Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33
'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
“hellhole on the planet ?”
“hellhole on the planet ?”
-
काय बोलत आहे याचे यालाच कळत नाही.
President Trump says tonight
President Trump says tonight’s shooting at the WHCD is a clear example of why we need a need a new ballroom for The White House
--
Reporter:
“My condolences on the loss of your friend Charlie Kirk. How are you holding up?”
Trump:
“I think very good. And by the way, you see all the trucks? They just started construction of the new ballroom for the White House.” -Donald Trump
<<>>
<<< Redistricting म्हणजे आमच्या delimitation सारखं का? मतदारसंघांची पुनर्रचना? >>>
——- gerrymandering
https://blogs.loc.gov/loc/2024/07/gerrymandering-the-origin-story/
gerrymandering शब्दाची
gerrymandering शब्दाची व्युत्पत्ती मजेदार आहे. जेरी नावाचा मॅसेचुसेट्स चा गव्हर्नर होता. त्याने मतदारसंघ कातरुन स्वतःच्या सोयीचे केले. त्यातला एक मतदारसंघ सॅलामॅन्डर च्या आकाराचा झाला. ती केस कोर्टात गेली आणि ते चालणार नाही असं कोर्टाने सांगितलं. तेव्हा त्या प्रकाराला जेरी + सॅलामॅन्डर वरून जेरीमॅन्डरिंग नाव पडलं.
Delimitation थोड वेगळ वाटतंय
Delimitation थोड वेगळ वाटतंय पण आत्मा तोच.
Now most media comments are
Now most media comments are like the shooting was staged.
हे जर खरे असेल तर चिंताजनक आहे...देशाचा प्रमुख कसा नसावा हे अगदीच समजतय ट्रंप यांच्याकडे बघून
.
(No subject)
डाऊन द मेमरी लेन...
.
.
थिंक बँकचा आणखी एक श्रवणीय
थिंक बँकचा आणखी एक श्रवणीय आणि मननीय एपिसोड.
"परिस्थिती confusing आहे!!!"
"परिस्थिती खूप जास्त confusing आहे!! त्याच्यामुळे काहीहि भाष्य करणे किंवा अंदाज वर्तवणे सध्या शक्य नाही!"
हे वाक्य लिहून ठेवा. हे त्रिकालाबाधित आणि जगातल्या कुठल्याहि परिस्थिती बद्दल बोलताना उपयोगी येईल असे आहे.
उदा. शेपूच्या भाजीत केळे टाकले तर काय होईल?
डाऊन द मेमरी लेन... >> दे
डाऊन द मेमरी लेन... >> दे एज्ड रीयली वेल असे म्हणू शकतो आपण
इकानमी
इकानमी
वर्षभरातच मी टाकोचा समर्थक
वर्षभरातच मी टाकोचा समर्थक बनलो आहे.
जीवनातली ही घडी अशीच राहु दे!
. टाको आला नसता तर आमच्या इथे रेकलेस राईट विंगर पीअर पॉलिएव्ह आला असता.
. ट्रिड्यूच्या राजिनाम्यात आणि लिबरल पार्टीच्या नेता निवडीत टाकोच्या बुलिंगचा हात नाही असं तरी कसं म्हणू! ते जरी होणारच होतं तरी टाकोने निवडून आल्यावर अॅक्सिलरेट केलं आणि महिन्याभरात ट्रिड्यू जाऊन कार्नीचा उदय झाला.
. टाको येतोय बघुन अल्बर्टा प्रिमिअर डॅनिअल स्मिथ मार्लागोला जाऊन पायलागू करुन आलेली. करेक्ट, ती आणि पीअर पॉलिअॅव्ह एकाच पार्टीचे आणि माळेचे. लोकांच्या डोळ्यात आलं, आणि त्यानंतर कॅनडा बॅशिंग चालू झाल्याने फारच नजरेत आलं.
. टाको आणि परिणामी फार-राईट लोक काय धुमाकुळ घालू शकतात त्याचं प्रात्यक्षिक सुदैवाने जानेवारी-फेब्रुवारीतच धडधडीतपणे आम्हाला दिसलं. गव्हर्नर, फिफ्टीफर्स्ट स्टेट वर लोक भयंकर भडकली वर टेरिफ टेरिफ चा गोंधळ संपता संपेना. टाको रे टाको!
. या सगळ्याचा परिणाम डिसेंबर मध्ये पीअर पॉलिएव्ह +३० टक्क्यांनी जो आघाडीवर होता तो मार्च येता येता साफ पडला. स्वतःची सीट ही वाचवू शकला नाही.
. यावर टेरिफ त्यावर टेरिफ करत करत वर्ष गेलं. कुसमा (CAUSMA) असल्याने फरक फार पडला नाही. पण काही क्षेत्रांवर नक्कीच पडला.
. इतकी वर्षे कनेडिअन इकॉनॉमी अमेरिकेला निर्यात करण्यावर अवलंबुन होती तो आपला कमकुवत दुवा आहे हे राजकारण्यांच्या आणि जनतेच्या अगदी स्पष्ट समजलं. या सगळ्यात ट्रंपने इतकं सगळं ब्लेटंट केलं की राग फक्त आणि फक्त अमेरिकेवर आणि टाकोवर गेला. लोकल राजकारण्यावर आलाच नाही.
. राजकारण्यांनी फार काही न करता लोकांनीच स्वयंघोषित बहिष्कार घालायला सुरुवात केली.
. लोकांनी अमेरिकेला जाणेच थांबवले. त्यानेच १२ बिलियन नुकसान झालं असं वाचलं. तुम्हाला १२ बिलियन किस झाड की पत्ती असेल का काय, तुम्हाला तुमचे अल्कोहोल आम्हाला निर्यात करुन काही फरक पडतो का नाही हु केअर्स, आम्ही तुम्हाला बिझनेस देणार नाही हे ४० बिलियन लोकांनी ठरवले.
. परिणाम झालाच असावा कारण हावर्ड लटनिक, अॅंबॅसेडर, बेसंट दिवस रात्र कॅनडाच्या नावाने अजुनही बोटं मोडत असतात. गरज नसती तर इग्नोर करू शकले असते. पण अगेन हु केअर्स!
. आता परत रिनिगोशिएट करायचं आहे. तर 'नो डील इज बेटर दॅन बॅड डील' हे जनताच म्हणते आहे.
. कॅनडा पोलिटिकली आणि एकुणच सोसायटी म्हणून अमेरिकेसारखा डिव्हायडेड नाही. डिफरंसेस आहेत पण अमेरिकेसारखे टोकाचे सिव्हिल वॉरच होईल असे नाहीत. टाको आल्याने देशप्रेम राईट आणि लेफ्ट दोन्हीकडे दिसू लागलं. पूर्वीकधी अमेरिकेला गन कंट्रोल, अबॉर्शन म्हणून नावं ठेवली तरी माझ्या माहितीतले सगळे लोक वर्षांत दोन चार वेळा तरी अमेरिकेत जातच असत. आता कोणालाच गरज नसेल तर लेझर साठी जायचं नाही आहे. कॅनडा मधलं टूरिझम प्रचंड वाढलं.
. इकॉनॉमी डायव्हर्सीफाय केलीच पाहिजे हे सत्य कसं का होईना भेदकरित्या कॅनडाला समजलं आहे. युरोप, चीन, भारत, ईस्ट एशिया, मिडलईस्ट सगळीकडे कार्नी जाऊन व्यापार करार आणि निर्यात वाढीसाठी प्रयत्न करतो आहे. फळे दिसायला दिवस जातील पण अमेरिकेच्या बेभरवशी लोकांवर अवलंबुन आता कधीही नाही हे सर्वांना पक्कं समजलं आहे.
. परत या १/१० लोकांच्या मार्केटचा अमेरिकेला त्रास होतोय! कॅनडाने चीनशी करार केला आणि त्यामुळे आम्ही खड्ड्यात जाणार असू तर अमेरिका जन्मात काही बोलणार नाही. पण अमेरिका इतकी तावातावाने रागात बोलते आहे म्हणजे कॅनडाने नक्कीच काहीतरी चांगलं केलं आहे, किमान अमेरिकेच्या कशावर तरी पाय ठेवला आहे.
. अमेरिकेपेक्षा चीन सुद्धा आता भरवशाचाच आहे म्हणा!
. संरक्षणखर्चातील ७०% रक्कम इतकी वर्षे अमेरिकेकडे जायची. ते जाण्याचे दिवस संपले इतक्या स्पष्ट शब्दांत यापूर्वी अमेरिकेला कॅनडातून कोणी सुनावलं असेल? आणि त्यावर गपगुमान आरडाओरड्याखेरीज काही प्रतिक्रिया आली नाही असं यापूर्वी कधी झालेलं का?
तर हे सर्व टाको शिवाय शक्यच न्हवते. तर ही टाकोगिरी अशीच सदैव चालत राहो. लॉंग लिव्ह द किंग.
पुढे व्हांसच्या ही दोन टर्म्स सुखेनैव चालोत हीच कामना!
टाको जगाचे कल्याण करायला नि
टाको जगाचे कल्याण करायला नि अमेरिकेला बुडवायला राष्त्राध्यक्ष झाला आहे.
टाको जगाचे कल्याण करायला नि
टाको जगाचे कल्याण करायला नि अमेरिकेला बुडवायला राष्त्राध्यक्ष झाला आहे.
>>>
म्हणुनच त्याला नोबेल प्राइझ हवे आहे. तो विश्वाचे कल्याण करत आहे.
>>>टाको जगाचे कल्याण करायला
>>>टाको जगाचे कल्याण करायला नि अमेरिकेला बुडवायला
द्विरुक्ती
म्हणजे कल्याण सारखे गुंडाराज
म्हणजे कल्याण सारखे गुंडाराज जगभरात आणणार का?
आइस इस फिक्स्ड!
आइस इस फिक्स्ड!
उद्यापासून आईस चे नाव नाइस करण्यात आलं आहे. सगळ्या बातम्यांत सगळीकडे लोक नाइस एजंट्स म्हणू लागतील! झाले ते नाइस एजंट्स!
नवं डीओजे कोमीला परत इंडाइट
नवं डीओजे कोमीला परत इंडाइट करतंय! वाळुत काढल्या रेघा!
वाळूत ८६ ४७ अशी शिंपले आणि दगडांची नक्षी केली म्हणून! नॉट किडिंग!
हे आईसचे नाईस, धुळाक्षरे काढली म्हणून एफबीआय डायरेक्टरवर खटला या अशाच बातम्या रोज मलाच कशा दिसतात! दुपारी जरा रिकामावेळ आहे तर न्युज साईट ओपन करावी तर रोज अतरंगी बातम्या इतक्या रेग्युलरली अमेरिकेत कशा घडतात!?
डोन्च्यू एन्व्ही अस?!
डोन्च्यू एन्व्ही अस?!
दरवेळी याहुन मजेदार काय असेल!
दरवेळी याहुन मजेदार काय असेल! म्हणतो आणि वाळूतली रांगोळी बघुन "अरे! हे पण होऊ शकतं की! ह्याचा आपण विचारच नाही करू शकलो" असं होतं. किती ग्रेट करणार अमेरिका! बास की!
करन्सी बिल्स वर टाकोचा चेहरा
करन्सी बिल्स वर टाकोचा चेहरा आल्यानंतर आता पासपोर्ट वर पण टाको येणार!! पण ही लिमिटेड टाईम ऑफर आहे. फक्त डिसी पासपोर्ट ऑफिस मधून पासपोर्ट काढणाऱ्यांना ही संधी उपलब्ध आहे. तेव्हा त्वरा करा. इथले मागा लोक तरी जातील आणि पासपोर्ट घेतील अशी आशा करतो.
<< करन्सी बिल्स वर टाकोचा
<< करन्सी बिल्स वर टाकोचा चेहरा आल्यानंतर आता पासपोर्ट वर पण टाको येणार!! >>
—— नेक्स्ट काय असणार आहे?
फ्लॅग वर जागा आहे. दोन राजे काल एकत्र आले. याराना आहे.
हॅंडमेड्स टेल्स, हंगर गेम्स,
हॅंडमेड्स टेल्स, हंगर गेम्स, मेझ रनर असं सगळं परत वाचलं पाहिजे. सापडेल काहीतरी.
बाकी जुलैला हंगर गेम्स पॅनॅम डिस्ट्रिक्ट-१ आपलं डीसी मध्ये होताहेत ना! स्टे ट्युन्ड!
>>> नेक्स्ट काय असणार आहे?
>>> नेक्स्ट काय असणार आहे?
अमेरिकन फ्लॅग!! मी तर म्हणते प्रत्येक स्टारमध्ये टाका फोटो!
आणि माउंट रशमोरचं काय झालं? तिथले चारही चेहरे तात्याचे करा.
आहे आहे! माउंट रशमोरचं बिल
आहे आहे! माउंट रशमोरचं बिल हाऊस मध्ये पेंडिंग आहे. तुझ्या तोंडात साखर पडो आणि त्यात अमेंडमेंट होऊन चारही चेहेरे
त्याचे येवो!
तिकडे ही आता १०० डॉलर एंट्री फी लावली असेल तर ते एक राहिलंच बघायचं! सगळ्या इच्छा थोडी पूर्ण होतात!
झालंच तर स्टॅच्यू ऑफ
झालंच तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं नाव बदलून स्टॅच्यू ऑफ ट्रम्प करता येईल.
ट्रम्पच्या वाढदिवसाला फेडरल हॉलिडे डिक्लेअर करता येईल.
एवढंच कशाला, USA नाव बदलून MST (mental states of Trump) करता येईल!
काहीही करा. आमच्या त्या
काहीही करा. आमच्या त्या ह्यांची सर येणार नाही. कोव्हिड लस घेतल्यावर जे सर्टिफिकेट मिळतं त्यावर त्यांचा फोटो आहे.
< USA नाव बदलून MST (mental states of Trump) करता येईल! > मी आतापासून अमेरिकेला ट्रंपिस्तान म्हणणार.
>>> कोव्हिड लस घेतल्यावर जे
>>> कोव्हिड लस घेतल्यावर जे सर्टिफिकेट मिळतं त्यावर त्यांचा फोटो आहे.


आम्हाला ब्लीचच्या बाटल्यांवर तात्याचा फोटो लावता येईल!
बाकी आता युद्धाचं पार सगळे
बाकी आता युद्धाचं पार सगळे विसरुन गेले का? टॉडलरचा इंटरेस्ट आता कुठे आहे?
इथला सावळा गोंधळ बघितला की तुमच्या त्या ह्यांच्या बाबत आदर वगैरे वाटू लागेल का काय असं वाटतं. तेवढ्यात ते ही काहीतरी भेळ वगैरे खाऊन कारनामे करतातच! त्याची रेसिपी नाही आली का माबोवर? मी परवा सर्च केली. पण सरसोंका तेल वाचुन सोडून दिली.
कमिला ला कट करुन आपल्याच
कमिला ला कट करुन आपल्याच कॅबिनेटचे हँड शेक करायचा व्हिड्यू रिपीटवर बघितला तरी दरवेळी तितकंच हसू येतंय!
Pages