मनसोक्त गप्पा

Submitted by मानव पृथ्वीकर on 17 September, 2020 - 14:33

या, आरामात बसा, आणि मनसोक्त गप्पांत सामील व्हा, धागा आपलाच आहे.
विविध विषयांवर गप्पा, चर्चा किंवा नुसतीच थट्टा मस्करी, खेळीमेळीने.

राजकारणाला दुरूनच हात जोडू, गॉसिपला स्थान न देऊ, गटबाजी टाळु.

माराया दिलखुलास गप्पा सगळ्यांनाच असे इथे मुभा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाईट नाहीये आमच्या कडे.. पाऊस पडतोय जोरदार.. मोबाईल चे चार्जिंग संपायला लागले..

शुभ रात्री

आज सकाळी दोन मस्त पाँफ्रेट आणले होते.
उद्या किंवा परवा बनवणार होतो पण संध्याकाळचं पावसाळी वातावरण बघून आजच ग्रिल्ड तंदुरी बनवायचा मूड आला.
आधी मॅरिनेशन मग गॅसवर स्काॅच बर्निंग आणि मग ग्रिल...


अशक्य भारी दिसताहेत! मजा करा! रविवारी फिश करी केली ती पहिल्यांदाच चांगली जमली. ती थोडी फ्रिज मध्ये आहे त्यावर रात्री भागवेन मी. Happy