Submitted by केअशु on 27 November, 2025 - 20:23

जास्त काही लिहिण्याच्या पद्धत पडत नाही कारण मुळातच माहिती हवी आहे म्हणून विचारतो आहे आता वरील कोड जो आहे तो आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञाचा आहे त्यामुळे त्याला तोतांड म्हणून वगैरे चुकीचे आहे आणि तसेच असेल तर मग खरंच आपल्या मनात तुझ्या इच्छा निर्माण होतात त्यांचा उगम कुठे असतो कुठे असतो म्हणून यापेक्षाही त्यांवर नियंत्रण कोणाचा असतो कोण ह्या इच्छा आपल्या मनात आणतो आणि आपल्या आकाश शरीर त्याप्रमाणे त्यामागे काम करण्यासाठी झटत राहत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मानवाच्या उत्क्रांतीत
मानवाच्या उत्क्रांतीत श्रद्धेचा मोठा वाटा आहे >>> एक्झॅक्टली. कशावर तरी विश्वास ठेवल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही- ही गोष्ट तिघांनाही लागू. धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान. हायपोथेसिस सगळ्यांच्यात.
हायपोथेसिस मांडल्याशिवाय पुढ्यात काही येतच नाही. धर्मात कर्मसिद्धांतासारख्या (आणि आणखी लाखो) गोष्टी येत नाहीत. तत्त्वज्ञानातली हायरार्की आणि रीझनींग मांडता येत नाही. विज्ञानात तर प्रयोगच करता येणार नाहीत. हे सारे हायपोथेसिस सेपियन्सपासून ते आपल्या आजवरच्या जगण्याचा आधार झाले आहेत. अनेक गोष्टी सिद्ध होतात, आणि बदलतात, चक्क खारिजही होतात. शेवटी पुन्हा नवा आधार एकच- हायपोथेसिस.
कमिंग बॅक टू विश्व. म्हणजे काय, तर आपणच. किंवा खरं तर, मीच. या विषयाचा फार थोडा भाग- फ्रीविल. सुरुवातीपासून मांडल्याशिवाय हे सारं नीट सांगता येणार नाही. मानव, स्टिल ट्राईंग टू फिगर इट आऊट अँड राईट. हे फारच मोठं पुराण होईल, कदाचित लिहिनही इथं, पण त्यातही विशेष असं काही नाही, बर्याच गोष्टी तुम्हाला, आणि अर्थातच इतर बर्याच जणांना आधीच माहिती आहेत. फक्त डॉट्स जॉईन करणं बर्याच वेळेला आपलं राहून जातं, तसंच इथंही..
जावू दे म्हणायचं आहे का
जावू दे म्हणायचं आहे का तुम्हाला? >>>
साजिरा, मस्त मस्त मस्त. अगदी रसाळ प्रवचन ऐकल्याचा फिल आला.
तुम्ही भगवे कपडे घालून टिव्हीवर सुद्धा येऊ शकता
ही असते चर्चा ज्यात स्वतःचं आकलन महत्वाचं आहे. हे सगळं कॉपी करून कुठेतरी वापरण्याचा मोह होतोय हा विरोधाभास आहे
हे असं सोपंसोपं वरवरचं गोलगोल
हे असं सोपंसोपं वरवरचं गोलगोल बोललं की भगव्या कपड्यांचा फील येणारच.
थांबा आता आपण बोअर करायला सुरुवात करू.. 
कशावर तरी विश्वास
<<कशावर तरी विश्वास ठेवल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही- ही गोष्ट तिघांनाही लागू. धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान. हायपोथेसिस सगळ्यांच्यात.>>
हं. पण इथे श्रद्धा, विश्वास आणि हायपोथॅसिस यात मूलभूत फरक आहे असे मला वाटते. (हे आता फ्री विल पासून पारच भरकटेल, पण विषय निघालाच आहे तर होऊ दे.)
श्रद्धा म्हणजे काय याबाबत बराच उहापोह होऊ शकेल, तेव्हा ती वेगळी एवढंच सध्या म्हणतो.
विज्ञानाबाबतीत हायपोथेसिस आपण करतो. अमुक गोष्ट का होत असेल त्याचे कारण शोधायला, किंवा अमुक केले तर काय होईल त्याबाबतीत हायपोथेसिस करतो. या या शक्यता वाटत आहेत आधी असं करून पाहु, नंतर तसं आणि तरीही रिझल्ट्स मिळाले नाही तर परत पुढला असा विचार करू वगैरे. त्याप्रमाणे, प्रयोग चाचण्या होतात, त्यातले एक हायपोथेसिस चूक ठरले काट मारली, दुसऱ्यावरही काट मारली. नविन केले आणि मग निष्कर्ष काढण्याइतपत प्रगती झाली, शेवटी रिझल्ट्स मिळाले. याला बराच कालावधी लागु शकतो, काही वर्ष, दशक ते शतके. पण आखुन दिल्या प्रमाणे, पुनराखणी करत प्रयोग, नोंदी सुरू राहतात, प्रयोगात सहभागी होणारी माणसं बदलतात,.त्या नोंदींवरून त्यापुढचे संशोधन सुरू रहाते.
इथे श्रद्धेचा भावनेचा प्रश्न नाही. माणुस आहे, भावना टाळता येत नाहीत पण इथे त्या आवरल्या पाहिजेत हे माहीत असतं, मान्य असतं. त्यात काम करणारे कुणी श्रद्धाळू असु शकतात त्यांना त्याची गरजही असु शकते ही वेगळी आणि त्यांची वैयक्तिक बाब झाली, त्याचा संशोधनाशी संबंध नाही.
तत्वज्ञानात सुद्धा असे हायपोथेसिस मांडुन जसजशी नविन माहिती मिळेल, नविन शोध लागतील त्यानुसार बदल होत जातील (व्हायला हवेत.)
गेल्या हजार दोन हजार वर्षात धर्मात आणि अध्यात्मात काय प्रगती झाली? काय प्रयोग झाले? ज्या काही अंधश्रद्धा कमी झाल्या त्या धर्मातील, अध्यात्मातील नव्या प्रगतीमुळे झाल्या की पूर्वीच जे लिहुन ठेवले आहे त्या पासुन फारकत घेऊन उलट अंधश्रद्धा, नसती कर्मकांडं वाढली होती म्हणुन काही संतांनी कळकळीने चांगले उपदेश केले म्हणुन कमी झाल्या? विज्ञानातील प्रगतीमुळे तर झाल्याच, ते वेगळे.
मला वाटते त्या टप्प्यासाठी गरज असलेली श्रद्धा, जिचा उत्क्रांती मोठा वाटा होता, त्यापासुन आपण आता पुढे आलो आहोत, विज्ञानाकडे वळलो आहोत. म्हणजे हयात असलेल्या सगळ्याच पिढ्या किंवा नव्या पिढीतले सगळेच आता तिकडे वळलेत, वळायला हवे असे नाही, पण कालांतराने तेच होईल. आपल्या गरजा बदलल्या आहेत, बदलत आहेत, साधनं बदललेली आहेत, बदलत आहेत, बदलाचा वेग बदलत आहे, मानसिक बदल घडत आहेत. मानसशास्त्राला बरीच प्रगती करावी लागेल, श्रद्धेशिवाय कठीण प्रसंगी मानसिक धैर्य, बळ कसे राखावे हे सगळे शिकतील. पण पुढचा मार्ग विज्ञानाचा असेल, अजुन प्रगती किंवा सर्वनाश म्हणा जे काय ते.
अध्यात्माचे प्रश्नही आता आपणच विज्ञानाने सोडवायचे आहेत. त्यांचें अध्यात्म, यांचे विज्ञान असे काही नाही. कदाचित अध्यात्माच्या प्रश्नांसाठी, गरजेसाठी विज्ञानाला मोठे वळण घ्यावे लागेल/मिळेल, ही जी नविन शाखा आहे - अज्ञात्मविज्ञान - ही पुढे महत्वाची शाखाही होईल.
हे हास्यास्पद वाटु शकते याची कल्पना आहे, पण सध्यातरी असे विचार आहेत.
मानव पृथ्वीकर, छान लिहिले आहे
मानव पृथ्वीकर, छान लिहिले आहे तुम्ही.
मापृ सुरेख विचार मंथन.
मापृ सुरेख विचार मंथन.
क्या बात मानव
क्या बात मानव!! 🧡
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/1ChZsTmqTv/
मन, आत्मा वगैरे काहीही नसतं.
मन, आत्मा वगैरे काहीही नसतं. शरीरातच विविध प्रणाली आहेत ज्यामुळे शरीर स्वतःच विचार करतं.
ईश्वर आपण समजूनच घेऊ शकत नाही. काहीही केलं तरी समजणं कठीण आहे. त्यामुळे ईश्वर आहे किंवा नाही याबद्दल विचार करणे व्यर्थ आहे. ज्यांना आहे असं समजायचंय त्यांना समजू द्यावे आणि ज्यांना नाही असे समजायचेय त्यांना तसे समजू द्यावे, आपसात वाद घालून उपयोग नाही, कारण यातून काहीही निष्पन्न होत नाही. - जर्मन दार्शनिक सॅम्युएल काट.
डॉ. विकास दिवकीर्त यांचे लेक्चर
https://www.youtube.com/watch?v=A0xyLMHsi40
मन, आत्मा वगैरे काहीही नसतं.
मन, आत्मा वगैरे काहीही नसतं. शरीरातच विविध प्रणाली आहेत ज्यामुळे शरीर स्वतःच विचार करतं.
ईश्वर आपण समजूनच घेऊ शकत नाही. काहीही केलं तरी समजणं कठीण आहे. त्यामुळे ईश्वर आहे किंवा नाही याबद्दल विचार करणे व्यर्थ आहे. ज्यांना आहे असं समजायचंय त्यांना समजू द्यावे आणि ज्यांना नाही असे समजायचेय त्यांना तसे समजू द्यावे, आपसात वाद घालून उपयोग नाही, कारण यातून काहीही निष्पन्न होत नाही. - जर्मन दार्शनिक सॅम्युएल काट.
डॉ. विकास दिवकीर्त यांचे लेक्चर
https://www.youtube.com/watch?v=A0xyLMHsi40
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=IO0Z7spadgA&list=WL&index=1&t=1098s
Pages