डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व! - भाग २

Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33

'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गंमत म्हणजे जे आधीचे ट्रेड डील होते कॅनडा सोबत, ते सुद्धा या येड्यानेच केलेले. आता स्वतःच्याच डील मध्ये अमेरिकेचे कसे नुकसान आहे सांगतोय.

कॅनडातील विविध वस्तूंवर ५० टक्के टेरिफ शुल्क लागू करण्याची प्रक्रिया पुढच्या ७२ तासांसाठी स्थगित करण्याचा निर्णय तब्बल २ तास आधी जाहिर केला. अनिश्चितता कायम आहेच. काही ट्रेड डिल झाले तरी ते पाळायचे बंधन ट्रम्पला नाही. कार्नीची मोठी कसोटी आहे.

आज अमेरिकेचे कर्ज ३९.९३ ट्रिलियन $ आहे. या महिन्या अखेरिस ते ४० ट्रिलियन $ चा ऐतिहासिक टप्पा ओलांडण्याच्या उंबरठ्यावर आहे. कर्जाचा डाँगर डोंगर वाढत आहे, पण व्यावसायांत स्मार्ट असणार्‍या ट्रम्प यांच्या अ‍ॅसेट मधे २.२ बिलियन $ ची भर पडली आहे असे WSJ म्हणतो.
https://www.wsj.com/finance/trump-investments-presidency-4ca88728?eafs_e...

>>> कर्जाचा डाँगर डोंगर वाढत आहे, पण व्यावसायांत स्मार्ट असणार्‍या ट्रम्प यांच्या अ‍ॅसेट मधे २.२ बिलियन $ ची भर पडली आहे
इट्स द इकानमी, पीप्स!

अमेरिकेत असलेले पण नागरिक नसलेले( वोटिंग राइट्स नसलेले) ट्रंपवर टीका करतात का?( करू शकतात का?)
आणि जे आहेत त्यांचीही मते किती धारदार असतात?

भारतात ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली आहे.
https://www.ndtv.com/world-news/indian-origin-grandma-venkata-vasamsetty...
२०२२ मध्ये या बाईंचा भारतातले वास्तव्य करोना झाल्याने सहा महिन्यांच्या वर लांबले. त्याबद्दल आता अ‍ॅक्शन घेतली आहे.

Pages