डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व! - भाग २

Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33

'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इराणचे परराष्ट्र मंत्री आणि एकंदर परराष्ट्रव्यवहार खातं. त्यांच्या देशोदेशीचे दूतावास - गालगुच्चा वर्दी worthy आहेत.
https://x.com/CENTCOM/status/2043432050921718194
U.S. Central Command (CENTCOM) forces will begin implementing a blockade of all maritime traffic entering and exiting Iranian ports on April 13 at 10 a.m. ET, in accordance with the President’s proclamation.

Iran Embassy in Sierra Leone @IRANinSalone
You know you can't execute a blockade by posting on X, right? Like you have to actually bring your ships closer!

https://www.youtube.com/watch?v=1p_wxH9M6No

News Anchor - Are you afraid of the US invasion in your country?

Abbas Araghchi - पापणीही न लवू देता No we are waiting for them

We will not be involved in blockade of the Strait, we are urgently working with France, Spain and other partners to put together a wide coalition to protect the freedom of navigation. US cannot dictate how other should manage their affairs"- UK PM Keir Starmer

आता चीनने थप्पड मारली आहे. चीनची जहाजे अमेरिकेचे ब्लॉकेड दुर्लक्षित करुन स्ट्रेट मधुन जातील असं चीनच्या संरक्षण मंत्र्याने सांगितलं आहे.
"Our ships are moving in and out of the waters of the Strait of Hormuz,” China’s Defense Minister Admiral Dong Jun said in a statement on Monday. “We have trade and energy agreements with Iran. We will respect and honor them and expect others not to meddle in our affairs. Iran controls the Strait of Hormuz, and it is open for us."

आता फुल टाको करुन परत दोन आठवड्यांची मुदत इराणला दिली आहे. अमेरिकेच्या अंगात चीन च्या जहाजांवर हल्ला करायची हिंमत असणे शक्य नाही. Lol म्हटलेलं ना! झाकली मूठ सवा लाखाची उघडल्यावर कवडी मोलाची! आता कुणी ही यावं आणि टपली मारुन जावं अशी अमेरिकेने आपलीच गत करुन घेतली आहे. ये तो होना ही था!

अवतार डॉक्टरचा नाही वाटत.
रेड क्रॉस डॉक्टरकडे स्टेथॅस्कोप असायला हवा.
डॉक्टरला लाल शाल कशासाठी?
डाव्या हातामधून ( radiant hand) मधे फ्लॅश लँप आहे का?

विनोद झाला आहे. चीन भेट होणार होती, युद्धामूळे भेट पुढे ढकलली... आता ६ आठवडे झाले तरी युद्ध विराम दृष्टीपथांत नाही.

पोपशी पंगा महागात जातोय असे दिसले की पुन्हा टाकोगिरी होईल. निवड झाली तेव्हा या पोपकडून होप्स होते पण ते दुसर्‍या कारणास्तव. हे असे काही, अशा प्रकारे आणि इतक्या लवकर ? वेरी हॅपी! इवानजेलिकल्सचा धीर कधी सुटतोय याची वाट पहाणे म्हणजे अगदीच टोकाचे सकारात्मक होईल का?

होर्मुझची नाकाबंदी कशी चालली आहे बघा.
US-sanctioned Chinese tanker transited Strait of Hormuz despite American naval blockade — shipping data
मुद्दाम ही लिंक देतोय ;)https://www.timesofisrael.com/liveblog_entry/us-sanctioned-chinese-tanke...
यावर इराणी दूतावासाचं एपिक ट्रोलिंग
ट्वीटखालचे मीम्स बघाच
https://x.com/IRAN_GHANA/status/2043955468687614052

Iran in Ghana
@IRAN_GHANA
BREAKING: "Rich Starry," a Chinese oil tanker sanctioned for shipping Iranian oil, flying the flag of Malawi — a country with no coastline — just sailed through America's blockade of the Strait of Hormuz. The Navy, with its many "big beautiful ships," issued repeated warnings. Reportedly, The tanker's captain upgraded to premium to skip the ads.

EDIT: We're being told the blockade only applies to countries the US isn't afraid of. That list used to be long. It now fits on Trump's McDonald's receipt, Delivered by DoorDash.

Lol
डोअर डॅश आणि मॅक्डोनाल्ड रेफरंस साठी हे बघा. हे बघुन इंटरनेट एका आजीला या वयात डोअर डॅश करत का फिरावं लागतंय करुन उलटलं आहे.

नेव्हल ब्लॉकेड ही रात्री ९:३० ते पहाटे ४:३० दरम्यान सुचलेली कल्पना आहे. त्याच दरम्यान पोप टर्न्ड डॉक्टरची, हंटर बायडनला शिव्या घालायची आणि अशाच नामी कल्पना सुचलेल्या होत्या. नेव्हल ब्लॉकेड हा आपल्याच पायावर धोंडा आहे हे कुणीही सांगू शकलं असतं. पण महाशय म्हणतात मी विचार करत नाही आणि मला विचार करणारी माणसे आवडतही नाहीत.

स्वाती +१. इव्हॅंजलिक लोकांचा धीर सुटणे नाही. फार अपेक्षा ठेवू नका.

ओव्हल ऑफिसपर्यंत डोअरडॅश डिलीव्हरी पोचते आहे तोवर कुठल्याही ब्लॉकेडची काळजी करायचं कारण नाही.

इव्हॅंजलिक लोकांचा धीर सुटणे नाही. फार अपेक्षा ठेवू नका.
>>

युएसए मधले एवँजेलिकल तसेही प्रोटेस्टन्ट असतात, त्यांना पोपशी फार घेणे देणे नाही.

इराण या भूतलावरून नष्ट झाला आहे ही बातमी न छापल्याबद्दल तात्यांनी न्यु यॉर्क टाइम्सची लाज काढली.
त्याला इराणच्या एका दूतावासाचं उत्तर
If we confirm that you have won, if we confirm that you are the greatest and most victorious blocker in the entire world, will you put down the phone for half an hour, just half an hour, and attend to your main duties?

To the 30 million Americans who have no health insurance, to the 800000 Americans who are homeless, to America's infrastructure that is dilapidated. To the 38 trillion dollars of United States national debt...

पोपशी देणे घेणे नाही ते माहिती आहे इनफॅक्ट लोकल लेवलला या दोन चर्चचे भांडणही असते. ट्रंपचा मुख्य निष्ठावंत आधार हा हे इवांजेलिकल्स. ते त्याला 'chosen' समजतात. त्यांच्या विश्वासाला साजेसेच तर चित्र टाकले ना. इन्फ्लेशनपायी यांचा धीर अजून तरी सुटलेला नाही, सुटेल असे वाटत नाही. ही पेन तात्पुरती आहे असे टाकोनेच सांगितेले म्हटल्यावर ....

डायरेक्ट खरंतर संबंध नाही, किंवा आहे ही.
शेंडे आणि हावर्ड ल्युनटिक आणि होगन आणि टाको सारखा सारखा अल्बर्टा सेपरेस्टिस्टचा विषय काढत असतात. डॅनिअल स्मिथ पण इनॉगरेशनच्या आधी मारलागोला पाया पडून आलेली. पीपी (पीअर पॉईअ‍ॅव्ह, कॉन्झर्वेटिव्ह हारके भी जीता हुवा लीडर) पण संपर्कात होता.

तर टाको टच झाला की कसं कायम वाईटच घडतं याचं आणखी एक उदाहरण.
अल्बर्टा हे आमचं कुरुप वेडे पिल्लू थोडं फार टेक्सस आहे म्हणायला हरकत नाही, पण एकाच तळ्यातलं आणि आमचंच आहे. तर अल्बर्टा सेपरेटिस्टना थारा दिला हे डॅनिअल स्मिथच्या अंगाशी येतंय आणि नहीद नँशी हा शेंड्यांच्या लाडक्या एनडीपीचा एक लीडर, पूर्वीचा कॅलगरीचा मेयर, भारतीय गुजराथी मुस्लिम ओरिजिनचा आहे हो... आज निवडणूक झाली तर प्रिमिअर बनेल असं सर्वे सांगतोय. याला काही फार अर्थ नाही, पण एक डेटा पॉईंट आहे, आणि तो आमच्या बाजुचा आहे इतकंच! Wink

चर्चेची दुसरी फेरी दोन दिवसांत (?) पाकीस्तान मधे होणार असे ट्रम्प म्हणतात, पण इराण कडून प्रतिसाद यायचा आहे. बिच्चारा जेडी. फार कठिण कामगिरी दिलेली आहे.

युद्ध सुरु होण्यापुर्वी इराण सोबत अमेरिकेची चर्चा सुरुच होती आणि अनेक मुद्द्यांवर सहमती झालेली होती. अचानक २८ फेब ला काय लहर आली आणि युद्ध सुरु झाले. ट्रम्प / इस्त्रायल आणि इराण दोघांनाही एकमेकांबद्दल कमालीचा अविश्वास आहे.

ओव्हल ऑफिसपर्यंत डोअरडॅश डिलीव्हरी पोचते आहे तोवर > ..... Lol

शेंडे आणि हावर्ड ल्युनटिक आणि होगन आणि टाको सारखा सार >> शेंडे सध्या नाशिकामधे बिझी आहे त्यामूळे नॉन मागा लोकांकंडून एखादी अतिशय क्षुल्लक चूक झाल्याखेरीज इथे येणे होईल असे वाटत नाही Wink

ते परवा डोअरडॅशचा इंटरव्यूला दिसलेले. मला कसे दिसले विचारू नका. कॅमेरा हॅक केला. तर प्रश्नांत
व्होटेड टाको? चेक.
रॅडीकल व्युज ऑन डीईआय? चेक चेक.
ट्रान्स इन वुमेन स्पोर्टवर आगपाखड? चेक चेक चेक!
पण ब्राऊन स्किनमुळे बोंबलला त्यांचा जॉब. इथे दोन वर्षे ट्रान्स वुमनवर केलेली आगपाखड पार फुकट गेली यार!

आमचा मार्क कार्नी काल ऑटोवा चार्ज या पीडब्लूएचएल ( प्रोफेशनल वुमन्स हॉकी लीग) प्रॅक्टिसला गेलेला आणि गोल करुन आला. Lol मला एकदम न बघता थ्री पॉईंट शॉट घेणारा ओबामा आठवला. जुन्या आठवणींत रमायला छान वाटतं हो! कंटाळा आला रोजच्या कटकटीचा! तरी आम्ही इथे मजा बघतोय, तुम्ही कसे जीवन कंठता तुम्हाला ठाऊक!

फुल टाको! Rofl
ही चुक परत कधीही करणार नाही हे सार्वभौम देशाचा राजा चीनला सांगतोय! दिग्विजय म्हणजे हाच का रे भाऊ? Lol अमेरिका चीन साठी करतोय! का? नका करू की! आहे हिम्मत! बॉस कौन है मालुम है क्या!
स्ट्रेट ओपन ही करता येत नाहीये आणि क्लोज ही करता येत नाहीये. Biggrin का? कारण येड्या तू तो कंट्रोलच करत नाहीस रे राजा!

जनरल मोटर्स आणि फोर्ड या मोटारी उत्पादकांकडे ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन मिलिटरी उत्पादने तयार करायला गेले आहे. मिलिटरी कॉन्कवेस्ट ओव्हरसीज हा शब्द वापरलेला आहे. काँग्रेसकडे बिलियन्स ऑफ डॉलर मागितले आहेत.

This is the story of a battle. A battle fought in the skies over the Arctic and over Russia, on an American Strategic Air Command Base, and in the minds of men. Its duration was only two hours.
      It is a chaotic story, because battles usually are chaotic. It is a pitiless, cruel story, because pitilessness and cruelty are inherent qualities of battle, and especially a battle fought out with modern nuclear weapons.
      Most important of all, it is a story which could happen. It may even be happening as you read these words. And then it really will be two hours to doom.
      Yours and mine and every other living creature's.
    रेड अलर्ट ह्या पुस्तकाची प्रस्तावना.
ह्या युगातील डॉक्टर द्त्रेंजलव !

आजचा जोक: जिझस चित्रावर त्याला ब्रिफिंग मध्ये सांगितलं की प्रश्न विचारला तर सांग की ते पिक्चर डॉक्टर्ड आहे. टाको ला वाटलं ते पिक्चर डॉक्टर चे आहे. Lol म्हणून हा बोलला डॉक्टर, मग क्रॉस दिसला कुठे तर इम्प्रोवाईज करून रेड क्रॉस सांगितलं. Lol

बाकी मिडल ईस्ट मध्ये सर्विस मेंबर आता फूड रेशन करत आहेत.

प्रेअर सर्विस मध्ये पीट हेगझीटने बायबल कोट्स म्हणून पल्प फिक्शन मधले कोट्स वाचले.>>>>

ओह म्हणुन आज सगळिकडे याची चर्चा चालू होती

काय मूर्ख भरलेत

सर्विस मेंबर ना पुरेसे अन्न द्यायला ही अमेरिकेला जमत नाहीये. पुल्ड पोर्क आणि एक मरतूकडी तोर्टोया. दोन तृतीयांश ट्रे रिकामा. आणि पीट हेगझिट च्या सुशी आणि श्रिम्प आणि स्टेक चे काहीशे मिलियन बिल तुम्ही टॅक्स पेअर भरताहात. फॅमिली मेंबर नी पोस्टाने आपल्या मुला नातवंडांना पोटभर खायला पाठवण्याची ही सोय नाही कारण मिलिटरी झिप कोड ना पोस्टल सर्विस बंद करून टाकली आहे.
मागास म्हणजे किती मागासवर्गीय असावे अमेरिकेने!

Pages