मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.
हं, आलं लक्षात. दोन वेगळे
हं, आलं लक्षात. दोन वेगळे अर्ज आहेत याची कल्पना नव्हती.
Sayyed told the court that Khan would not surrender ahead of the next hearing scheduled for April 27.
असं तुम्ही वर दिलेल्या हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.
म्हणजे आरोपीने दखल घेऊन कोर्टात अर्ज केलाय आणि सुनावणी होई पर्यंत सरंडर न होण्याचा अधिकार वापरत आहे असे यावरून दिसते. अन्यथा कोर्टाने लगेच सरंडर करा असे सांगितले असते.
तेव्हा अद्याप फरार घोषित करता येत नाही हे बरोबर वाटतेय.
आजचा अर्ज फेटाळला तरीही सरंडर केले नाही तर म्हणता येईल.
On lighter note:
<<मान्य आहे, निदा खान फरारी आहे असे टेक्निकली म्हणू शकतो.>>
एखादा आरोपी प्रचंड वेगाने पळतोय तेव्हा फरारी आहे असे म्हणता येईल, अन्यथा फरार आहे.
काय म्याटर झालाय कोण सांगणार
काय म्याटर झालाय कोण सांगणार का?
wronged ह्या युट्युब चॅनल वर
wronged ह्या युट्युब चॅनल वर २० मिन. ची डोक्युमेटरी आहे ह्या विषयाची. त्याने पुरावे पण दाखवले आहे. लिखित तक्रारी चे स्क्रीन शॉट्स दाखवले आहेत. हा सर्व च्राईम केसेस फार प्रामाणिकपणे सादर करतो आणि अॅनलिसिस पण लॉजिकल आणि सरळ असते.
मलाही तेच म्हणायचे होते,
मलाही तेच म्हणायचे होते, अंतीम जामीन फेटाळला, पोलिस शोध घेत आहेत व ती सापडत नाही तेव्हा फरार म्हणणे योग्य असेल असे मला वाटते.
एनीवे तिची इतकी बदनामी अॅलरेडी झालेली आहे ही फारार शब्दाने फार फरक पडू नये.
पाहिला तो wronged व्हिडिओ.
FIR मधल्याच गोष्टी तिखट मीठ लावून सांगितल्या आहेत. शिवाय verified facts आहेत असा सुरुवातीलाच दावा करतो !
८००के च्या वर व्ह्यूज आहेत म्हणजे पैसेही बरेच मिळाले असतील. रियाच्या वेळीही तिची निंदानालस्ती करून अनेक यू ट्यूबर्स नी छप्पर फाडके कमाई केली होती.
बाय द वे, मिसेस चैनानी यांनाही अटक करण्याची गरज नव्हती असे मी वर लिहिले तर लोकांनी मला बोचकारून काढले. आजही माझे तेच मत आहे, ही चौकशी करण्यासाठी त्यंना अटक करायची गरज नव्हती असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांना फार तर चौकशी पूर्ण होईपर्यंत देश सोडून जाऊ नये, नाशिक मध्ये उपलब्ध असावे अशा अटी घालता आल्या असत्या.
Supreme Court judgments state that if offences under the Bharatiya Nyaya Sanhita carry punishment of less than seven years, arrest is not necessary.
Claims circulating in sections of the media about the National Investigation Agency entering the case, or about Nida Khan’s alleged links to a bomb blast, have been dismissed as baseless by the Nashik Police and her legal representatives.
सकाळी निदा खान चा फोटो लावून
सकाळी निदा खान चा फोटो लावून बनवलेली थंबनेल पाहिली. हेरगिरीच हेडींग होतं. बघायची तसदी घ्यावी असं वाटलं नाही.
अजून काय काय कल्पकता बाकी आहे बघायचं.
>>> काय म्याटर झालाय कोण
>>> काय म्याटर झालाय कोण सांगणार का?
छे हो? काहीही काय ?
एखादा आरोपी प्रचंड वेगाने
एखादा आरोपी प्रचंड वेगाने पळतोय तेव्हा फरारी आहे असे म्हणता येईल >> फेरारी
कपिल शर्मा शो ला टक्कर.
कपिल शर्मा शो ला टक्कर.
एखादा आरोपी प्रचंड वेगाने
एखादा आरोपी प्रचंड वेगाने पळतोय तेव्हा फरारी आहे असे म्हणता येईल >> फेरारी
या फाकोबद्दल तुमच्यावरच का एफ आय आर करू नये ?
असो
पोलिसांनी SC ST Act मधलीही कलमे लावली आहेत, हा पोलिसांचा रडीचा डाव आहे व आमच्या केस मध्ये दम नाही याची कबुलीही.
वास्तविक या केस मध्ये ती कलमे लागू होत नाहीत व कोर्टात (होपफुली) ती कलमे टिकणार नाहीत, पण process is the punishment या उक्तीप्रमाणे ही कलमे लावली आहेत जेणेकरून बेल मिळणे अवघड व्हावे.
Hoax ला आपण सारेच कधी ना कधी बळी पडतो. काही महिन्यापूर्वी एका अमेरिकन नागरिक मुलीने दावा केला होता की तिला परदेशातून परत येताना शिकागो विमानतळावर ICE ने अटक केली, ४८ तास दुसर्याच राज्यात तुरुंगात ठेवले व मग तिथेच रस्त्यावर सोडून दिले. तिचा हा दावा आईस च्या एरवीच्या हडेलहप्पी वागण्याशी सुसंगतच होता त्यामुळे सर्वांचा विश्वास बसला. ती खोटे बोलत होती व एका हॉटेल मध्ये मौजमजा करत होती. अशाने जेन्यूइन केस मध्येही लोक शंका घेतात. MAGA लोकांना कोलीत मिळत ते वेगळेच. आपण hoax ला बळी पडलो हे निदान स्वतःशी कबूल करण्याइतका प्रांजळपणा हवा.
इतना सन्नाटा क्यों हैं भाई ?
इतना सन्नाटा क्यों हैं भाई ?
हा बीबी सुरुवातीपासून वाचला तर लक्षात येइल की मी व भरत यांनी हे प्रकरण बोगस आहे ही consistent भूमिका सुरुवातीपासून घेतली होती. त्यामुळे अनेक शेलकी विशेषणे व टोमणेही झेलले. Guess what, we were right all along! . या गोष्टीचा आनंद वगैरे काही नाही पण एक खंत जरूर आहे ती म्हणजे नाशिक पोलिसांना निदा खान HR Manager नाही, किंबहुना ती त्या विभागातही नाही हे पहिल्या दिवशीच माहित होते, त्यांनी ते स्पष्ट पणे क्लियर केले असते तर नंतर ८-१० दिवस नोइडा चॅनेल्स आणी यू ट्यूब चॅनल्स वर झालेली बदनामी तरी टाळली असती.
असे प्रकरण जेव्हा तापलेले असते तेव्हा 'ब्रेकिंग न्यूज' च्या नावाखाली अनेक बातम्या (पुड्या) येत असतात, त्यांवर विश्वास ठेवताना निदान थोडीशी चिकित्सा करणे आवश्यक आहे. एखाद्या मुस्लिम बहुल जिल्ह्यात बीफ खायची सक्ती/आग्रह केला गेला हे विश्वसनीय आहे, नाशिक सारख्या ठिकाणी हे घडते आणी एका पक्षाच्या कार्यकर्त्याने ते बाहेर आणेपर्यंत ते कुणालाच कळत नाही हे अशक्य होते, But it didn't matter.
अशा प्रकरणात १०० % शहानिशा झल्याशिवाय 'आठ मुली आयुष्यातून उठल्या' वगैरे वावड्या पसरवू नयेत हे माझे विधानही योग्यच होते, त्यात भडकण्यासारखे काय होते हे अनाकलनीय आहे.
‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे. हे हेडर मधले वाक्यही speculation आहे.
फार फार तर आरोप सिद्ध
फार फार तर आरोप सिद्ध होईपर्यंत आरोपिंची बदनामी नको, हिथं पर्यंत ठीक आहे. पणं मीडिया मध्ये अतिरंजित बातम्या आल्या म्हणून हें प्रकारणच बोगस आहे हें सिद्ध होत नाही.
विकु, तुम्ही सुरुवातीपासूनच
विकु, तुम्ही सुरुवातीपासूनच मी लिहिलेलेच बरोबर होते असे म्हणत प्रकरण डिसमिस करत आहात, त्यावरच बहुतेक लोकांची आर्ग्युमेन्ट्स आहेत. तुमच्यावर वैयक्तिकरित्या भडकायचे काहीच कारण नाही. निदा खान एच आर नसल्याने काय बदलणार आहे? किंवा ती निर्दोष जरी असली तरी बाकीच्या आरोपी आणि केसेस चे काय ते कळल्याशिवाय हे सगळे होक्स होते हे तरी कसे ठवरणार ? त्यामुळे नविन अपडेट येईपर्यन्त चर्चा काय करणार इथे?!
आता काही नविन बातमी / अपडेट आली आहे का? तर बोलता येईल. नाही तर तुमचे वरचे सगळे पोस्टही स्पेक्युलेशनच नाही का?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=DczMjH3a1tI
काल हा वरचा विडीओ पाहिला. मुलाखत देणारी व्यक्ती पोलीस दलातून अधिकार पदावरुन निवृत्त झालेली आहे. नक्की काय समजायचे?
पाहिला तो व्हिडिओ !(का?)
पाहिला तो व्हिडिओ !(का?)
अँकर ने सुरुवातीलाच त्या मुलीचे नाव बदलले गेले होते हे जणू काय भयंकर कारस्थान असल्याप्रमाणे लीडिंग प्रश्न विचारला.
निदा खान कोणत्याही अधिकारपदावर नव्हती हे यांना अजूनही कळलेले दिसत नाही. तिने कनिष्टांच्या तक्रारीची दखल घेतली नाही वगैरे बेफाम गप्पा होत्या. या तथाकथित मास्टरमाईंड चे नाव किती एफ आय आर मध्ये आहे ?
मी हा धागा फॉलो करायचं
मी हा धागा फॉलो करायचं सोडलं होतं.एक तर सुशान्तसिंग प्रकरणाच्याच वळणाने सगळं जाताना दिसत होतं आणि त्यावेळचेच काही अयशस्वी कलाकारही होते. आताही मधले प्रतिसाद वाचलेले नाहीत. फक्त वरवर नजर फिरवली तर विकु आणि राज अज्ञानी यांनी लक्ष्मण आणि द्रविडच्या विक्रमी भागीदारीची आठवण करून दिली . आता विकु झहीर खानसारखे यॉर्कर टाकू लागलेत.
सुशांतसिंग प्रकरणावरूनही मंडळी धडा शिकत नाहीत किंवा त्यांची शिकायची इच्छा नसते. आपल्या नावडत्या लोकांबद्दल काही आलं की ते खोटं आहे माहीत असलं तरी पसरवायचं आणि याउलट त्यांच्याबद्दल काही त्रासदायक सत्य समोर आलं की ते खोटं आहे म्हणायचं . आपल्या आवडत्या लोकांबाबत काही त्रास दायकगोष्ट समोर आली की त्यावर मूग डाळीचा हलवा खाऊन गप बसायचं हा पॅटर्न बदलत नाही.
वरच्या व्हिडियोतल्या माजी पोलिस अधिकारी महिलेचं बोलणं ऐकून मला माझ्या आवडत्या स्तंभलेखिका तवलीन सिंग यांची आठवण झाली.
सुशांतसिंगच्या वेळचा धागा मला दिसत नाही. उडालाय का?
इथे ३-४ दिवसांत काही लिहीलेले
इथे ३-४ दिवसांत काही लिहीलेले नाही कारण नवीन काही विशेष बाहेर आलेले नाही.
विकु तुम्ही आज नव्याने काहीतरी निष्पन्न झाल्याच्या थाटात लिहीण्याचे कारण समजले नाही. कारण तशी काहीच बातमी गेल्या ३-४ दिवसांत नाही. साइड नोट - मी या बाफवर (आणि इन जनरल कोठेही) फक्त तुमच्या मुद्द्यांवर लिहीले आहे. माझी एकही पोस्ट टोमणा कॅटेगरीत नाही. वैयक्तिक तर नाहीच.
यातले कोणीही धर्मांतर वगैरे बद्दल दोषी आहेत असा मी आधीही क्लेम केलेला नाही. माझ्या पहिल्या पोस्टपासून माझा अॅप्रोच जो डेटा समोर दिसत आहे त्यावरून अंदाज लावण्याचा आहे. तो बदललेला नाही. अजूनही सगळे निर्दोष असल्याचा निर्वाळा देण्यातकी माहिती समोर आलेली दिसत नाही - हे ही तितकेच खरे.
स्वाती२ - असे जे एका वेळी पन्नास फ्रेम्स असलेल्या, नव्याने शोध लागल्यासारख्या त्याच आधीच्या बातम्या रवंथ करत सांगणार्या आणि त्याच त्याच क्लिप्स परत परत दाखवणार्या कव्हरेजवर मी कधीही विश्वास ठेवत नाही. अशा शेकडो सापडतील. तो सगळा टीआरपीचा खेळ आहे. जेन्युइन बातमी देण्यात त्यांना इंटरेस्ट नाही. त्या निवृत्त पोलिस अधिकारी एकतर जुया माहितीवर आधारित रिमार्क्स देत आहेत, किंवा इतर कोणालाही माहीत नसलेल्या गोष्टी त्यांना माहीत आहेत. या अशा क्लिप्स मधे पहिलीच शक्यता जास्त आहे.
फारेण्ड, टोमण्यांचं एवढं काय
फारेण्ड, टोमण्यांचं एवढं काय ते? मला पहिल्याच पानावर हिंदूसदृश्य नावाचे एडी घेऊन लिहिणारा असं बिरूद मिळालं आहे. तशी अनेक बिरुदं माझ्याकडे आहेत. मी जपून ठेवलीत.
नाही मला मिळालेल्या
नाही मला मिळालेल्या टोमण्यांबद्दल माझी तक्रार नाही
मी विकुंना मारलेले नाहीत हे सांगत होतो. त्यांनी वरती टोमण्यांचा उल्लेख केला आहे म्हणून.
ते टोमणे मिळाल्याची पोच
ते टोमणे मिळाल्याची पोच देताहेत
फा, हे तुम्हाला उद्देशून
फा, हे तुम्हाला उद्देशून नव्हते. आपली ८०% मते जुळातात, आणी जी २०% जुळत नाहीत तिथे आपण एकमेकांना रिस्पेक्टच देतो.
इथे केरळ मधल्या मुस्लिमांच्या
इथे केरळ मधल्या मुस्लिमांच्या तुलनेने अधिक जननदराचा मुद्दा दिसला होता. जननदराचा संबंध कशाशी असतो, हे अनेकदा सांगितलेलं आहे. अर्थशास्त्रात यावर थियर्या आहेत. पण ते मरू दे. हिंदूंनी आपला जननदर वाढवावा असं आदर्णीय धिरेंद्र कृष्ण शास्त्रींनी सांगितलं आहे. मुस्लिमांच्या वाढत्या संख्येने भयभीत झालेले इथले हिंदू या शास्त्रीजींचं मार्गदर्शन का घेत नाहीत?
हिंदू म्यारेज अॅक्टमधून
हिंदू म्यारेज अॅक्टमधून एकपत्नीव्रत उडवून टाका म्हणावं! (फक्त पत्नीच हं!)
म्हणजे आपोआप युनिफॉर्म सिव्हिल कोडची पायरी चढली जाईल, आणि जननदराचा बागुलबुवा मारला जाईल.
शिवाय आपल्या संस्कृतीत बहुपत्नित्व काही नवीन नाही. दशरथापर्यंत मागे नाही गेलं तरी अगदी परवा परवा छत्रपती शिवाजी महाराजाधिराजांच्याही आठ बायका होत्या ना?
प्रकरण अजून न्याय प्रविष्ट
प्रकरण अजून न्याय प्रविष्ट आहे आणि हिंदू ऐदी धारण केलेले काही लोक्स "पहा आम्हालाच कसे नेहमी दोषी ठरवतात, आमचा मजहब आम्हाला कोणता गुन्हा करण्याची परवानगी देत नाही, म्हटलं होता ना, आम्ही दोषी नाहीतच" असा गदारोळ करत आहेत. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा, संविधानावर विश्वास ठेवावा, हे तर दूरच राहिलं, त्या निडा खान ला वाचविण्यासाठी या प्रकरणातील फिर्यादींचा सन्मान पायदळी तुडवत आहेत.
हे लोक्स स्वतःला लोन वूल्फ दाखवीत असले तरी त्यांच्यामागे एक पद्धतशीर यंत्रणा काम करत आहे असे दिसते.
< तुमच्यावर वैयक्तिकरित्या
< तुमच्यावर वैयक्तिकरित्या भडकायचे काहीच कारण नाही.>
अजय संन्याल म्हणतात त्याप्रमाणे हिंदू लोकांचे हिंदू हेच पहिले शत्रू आहेत, किंवा हिंदू ऐदी धारण केलेले लोक असं नाव घेऊन लिहिलेलं नसलं तरी कोणाला उद्देशून आहे, कोणाच्या प्रतिसादानंतर हे असं लिहिलं जातं यावरून ते वैयक्तिक रीत्या भडकणं आहे. त्याचं कारण काय असावं.
यावरून मला एक आयडियाची कल्पना सुचली आहे.
आपल्या ग्यानेशकुमारांचा निवडणूक आयोग सगळ्या भारतीयांना अमुक एक मतदार अपात्र आहे असा आक्षेप नोंदवायची पॉवर देतो. यासाठी फॉर्म भरता येतात, तसंच ते ऑनलाइनही करता येतं.
आता जनगणना होते आहे. त्याचा डेटाही असाच इंटरनेटवर उपलब्ध करावा आणि अमुक एक व्यक्ती हिंदू नाही असा आक्षेप घेण्याची सोय उपल ब्ध करून देण्यात यावी. म्हणजे इथल्या काही व्यक्तींना वाटते ती हिंदू धर्मातली घाण आपसूक बाहेर पडेल. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्याही थोडी कमी भरेल. पण शेवटी मतदारयादीप्रमाणेच हिंदू धर्मही शुद्ध होणं महत्त्वाचं. जो मुस्लिमांचा द्वेष करत नाही, त्याला हिंदू म्हणवून घ्यायचा हक्क नाही. बरोबर ना विकु आणि अशा हल्ल्यांकडे सिलेक्टिव्ह दुर्लक्ष करणारे सेल्फ डिक्लेअर्ड न्युट्रल लोक्स?
सुशांत सिंग वरून आठवलं. बिचार्याच्या आत्म्याला सद्गती काही मिळू देत नाहीत लोक.
त्यावेळी प्रदीप भंडारी नामक पत्रकार यात अग्रणी होते. एकदा ते या प्रकरणाशी संबंधित कोणा व्यक्तीच्या घराजवळून सायकलवर फेर्या मारत रिपोर्टिंग करत होते. आज ते भाजपचे राष्ट्र्रीय प्रवक्ते आहेत.
भंडारी नावावरून अंकिता भंडारी आठवली. हिचा तर खून झाला. पण आरोपी मुस्लिम नसल्याने जाऊ द्या झालं.
जो मुस्लिमांचा द्वेष करत नाही
जो मुस्लिमांचा द्वेष करत नाही, त्याला हिंदू म्हणवून घ्यायचा हक्क नाही.
चूक
जो हिंदूंचा द्वेष करत नाही, त्याला सेकुलर हिंदू म्हणवून घ्यायचा हक्क नाही.
असं म्हणा.
अरे वा! हे माबो पुणेकर आहेत.
अरे वा! हे माबो पुणेकर आहेत.
माझं हल्ली पुण्याला जाणं येणं असतं. एक माबो गटग केलं आहे. आणखी होतील. तुम्हांला पुढल्या गटगचं आगाऊ आमंत्रण देतो. मी माझं आधार कार्ड , जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला अशा गोष्टी घेऊन येतो.. म्हणजे माझं ऐदी नाव हेच माझं नाव आहे, हे तुम्हांला दाखवता येईल.
तुम्हीपण तुमची कागदपत्रं आणली तर आनंद वाटेल.
कॉर्पोरेट जिहादचं आणाखी एक
कॉर्पोरेट जिहादचं आणाखी एक प्रकरण.
अंकिता भंडारीचं नाव वाचून परत गेलेल्यांनी पुन्हा धावत धाग्यावर या
https://x.com/Mahaveer_VJ/status/2049475370458771568
अशा हल्ल्यांकडे सिलेक्टिव्ह
अशा हल्ल्यांकडे सिलेक्टिव्ह दुर्लक्ष करणारे सेल्फ डिक्लेअर्ड न्युट्रल लोक्स? >> अॅडमिनचं अभय असल्यावर काय हवंय? मनुस्मृतीचे दाखले दिले कि आयडी यमसदनाला पाठवला गेला. कुराण, मुस्लीम, शांतताप्रेमी लोक याबद्दल सातत्याने गरळ ओकणारे बाय डिफॉल्ट सभ्य आहेत. तर मग सहन करा किंवा प्रत्त्युत्तर देऊन क्षुद्र आयडी उडवून घ्या.
#बाब्याकार्टन्याय.
मुंबईत चार जणांचा बिर्याणी +
मुंबईत चार जणांचा बिर्याणी + कलिंगड खाऊन मृत्यू झाला. पायधुनी परीसरात पोलिसांनी कलिंगड विक्रेत्यांकडे चौकशी केली. यातल्या एकाची कसून चौकशी केली त्याचे नाव हिरव्या रंगातले असल्याने मीडीयात ते पसरले. एफडीआयला बाजारातले म्हणजे परिसरातले कलिंगडाचे सँपल्स हवेत तर पायधुनी आणि आजूबाजूच्या परीसरात मार्केटमधून कलिंगड गायब आहेत.
या विक्रेत्यांची नावे समजलेली नाहीत. पण सातत्याने कलिंगड खाऊन मृत्यू झाला हा प्रचार झाल्याने कलिंगड विक्रेते धास्तावलेले आहेत. गिर्हाईक कलिंगड नको म्हणत असल्याने कलिंगड बाजारात नाही असे काहींनी बातमीदारांना सांगितलेय.
व्हॉटसअॅप वर मेसेजेस फिरलेत कि कलिंगडावर पेस्टीसाईड होतं. आत मधे रंग येण्यासाठी विषारी रंग टोचलेले होते. काहींनी सापाचं विष कलिंगडात टोचल्याच्या अफवा ऐकल्याचे न्यूज पोर्टल्सना सांगितले आहे.
आता कोविड काळातल्या बातम्या आठवा.
इथे काय रिलेव्हन्स आहे हे सांगत बसत नाही. सूज्ञांस सांगणे न लगे. अजूनही निधी खान मास्टरमाईंड असल्याचा प्रचार आणि पोलिसांचे मौनव्रत याचा संबंध लक्षात आला नसेल तर मग पुढच्या वेळी हेच चालू राहणार आहे.
एक जरा वेगळे - सध्या छत्रपती
एक जरा वेगळे - सध्या छत्रपती शिवरायांवर कोणीही काहीही बोलत आहे व त्यावरून माध्यमांवर वाद होत आहेत. ते वाद कधी हाणामारीत बदलतील हे सांगता येत नाही अशी अवस्था आहे. येथे सगळे एका कुटुंबाप्रमाणे असल्याने इथे काही होणार नाही हे नक्की, पण कोणाचे काही सांगता येत नाही. तेव्हा छत्रपती शिवरायांबद्दल सैल भाषा न आलेली केव्हाही बरी! (म्हणजे, कोणाला सैल भाषा वापरायची आहे असेही म्हणत नाहीये आणि closed circle मध्ये वापरली तर गोष्ट वेगळी असे तर अजिबात म्हणत नाहीये).
Pages