मुस्लिम दहशतवाद - एक अमेरिकन बागुलबुवा

Submitted by राज अज्ञानी on 23 March, 2026 - 05:09

प्रस्तावना

जगभरात "इस्लामी दहशतवाद" हा शब्द आज इतका रूढ झाला आहे की त्याबद्दल प्रश्न विचारणे अनेकांना धोकादायक वाटते. पण हा दहशतवाद नेमका कुठून आला? तो उत्स्फूर्तपणे जन्मला, की त्याला जन्म देणारे, वाढवणारे, शस्त्रे पुरवणारे आणि नंतर त्याचाच बागुलबुवा करून स्वतःच्या परराष्ट्र धोरणाला न्याय देणारे अदृश्य हात यामागे होते?

इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास केला तर एक गडद वास्तव (dark reality) समोर येते. अमेरिकेच्या CIA आणि परराष्ट्र धोरण यंत्रणेने, शीतयुद्धाच्या काळात आणि नंतरही, मुस्लिम अतिरेकी संघटना जाणीवपूर्वक उभ्या केल्या, पोसल्या आणि नंतर त्यांना "जगातील सर्वात मोठा धोका" म्हणून जाहीर केले. या लेखाचा उद्देश त्या इतिहासाचा धांडोळा घेणे हा आहे. कदाचित काही नंतरच्या घटनांकडे दुर्लक्ष झाले असेल. त्या नंतर आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भागात घेऊयात. एकतर्फी वाटला तर कळवा. असा उद्देश नाही. पण एका डॉट जोडण्याच्या प्रोसेस मधे मानवी मर्यादांमुळे दुर्लक्ष झाले असावे. एखाच लेखात सर्व डॉट्स समाविष्ट करत आहे. त्यामुळे तपशीलवार देणे शक्य नाही.

१. शीतयुद्ध आणि अमेरिकन रणनीती : पार्श्वभूमी

दुसऱ्या महायुद्धानंतर जग दोन गटांत विभागले.
अमेरिकेन भांडवलशाही आणि सोव्हिएत युनियनचा साम्यवाद.
या दोन महासत्तांनी थेट एकमेकांशी लढणे टाळले, पण जगभरात प्रॉक्सी वॉर" म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढणे, हे धोरण अवलंबले.

आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, सर्वत्र अमेरिकेने आपल्या हितसंबंधांसाठी हुकूमशहांना, अतिरेक्यांना आणि सशस्त्र गटांना आधार दिला. मध्य-पूर्व आणि दक्षिण आशिया हे या खेळाचे प्रमुख रंगमंच ठरले.

२. इराण : तेल राष्ट्रीयीकरण आणि CIA चा उठाव (१९५३)

मोसादेघ आणि लोकशाहीचा शेवट

१९५१ साली इराणचे लोकनियुक्त पंतप्रधान मोहम्मद मोसादेघ यांनी इराणच्या तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले. आजपर्यंत ब्रिटिश अँग्लो-इराणियन ऑइल कंपनी (आजची BP) इराणचे तेल काढून नेत होती आणि इराणला नाममात्र मोबदला मिळत होता. मोसादेघ म्हणाले, "हे तेल इराणच्या जनतेचे आहे."

ब्रिटन आणि अमेरिका यांनी हे सहन केले नाही. ऑगस्ट १९५३ मध्ये CIA आणि ब्रिटिश MI6 ने मिळून 'ऑपरेशन AJAX' (ब्रिटिश नाव: ऑपरेशन BOOT) राबवले.

रस्त्यावर दंगली घडवल्या, लष्कराला फोडले आणि मोसादेघ यांना हटवून शाह रेझा पहलवी यांना पुन्हा सत्तेवर बसवले. इराणच्या लोकशाही सरकारचा CIA ने घडवून आणलेला हा पाडाव इतिहासात उघडपणे मान्य झालेला पहिला अमेरिकन गुप्त उठाव आहे. २०१३ मध्ये CIA ने अधिकृतपणे हे कबूल केले.

शाह पहलवी यांनी पुढे अत्यंत क्रूर हुकूमशाही राबवली. त्यांची गुप्तचर यंत्रणा SAVAK ही CIA च्या मदतीने उभारली गेली आणि हजारो इराणी नागरिकांना छळ छावण्यांत टाकले गेले. या दडपशाहीतूनच १९७९ च्या इस्लामी क्रांतीचे बीज पेरले गेले.

१९७९ ची क्रांती आणि अमेरिकन / अमेरिकेशी वैरभाव

आयातुल्लाह खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामी क्रांती झाली. शाह पहलवी पळाले. इराणने अमेरिकेला मोठा सैतान( Great Satan) घोषित केले आणि हे उगाच नव्हते, त्याच्या मागे १९५३ चा इतिहास होता.

तेहरानमध्ये अमेरिकन दूतावास ताब्यात घेण्यात आला, ४४४ दिवस ओलीस संकट चालले. अमेरिका-इराण संबंध पूर्णपणे तुटले आणि आजतागायत ते सुधारले नाहीत.

३. इराण-इराक युद्ध : सद्दाम हुसेनचा अमेरिकन वापर (१९८०–१९८८)

इराणमध्ये इस्लामी क्रांती झाल्यानंतर अमेरिकेने एक नवीन शस्त्र वापरले ,

सद्दाम हुसेन.!

इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन याने १९८० मध्ये इराणवर आक्रमण केले. अमेरिकेने या युद्धात इराकला उघड पाठिंबा दिला. रोनाल्ड रेगन यांच्या प्रशासनाने इराकला:
- उपग्रह प्रतिमा आणि गुप्तचर माहिती पुरवली
- शस्त्रे आणि दुहेरी वापराचे तंत्रज्ञान दिले
- रासायनिक शस्त्रांसाठी लागणारे घटक (precursors) पुरवले

१९८३ मध्ये डोनाल्ड रम्सफेल्ड जे नंतर इराक युद्धात संरक्षण मंत्री झाले) बगदादला जाऊन सद्दाम हुसेनशी हस्तांदोलन करत होते, त्याच वेळी सद्दाम इराणी सैनिकांवर रासायनिक शस्त्रे वापरत होता. हे हस्तांदोलनाचे ऐतिहासिक छायाचित्र नंतर जगभर गाजले.

आठ वर्षे चाललेल्या या युद्धात दोन्ही बाजूंचे सुमारे दहा लाख लोक मारले गेले. अमेरिकेला इराणला कमकुवत करायचे होते. सद्दाम हे साधन होते.

४. अफगाणिस्तान, सोव्हिएत आक्रमण आणि मुजाहिदीनची निर्मिती (१९७९–१९८९)

"ऑपरेशन सायक्लोन" - जगातील सर्वात मोठी गुप्त कारवाई.

१९७८–७९ मध्ये अफगाणिस्तानात साम्यवादी सरकार आले. डिसेंबर १९७९ मध्ये सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानात शिरल्या. अमेरिकेसाठी ही संधी होती.

CIA ने ऑपरेशन सायक्लोन सुरू केले. इतिहासातील सर्वात मोठी गुप्त लष्करी मदत कार्यक्रम. या अंतर्गत:
- पाकिस्तानच्या ISI मार्फत अफगाण आणि परदेशी जिहादी लढवय्यांना शस्त्रे, पैसे आणि प्रशिक्षण दिले गेले
- सौदी अरेबियाने समान रक्कम ओतली
- अमेरिकेने एकूण सुमारे ३ अब्ज डॉलर या कारवाईत ओतले
- या लढवय्यांना मुजाहिदीन, अर्थात धर्मयुद्धाचे शिपाई, असे म्हटले गेले

CIA चे संचालक विलियम केसी आणि पाकिस्तानचे हुकूमशहा झिया उल-हक यांनी मिळून हा कार्यक्रम राबवला. जगभरातून मुस्लिम तरुणांना भरती केले गेले इजिप्त, सौदी अरेबिया, यमेन, अल्जेरिया आणि इतरत्रहून.

झबिगन्यू ब्रझेझिन्स्की यांची कबुली

अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झबिगन्यू ब्रझेझिन्स्की यांनी १९९८ मध्ये फ्रेंच मासिक Le Nouvel Observateur ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सोव्हिएत आक्रमणाआधीच, जुलै १९७९ मध्ये, अमेरिकेने मुजाहिदीनला मदत सुरू केली होती, म्हणजे सोव्हिएत आक्रमणाला जाणीवपूर्वक चिथावणी दिली जेणेकरून रशियाला त्यांचे व्हिएतनाम" मिळेल.( इथे काही आठवणी पुसट आहेत आणि संदर्भ शोधण्यासाठी बेसच नाही. म्हणजे रशियन आक्रमणाचे निःसंदिग्ध कारण उपलब्ध नाही)

जेव्हा पत्रकाराने विचारले,
"पण यातून मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद उभा राहिला, त्याचे काय?"
तेव्हा ब्रझेझिन्स्की म्हणाले, " इतिहासाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे काय आहे? सोव्हिएत साम्राज्याचा अंत, की काही उत्तेजित मुसलमान?"

तालिबानची उत्पत्ती

सोव्हिएत सैन्य १९८९ मध्ये अफगाणिस्तानातून माघारी गेले. अमेरिकेने आपला रस गमावला आणि अफगाणिस्तानला त्याच्या नशिबावर सोडले. मुजाहिदीन गटांत यादवी युद्ध सुरू झाले. या अराजकातून तालिबान उदयास आला.

तालिबान हे मुख्यतः पाकिस्तानातील मदरशांमध्ये शिकलेले, ISI ने आकार दिलेले आणि सौदी पैशाने पोसलेले होते. हे सर्व घटक अमेरिकेने उभे केलेल्या नेटवर्कमधून आले होते. १९९६ मध्ये तालिबानने काबूल ताब्यात घेतले. अमेरिकन गुंतवणुकीचे हे कडू फळ होते.

५. अल-कायदा _अमेरिकन प्रयोगशाळेतील भस्मासुर

ओसामा बिन लादेन कि CIA चा मुजाहिद?

ओसामा बिन लादेन हा सौदी अरेबियाच्या श्रीमंत बिन लादेन कुटुंबातून आला. अफगाण-सोव्हिएत युद्धादरम्यान तो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आला आणि मुजाहिदीन भरती आणि निधी व्यवस्थापनात अत्यंत सक्रिय झाला.

त्याने मकतब अल-खिदमात (Services Office) ही संघटना उभारली जी जगभरातून जिहादींना अफगाणिस्तानात आणत होती. CIA आणि ISI या नेटवर्कशी थेट काम करत होते. बिन लादेनला CIA ने थेट प्रशिक्षण दिले की नाही यावर वाद आहे, पण त्याच्या संघटनेला ज्या व्यापक यंत्रणेतून मदत मिळाली ती CIA-ISI-सौदी अरेबिया यांनी मिळून उभी केली होती हे निर्विवाद सत्य आहे. यासंबंधी लेख वाचले होते. दुर्दैवाने ते सध्या उपलब्ध नाहीत. काही काळाने पुन्हा मिळतील. (असे संवेदनशील बातम्यांबाबत होते. मध्यंतरी भारतातील अग्रगण्य व्यापारी टुंबातील वादामध्ये एका भावाने दुसर्‍या भावाचे घोटाळे उघड केले होते. ते नंतर लपवले गेले. दोन वर्षांपूर्वी ते पुन्हा दिसून आले).

अल-कायदाची स्थापना (१९८८)

सोव्हिएत माघारीनंतर बिन लादेनने १९८८ साली अल-कायदा (अरबी: तळ/ बेस / आधार) स्थापन केली. हे जिहादी लढवय्यांचे एक जागतिक नेटवर्क होते, ज्याचे प्रशिक्षण, शस्त्रे आणि विचारसरणी अमेरिकन पोसलेल्या अफगाण जिहादमधून आली होती.

आखाती युद्ध आणि वळण (१९९०–९१)

१९९० मध्ये सद्दाम हुसेनने कुवेतवर आक्रमण केले. अमेरिकेने सौदी अरेबियात लष्करी तळ उभारले. बिन लादेनने सौदी सरकारला सांगितले, "माझे मुजाहिदीन सद्दामला हाकलतील, अमेरिकन फौजा नको." सौदींनी नकार दिला आणि अमेरिकन सैन्य इस्लामच्या पवित्र भूमीवर, मक्का-मदीनाजवळ तैनात झाले.

हा बिन लादेनसाठी निर्णायक क्षण होता. अमेरिका आता त्याची शत्रू झाली. त्याने सौदी नागरिकत्व गमावले, सुदान आणि नंतर अफगाणिस्तानात आश्रय घेतला. याचे राजकीय विश्लेषण देत नाही. आपण यावर प्रतिसादात स्वतंत्र बोलू शकतो.

९/११ आणि वॉर ऑन टेरर

११ सप्टेंबर २००१ रोजी अल-कायदाने अमेरिकेवर हल्ला केला. दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर, एक पेंटागॉनवर आणि एक पेन्सिल्व्हेनियात कोसळले. जवळजवळ ३,००० लोक मारले गेले.

अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध जाहीर केले. पण या दहशतवादाची मुळे अमेरिकेच्याच धोरणांत होती हे सांगणे तेव्हा देशद्रोह मानले जात होते. हा काळ भारतात माध्यम स्वातंत्र्याचा शेवटचा काळ. कारण काही चॅनल्स वर ही गोष्ट सांगितली गेली. त्यानंतर भारतीय न्यूज चॅनल्सचे Foxination होत गेले.


६. सद्दाम हुसेनचा खात्मा : खोट्या आरोपांवर युद्ध (२००३)

तेल राष्ट्रीयीकरण आणि अमेरिकन नाराजी

सद्दाम हुसेनने १९७२ मध्ये इराकच्या तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले. इराक पेट्रोलियम कंपनी (ज्यात ब्रिटिश आणि अमेरिकन भागीदारी होती) त्याने सरकारी ताब्यात आणली. तेलाच्या महसुलावर सद्दामने इराकमध्ये शाळा, रुग्णालये आणि पायाभूत सुविधा उभारल्या. हे अमेरिकेला आवडत नव्हते.

सद्दाम इराण-इराक युद्धापर्यंत अमेरिकेचा "उपयुक्त मित्र" होता. नंतर तो "उपद्रव" बनला.

खोटे आरोप आणि इराक युद्ध (२००३)

९/११ नंतर बुश प्रशासनाने इराकवर दोन मुख्य आरोप ठेवले:

१. इराककडे सामूहिक संहाराची शस्त्रे (WMD) आहेत
२. सद्दामचे अल-कायदाशी संबंध आहेत

दोन्ही आरोप खोटे ठरले.

- UN शस्त्र निरीक्षक हॅन्स ब्लिक्स यांनी युद्धापूर्वीच सांगितले होते की त्यांना WMD चे पुरावे सापडत नाहीत.

- कॉलिन पॉवेल यांनी UN मध्ये जे "पुरावे" सादर केले ते नंतर बनावट असल्याचे सिद्ध झाले. पॉवेल यांनी नंतर हे स्वतःच्या कारकिर्दीवरील कायमचा डाग म्हणून मान्य केले.

- सद्दाम आणि बिन लादेन यांचे संबंध अस्तित्वात नव्हते उलट सद्दाम धर्मनिरपेक्ष होता आणि कट्टर इस्लामवाद्यांचा विरोधक होता. ही गोष्ट cloude check मधे चेक केली आहे कारण cloude न्युट्रल आहे. त्यांना ट्रंप प्रशासनाने धमकी दिली आहे.

मार्च २००३ मध्ये अमेरिका, ब्रिटन आणि सहयोगींनी इराकवर आक्रमण केले. डिसेंबर २००३ मध्ये सद्दाम पकडला गेला. डिसेंबर २००६ मध्ये त्याला फाशी दिली गेली.

युद्धात एक लाखांहून अधिक इराकी नागरिक मारले गेले. इराक उद्ध्वस्त झाला. तिथेच नंतर **ISIS** चा उदय झाला.


७. पाकिस्तान - अमेरिकेचा विश्वासघाती मित्र

भू-राजकीय महत्त्व

पाकिस्तानचे अमेरिकेसाठी भू-राजकीय महत्त्व अनन्यसाधारण आहे:
- चीनच्या सीमेवर असलेला देश.
- अफगाणिस्तानला थेट सीमा - सोव्हिएत काळापासून आजपर्यंत.
- इराण व भारत यांच्याशी सीमा
- मुस्लिम जगतातील एकमेव अण्वस्त्रधारी देश. (हे खरे तर अमेरिकेला कबूल करता येत नाही)

अमेरिका-पाकिस्तान संबंधांचा इतिहास

- १९५४ : पाकिस्तान SEATO आणि CENTO या अमेरिकन लष्करी करारांत सामील झाला
- १९७१: भारत-पाक युद्धात अमेरिकेने पाकिस्तानला पाठिंबा दिला (USS Enterprise सातवे आरमार भारतीय महासागरात पाठवले. )
- १९७९–८९: अफगाण जिहादमध्ये ISI आणि CIA एकत्र काम केले
- १९९८: पाकिस्तानने अणुचाचण्या केल्यावर अमेरिकेने निर्बंध लादले, पण ९/११ नंतर लगेचच सर्व निर्बंध उठवले

दुटप्पी खेळ - आतंकवाद्यांना आश्रय

पाकिस्तानने एकीकडे अमेरिकेचे दहशतवादविरोधी भागीदार म्हणून अब्जावधी डॉलर घेतले आणि दुसरीकडे अफगाण तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि काश्मीरसाठी लढणाऱ्या गटांना आश्रय दिला.

ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरात लष्करी अकादमीपासून हाकेच्या अंतरावर राहत होता. मे २०११ मध्ये अमेरिकन SEAL कमांडोंनी त्याला ठार केले. पाकिस्तानला आधी कळवले नाही कारण अमेरिकेला माहीत होते की ISI त्याला वाचवण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने हे सर्व माहीत असतानाही पाकिस्तानला सहकार्य चालू ठेवले कारण पर्याय नव्हता. अफगाणिस्तानला पुरवठा मार्ग पाकिस्तानमार्गे जात होता.

८. काश्मीर आणि अतिरेक्यांना अभय

पाकिस्तान-पुरस्कृत काश्मीर दहशतवाद

१९८९ पासून काश्मीरमध्ये ISI पुरस्कृत सशस्त्र उठाव सुरू झाला. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन या सर्व संघटना पाकिस्तानच्या भूमीतून चालत होत्या.

अमेरिकेची भूमिका इथे गुंतागुंतीची राहिली:
- १९८०च्या दशकात: अफगाण जिहादसाठी उभारलेले नेटवर्क काश्मीरकडे वळले
- क्लिंटन काळात: अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणण्याचे प्रयत्न केले, पण कर्गिल युद्धानंतर (१९९९) पाकिस्तानला "वाचवण्यात" अमेरिकाच पुढे होती
- ९/११ नंतर: पाकिस्तान "दहशतवादविरोधी भागीदार" झाल्याने त्याच्यावरचा दबाव कमी झाला.
- लष्कर-ए-तैयबा: मुंबई २६/११ हल्ल्यानंतर (२००८) अमेरिकेने LET वर दबाव आणला, पण पाकिस्तानने आरोपींना कधीच शिक्षा केली नाही. अमेरिकेने हे सहन केले.

अमेरिकेची भारताबद्दलची दुहेरी भूमिका

भारत-पाक संघर्षात अमेरिका नेहमीच "तटस्थ मध्यस्थ" असल्याचे भासवते, पण प्रत्यक्षात पाकिस्तानला सोडण्याची अमेरिकेची तयारी नसते. कारण त्याची भू-राजकीय उपयुक्तता आजही संपलेली नाही (चीनच्या विरोधात).

९. "दहशतवादावरील युद्ध" - एक शाश्वत उद्योग

९/११ नंतर अमेरिकेने "वॉर ऑन टेरर" घोषित केले. या युद्धाची काही वैशिष्ट्ये लक्षात घेण्यासारखी आहेत:

आर्थिक बाजू:
- २००१ पासून अमेरिकेने अफगाणिस्तान, इराक आणि इतर ठिकाणी $८ ट्रिलियनहून अधिक खर्च केला आहे (Brown University Costs of War Project)
- संरक्षण उद्योग — Lockheed Martin, Raytheon, Boeing, General Dynamics — या कंपन्यांचे शेअर्स ९/११ नंतर अनेक पटींनी वाढले
- Dick Cheney उपराष्ट्राध्यक्ष असताना Halliburton (त्यांची जुनी कंपनी) ला इराक पुनर्बांधणीचे अब्जावधींचे ठेके मिळाले

राजकीय बाजू:
- "दहशतवादाचा धोका" हे नागरी स्वातंत्र्ये कमी करण्याचे, पाळत ठेवण्याचे (Patriot Act, NSA surveillance) आणि परदेशी हस्तक्षेपाला जनमान्यता देण्याचे एक शस्त्र बनले

- "इस्लामोफोबिया" हा उद्योग उभा राहिला. मुस्लिम समाजाला एकसंध शत्रू म्हणून रंगवण्यात आले

१०. ISIS — इराक युद्धाचे अपत्य

२०१३-१४ मध्ये ISIS (Islamic State of Iraq and Syria) उदयास आले. हे कुठून आले?

- अबू मुसाब अल-झरकावी - अल-कायदाचा इराकमधील नेता, जो अमेरिकन आक्रमणापूर्वी इराकमध्ये नव्हता.
- अमेरिकन आक्रमणानंतर इराकचे विघटन झाले, सद्दामच्या बाथ पार्टीचे सुन्नी अधिकारी आणि लष्करी अधिकारी बेकार झाले. यांनीच ISIS चा कणा उभारला.
- CIA ने मान्य केले की सीरियन बंडखोरांना दिलेली शस्त्रे ISIS कडे गेली
- ISIS विरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने जे माफक बंडखोर (moderate rebels) उभे केले त्यांनी ISIS ला शरणागती पत्करली आणि शस्त्रे दिली

म्हणजे अमेरिकेने उभारलेल्या दहशतवादाला नष्ट करण्यासाठी उभ्या केलेल्या फौजांनी पुन्हा नवीन दहशतवाद जन्माला घातला.

११. अरब जगतातील अमेरिकन हितसंबंध — तेल, शस्त्रे आणि इस्राएल

मध्य-पूर्वेत ( पाश्चात्यांचे मध्य पूर्व आपले वेस्ट एशिया) अमेरिकेचे तीन मुख्य हितसंबंध आहेत:

१. तेल: जगातील सर्वात मोठे तेल साठे असलेल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे.
ज्या देशाने तेलाचे राष्ट्रीयीकरण केले इराण (१९५१), इराक (१९७२), लिबिया (गद्दाफी, १९७३) त्या देशावर अमेरिकेने कारवाई केली.

२. शस्त्र विक्री: सौदी अरेबिया, UAE, इस्राएल, इजिप्त यांना अब्जावधींची शस्त्रे विकणे. अरब देशांत अस्थिरता असेल तर शस्त्र खरेदी वाढते.

३. इस्राएलचे संरक्षण: मध्य-पूर्वेत इस्राएलला "सुरक्षित" ठेवण्यासाठी अरब देशांत शक्तिशाली, एकसंध सरकारे नको. विखुरलेले, परस्पर भांडणारे देश हवेत.

१२. "मुस्लिम दहशतवाद" - एक राजकीय वापर

वरील इतिहास पाहिल्यानंतर एक प्रश्न उपस्थित होतो - "मुस्लिम दहशतवाद" ही संकल्पना नेमकी कोण, कशासाठी वापरते?

वास्तव काय आहे?

- जगातील बहुतेक मुस्लिम हे शांतताप्रिय, सामान्य नागरिक आहेत
- अल-कायदा, ISIS यांचे सर्वात जास्त बळी मुस्लिमच आहेत
- तालिबान आणि अल-कायदा यांचे राजकीय उद्दिष्ट धार्मिक होते, पण त्यांना शस्त्रे, पैसे आणि प्रशिक्षण भू-राजकीय गरजांसाठी अमेरिकेने दिले

बागुलबुवा कशासाठी ?
- लष्करी खर्चाला जनमान्यता देण्यासाठी
- तेल-समृद्ध देशांत हस्तक्षेपाला न्याय्य ठरवण्यासाठी
- नागरी पाळत ठेवणे आणि नागरी स्वातंत्र्ये कमी करण्यासाठी
- देशांतर्गत राजकारणात मतदारांना एकत्र आणण्यासाठी ("आपण" विरुद्ध "ते") वाजपेयींच्या काळात अमेरिकेशी दीर्घ काळ चर्चा झाल्यानंतर भारताने अमेरिकेचा नरेटिव्ह स्विकारला. यामागे अनेक कारणे असू शकतात.

जेव्हा गरज होती तेव्हा मुजाहिदीन स्वातंत्र्यसैनिक होते. रेगन यांनी त्यांची तुलना "अमेरिकेच्या संस्थापकांशी" केली होती. सोव्हिएत युनियन संपल्यावर तेच लोक "दहशतवादी" झाले.

निष्कर्ष

इतिहासाचे हे धागे एकत्र जोडल्यावर एक स्पष्ट चित्र दिसते.

अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळात आणि नंतरही, आपल्या आर्थिक आणि भू-राजकीय हितसंबंधांसाठी मध्य-पूर्व आणि दक्षिण आशियात जाणीवपूर्वक अस्थिरता निर्माण केली. लोकनियुक्त सरकारे उलथवली, हुकूमशहांना पाठिंबा दिला, जिहादी संघटना उभारल्या आणि नंतर याच संघटनांना "मुस्लिम दहशतवाद" म्हणून जगापुढे उभे करून स्वतःला "सभ्य जगाचे रक्षक" घोषित केले.

हे म्हणजे ज्याने आग लावली त्यानेच अग्निशमन दल उभे करून स्वतःला नायक घोषित करण्यासारखे आहे. गुटख्याबाबत अशीच म्हण आहे.

"मुस्लिम दहशतवाद" हा अमेरिकन धोरणाचा बागुलबुवा आहे. वास्तवात तो अमेरिकन परराष्ट्र धोरणाचाच एक उप-उत्पादन (by-product) आहे. हे समजल्याशिवाय जगातील दहशतवादाचे खरे मूळ कधीच सापडणार नाही.

संदर्भ

पुस्तके

1. Chalmers Johnson, Blowback, The Costs and Consequences of American Empire (2000), Metropolitan Books. [अमेरिकन परराष्ट्र धोरणाचे दुष्परिणाम यावरील मूलभूत ग्रंथ]

2. Robert Dreyfuss : Devil's Game: How the United States Helped Unleash Fundamentalist Islam (2005), Henry Holt & Co.

3. Steve Coll - Ghost Wars: The Secret History of the CIA, Afghanistan, and Bin Laden (2004), Penguin Press. [Pulitzer Prize विजेते पुस्तक]

4. Naomi Klein- The Shock Doctrine: The Rise of Disaster Capitalism (2007), Picador.

5. Stephen Kinzer - All the Shah's Men: An American Coup and the Roots of Middle East Terror (2003), Wiley. [१९५३ इराण उठावावरील सर्वोत्तम पुस्तक]

6. John Perkins - Confessions of an Economic Hit Man (2004), Berrett-Koehler Publishers.

7. Ahmed Rashid - Taliban: Militant Islam, Oil and Fundamentalism in Central Asia* (2000), Yale University Press.

8. Richard Clarke - Against All Enemies: Inside America's War on Terror (2004), Free Press. [माजी अमेरिकन दहशतवादविरोधी प्रमुखाचे पुस्तक]

अधिकृत कागदपत्रे आणि बातम्या

9. CIA ची अधिकृत कबुली (२०१३) - इराण उठाव:
https://nsarchive.gwu.edu/briefing-book/iran/2013-08-19/cia-confirms-rol...

10. ब्रझेझिन्स्की मुलाखत - Le Nouvel Observateur (१९९८):
https://dgibbs.faculty.arizona.edu/brzezinski_interview

11. **Brown University - Costs of War Project:
https://watson.brown.edu/costsofwar/

12. Senate Intelligence Committee Report on CIA Torture (2014):
https://www.intelligence.senate.gov/sites/default/files/publications/CRP...

13. The Guardian - Rumsfeld's handshake with Saddam (2002):
https://www.theguardian.com/world/2002/dec/31/iraq.comment

14. New York Times - CIA Spent Millions to Support Pakistani Militants" (History)
https://www.nytimes.com/1994/03/06/world/pakistan-and-the-taliban.html

15. **The Intercept - The ISIS Files" (ISI connections)
https://theintercept.com/series/the-isis-files/

16. BBC - Operation Ajax: How the CIA engineered Iran coup" (2013):
https://www.bbc.com/news/world-middle-east-23762970

17. Washington Post - "How the US helped create al-Qaeda and ISIS"
https://www.washingtonpost.com/opinions/2015/11/20/the-us-helped-create-...

18. Colin Powell, UN presentation on WMD (2003) — original and retraction:
https://www.theguardian.com/us-news/2016/feb/05/colin-powell-united-nati...

19. Human Rights Watch - Pakistan's support for Taliban:

https://www.hrw.org/reports/2000/pakistan/

20. Seymour Hersh - The Killing of Osama bin Laden (London Review of Books, 2015):
https://www.lrb.co.uk/the-paper/v37/n10/seymour-m.-hersh/the-killing-of-...

टीप -

१. हा लेख उपलब्ध सार्वजनिक इतिहास, अधिकृत कागदपत्रे आणि काही शोधलेखांवर आधारित आहे. काही संदर्भ हे आंतरजाल उदयास येण्या आधीचे आहेत.

२. काही फॅक्टर् क्लाउड ऐ आय ला डेटा पुरवून चेक करून घेतले आहेत. त्याची लिंक देता येत नाही. जर क्लाऊडने चूक केली तर फॅक्ट चेक चुकीचे होऊ शकेल.

३. मायबोलीवर प्रकाशित केला आहे तरीही अन्य ठिकाणी गरज पडल्यास प्रकाशित करण्याचे हक्क राखून ठेवण्यात येत आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://aerospaceglobalnews.com/news/india-russia-military-aviation-pact/

लॉजिस्टिक हा खूप व्यापक शब्द आहे. लष्करी तळांचा उपयोग असे स्पष्ट आहे यात. अशा करारात जे लिहायचे असते तेच यातही आहे. या कराराची पार्श्वभूमी सांगण्याचे कारण अमेरिकेचा असाच गुप्त करार पाकिस्तानशी असल्याचे उघडकीस आले होते. हे ही सांगण्याचे कारण म्हणजे अमेरिकेचा बेस पाकिस्तानात अजूनही आहे.

याचाच अर्थ दहशतवाद आणि अमेरिका अलिप्त नाहीत. हे डॉटस जोडायचे होते फक्त.

तुम्हाला अजून ७ ते ८ डॉटस तरी जोडावे लागतील. अमेरिके बरोबर आपलाही असा करार आहे पण तो गुप्त नाही. इतर अजून पाच ते सहा देशा बरोबर पण आपले करार आहेत.

अमेरिकेबरोबर करार करण्यासाठी कोणतेही निर्बंध नव्हते हा डॉट पण जोडा त्यात.
रशियाकडून तेल घ्यायलाही बंदी होती.

https://www.financialexpress.com/world-news/nur-khan-airbase-under-us-co...
अमेरिकेचे नियंत्रण असलेला नूर खान बेस.

काही भूतपूर्व संघी विश्लेषकांनी आता न्युट्रल राहून विश्लेषणे सुरू केली आहेत. अशांपैकी काहींनी युएसच्या हालचालींची सॅटेलाईट फूटेजेस त्यांच्या विश्लेषणात दाखवलेली आहेत. ती इथे देण्याचा विचार नाही, गरजही नाही.

अमेरिकेने जर पाकिस्तानला मदत करायची ठरवलं तर या एअरबेस वर असलेली त्यांची विमानं भारतावर हल्ला का करणार नाहीत? रावळपिंडीची लोकेशन भारतासाठी डोकेदुखी आहे. अशा वेळी अमेरिकेला भारतात असलेला रशियाचा प्रेझेन्स शह देऊ शकतो. रशिया त्यांच्या कोणत्या विमानांचा मेन्टेनन्स भारतात करणार आहे? त्यांचे कोणते नेव्हल शिप भारतात दुरूस्तीसाठी येणार आहे? समजा आले तरी आणिबाणीच्या परिस्थितीत ही विमाने, जहाजं शांत बसतील का?

पुन्हा एकदा हा करार त्याचा कीस काढण्यासाठी इथे दिलेला नसून हा कोणत्या परिस्थितीत निर्बंध झुगारून देऊन केला आहे हे सांगण्यासाठी दिला आहे. कार्यकारणभाव लक्षात घेऊनच चर्चा व्हावी.

निव्वळ वादासाठी वाद घालायचे म्हटले कि तारतम्य सुटते.

भारताने रशियाशी केलेल्या कराराची पार्श्वभूमी बघताना उगीचच रणनीतिक महत्व नसलेल्या करारांची तुलना करून काय साध्य होते?
अमेरिकेशी भारताचा करार उघड आहे. अन्य देशांशी सुद्धा. हे देश काय भारताच्या मदतीला युद्धात आले आहेत का? भविष्यात येण्याची शक्यता आहे का? यामुळे निव्वळ लष्करी सहकार्यापलिकडे हे करार जाणार नाहीत हे उघड नाही का?

भारताने बांग्लादेश ऑपरेशनपूर्वी रशियाशी दोन वर्षांचा सहकार्य करार केला होता. त्यामुळे अमेरिकेचे सातवे आरमार हिंदी महासागरात निघाल्यावर रशियाने आपली नेव्ही पाठवली होती. हा इतिहास माहीत असेल तर कोणते डॉट जोडायचे याचा तरतमभाव लक्षात येईल. काहीही जोडत बसले तर या वादाला अंत नाही. अशा कमेण्टसना पास असेल. माफ करा.

( या कमेण्टसाठी कोणता प्रॉम्प्ट दिला हे अ‍ॅडमिन सांगतीलच. आल्यावर बघायची उत्सुकता आहे.)

रशिया आणि इस्रायल हे दोनच देश असे आहेत ज्यांनी भारताला अडचणीच्या वेळेस कोणतेही अनमान न करता सहाय्य केले आहे.

याउलट अमेरिकेसारखा बेभरवशी देश दुसरा नसेल.

युद्ध सुरु केले कि सर्व प्रथम अमेरिका शस्त्रास्त्रे आणि सुटे भाग यांच्या पुरवठ्यावर मर्यादा आणते. म्हणजेच पुढे युद्ध कसे चालवायचे यावर निर्बंध येतात.
याशिवाय अशा अत्याधुनिक शस्त्रास्त्रांवरील संगणकाचे नियंत्रण अमेरिकेकडे राहते त्यामुळे ऐन वेळी त्यांनी संगणक लॉक केले तर तुमची गोची होऊ शकते.

यामुळेच आतापर्यंत भारताने अमेरिकेशी शस्त्रास्त्रे आणि सुटे भाग यांच्या पुरवठ्यासाठी कोणताही अतिमहत्त्वाचा करार केलेला नाही. उदा F २१ किंवा F १८ हि विमाने तसेच अनेक जहाजे विकत घेण्यास भारताने नकार दिला आहे.

जेथे भारताचे आणि अमेरिकेचे हितसंबंध एकच आहेत अशा वेळेस अमेरिका भारताला सर्वात अद्ययावत सामग्री पुरवतो. उदा P ८ I पोसायडॉन हे सर्वात अद्ययावत पाणबुडी विरोधी विमान खरेदी करणारा भारत हा प[हिला देश होता. हे त्यांनी का पुरवले तर चीनच्या अणुपाणबुड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना भरवशाचा साठी हवा होता. याशिवाय त्यांना इतर भारतीय पाणबुड्यांची मिळवलेली समुद्रतळाची माहिती हवी होती जी अर्थातच भारताने दिली नाही.

बाकी काही सामग्री भारताने अमेरिकेकडून विकत घेतली आहे ज्याचे सुटे भाग सुद्धा भारताने सुरुवातीसच विकत घेतले आहेत. शिवाय

फ्रान्स सुद्धा भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवतो पण त्याची संपूर्ण किंमत वसूल करूनच. यामुळे जेथे केवळ अत्यावश्यक आहे अशी ऊच्च तंत्रज्ञान युक्त सामग्री भारत त्यांच्याकडून विकत घेतो.

पण याचा अमेरिका पुरस्कृत मुस्लिम दहशतवादाशी कोणता संबंध आहे हे समजले नाही.

वसाहतवाद्यांना, भांडवलशाह्यांना आपले साम्राज्य वाढवण्यासाठी एक शत्रू दाखवावा लागतो. कम्युनिझम हा मोठा शत्रू. तो संपवायला इस्लामी दहशतवाद उभा केला. आता यांची भूक भागली नाही. आखाती देशांवर कब्जा करणे गरजेचे होते. म्हणून इस्लामी दहशतवाद हा शत्रू उभा केला.

पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आणि लष्करशहांना आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भारत हा शत्रू दाखवणे गरजेचे वाटले.

सध्याचे आपले सत्ताधारी तेच करताहेत. मुस्लिम हा तुमचा शत्रू आहे, असं हिंदूंना सांगताहेत. इतिहास उगाळून पुरेशी मात्रा मिळणार नाही म्हणून हे तुमच्या मुली नासवतात (लव्ह जिहाद), तुमची गोमाता मारतात ( गोरक्षक) हे लोक तुमची संपत्ती बळकावतील ( झारखंड निवडणुकीच्या वेळची जाहिरात - मंगळसूत्र - मोदींचं वक्तव्य) लँड जिहाद (वक्फ बोर्ड) , थूक जिहाद पासून आय ए एस जिहादपर्यंत काय वाटेल ते दाखले देतात.

आणि यांचे पाठिराखे धर्माधिष्ठित राजकारणामुळे, कट्टरपणामुळे पाकिस्तान, पॅलेस्टाइन इत्या दींची वाताहात झाली असे दाखले देतात. हिपोक्रसी की भी कोई सीमा होती है.

हिपोक्रसी की भी कोई सीमा होती है.

तुम्हाला सहमत आहे. कुराणात नॉन बिलिव्हर्स ना संधी मिळेल तिथे ठार मारावे त्यांची संपत्ती लुटावी तरुण स्त्रियांना जनानखान्यात ठेवावे इतरांना खच्चीकरण करून त्यांना गुलाम म्हणून ठेवावे अश्या स्पष्ट आज्ञा इनामदारांना आहेत.

तरीही इस्लाम हा शांततेचा मार्ग आहे असे म्हणणे म्हणजे हिपोक्रसी की भी कोई सीमा होती है!
तरीही मुस्लिम दहशतवाद म्हणजे एक अमेरिकन बागुलबुवा असे आहे असे म्हणणे म्हणजे हिपोक्रसी की भी कोई सीमा होती है!
तरीही त्यात ओढूनताणून भारत काश्मीर हिंदू वगैरे बाबी आणणे म्हणजे हिपोक्रसी की भी कोई सीमा होती है!

मुस्लिम हा तुमचा शत्रू आहे, असं हिंदूंना सांगताहेत

पाकिस्तानची निर्मिती का झाली?

हिंदूंनी असं म्हटलं होतं का कि मुसलमान आमचे शत्रू आहेत? तेंव्हा काँग्रेसचा काळ होता. रा स्व संघ किंवा हिंदू महासभा खिजगणतीतही नव्हते.

"मुसलमानाना हिंदू राज्यकर्त्यांच्या राज्यात न्याय मिळणार नाही पासून मुसलमान येथे राजा म्हणून सत्ता करण्यासाठी आलेले आहेत प्रजा म्हणून राहण्यासाठी नाहीत" याच विचारसरणीमुळे पाकिस्तानची निर्मिती झाली.

इतक्या लवकर लोक इतिहास विसरतील असे वाटले नव्हते.

सोयीस्कररीत्या इतिहास डावलणे हा शहाणपणा नाही.

माबो, तुम्ही काहीही नवीन लिहिलं नाहीत. मुद्दे तर अजिबातच लिहिले नाहीत. फक्त नेहमीची पाठ केलेली वाक्ये लिहिलीत.

कुराणात लिहिलेलं पाळणारे मुस्लिम माझ्या आजूबाजूला नाहीत , पाहण्यात नाहीत.

कुराणाबद्दल लिहिलेलं चालतं, तर मनुस्मृतीबद्दल लिहिलेलंही चालवून घ्या. आता रात्रीचे चांदणे म्हणतील, मस्नुस्मृती आता कोणी मानत नाही. त्यांनी शरद पोंक्ष्यांना भेटून यावं. जातिभेद, अस्पृश्यता, मांसाहार हीन असं मानणारे आणि त्यानुसार वागणारे हिंदू मात्र पाहण्यात आहेत.

ज्युडाइजममध्ये मूर्तिपूजकांबद्दल जे म्हटलंय त्यानंतरही त्यांच्या गळ्यात पडायचं कारण समान इस्लामद्वेष हेच आहे का?

म्हणजे इतर देशात दहशतवाद असेल तर अमेरिका दोषी आणि भारतात असेल तर आहेच भाजपा, RSS वगैरे. मग याच निष्कर्षावर डॉट्स जोडत जायचे.

आता रास्वसंघाचा काळ आहे. आणि आता त्यांच्या परिवारातील संस्था आणि सरकारं मुस्लि म हा तुमचा शत्रू आहे, असं सांगताहेत की नाही? त्यांची ही विचारसरणी तेव्हापासूनच आहे.
मग मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांत आणि यांच्यात फरक काय?

जे मुस्लिम पाकिस्तानात गेले नाहीत, त्यांना पाकिस्तान मान्य नव्हता. त्यांना मी शत्रू का मानू?

आणि पश्चिमी देशांनी इस्लामी दहशतवाद उभा केला, याचे खंडीभर पुरावे आहेत. हे देश जगभर नरसंहार करतात, शोषण करतात , हा इतिहास आपण अनुभवला आहे. त्याचीच भलावण ते अजूनही करत आहेत. वसाहतवाद्यांनी केलेला विध्वंस आणि इस्लामी दहशतवाद्यांनी केलेला विध्वंस याची तुलना इथे मांडलेली आहे. मग असं असताना त्या वसाहतवाद्यांच्याच ओंजळीने पाणी पिण्याचं कारण काय असावं?

इतर बाबतीत त्यांनी तुमचे मेंदू धुतलेत, असं इतरांना सुनावणारे याबाबत आपले मेंदू का धुवू देतात?

पाकिस्तानची निर्मिती का झाली?

हिंदूंनी असं म्हटलं होतं का कि मुसलमान आमचे शत्रू आहेत? तेंव्हा काँग्रेसचा काळ होता.

याचं उत्तर नाही.

नसते फाटे फोडणे

तेंव्हा तर अमेरिका पुरुस्कृत दहशतवाद नव्हता

मनुस्मृतीबद्दल लिहिलं तरी काही हरकत नाही. फक्त मनुस्मृतीची तुलना पवित्र ग्रंथा बरोबर होऊ शकत नाही.

कुराणाबद्दल लिहिलेलं चालतं, तर मनुस्मृतीबद्दल लिहिलेलंही चालवून घ्या.

कुराण जाळून टाका असं जाहीरपणे म्हणणारा एक तरी मुसलमान दाखवता येईल का?

तुमची तरी हिम्मत आहे का जाहीरपणे म्हणण्याची.

मनुस्मुर्ती शी तुलना केवळ आपलाच मुद्दा दामटण्यासाठी करताय.

इस्लामी दहशतवाद हा पाश्चिमात्य वसाहतवाद्यांनी उभा केला यावर सहमती आहे की नाही?

मग पुढे बोलू.

तेव्हा काँग्रेसचा काळ होता म्हणजे काय? संघाच्या लोकांनी मुस्लिमविरोधी दंगे केले होते, असं सरदार पटेलांनी गृहमंत्री या नात्याने लिहून ठेवलं आहे.

पाकिस्तानची निर्मिती का झाली?

हिंदूंनी असं म्हटलं होतं का कि मुसलमान आमचे शत्रू आहेत? तेंव्हा काँग्रेसचा काळ होता.

याचं उत्तर नाही.

कुराणाबद्दल लिहिलेलं चालतं, तर मनुस्मृतीबद्दल लिहिलेलंही चालवून घ्या.

कुराण जाळून टाका असं जाहीरपणे म्हणणारा एक तरी मुसलमान दाखवता येईल का?

तुमची तरी हिम्मत आहे का जाहीरपणे म्हणण्याची.

याचं उत्तर द्या

मग पुढचं

सुबोध खरे - धाग्याचा विषय काय आहे?

पाश्चात्य वसाहतवाद्यांनी इस्लामी दहशतवाद निर्माण केला हे मान्य करायला का घाबरताय?

पाकिस्तानची निर्मिती का झाली?

हिंदूंनी असं म्हटलं होतं का कि मुसलमान आमचे शत्रू आहेत? तेंव्हा काँग्रेसचा काळ होता.

याचं उत्तर नाही.

कुराणाबद्दल लिहिलेलं चालतं, तर मनुस्मृतीबद्दल लिहिलेलंही चालवून घ्या.

कुराण जाळून टाका असं जाहीरपणे म्हणणारा एक तरी मुसलमान दाखवता येईल का?

तुमची तरी हिम्मत आहे का जाहीरपणे म्हणण्याची.

याचं उत्तर द्या

मग पुढचं.

दहशतवाद हा वेगवेगळ्या स्वरूपात असतो. उदा. निकारागुआ मध्ये कॉन्ट्रा या विरोधकांना अमेरिकेने मदत केली ते काही मुसलमान नव्हते. किंवा भारत माओवादी अथवा नक्षलवादी हे दहशतवादी आहेत पण मुसलमान नाहीत.

पण धार्मिक दहशतवाद हा केवळ इस्लामी मूलतत्ववाद्यांचा आहे आणि त्याला अमेरिकेने खतपाणी घातले पण तो केवळ अमेरिकेचा बागुलबुवा आहे हे म्हणणे चूक आहे.

आपले म्हणणे कसेही करून सिद्ध करण्यासाठी आपलयाला भगत सिंह यांची आठवण झाली किंवा मनुस्मृती शी कुराणाची तुलना करणे हे केवळ पूर्वग्रहदूषित विचारसरणीचे द्योतक आहे.

कसंही करून आपला च मुद्दा पुढे दामटण्या तुन निष्पन्न काहीही होणार नाही

भारतीय मनोवृत्तीच्या माणसाने मनुस्मृती टाकून दिलेली आहे एवढेच नव्हे तर कोणत्याही शालेय किंवा विद्यापीठीय अभ्यासक्रमात ती शिकवली जात नाही. याउलट १०० % मदरशात कुराण शिकवले जाते पाठ केले जाते आणि कुराण पथनाच्या स्पर्धा असतात असे असून आपल्याला मनुस्मृती आणि कुराणाची तुलना करावीशी वाटते हे कशाचं द्योतक आहे?

इथे मुस्लिमांचे गुणगान करणार्‍यांचे“ कायचे काय “ विचार वाचुन मला आता अस वाटु लागल आहे की मुस्लिम जमात व धर्म हा जगातला सगळ्यात शांतताप्रिय व मवाळ धर्म असुन त्या गरीब इनोसंट मुसलमानांशिवाय सगळ जग (मग त्याच्यात इस्रायल, अमेरिका, भारत (खासकरुन भारतातले सगळे हिंदु) हे सगळे आले) हे कसे खुनशी, मुंडी धडापासुन मशेटीने वेगळे करण्यात पुढे मागे विचार न करणारे, मुस्लिमांना उगाचच त्रास देणारे, विमाने इमारतीत घुसवुन विध्वन्स करणारे लोक आहेत.

यांच्या मते असे हे बिचारे मुस्लिम जेव्हा मुंबईत ९/२६ घडवुन आणतात, इनोसंट लोकांना ए के ४७ ने बोरिबंदर स्टेशनवर वेचुन वेचुन ठार मारतात, गोधराला ट्रेनच्या डब्यांना बाहेरुन कडी लावुन हिंदुंना जिवंत जाळतात, तेव्हा त्यात त्यांचा काहीही दोष नसतो. तो नुसता एक “ बागुलबुवा” असतो, त्यांच्या दृष्टीने ती एक मजेशीर गंमत असते. त्याला जबाबदार( ते सोडुन) अमेरिका असते, भारतातले हिंदु असतात, इस्रायल असतो. असो. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!

चालु द्या! इथे मायबोलीवर काही “ अडाणी“ मुसलमान अस्सल मराठी व हिंदु नावांच्या आयडीज घेउन, मुस्लिम सोडुन अमेरिका, भारत,हिंदु, इस्रायल यांच्या नावावर काहीच्या काही बिल फाडुन इस्लामचा प्रचार करत आहेत.

कुराणात मुस्लिम धर्म पाळणाऱ्यांसाठी कोणत्या शिक्षा आहेत म्हणून त्या धर्मातील लोकांनी ते जाळले पाहिजे है कुणीतरी समजावून सांगा.

वर कुणीतरी आयतांचा अर्थ विचारला आहे. तो सांगतो.

मायबोली प्रशासनाने मनुस्मृती चे दाखले डिलीट केले आहेत. कुराण आणि मुसलमान यांना शिवीगाळ करण्यास बंदी नाही. त्यामुळे हे वत्स तुम्ही निर्भयपणे अजेंडा रेटत रहा. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत.

@ राज अज्ञानी

फाटे कशाला फोडताय?

भरत याना उत्तर देऊ द्या कि

<हिंदूंनी असं म्हटलं होतं का कि मुसलमान आमचे शत्रू आहेत? तेंव्हा काँग्रेसचा काळ होता.

याचं उत्तर नाही.< याचं उत्तर सरदार पटेलांनी लिहून ठेवलंय. वाचाय ची हिंमत आहे का? सावरकरांनी काय म्हटलं तेव्हा?

मुस्लिम लोक त्यांच्या धार्मिक श्रद्धा , पुस्तकांचं काय करतात, याबाबत मला काही रस नाही. ते माझ्याशी कसे वागतात , हे मला पुरेसे आहे.
त्यांच्यातही प्रोग्रेसिव्ह लोक असतात , आहेत. स्वतः मूलतत्त्ववादी हिंदू असलेल्यांनी कायम मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांकडे बोट दाखवणे यातला विरोधाभास लक्षात येतो का?

आणि मनुस्मृती शिकवली जात नसू दे. हिंदू ही जीवनपद्धती आहे असं म्हणतात, आणि त्यात मनुस्मृतीत सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी पाळल्या जातातच. संघाने भारताच्या घटनेचं स्वागत केलं होतं का? १९४९ मध्ये ऑर्गनायझरने मनुस्मृती हे भारतासाठी मार्गदर्शक तत्त्व असलं पाहिजे असं म्हटलं होतं.

इथे तुम्ही फक्त इतरांचा कालापव्यय करताय.

भारतात मुस्लिमांनी दहशतवादी कृत्ये केलीच नाहीत्, असं मी वा अन्य कोणी लिहिलेलं नसताना गवताच्या काड्यांचे इमले बांधायची स्पर्धा लागणं अपेक्षितच होतं.

म्हणजे मी रिटायर होऊ का?
भरत यांनी उत्तर दिले आणि ते डिलीट झाले तर प्रशासनाला तुम्ही जाब विचारणार का?

परत तेच!

मूळ मुद्द्याला फाटे फोडत राहायचे!

आपला मुद्दा कुणी चुकीचा सिद्ध करू शकतो हे मोकळे पणाने मान्यच करायचे नाही!
मग त्यासाठी शब्दांचे अवडंबर रचत राहायचे!

असो!

यात अधिक कालापव्यय करण्यात काही हशील नाही

Pages