंडा ( नोकर्‍यांमधून मुस्लीमांना दूर ठेवण्यासाठी - हेच वर राज ज्ञानी यांनी सांगितले आहे ) पुढे रेटण्यासाठी वापर केला गेला आहे, म्हणून सर्व यंत्रणा हलविली आहे. तथाकथित कॉर्पोरेट जिहाद लोकांच्या माथी मारायचा आहे.

आरोपीवर SC/ST Atrocity Act पण लावलेला आहे असे वाचले. हाथरस मधे, उनाव किंवा कथुआ येथे बजरंग दल पीडित युवतीच्या मदतीला आले होते? इथे कुठल्या उद्देशाने आले आहे? तथाकथित कॉर्पोरेट जिहाद लोकांच्या माथी मारता येणार नसेल तर या केसचे महत्व सत्ताधार्‍यांना नाही.

<< आज पर्यंत जे झाले नाही ते पुढील २५ वर्षात होईल असे म्हणायचे आहे?>>>>
हो. आजपर्यंत झाले नाही असे तुम्हाला वाटतेय म्हणजे १००% झाल्यावरच तुम्ही झाले असे म्हणणार. गेली १००० जे सुरु आहे त्याला यश मिळतेय, पाकिस्तान उगीच झालेला नाही. तेही या प्रयत्नांचाच एक भाग आहे.
किती भारतीय शहरांची डेमोग्राफी बदललीय, ती कशी बदललीय हे शोधा नेटवर. इथे लिहिले नाही तरी चालेल. मला व्यक्तिशः ना खेद ना खंत. >>

------- मुस्लीम धर्मियांची लोकसंख्या वाढीचा वेग पण मंदावतो आहे. भिण्याचे कारण नाही , १०० % होणे केवळ अशक्य आहे पुढच्या ५०० वर्षात.
येथे विविध प्रकारे सांगितले आहे,
https://www.pewresearch.org/religion/2021/09/21/population-growth-and-re...

१००% होण्याची गरजच कांय आहे. आणि एका देशासाठी ५०० वर्ष म्हणजे काहीच नाहीत.
केवळ ७८ वर्षांपूर्वीच आपला देशाची धर्मामुळे फळणी झालेली. त्यावेळी कुठं कोण १००% होत. मुस्लिम धर्माचा वाढीचा वेग अजूनही सगळ्यात जास्त आहे.

किती भारतीय शहरांची डेमोग्राफी बदललीय >>> १९९२ च्या दंगलीनंतर जोगेश्वरी राधाबई चाळीत राहणारी हिंदू कुटुंबं दुसरीकडे स्थलांतरीत झाली. अशीच मुस्लिम कुटुंबं देखील झाली. ती जिथे स्थलांतरित होतात तिथे त्यांचा टक्का वाढतो. मुस्लिम समाज हा नेहमीच घेटटो मधे राहतो त्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढलेली दिसणारच. 2002 नंतर गुजरात मधे देखील हे आढळले आहे. त्यात धर्मांतराचा भाग असेल हे धाडसी विधान आहे. माजी निवडणूक आयउकय कुरेशी ह्यांचा ह्या संदर्भात एक लेख वाचला होता ,त्यात त्यांनी उदय ह्यांनी म्हटल्याप्रमाणे 50% मुस्लिम लोकसंख्या होण्यासाठी अनेक शे वर्षे जातील. तेव्हा पुनर्जन्म घेतेलेले हिंदू बघून घेतील

मुस्लिम धर्माचा वाढीचा वेग अजूनही सगळ्यात जास्त आहे. >> केरळ सारख्या सुशिक्षित राज्यात तो हिंदूंच्या दरवाढी इतकंच आहे, उत्तरेला तो तिथल्या हिंदू एवढांच आहे.

मुस्लीम धर्मियांची लोकसंख्या वाढीचा वेग पण मंदावतो आहे. भिण्याचे कारण नाही , १०० % होणे केवळ अशक्य आहे पुढच्या ५०० वर्षात.
>>>
स्वतःच्या पंथाचा बचाव करण्यासाठी फेकाफेकी करण्याआधी, द्यायच्या त्या लिमका तरी किमान तपासून पाहायच्या !

हेडिंग मध्ये आहे की, हिंदू-मुस्लिम लोकसंख्या प्रमाण हे बदलेले नाही. पण खालच्या तपशिलात मात्र हिंदूंच्या व मुस्लिमांच्या तुलनात्मक लोकसंख्येत जवळजवळ दहा टक्क्यांचा फरक पडला आहे.

India’s religious composition largely stable since Partition

In percentage terms, India’s six largest religious groups have remained relatively stable since Partition. The greatest shift has been a modest rise in the share of Muslims, accompanied by a corresponding decline in the share of Hindus. Between 1951 and 2011, Muslims grew by 4.4 percentage points to 14.2% of the population, while Hindus declined by 4.3 points to 79.8%

इथे पहा, पिऊ च्या अहवालाचे विश्लेषण

https://www.opindia.com/2025/06/population-of-muslims-growing-the-fastes...

पिऊ रिसर्च चा हिंदू विरोधी असण्याचा इतिहास आहे. त्यांच्या टायर केलेल्या भाकडकथांवर कुणी शहाणा विश्वास ठेवणार नाही.

https://timesofindia.indiatimes.com/blogs/blunt-frank/understanding-pew-...

या प्रकरणात निरंजन टकले यांनी असा दावा केला आहे कि त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आहे. त्यानंतर त्यांनी हा रिपोर्ट बनवला आहे.
https://www.youtube.com/live/ptf6VKLf6r4?si=znibM3TLlIjPW3wA

काही भाग अतिरंजित असला तरी पहिल्या दिवसापासून जे जाणवले ते यात आले आहे. नंतर निवांत लिहीन.

Chatgpt नुसार केरळ मध्ये
2001 ते 2011
Hindus: 2.2% growth
Muslims: 12.8% growth
This shows Muslim population grew much faster than Hindu population in that decade.
2. Long-term trend (1901–2011)
Hindu share: 69% →55% (declining)
Muslim share: 17% → 26–27% (increasing)

आमच्या कॉलेजची सहल गणपतीपुळ्याला गेलेली, तिथं काही ब्राह्मण अभिषेक करून घेत होते. पुजाऱ्याने सांगितलेली दक्षिणा ऐकून आमच्या आणि आमच्या ज्युनियर वर्गातल्या 300 मुलामुलींपैकी एकमेव मुलाने अभिषेक केला.. हाजी दानिश खान नावाचा माझा वर्गमित्र.. हाजी गोत्रस्य म्हणून बामनाने पण पूजा घातली

बामनाने पण पूजा घातली

>>>

पूजा करविणारा हाजी, करणारा बामन; तुला कशाला रे आगाऊ चौकश्या, धसकट्या?

>>
नक्षत्रकुमार, ते आधीच्या जातीत गेले. काहीही बरळू नका.
नीट वाचा, जमल्यास एका अवयवाला ताण द्या मग प्रतिवाद करा.
<<
ठीक. नेताजी आणि निंबाळकर यांना आधीच्या जातीत घेतले.
पण मग स्वामी श्रद्धानंदांनी चालवलेल्या धर्मांतराबद्दल काय? त्यांना मुस्लिमांना हिंदू बनवताना कुठली जात असा प्रश्न पडला नाही. त्या धर्मांतरित व्यक्तीला आर्य समाजी बनवले. कुठल्या अवयवाला ताण देऊन त्याबद्द्ल स्पष्टीकरण द्याल?

आर्य समाजी ! Lol
तुम्ही पण व्हा कि आर्य समाजी.

Pages