इराण-इस्राएल-यूएस त्रांगडं आणि भारत

Submitted by माझेमन on 19 March, 2026 - 08:48

मुळात या युद्धमागचं कारण 'इराण हा देश अण्वस्त्रसज्ज बनू नये' हे ' हे तकलादू आहे. ज्या दिवशी अणुबॉम्बची पहिली यशस्वी चाचणी झाली आणि हिरोशिमा, नागासाकीमध्ये प्रचंड नरसंहार केला गेला त्यादिवशी जग एका पॉईंट ऑफ नो रिटर्नवर पोहोचले. प्रत्येक देशाला संदेश मिळाला की अणुबॉम्ब हा तुमचा शेवटचा बचाव आणि शेवटचं शस्त्र आहे. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धातल्या मित्र देशांनी अणुचाचण्या केल्या, अण्वस्त्रं बनवली. त्यामागोमाग चीनसारख्या महत्वाकांक्षी व आश्चर्यकारकरित्या भारतासारख्या अहिंसेचा गजर करणाऱ्या देशानेही अण्वस्त्रसज्जतेचा मार्ग चोखाळला.

त्यानंतर जगभरातल्या सेन्सिबल माणसांना जाग येऊन अजून तरी चाचण्या होऊ नयेत ही मागणी पुढे आली व मुळात
अण्वस्त्रसज्ज असलेल्या देशांनी इतरांवर बंधन घालायला सुरुवात केली. मी माझी शस्त्रं नष्ट करणार नाही पण तुम्ही मात्र ही शस्त्रं निर्माण करायची नाहीत एवढा दुटप्पीपणा इतर देश का म्हणून खपवून घेतील? सुदैवाने हे तंत्रज्ञान सहजसाध्य नाही, अफाट
संसाधने व आर्थिक समृद्धी असल्याशिवाय त्यात पाय घातला की काय होते याचे उत्तम उदाहरण आपला शेजारी देश आहे. एके काळी तिथल्या राज्यकर्त्यांनी वल्गना केली होती की गवत खाऊन राहून पण अण्वस्त्र निर्माण करू. आज जगाने आर्थिक मदत केली नाही तर तिथल्या सामान्य जनतेवर खरोखर गवत खाण्याची वेळ येईल. असो मूळ विषयाकडे वळू. अण्वस्त्रप्रसार बंदी (Non Proliferation Treaty) व Comprehensive Test Ban treaty CTBT चा वापर करून आणि आर्थिक निर्बंध लादून इतर देशांना अण्वस्त्रसज्जतेपासून प्रवृत्त करण्यात मित्र देश यशस्वी ठरले.

स्वतः अण्वस्त्रसज्ज असलेल्या (पण जाहीर न केलेल्या) इस्रायलची इराणकडे अण्वस्त्रं येण्याबद्दल धास्ती मी समजू शकते. कारण एक अण्वस्त्रं इवलुश्या इस्राएलचे अस्तित्व कायमचे मिटवू शकते. पण ज्या देशाने इराणला प्रथम अणुशक्तीची झलक दाखवली, त्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले त्या अमेरिकेला नागरी अणुशक्ती कालांतराने मिलिटरीकडे जाईल हा अंदाज नव्हता हे म्हणणे फार धाडसाचे ठरेल. आत्ताचा त्यांचा सहभाग म्हणजे त्यांनीच बाटलीतून बाहेर काढलेल्या राक्षसाला बाटलीमध्ये कोंबायचा
आटापिटा आहे.

अनुक्रमणिका :
भाग १ : इराण-इस्राएल-यूएस त्रांगडं आणि भारत
भाग २ : इराणमधील इस्लामिक क्रान्ती
भाग ३ : इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम
भाग ४ : इराण आणि भारत
भाग ५ : भारत इस्राएल संबंध
भाग ६ : IMEC – India Middle East Europe Economic Corridor
भाग ७ : भारत सद्यस्थिती

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अण्वस्त्रांबाबत बोलायचे झाल्यास, कुणाचीच खात्री देऊ शकत नाही.....अमेरिकेची तर नाहीच नाही, कारण फक्त अणुबॉम्ब युद्धात वापरणारेच नव्हे तर एका अणुबॉम्बची संहारकता पाहून देखील दुसरा अणुबॉम्ब वापरणारे ते एकच राष्ट्र आहे....आणि अशांना वेसण घालायला अण्वस्त्रांसहीत त्यांच्या गजबजलेल्या शहरांपर्यंत मारा करू शकतील अशी क्षेपणास्त्रे असणे देखील क्रमप्राप्त आहे.

अण्वस्त्र बाबत एक स्पष्ट संकल्पना आहे कि आपल्याकडे अण्वस्त्रे असतील तर आपल्या देशाचा सर्वनाश होण्यापासून ते आपल्याला संरक्षण देते.

कारण MAD अर्थात (mutually assured destruction) किंवा दोघांचा सर्वनाश या तत्वाप्रमाणे दोघांनी अण्वस्त्रे वापरली तर दोघांचा सर्वनाश ठरलेला आहे.

पाकिस्तान इतके दिवस आपल्याला आम्ही अण्वस्त्रे वापरू हि धमकी देत आला होता.

उडी बालाकोट आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने त्यांच्या धमकीला भीक न घालता त्यांच्यावर हल्ला केला आणि तुम्ही अण्वस्त्र वापरले तर आम्ही "पाकिस्तान पृथ्वीतलावरून नष्ट करू" हि स्पष्ट ताकीद दिल्यामुळे पाकिस्तानचे हे अस्त्र निकामी झाले आहे.

याची पुढची पातळी म्हणजे पाकिस्तानने वापरलेली क्षेपणास्त्रे Fatah-1 आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये पाडली.
याशिवाय S ४०० या क्षेपणास्त्र प्रणाली मुळे आपल्याला F १६ विमानातून भारतावर सहजासहजी अणुबॉम्ब टाकता येणार नाही हेहि पाकिस्तानला कळून चुकले आहे.

याशिवाय तिसरा आयाम म्हणजे अणुपाणबुडीतील क्षेपणास्त्रे- पहिल्या प्रचंड अणुहल्ल्यात भारतीय भूमीवरील अण्वस्त्रे निकामी केली तरी भारताकडे तीन अणुपाणबुड्या आहेत ज्यावर असलेली अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे पाकिस्तान किंवा चीनवर प्रचंड हल्ला करून त्यांचा सर्वनाश करू शकतील. यामुळे भारताला सर्वनकष युद्धात सपशेल हरवणे आता कुणालाही शक्य नाही.

इस्रायल ने अण्वस्त्रे निर्माण करण्याचे हेच तर एक कारण आहे. कोणताही अरब देश इस्रायलचा नायनाट करण्यासाठी स्वतःचा संपूर्ण नाश झालेला पाहू शकणार नाही.

याच कारणासाठी उत्तर कोरिया वर हल्ला करण्याची अमेरिकेची आजतागायत हिम्मत झालेली नाही.

वनानी दहते वन्हे

सखा भवति मारुत:

स एव दीप नाशाय,

कृशे कस्यास्ती सौहृदम!

जेंव्हा वनाला आग लागते तेंव्हा वारा ती पसरवण्यास मदत करतो

पण तोच वारा छोट्या दिव्याला विझवतो

अर्थात बलहीन माणसाचा कोणीही मित्र नसतो.

सध्या जग असे झाले आहे की अंगावर वस्त्र नसले तरी चालेल पण अण्वस्त्रे हवीत.
अन्यथा कोणी आपल्या अंगावरील वस्त्र उतरवून नेले तरी आपण काही करू शकणार नाही.

इराण कडे जर खरोखरच अण्वस्त्रे असती तर इस्रायल किंवा अमेरिकेची हिम्मत झाली असती का त्यांच्यावर हल्ला करायची?

तेच मी म्हटले आहे.
अण्वस्त्रे किंवा शस्त्रास्त्रे नसली तर कोणी अंगावरील वस्त्रे उतरवून नेली तरी ते काही करू शकणार नाही.
इराण लढली आणि अमेरिका कंट्रोलमध्ये राहिली. अमेरिकेतली मिडिया सुद्धा युद्धाची आपल्याला झळ बसेल याची शक्यता निर्माण झाली तेव्हाच तिला जाग आली. इराणला दोन दिवसात चिरडला असता तर कोणाला काही पडली नसती. पण हा मानवी स्वभावच आहे. पाशवी ताकद प्राप्त झाली की अंगातला जनावर बाहेर येतोच. स्वतःला जंगलचा राजा समजणे आणि तसे वागणे हा मोह आवरणे अवघडच. अण्वस्त्रांबाबत जोपर्यंत संतुलन टिकून आहे तोपर्यंत जग टिकून आहे.

इस्रायलचं कौतुक करायला योग्य असा हाच धागा दिसला.
ही २००२ ची बातमी
https://www.theguardian.com/world/2002/aug/17/iraq.israel1
Israel signalled its decision yesterday to put public pressure on President George Bush to go ahead with a military attack on Iraq, even though it believes Saddam Hussein may well retaliate by striking Israel.
With foreign policy experts in Washington becoming increasingly critical of the wisdom of a military strike, and European governments showing no willingness to support an attack, the Israeli prime minister, Ariel Sharon, wants to make it clear that he is the US president's most reliable ally.

"Any postponement of an attack on Iraq at this stage will serve no purpose," Ranaan Gissin, a senior Sharon adviser told the Associated Press yesterday. "It will only give Saddam Hussein more of an opportunity to accelerate his programme of weapons of mass destruction."

Israeli intelligence officials had new evidence that Iraq was speeding up efforts to produce biological and chemical weapons, he added.
Last night Mr Bush, speaking in Crawford, Texas, said he would consult with others on US policy on Iraq, but would make his decisions based on the "latest intelligence".

"We'll continue to consult - but Americans need to know I'll be making up my mind based upon the latest intelligence and how best to protect our own country, plus our friends and allies," Mr Bush told reporters.

Earlier this week Mr Sharon told the Knesset's foreign affairs committee that Iraq was Israel's "greatest danger" but Israel was not pressing for an attack. A day later, however, he met Israel's air force chiefs and toured Israel's air defences.

Q च्या जागी N लिहून तोच खेळ पुन्हा.

अहो कसला इंटेलीजन्स अनं कसलं काय... आमच्या तात्यांना नाही लागत इंटेलीजन्स फिन्टेलीजन्स...

“People keep asking me about intelligence,” he told reporters on Air Force One. “I made this call with no intelligence whatsoever.”

“Quite frankly, every decision I’ve ever made in my life I’ve made without intelligence,” he boasted. “Intelligence is for losers.”

https://www.borowitzreport.com/p/trump-says-intelligence-played-no

आजच्या इंडियन एक्प्रेसमध्ये आयर्लंडचे भारतातले राजदूत Kevin Kelly, यां च्याशी झालेल्या Idea Exchange चा वृत्तान्त आला आहे.
आयर्लंडने पॅलेस्टाइनला मान्यता दिल्याने इस्रायलने आयर्लंडमधला आपला दूतावास बंद केला आहे.
यात ते value based foreign policy बद्दल बोललेत
We like to say that we have a values-based foreign policy. It perhaps sounds very grand, but it is something we aim for every day and is something which is becoming increasingly difficult in today’s world, It’s very difficult for countries to have a very clear and consistent set of values. But I’m proud to say that we have had a degree of consistency. It comes from our experience of imperialism, famine, fighting for our independence and forced emigration…
भारता च्या फॉरेन पॉलिसीबद्दल त्यांचं मत
Even though India has a very careful policy of strategic autonomy and multi-alignment, like us, that does not mean it is politically neutral.

आयर्लंडने पॅलेस्टाइनला मान्यता दिल्याने इस्रायलने आयर्लंडमधला आपला दूतावास बंद केला आहे.

तूर्तास इराण यू एस भारत त्रांगडं.
तात्यांनी भारताला hellhole म्हणणारी पोस्ट शेअर केली. त्यावर भारताच्या परराष्ट्र सचिवांनी
Journalist: Donald Trump has reposted a letter referring to India and other countries as “hellholes”. Any response?
MEA: We have seen some reports. That is where I leave it
असं उत्तर दिलं.
नंतर We have seen the comments, as also the subsequent statement issued by the US Embassy in response. The remarks are obviously uninformed, inappropriate and in poor taste. They certainly do not reflect the reality of the India-US relationship, which has long been based on mutual respect and shared interests.
ही लेखी (म्हणजे ट्वीटर व संकेतस्थळावर) कमेंट आली.

दरम्यान इराणने काय म्हटलं पहा
China and India are the cradles of Civilization. In fact, the #hellhole is where its war-criminal president threatened to decimate the civilization in Iran.

आज म्हणताहेत
India isn’t “foreign” to us, it’s family.

We don’t really buy into those old Western boxes of “self” vs “other.” For us, it’s always been connection, and a sense of belonging between us.

Seyed Abbas Araghchi
@araghchi
Told BRICS FMs summit: Iran's resistance against U.S. bullying is not an unfamiliar battle. So many of us encounter slight variations of same repugnant coercion. High time for us to jointly step up and work towards making clear that those practices belong in dustbin of history.

Government of the Islamic Republic of Iran
@Iran_GOV
·
May 14
FM @araghchi delivers Iran's statement at the #BRICS Foreign Ministers' Meeting in India.

He highlighted the importance of breaking Western hegemony and ensuring that international institutions remain free from political manipulation.

इराणचे सरकार व सैन्य यामध्ये सध्या अंतर्गत दुफळी असू शकते विशेषतः भारताबाबत इराणचे राजकीय नेतृत्व आणि सैन्यदल/IRGC चा स्टॅण्ड दोन टोकाचा आहे.
आर्गाची इत्यादींचा कल भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचा दिसून येतो तर मिलिटरी पॉवर होर्मूझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या ऑइल टँकर्सवर हल्ला करत आहेत.
सन्मार हेराल्डला होर्मूझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची अनुमती मिळाली असताना त्यावर हल्ला करण्यात आला. सुदैवाने कोणतेही नुकसान न होता हा ऑइल टँकर हल्ल्याच्या ठिकाणापासून दूर नेता आला.
https://x.com/Osinttechnical/status/2045503858130956788?s=20

परंतु सोमालियाकडून शारजाकडे जाणाऱ्या कार्गो शिपला अवैध पद्धतीने ताब्यात घेऊन बुडवल्याचे रिपोर्ट आले आहेत. या जहाजाचे नाव जाहीर झाले नसले तरी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही घटनांचा जाहीर निषेध केला आहे.

भारताने इराणच्या मिलिटरी शिपला कोची बंदरात आश्रय दिला असताना भारतीय जहाजांवर हल्ला होणे निषेधार्ह आहे.
https://indianexpress.com/article/world/strait-of-hormuz-ship-seized-ind...

युद्ध परिस्थिती निवळल्यावर इराणमध्ये कोणत्या कोणत्या गटाचे वर्चस्व राहते यावर भारताचे इराणशी राजनैतिक संबंध कसे राहतील याची झलक आता मिळू लागली आहे.

इराणमध्ये दुफळी ही थियरी आमच्यात नुकत्याच फेमेस झालेल्या नेने नामक अभ्यासकांनी मांडलेली पाहिली.

मला हा गुड कॉप बॅड कॉप प्रकार वाटतो. इराणचे परराष्ट्रमंत्री अतिशय हुशार आहेत. ते डिप्लोमसी करत असतील.
इस्रायल अमेरिकेला साथ देणार्‍या देशांची जहाजं अडवू असं इराणने आधीच सांगितलं होतं ना?

भारताचं इराणसंबंधीचं धोरण अजूनही इस्रायलच्या सावलीतच चालतंय असं दिसतंय.

ट्रंपचं ताजं वक्तव्य - इस्रायल आणि काही अरब देशांना मदत करण्यासाठी आम्ही इराणवर हल्ला केला.
https://www.youtube.com/shorts/7y6DvB5yKh4

इंटरेस्टिंग
https://www.moneycontrol.com/world/saudi-arabia-is-quietly-pushing-for-a...
Saudi Arabia is reportedly exploring the idea of a broad non-aggression pact involving Iran and Middle Eastern states as regional powers begin thinking beyond the current war and toward the long-term security architecture of the Gulf.
यात संयुक्त अरब अमिराती सामील नसाव्यात
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/131118013.cms?utm_source=...
युए ई ने सौदी अरेबिया , कतारसारख्या देशांना इराणविरुद्ध संयुक्त लष्करी मोर्चात सामील होण्यासाठी प्रयत्न केले. पण या देशांनी not our war म्हणून नकार दिला. भारत नेमका यु ए ई शी व्यापारी आणि लष्करी संबंध वाढवताना दिसतो आहे.

इस्रायल अमेरिकेला साथ देणार्‍या देशांची जहाजं अडवू असं इराणने आधीच सांगितलं होतं ना?
>>> क्लिप ऐकलीत का नीट? त्यात इराणने परमिशन दिली आहे म्हणून सन्मार हेराल्ड मुव्ह करत आहे तरी हल्ला का होतोय हा स्पष्ट प्रश्न कॅप्टनने विचारला आहे. याचा अर्थ इराणमधे दोन विरोधी मताचे गट आहेत असा होत नाही?

आणि भारताने युद्धात कोणती साथ दिली आहे इस्त्राएल किंवा अमेरीकेला? उलट आयरीस लावनला भारताने ऑफिशिअल आश्रय दिला आहे ना? भारत अंग झटकू शकला असता.

कोण नेने आणि त्यांनी काय थिअरी मांडली आहे मला माहित नाही पण ओपन सोर्समधे मिळणाऱ्या बातम्या स्पष्ट आहेत.

भारताचा युएईशी करार आत्ता झाला. सन्मार हेराल्डवर हल्ल्याची बातमी किमान १० दिवस जुनी आहे.

Pages