डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व! - भाग २

Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33

'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे युद्ध सुरू व्हायच्या आधी तो जलडमरू ( बातमीत वाचलेला शब्द आहे ) सुरू होता की बंद?
सुरू असलेली गोष्ट काड्या करून बंद करायची आणि परत खर्च करून सुरू करायची.
हा प्रकार झाला.

>>> प्रेअर सर्विस मध्ये पीट हेगझीटने बायबल कोट्स म्हणून पल्प फिक्शन मधले कोट्स वाचले
भगवंता!

> प्रेअर सर्विस मध्ये पीट हेगझीटने बायबल कोट्स म्हणून पल्प फिक्शन मधले कोट्स वाचले>>धर्माचा वापर करुन मॅन्युपुलेट करणे हे काय नवे नाही. मागा मंडळी आणि त्यांच्या खाजगी रेडीओ स्टेशनना मॅचिंगच आहे.
Our press are just like these Pharisees असा ही दावा केलाय.

अल्कोहोलिक कॅश पटेल, त्याला जागं करायला एफबीआय इमर्जंसीं मध्ये लॉक्स तोडायला वापरते ते इक्विपमेंट आणायला लागणे, अती दारू ढोसल्याने सकाळच्या मीटिंग सर्रास रिस्केड्युल करायला लागणे, त्याला एकदा एफबीआय अकाऊंट अ‍ॅक्सेस करता न आल्याने आपण फायर झालोय असं वाटणे आणि ते आपल्या सपोर्टरना, सार्‍या एफबीआयला, व्हाईट हाऊसला सांगून सावळा गोंधळ माजवणे, एफबीआयचा हेड सर्रास अनुपलब्ध असणे इ. अनेक गोष्टी उघड करणारी स्टोरी अटलांटिकने केली. नोट: सीएनएन, वॉपो, सीबीएस इ फेक मिडियाने नाही तर अटलांटिकने केली. त्यावर सी यू इन कोर्ट धमकी कॅश काकांनी दिली.

स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चालू होऊन फ्रायडे मार्केट बंद झाल्यावर १२ तासांत परत संपूर्ण बंद झाला.

इराणने भारतीय टँकरवर हल्ला केला. आणखी ही दोन तीन जहाजांवर हल्ला झाला. आता सगळं ठप्प झालं आहे.

ते सगळं आहेच पण हे दोन व्हिडिओ नक्की बघा. या गोंधळात असं काही बघितलं की चेहर्‍यावर हसु आल्याशिवाय रहाणार नाही.
डेमोक्रॅट असा, रिपब्लिकन असा, अमेरिकन असा, बाहेरचे असा. हे व्हिडिओ नावडणारं कोणी असेल असं वाटत नाही.

ओबामा आणि झोरान ममदानी न्युयॉर्कच्या प्रिस्कूल मध्ये गेलेले. तिकडे 'तुम्ही कोण आम्हाला माहिती आहे!' करुन पोरं कल्ला करतात. ओबामा ममदानी कडे बोट करुन विचारतो हा कोण आहे. पोरं ममदानी करुन ओरडतात. याचं फर्स्ट नेम काय आहे. तर पोरं मेयर करुन ओरडतात. मेयर ममदानी. Lol ममदानी ओबामा आणि सगळेच हसू लागतात.

इथे ओबामा आणि ममदानी व्हील्स ऑन द बस मुलांबरोबर गातात. मग फोटो ऑपला सगळे प्ले मॅटवर बसतात आणि खाली बसल्यावर उठायला मदत करा असं ओबामा आणि ममदानी सांगतात. पोरं हात पाय खांदे खेचून अक्षरशः त्यांना उठवतात. शिक्षक जरा कानकोंडे वाटतात. पण ओबामा बिईंग ओबामा... हे लिहिताना माझ्या अंगावर शहारे आलेत... तुम्हीच बघा.
बीईंग प्रेसिडेंशिअल! लव्ह यू ओबामा! Happy

लेबर सेक्रेटरी आऊट.
हेवी सेट जेंटलमन इस्लामाबाद ला गेला का? Wink
व्हेटरन आणि व्हेटरन फॅमिली, अपंग व्हेटरन झिप टाय बेड्यांमध्ये कॅपिटल मधून अटक झाले. ८० एक तरी असतील.

बाकी कमांडर इन चीफ ला सिच्युएशन रूम मध्ये येऊच दिलं नाही. कारण चक्रमपणा करून काहीतरी करेल आणि अमेरिकन सर्विस मेंबरचा जीव वाचणे सोडा दगडाखाली हात यायचा. मोरॉनल दूर ठेवा असं सर्वानुमते ठरले. Wink जोक आहे जोक!

सीझफायर अनिश्चित काळासाठी आणखी पुढे कंटन्यू केलं. इराणने एकही मागणी मान्य केलेली नाही. स्ट्रेट पूर्ण बंद आहे, इराण टेबलवर यायलाही उत्सुक नाही आणि राजाने अमेरिकेला इतके व्हलनरेबल बनवले नाही की गुडघे टेकून सीझफायर करतो सांगण्याशिवाय गत्यंतर नाही. आज अमेरिकेला कोणीही मित्र नाही. कुणीही अमेरिकेला घाबरणे सोडा, राजा तर इतके दिवस कटोरा घेऊन भीक मागतोय, कुणी मदत करता का मदत! तरी गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला! एकावर्षांत १६६ बिलियन वाटून टाकायची वेळ आली. लोकांकडून टेरीफ टॅक्स म्हणून उकळलेले पैसे बिग कॉर्पोरेशन ना दान देणार. ज्यांच्याकडून वस्तू घेताना टेरीफ म्हणून पैसे उकळले त्या लोकांना काहीही मिळणार नाही. पण त्यांचे पैसे मोठ्या कंपन्यांना मिळणार.
स्वतःला मुलाना जावयाला खैरात होणार. टॅक्स पेअर पैशावर असा राजरोस डल्ला म्हणजे मज्जा! इतक्यात अमेरिका ग्रेट वगैरे नको व्हायला! हे असेच चालू राहुदे!

बाकी हाऊस महागाई कमी करायला, युद्ध, सैनिक इ. साठी काही बिल्स आणत असेल ना?
खालील आठ नऊ बिले रिपलब्लिकननी आणलेली आहेत आणि सध्या पेंडिंग आहेत.
१. टाको चे फेस माऊंट रशमोर वर कार्व करणे
२. पाम बीच एअरपोर्टला टाको चे नाव देणे
३. डलस एअरपोर्टला टाको चे नाव देणे
४. स्टेट डिपार्टमेंटला ट्रम्प पीस प्राईस देण्यास सांगणे
५. टाको चा वाढदिवस फेडरल हॉलिडे डिकलेएर करणे
६. टाको ला काँग्रेशनल गोल्ड मेडल देणे
७. २५० डॉलरचे नवे बिल टाको च्या चेहेऱ्या सकट प्रिंट करणे
८. अनेक रेझिल्युषन पीस प्राईस द्यायला आहेत.
९. ट्रम्प डीरेंजमेट सिंड्रोम वर रिसर्च करणे
यातले काहीही विनोद अतिशयोक्ती वाटले तरी ते तसे नाही. या सत्य आणि फॅक्च्युअल बातम्या आहेत.

व्हर्जिनिया रिडिस्ट्रिक्टिंग मतदारांनी अप्रुव्ह केलं. Rofl
व्हर्जिनिया ६ - ५ सीट साधारण जातात. ६ डेमोक्रॅटिक आणि ५ रिपब्लिकन. टेक्सस मध्ये जेरेमंडरिंग करून करून देशभर राळ उठवून दिली टाकोने. तेव्हा सारासार विचार करतील तर ते मागा कसले! आता व्हर्जिनिया मिड टर्म रिडिस्ट्रिक्टिंग होऊन वरचे ६-५ गणित १० - १ बनेल! १० कोण असेल बरं? ओळखा!!!

वर टेक्सास चे गणित ही उलटले आहे आणि लोन स्टार ब्लू बनायची चिन्हे आहेत ते वेगळंच. Rofl

मतदारसंघ कातरुन आपल्याला मत न देणारे मतदार विभागून विखरून टाकायचे, किंवा आपल्याला हवे ते भाग एकत्र करायचे की त्यांच्या एक गठ्ठा मतदानाची ताकद विभागल्याने, किंवा एकत्र आल्याने दोन्ही सीट्स आपल्याच येतील.

जसे मुंब्रा आणि भिवंडी दोन्ही ठाण्यात ठेवलं तर विजय कठीण बनतो तर अर्धे मुंब्रा कल्याणमध्ये उरलेल्यातील निम्मे ठाण्यात आणि निम्मे वाशीत टाकले तर मते विभागून तीनही सीट आपल्या येतात. थोडक्यात मतदारसंघाचा नकाशा पक्षीय गरजे नुसार विचित्र आकारात कापायचा.

Clearing Strait of Hormuz of mines could take 6 months, Pentagon tells Congress

फेडरल रिझर्वचा चेअर म्हणून कनर्फेशन हिअरिंगला आलेला वॉर्श पपेट आहे. इकॉनॉमीचे आधीच बारा वाजणार आहेत. वॉर्श आला की तीन तेरा!

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफ रद्द केल्यावर तो परत द्यायला सुरवात होत असतांनाच काहींनी पाठपुरावा करणार नसल्याचे सांगितले आहे.

" I will remember " companies that don't seek tariff refunds. याचा अर्थ ?
जे टॅरिफ रिफंड मागतील त्यांना जो जास्त लक्षात ठेवील.

ह्या धमक्या किती पोकळ आहेत आणि त्याला पीस प्राईस इन्व्हेंट करून दिले किंवा सोन्याचे घड्याळ दिले किंवा जावयाच्या फर्म मध्ये चार दोन पैसे टाकले की ती स्मृती पुसली जाते हे एव्हाना जगाला समजलं आहे ते अमेरिकन कंपन्यांनाही समजले असेलच.
मागा आणि माबोमागा इतके ते स्पेशल नाहीत. डिमविट! तसे फक्त मागा लोकच काय सांगाल त्यावर डोळेझाकून विश्वास ठेवतात.

extraordinarily brilliant person # म्हणजे नॉन बायोलोजिकल का रे भौ?

फॉक्स न्यूज पोल नुसार ५०% पेक्षा जास्त अमेरिकन इकॉनॉमी मध्ये डेमोक्रॅटिक बाजूने आहेत. २०१० नंतर हे पहिल्यांदा होत आहे. १६ वर्षांनी.

बिग ब्युटीफूल कॅबिनेट फायरिंगला तयार रहा! टाको चिडलेला आहे.

मागाकाका आणि मागाकाकू , तात्या भारताबद्दल आणि तुमच्यासारख्या लोकांबद्दल काय म्हणताहेत बघा
hellhole.jpg

काय शिटहोल पीप्स!
बाकी माबोमागा शिटहोलला कधी जाणारेत? शिटहोल म्हणजे रेड स्टेट नाही हो! आणि गॅव्हिन न्युसम आणि टिम वॉल्ट्झचा स्टेटपण नाही! यु नो व्हॉट इज शिटहोल! Lol

Pages