TCS नाशिक

Submitted by रेव्यु on 12 April, 2026 - 00:28

मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सैल भाषा वापरल्याने वाद होतो. पण कुणा प्रकाशकाच्या कुटुंबातील स्त्रियांबद्दल सत्ताधारी युतीच्या आमदाराने काहीही भाषा वापरली तरी काहीही होत नाही. हेच ते नारीशक्तीवंदन.

भरत,

मी तरी त्या गोष्टीचे अजिबात समर्थन करत नाही.

(बाकी तो महाराष्ट्रातील राजकारण धाग्यावरील विषय म्हणायला हवा)

समर्थन करत नाही आणि निषेध करतो यांत एक स्पष्ट अंतर असतं.
>>>
मायबोलीवर कधी भरत. यांच्याशी सहमत होण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं.

हिंदूंवर अहिंदुंकडून हिंदू म्हणून झालेल्या अन्यायाचा तुम्ही कधीतरी निषेध केला आहे का?
कधीही नाही.

यावरून तुमचे पूर्वीचे By Default आठवले. मात्र, संजय गायकवाड हा विषय कुठे निघालेला (मला) दिसला नाही म्हणून मी निषेध केला नाही.

'युतीच्या आमदाराने काहीही भाषा वापरली तरी काहीही होत नाही' हे वाक्य एकतर या धाग्याशी निगडित नव्हते. त्यात ते वाचल्या वाचल्या निषेध करावा हेही धाग्याशी विसंगत झाले असते. वर महाराजांबद्दल एक विधान आलेले पाहून व सध्या येथील परिस्थिती माहीत असल्याने मी फक्त सावध करायला म्हणून माझा तो प्रतिसाद दिला.

बाकी, मीही अश्या गोष्टींचा by default निषेधच करतो.

असो, TCS वर चर्चा करुदेत सगळ्यांना!

अवांतराला अवांतराने शह द्यावा यासाठी.
आज वसंत व्याख्यानमालेत राज ठाकरे यांचे व्याख्यान झाले. श्रोते, आयोजक आणि वक्ते सर्वांनाच घाम फुटला होता.

<युतीच्या आमदाराने काहीही भाषा वापरली तरी काहीही होत नाही' हे वाक्य एकतर या धाग्याशी निगडित नव्हते. - छत्रपती शिवाजी महाराजांवरून जे चाललंय ते तरी या धाग्याशी कुठे निगडीत आहे?

या तो घोडा बोलो या चतुर.

आणि महाराष्ट्रातले राजकारण असा धागा आहे की. तिथे सत्ताधारी गटाच्या आमदाराचा स्वतःहून निषेध करायची सुवर्णसंधी तुम्हांला होती. की तसं केलं तर भाजपवाले पक्षातून किंवा पाठिराख्यांमधून काढून टाकतात?

हम छोडेगा नई जी.

असो.

माबो , तुम्ही तर हिंदुत्ववाद्यांकडून हिंदू व्यतिरिक्त अन्य कोणावर झालेल्या अन्यायाचं समर्थन करत असाल. बरोबर ना ?

निषेध आणि समर्थनातला असाही एक फरक.

मी पूर्वी लिहिलेलं इथे त्यात भर घालून लिहितो.

आरोपी मुस्लिम पुरुष - पीडित हिंदू स्त्री - अत्याचार.

आरोपी हिंदू पुरुष - पीडित हिंदू स्त्री - आपस का मामला

आरोपी दलित पुरुष - पीडित सवर्ण हिंदू स्त्री - अत्याचार

आरोपी सवर्ण हिंदू पुरुष - पीडित दलित स्त्री - तिचा उद्धार झाला

आरोपी हिंदू पुरुष - पीडित मुस्लिम स्त्री - हिंदू पुरुषाचा सत्कार करावा.

आरोपी मुस्लिम पुरुष - पीडित हिंदू स्त्री >> हे विकुंच्या मते धादांत खोटे आरोप. ते ही डे-झिरोलाच हो!
कारण? पूर्वी असे झाले आहे, आणि नेहेमी असेच होते, आणि त्यामुळे आता तरी वेगळं काय होणार, आणि नाशिक मध्ये ५० वर्षांपूर्वी ते राहिलेले आहेत तेव्हा नाशिकमध्ये काही लपवणे अशक्यच होते, आणि... !

बाकी दर दोन दिवशी काहीही नवी माहिती नसताना, नवं घडलेलं नसताना मीच कसा बरोबर होतो, मीच जिंकलो हे जगाला जाहिर सांगायची त्यांची उर्मी बघुन राहुन राहुन मला टाकोची आठवण होते आहे. बाकी कोणाला होते आहे का?

फक्त तेवढंच नाही. त्या आरोप मालिकेची सुरुवात कशी झाली हे महत्त्वाचं नाही का? एक हिंदू स्त्री रोजे ठेवते म्हणून एका पक्षाचा कार्यकर्ता पोलिसांत जातो आणि त्यातून पुढच्या साखळ्या येतात.

>>> छत्रपती शिवाजी महाराजांवरून जे चाललंय ते तरी या धाग्याशी कुठे निगडीत आहे?

अहो तुम्ही धागा कुठे नेताय? स्वाती आंबोळे यांनी तो विषय काढला म्हणून मी येथली त्या विषयावरील सद्य स्थिती फक्त लिहिली.

>>> तिथे सत्ताधारी गटाच्या आमदाराचा स्वतःहून निषेध करायची सुवर्णसंधी तुम्हांला होती. की तसं केलं तर भाजपवाले पक्षातून किंवा पाठिराख्यांमधून काढून टाकतात?

मी त्या पक्षात नाही. तुम्ही हा विषय TCS या धाग्यावर का लांबवत आहात? आणि 'निषेध करण्याची सुवर्णसंधी'? एक तर तो धागा मी इतक्यात वाचलेला नसल्याने तिथे हा विषय निघाला की नाही हे माहीत नाही. निघाला नसला तरी निषेध करणे हे कर्तव्य आहे हा मायबोली संकेतस्थळाचा नियम असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे, तुम्ही येथे अनेकांना संधी वगैरे देऊ करता हा भ्रम पटकन घालवा. एखाद्या महत्वाच्या विषयावर विषयांतर करायचे म्हणजे तरी किती करायचे? आता तुमच्या प्रतिसादांसोबत इतरांचेही प्रतिसाद delete होतील आणि तुमचे शाब्दिक पराक्रम विसमरणात जातील.

चर्चा TCS वर सुरू राहो ही माझी तुम्हाला परत विनंती!

अर्थात महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं कुभांडही असेल. काय असेल ते कळेलच, किंवा दाबलं जाऊन काही कळणारही नाही.
साखळीची सुरुवात कशी झाली ते तपासात हळूहळू बाहेर आलं. ते डे झिरोला मला तरी कुठे बातम्यांत दिसलं न्हवतं. त्यांना ही कळलेलं इथे तरी मी वाचलेलं नाही. मग केवळ धर्म असे आहेत म्हणून पूर्वग्रहदूषित नजरेने कॉजल कोरिलेशन काढण्याला काय म्हणायचं?
ते चूक ठरले का बरोबर हा प्रश्नच नाही.

अमितव +१
पहलगाम हल्ल्यातही जिथे माबोकराचे नातेवाइकच बाधित झाले तिथेही असच...१०० डेजच्या माधुरी दिक्षितची आठवण झाली त्यात तिला पुढे काय होणार हे आधीच स्वप्नात दिसत होत. smiley2.gif

TCS चा पुढचा सीझन तृंणमूल काँग्रेस सत्ते (त/ तून बाहेर) येण्याची वेळ झाली.
जुने सोडून द्यावे आता.

एक हिंदू स्त्री मुस्लिम माणसाच्या प्रेमात पडली, तिने प्रेमविवाह केला आणी काही महिन्यांनी त्याने तिचा खून केला, किंवा एका मुस्लिम माणसाने आपल्या हिंदू प्रेयसीचा खून केला, अशा अनेक घटना/ बातम्या आलेल्या आहेत. यापैकी एकाही प्रकरणात मी डे वन किंवा डे १०० ला काहीही शंका घेतलेली नाही.

भरत +१ ,

आय स्टँड करेक्टेड! खून करणे ही लाईन आहे. लक्षात ठेवेन.
बाकी जेनेटल मध्ये बोट घालणे पण न्युयॉर्कच्या लॉ प्रमाणे जेनेटल मध्ये पीनस न गेल्याने त्याला बलात्कार म्हणू नका, मग भले ८२ मिलियन नुकसान भरपाई का द्यायला लागली असेना, याचा ह्या धाग्यावरही संबंध नसताना विषय आणून टाकोला बलात्कारी म्हणणे हे कसं चूक आहे हे बाणेदारपणे बादरायण ही कारण नसताना सांगणे! चालू द्या! आपण फिफ्थ अ‍ॅव्हेन्यूला खून झाला की बोलू!!!
मुलींनो, सेक्श्युअल अब्युज वगैरे केस करायला जाऊ नका. नंतर लग्ने व्हायची बोंब, आणि ते सिद्ध करणे महत्कर्म कठिण! गप रहा की झालं! पुरुषांना तेच हवं आहे!

पहिल्याच दिवशी इतक्या सगळ्या आरोपांची भेळ केलेली दिसली.
नुकताच केरला फाइल्स २ च्या प्रोमोत वापरलेला जबरदस्तीने बीफ खायला लावण्याचा प्रकारही आरोपांत आला.

इथे धुरंधरमध्ये दाखवलेलं भारताचा अर्थमंत्री पाकिस्तानला मिळालाय हे खरं वाटणारे / वाटून घेणारे लोक आहेत. त्यापुढे हे काहीच नाही म्हणा.

मी मधले बरेच प्रतिसाद वाचलेले नाहीत आणि एपस्टीन फाइलबाबत विकुंशी असहमत आहे , हे लिहिलं होतं. त्यामुळे माझा विकुंना फक्त काहीच मुद्द्यावरून पाठिंबा Wink

बरं. कोणीतरी सुशांतसिंग राजपूतचा धागा शोधून द्या.

तुमची काळजी पोचली, बेफी. यापुढे लिहिण्यापूर्वी दहादा विचार करेन. धन्यवाद. Happy

भरत, 'छोडेगा नई' म्हटल्यावर पुढे 'असो' म्हणून कसं चालेल?! हे तात्याच्या इराण स्ट्रॅटेजीसारखं झालं की! Lol

हाँ, तर टीसीएस. काय झालं मग पुढे?

बाकी जेनेटल मध्ये बोट घालणे पण न्युयॉर्कच्या लॉ प्रमाणे जेनेटल मध्ये पीनस न गेल्याने त्याला बलात्कार म्हणू नका >>> तळमळ पोहोचली .

कायद्याच्या दृष्टीने आरोपीला जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषी मानले जात नाही. टीसीएस प्रकरणात गुन्हा सिद्ध झाला का?
सामान्य माणसांचे ठीक आहे. त्याला भावनांना आवर घालता येत नाही. कुठेतरी "आपल्या" माणसांवर अन्याय झाला तरी न्याय मिळणार कि नाही ही चिंता असते. ही चिंता तेव्हां असते जेव्हां तो हतबल असतो. जेव्हां न्याय देणारे, तपास करणारे, मीडीया वाले यात त्याचे कुणीही नसते. खून होऊनही पोलीस गुन्हा नोंदवून घेत नाहीत अशा वेळी मोर्चा काढून कायद्याची प्रोसेस तरी चालू करा म्हणून सांगावे लागते.

इथे पोलीस, न्याययंत्रणा, सरकार, मीडीया ज्यांच्या बाजूने आहे ते भावनिक झालेत. त्यातही जे लोक भावनिक प्रतिक्रिया देत नाहीत असा लौकीक बाळगून आहेत ते भावनिक झालेले आहेत. जे लोक देवयानी खोब्रागडेच्या प्रकरणात व्हिक्टीमचे तटस्थ बुद्धीने अ‍ॅनालिसीस करू शकत होते ते इथे भावनिक झाले आहेत.

कायद्याची यंत्रणा आणि सर्वच यंत्रणा ताब्यात असताना एव्हढा गाजावाजा का करावासा वाटला? कि आपलेच सरकार न्याय देऊ शकणार नाही ही भीती आहे?

ज्यांच्यावर आरोप आहे त्यांची बाजू का समजून घ्यायची हे आधी सांगितलेले आहे, त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून पुन्हा सांगण्यात अर्थ नाही. इथेच नाही तर पुन्हा असे प्रकरण समोर येईल तेव्हांही नाही. नाही तर अ‍ॅडमिन फेक प्रोफाईल्सने गरळ ओकतील. ती अशी ओकतील कि उत्तर दिले नाही तर गैरसमज होतील. दिले तर आयडी उडवायला निमित्त मिळेल. फारच वाटले तर दोन्ही आयडी उडवतील ज्यातला एखादा आयडी कुणीतरी अप्लाय केलेला पण अ‍ॅप्रूव्ह केलेला नसेल, जो परस्पर वापरायला सुरूवात केली असेल.

मी इथे आल्यापासून माझ्या नावाची तोडमोड करून साधा माणूस, स्पार्कल, माबो आणि अन्य अशा आयड्यांनी अशा पद्धतीने चिखलफेक केली. याकडे दुर्लक्ष करत राहिलो, पण अशी वेळ आली कि उत्तर द्यावे लागले. हे शेवटचे. इथून पुढे या आयड्यांनी चिखलफेक केली तरी उत्तर द्यायची वेळ येणार नाही म्हणून शेवटचे लिहीत आहे.

एखादी बाजू आपल्याला आवडत नाही म्हणून आयडी उडवण्याचा छंद अजब आहे. अर्थात ही काही माझ्या मालकीची वेबसाईट नाही. पण इथला मजकूर भारतामधे पब्लीक डोमेन मधे आहे. तुम्हाला जर तुमच्या कलानेच सर्वांनी व्यक्त व्हावं असं वाटत असेल तर फक्त निमंत्रितांसाठी असं स्वरूप ठेवावं. त्यावर अशा विषयांवर चर्चा करताना ते फक्त एक सारख्या विचाराच्या लोकांनाच दिसावं अशी सेटींग करावी. पब्लीक डोमेनमधे नाही हे नको का पाळायला?

आणि फेक प्रोफाईलने चिखलफेक करायची तर नियम सर्वांना सारखे असावेत. नाही का? पब्लीक डोमेनचे कायदे आपण आधी पाळूयात.

> आय स्टँड करेक्टेड! खून करणे ही लाईन आहे. लक्षात ठेवेन.

हा माझ्या विधानाचा विपर्यास आहे. हे explain करावे लागणे दुर्दैवी आहे, पण 'मी खुनी लोकांचा निषेध करतो' यावर ' अरे वा! याचा अर्थ बलात्कारी लोकांना तुमचा पाठिंबा आहे तर !' असे उत्तर असू नये. खून , बलात्कार, पाकिटमारी, विनयभंग, चोरी, अशा अनेक गुन्ह्यात अनेक मुस्लिम पकडले जातात. त्यातल्या कशावरही डे वन ला मी शंका घेत नाही. एम जे अकबर यांच्यावर metoo आरोपांबद्दल ही मी शंका घेतली नव्हती.

> सेक्श्युअल अब्युज वगैरे केस करायला जाऊ नका. नंतर लग्ने व्हायची बोंब,
हा सुद्धा विपर्यास आहे. अशा प्रकरणात त्रयस्थ व्यक्तीने कोणतीही शहानिशा झालेली नसताना 'सात मुली आयुष्यातून उठल्या' वगैरे सेन्सेशनल वाक्ये बोलू नयेत. इथे तर एक सोडून इतर कुणी बलात्काराचा उल्लेख एफ आय आर मध्येही केलेला नाहीये. 'आयुष्यातून उठल्या' हे खरे तर बलात्कार पीडीतांबद्दलही लिहायला माझा आक्षेप आहे, But that is another conversation.

या प्रकरणाची सुरुवातीला आलेली टाईमलाईन बहुतेक लोकांना आक्षेपार्ह वाटू नये हेही नवलाचे होते. हिंदु सज्ञान मुलीने रोजे पाळणे हे आपल्याला कितीही अप्रिय किंवा हास्यास्पद वाटले तरीही त्यात क्रिमिनल काय आहे ? भादंवि च्या कोणत्या कलमाखाली तो गुन्हा आहे ? बरं त्या मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली व पोलिसांनी चौकशी केली तर ते निदान समजण्यासारखे आहे. एक 'हिंदुत्ववादी' कार्यकर्ता पोलिसांना बातमी देतो आणी पोलिस एकदम धुरंधर मोड मध्ये जातात हे खरेच आक्षेपार्ह होते. त्याचा locus standi काय आहे? अफगणिस्तान / सौदी मध्ये महिलांनी नीट बुरखे घातले आहे ना हे तपासणारे पोलिस असतात तसे आपल्याला अपेक्षित आहे का? हे प्रकरण वाचताच भीमा कोरेगाव मध्ये पोलिसांनी एका खाजगी राजकिय व्यक्तीच्या तक्रारीवरून दाखल केलेला गुन्हा आणी लावलेली UAPA सारखी भयंकर कलमे आठवली व मी skeptic झालो. हे कोलित गोदी मेडिया व यू ट्यूब चॅनेल वाल्यांना मिळाले तर काय होईल याचा मला भीती होतीच व ती खरी ठरली.

एकदा एका वाघाने गाढवाला गवतात लोळण्यावरून टोकले. गाढव म्हणाले कि "या सुंदर निळ्याशार गवतात कुणाला लोळावेसे वाटणार नाही?"
यावर वाघ म्हणाला कि हे गवत हिरवे आहे एव्हढे समजत नाही का? गाढव म्हणाले कि तू वेडा आहेस गवत निळेच आहे.
वादात गाढव वाघाला शिव्या देऊ लागले. त्याचा पाण उतारा करू लागले. त्याच्यावर वेगवेगळे आरोप करू लागले. मनात आले असते तर वाघ गाढवाचा चट्टामट्टा करू शकत होता. पण त्याला गाढवाला शिकवायचेच होते कि गवत हिरवेच आहे. तो म्हणाला "आपण राजाकदे जाऊ"
गाढव म्हणाले "का आता घाबरलास का? आता रडगाणे याऊ लागलास तू. तू माकड आहेस, डुक्कर आहेस" वाघाचा संबंध ते अशा प्राण्यांशी जोडू लागले.

शेवटी दोघे वनराज सिंहाकडे गेले. सिंहाने सांगितले कि गाढवाला सोडून द्या आणि वाघाला शंभर फटके मारा.

वाघ नाराज झाला. तो म्हणाला "गवत हिरवे आहे हे तुम्हालाही माहीत आहे. तरी मला का शिक्षा दिलीत?"
सिंह म्हणाला, "तुला माहीत आहे कि गवत हिरवे आहे, मला माहीत आहे गवत हिरवे आहे. तुला गवत हिरवे किंवा निळे असण्यासाठी शिक्षा दिलेली नाही. तू गाढवाशी वाद घातलास याबद्दल तुला शिक्षा दिली आहे"

सिंहाने थोडक्यात अशा गाढवांना इग्नोर करायला सांगितले खरे. पण नंतर सिंह वार्धक्याने मरण पावला.
मग गाढव जंगलाचे सर्वेसर्वा झाले. त्याने सर्वांना गाढव बनवले. मग गाढव म्हणेल तेच कायदे बनू लागले. वाघाने शक्यतो दुर्लक्षच केले.

पण या गाढवांकडे आता दुर्लक्ष करायची वेळ निघून गेलीय हे ओळखून त्याने आता एका एका गाढवाचा चट्टामट्टा करायला सुरूवात केली. त्याने वादही घातला नाही आणि गाढवांना जी भाषा समजते तीच वापरायला सुरूवात केली.

शा रितीने साध्या गाढवातला वादविवादाचा स्पार्क ते सर्वेसर्वा होताच त्याचा वाघाने संपवला.
जंगलकथा.
गाढवाचे वंशजाचार्य यावर गदर्भराग आळवतील तिकडे दुर्लक्ष करूयात.

विकु, हे असं सगळं असेल तर पुढच्या वेळी शब्द सांभाळुन वापरा.
कारण नसताना इ-जेन-कॅरोल हा बलात्कार कसा नाही हे जिकडे तिकडे सांगू नका की टोमणे ऐकायला लागल्याबद्दल अश्रु गाळावे लागतील.

इतक्या एपस्टीन फाईल्स, फोटो, कित्येक विनयभंगाच्या केसेस, कित्येक व्हिक्टिमनी अंडरओथ सांगुनही त्यावर डिओजेनी काहीही कारवाई न करणे, कंसेंट वयाच्या आतील व्यक्तीशी संबंध ठेवणे, त्यांचा विनयभंग करणे असे उल्लेख सापडणे पण ते सगळं कार्पेट खाली टाकुन देणे.. वर यावर बोलू ही नका कारण अजुन टेक्निकली बलात्कार/ पिडोफाईल चा शिक्का बसलेला नाही.
वि.
पूर्वी मुस्लिम व्यक्तींच्या केस मध्ये काही राम न्हवता म्हणजे ही केसही काहीही तपास न करता फेकच... नुसती फेक नाही १००% फेकच असणार हे पहिल्याच दिवशी छातीठोक सांगणे.

इतका विरोधाभास कसा जमतो?

Pages