TCS नाशिक

Submitted by रेव्यु on 12 April, 2026 - 00:28

मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपस का मामला , आमची महान पॅट्रिअ‍ॅर्की.

>>>

या लेखाच्या पहिल्या पानावर मी लिहिले होते -
-
मायबोलीवर काही जण हिंदूसदृश्य नावाचे एडी घेऊन असे काही लिहीत असतात. त्याला अल-टकीया म्हणतात .म्हणजे नॉन बिलिव्हर्स च्या मनात संभ्रम उत्पन्न होईल असी विधाने करणे.
-
पण काही वेळा चुकून हे आयडी आपली खरी ओळख नकळतपणे दाखवून देतात. यांच्या दीन मध्ये अतिशय निर्दयी पॅट्रिअ‍ॅर्की असते तरीही ती महान आहे असे हे म्हणतात. शिवाय तो आपस का मामला आहे असेही म्हणतात. अर्थात त्यांच्यात हे सगळं वैधच आहे म्हणा!

अरे वा माबो! बर्‍याच दिवसांनी आलात. कसे आहात?
तुमचं हेच वाक्य मी फारेण्ड यांच्या मुद्देवंचितांसाठीच्या लेखावर चिकटवलं आहे.

वाचलं असेलच तुम्ही.

तुम्हांला दिलेलं माबो गटगचं आमंत्रण अजूनही कायम आहे बरं का.

१५०० पानांची चार्जशीट फाइल केल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसला होती.
हो, त्यात SC ST Act चीही कलमे लावली आहेत. वास्तविक मूळ केस भक्कम असती तर ती लावायची गरज नव्हती.
ही कलमे 'गाजराची पुंगी' उक्तीप्रमाणे लावण्यात आलेली दिसतात , बेल मिळणे अवघड व्हावे म्हणून.

एखाद्या घरात सुनेचा हुंड्यासाठी छळ होतो आहे, असे एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला कळले आणि त्याने पोलिसात तक्रार केली असे झाले आहे का?

एखाद्या मुस्लिम शाळकरी मुलीने आपल्या खोलीत गणपतीचा फोटो लावला व रोज अभ्यासाला बसताना नमस्कार करायला सुरुवात केली, शेजारच्या MIM कार्यकर्त्याने ही बातमी पोलिसांना दिली तर पोलिसांनी काय करावे असे आपल्याला वाटते ? 'मै हूं ना' मधल्या शहरुख प्रमाणे शिंगे मोडून गुप्त वेषात शाळेत प्रवेश घ्यावा ?

एखाद्या घरात सुनेचा हुंड्यासाठी छळ होतो आहे, असे एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला कळले आणि त्याने पोलिसात तक्रार केली असे झाले आहे का?
>>>
माहित नाही, पण एका वृद्ध स्त्रीला नवऱ्याने तलाक देऊन घराबाहेर काढल्यानंतर तिला न्याय देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकालच बदलून टाकणारा कायदा मात्र एका राजकीय पक्षाच्या नेत्याने केला असे झाले आहे.

एखाद्या मुस्लिम शाळकरी मुलीने आपल्या खोलीत गणपतीचा फोटो लावला व रोज अभ्यासाला बसताना नमस्कार करायला सुरुवात केली, शेजारच्या MIM कार्यकर्त्याने ही बातमी पोलिसांना दिली तर पोलिसांनी काय करावे असे आपल्याला वाटते ?
>>>
"एखाद्या मुस्लिम शाळकरी मुलीने आपल्या खोलीत गणपतीचा फोटो लावला व रोज अभ्यासाला बसताना नमस्कार करायला सुरुवात केली" यामध्ये शेजारच्या MIM कार्यकर्त्याने ही "बातमी" पोलिसांना देण्यासारखे काय आहे?

कितीही वर्षे रोमात राहून परत आलो तरी मराठी आंतरजालीय विश्व अन् खासकरून त्यावरच्या ताज्या घडामोडी आणि राजकीय मतप्रदर्शक धाग्यांची क्वालिटी अजिबात उतरलेली जाणवत नाही, एकवेळ हौसेने खास देवगडावरून आणलेली हापूसची पेटी बाद निघेल पण मराठी आंतरजाल ? No compromise on quality. तरीही मी ह्या धाग्यांचा फॅन आहे कारण

"आंतरजालावर चर्चा करून लोक आपली मते बदलतील" हा माझा एकेकाळचा गोड बाळबोध गैरसमज ह्या परमप्रतापी युद्धभूमी धाग्यांनी कायमचा दूर केला आहे.

:))

>>>परमप्रतापी युद्धभूमी
>>>>>राजकीय मतप्रदर्शक धाग्यांची क्वालिटी अजिबात उतरलेली जाणवत नाही,
जेम्स वांड Lol

हा राजकीय मतप्रदर्शक धागा नाही (किंवा नसावा). राजकीय धाग्यावर 'आमचा पक्ष श्रेष्ठ की तुमचा', 'आमचा नेता श्रेष्ठ की तुमचा' अशा प्रकारचे वाद होत असतात आणी कालांतराने धुळवड होते.
इथे मात्र कोणत्याही दोन पक्षांमध्ये वाद चाललेला नाही.
बाकी पाकिस्तान आणी आपण यात आणखी एक साम्य आहे. तिकडे 'कुणीतरी इशनिंदा केली' अशी हूल उठली की सगळे मिळतील ती हत्यारे घेऊन जमा होतात, इथे ' अमक्या ठिकाणी लव्ह जिहाद झाला' अशी हूल उठली की नेहेमीचे यशस्वी कलाकार दांडपट्टा घेऊन येतात.

आता पुणे विप्रोम ध्येही अशीच केस झाली आहे.
Pune, Maharashtra: On a recent 'love jihad' case involving a Wipro employee, former BJP Rajya Sabha MP Amar Shankar Sable says, "Our Hindu sister had filed a complaint regarding 'love jihad' with the Wipro administration, but it was ignored. In this country, Hindus, Muslims, Christians, and people of all religions can live together peacefully, but if anyone tries to tarnish Hindu culture through such acts, they will not be spared. The 'bulldozer culture' that Uttar Pradesh CM Yogi Adityanath has brought there needs to be replicated in Maharashtra as well..."
https://x.com/ians_india/status/2062148407997890688

Wipro fires a female Hindu employee for refusing to convert
https://sanatanprabhat.org/english/174400.html

ह्या सनसनाटी प्रकरणांचा शेवट तितक्याच सनसनाटी निष्कर्षांसह होतो का हे बघणे गरजेचे आहे.
सुशांत सिंह राजपूत चे प्रकरण इतके गाजले. काही भोळे (सांसदीय शब्दप्रयोग) लोक विभोर आनंद सारख्या थापाड्यांच्या (पुन्हा, सांसदीय शब्दप्रयोग) नादाला लागले. शेवट काय तर फुस्स.

मला हा धागा खूप आवडतो. या धाग्यावर मला हिंदूसदृश्य नावाचे एडी घेऊन लिहिणारा हा किताब मिळाला आहे. विकुंना सुद्धा हा किताब अजून मिळालेला नाही. विकु, तुम्हांला टुक टुक.

या किताबाबद्दल माझ्यावतीने कोणी आभारप्रदर्शक प्रतिसाद लिहिला तर मी त्या प्रतिसादाला मायबोलीवरचा सर्वोत्कृष्ट प्रतिसाद असा किताब देईन.

मला तरी वाटला बुवा राजकीय मतप्रेरित धागा, तुमच्या न वाटण्याला माझा कवडीचा आक्षेप नाही, माझ्या वाटण्याला तुमचाही नसावा अशी एक लोकशाहीवादी माफक छोटीशी अपेक्षा.

माझा कशाला आक्षेप असेल ? We are all entitled to our opinions.
लव्ह जिहाद हुडकत बसत नाही, पण फीड वर आले तर नक्की वाचतो, निदान एक तरी खरा असेल !

पियू या बातमीबद्दल धन्यवाद. काही प्रतिसाद ओलांडून जात असल्याने का काय माहीत नाही पण मी ही लिंक मिस केलेली Happy

विप्रो मधली बातमी अर्थातच फेक आहे (आता नेहेमीचे यशस्वी कलाकार येऊन टोमणे मारतील Happy )

मी या phenomenon ला 'केरला स्टोरी इफेक्ट' असे नाव देइन. केरला स्टोरी सारखे प्रोपॅगंडा पट आणी कायप्पा वर येणारा कचरा याचा परिणाम मोदी भक्त नसलेल्या उच्चवर्णीयांवरही झाला आहे व ते या विषयात नीरक्षीर विवेक गमावून बसले आहेत. बातमी कितिही far fetched, implausible असो, खरीच वाटते. मोदीभक्तांची तर गोष्टच वेगळी, ते प्रत्येक वेळी 'निदान या वेळी तरी खरा लव्ह जिहाद असू दे' म्हणून नवस बोलतात.

एका मुस्लिम जिम ट्रेनर ने म्हणे विवाहित महिलेवर सात वर्षे आब्यूज केला. सात वर्षांनी लक्षात आलं की अरे हा तर लव्ह जिहाद ! मग पोलिसात तक्रार वगैरे. सात वर्षाचे रेकॉर्ड कुणी तोडेल असे वाटले नव्हते पण एका महिलेला आपला पती मुस्लिम आहे हे तब्बल २० वर्षानी कळले , दरम्यान मुलगी कॉलेजलाही जाऊ लागली होती.

वरच्या इन्स्टा व्हिडिओ वर अनेक कॉमेंट्स स्केप्टिकल आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट !
Pro tip : read hidden comments

उत्तर प्रदेश - शामली - इथे एका हिंदू तरुणाला प्रेमात पाडून मुस्लिम केलं.
शामली: युवक का धर्मांतरण कराने के आरोप में दो गिरफ्तार, पाकिस्तान से जुड़ा कनेक्शन!
https://www.etvbharat.com/hi/state/two-people-arrested-in-shamli-for-con...

जनपद शामली में मेडिकल व्यवसाई देवराज मलिक का बेटा आयुष मलिक "कुरैशी जिम प्लस" में जाता था। यहां जिम ट्रेनर चांदनी थी। आरोप है कि चांदनी ने आयुष को प्रेम जाल में फंसाया और 4 साल पहले निकाह कर लिया। इसका पता अब चला, जब आयुष का लुक पूरी तरह बदल गया। वह नमाज पढ़ने मस्जिद जाने लगा। आयुष अब इस्लामिक टोपी लगाता है, कुर्ता–पायजामा पहनता है, दाढ़ी बढ़ा ली है।पुलिस ने चांदनी कुरैशी और उसके पिता को गिरफ्तार कर लिया है। निकाह करवाने वालों की तलाश जारी है।
https://x.com/Sachingupta/status/2063566599983181871

हे खालच पण वाचा, फेसबुक वरचा लेख आहे. News मध्ये पण ही केस आली होती. इथे देतोय कारण अशा बातम्या नेमक्या बघितल्या जात नाहीत.

गोरक्षक आणि विश्व हिंदू परिषदेचा नेता मेरठचा नकुल गुर्जर...
एका गँग रेपच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. मे २०२६ च्या सुमारास जामिनावर बाहेर आला...
नकुलने एका गरीब हिंदू मुलीला गाठून तिला पैसा आणि चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले...

आणि जिशान व शावेज नावाच्या दोन मुस्लिम तरुणांना लव जिहाद प्रकरणात अडकवण्याचा प्लॅन बनवला...

नकुलच्या सांगण्यावरून ती मुलगी जिशान आणि शावेज यांच्या संपर्कात आली...
ठरलेल्या योजनेनुसार, ३० मे २०२६ रोजी ती मुलगी दोन्ही तरुणांसोबत कारमध्ये बसली. कार मेरठच्या रिंग रोडवर पोहोचताच, नकुल गुर्जरने स्वतः पोलिसांच्या 'डायल ११२' हेल्पलाइनवर फोन केला आणि पोलिसांना सांगितले की, दोन मुस्लिम तरुणांनी एका हिंदू मुलीचे अपहरण केले असून तिला बेशुद्धावस्थेत गाडीतून घेऊन जात आहेत...

माहिती मिळताच पोलीस पथक वेगाने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रस्त्यावर गाडी थांबवून बेशुद्ध अवस्थेत असल्याचे नाटक करत असलेल्या त्या मुलीला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आणि कारमधील दोन्ही मुस्लीम तरुणांना तत्काळ अटक केली...

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ३१ मे रोजी या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाले.

उपचारानंतर शुद्धीवर आलेल्या (खरंतर सगळं नाटकच) मुलीची पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली, तेव्हा ती घाबरली आणि संपूर्ण खरं खरं पोलिसांसमोर सांगून टाकलं. तिने कबूल केले की तिचे कोणतेही अपहरण झाले नव्हते, तर नकुल गुर्जरनेच नोकरीचे आमिष दाखवून तिला या गाडीत बसवले होते...

पोलिसांनी जेव्हा परिसरातील ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा नकुलचा हा कट पूर्णपणे उघड झाला...
नकुलचा मुख्य उद्देश या तरुणांवर 'लव्ह जिहाद' आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी उकळणे हा होता...

१ जून २०२६ पर्यंत पोलिसांनी दोन्ही निरपराध मुस्लीम तरुणांची सन्मानपूर्वक सुटका केली आणि मुख्य आरोपी नकुल गुर्जर व त्याचा साथीदार अंकित सैनी यांच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा (FIR) दाखल केला...

आपला कट उघडकीस आल्याचे समजताच नकुल गुर्जर परिसरातून फरार झाला. सध्या मेरठ पोलिस नकूल चा शोध घेत आहेत.

हे एकच नाही असे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत... नाशिकचे TCS पण असेच फेक प्रकरण आहे हे एक दिवस सिध्द होईलच...

बजरंग दल, विश्व हिंदू परिषद म्हणजे गुन्हेगारांना गायगुंड आणि रामगुंड बनवून खुलेआम गुन्हे करून घेऊन त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी बनवलेल्या RSS आणि BJP प्रणित संघटना...

अपवाद वगळता ९०%+ गुन्हेगार यात सामिल आहेत...

<< नाशिकचे TCS पण असेच फेक प्रकरण आहे हे एक दिवस सिध्द होईलच...>>

—— सुशांत प्रकरणानंतर काय झाले?
आदळआपट करणाऱ्या गँगला हे सर्व ( यातील फोलपणा, खोटेपणा ) माहीत असतेच. प्रत्येक वेळेला दोन लोक शहाणे होतात पण ९८ लोक मूर्ख बनतात.

<< आपला कट उघडकीस आल्याचे समजताच नकुल गुर्जर परिसरातून फरार झाला. सध्या मेरठ पोलिस नकूल चा शोध घेत आहेत.>>

—— फरार झाला…. फरार होण्यास मदत केली… ?

यानेच तक्रार केली होती तर याच्यावर पाळत ठेवायला हवी होती.

वरच्या श्यामली च्या केस मध्ये त्याला, त्याच्या बायकोला व सासर्‍याला अटक करण्याचे कारण नव्हते.
एखाद्याने पूर्ण विचार करून धर्मांतर केले तर त्याला अटक कशाला करायला हवी ?
हिंदू मुले व मुली बावळट आहेत त्यांना आपले हित कळत नाही, रामगुंड , गायगुंड व खंडणीखोर पक्षाचे कार्यकर्ते यांनाच काय ते सारे कळते ! हिंदु मुलामुलींनी गपगुमान अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ऐकावे !

Pages